व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा.
1. तक्रारकर्ता श्रीमती लक्ष्मीबाई दुखराम झिंगरे यांनी त्यांचे ग्राहक क्रमांक 430010181601 अंतर्गत घरगुती वापरासाठी घेतलेली वीज ही तात्पूरती बंद करावी यासाठी रुपये 25/- भरुन विरुध्दपक्ष यांचेकडे अर्ज देवून सुध्दा त्यांनी वीज बंद न केल्यामुळे सदर ग्राहक तक्रार दाखल केली व मागणी केली आहे की, त्यांचा वीज पुरवठा तात्पूरता बंद करण्यात यावा तसेच त्यांना मानसिक त्रासासाठी रुपये 5,000/- व ग्राहक तक्रारीचा खर्च मिळावा.
2. विरुध्दपक्ष त्यांचे लेखी जबाबात म्हणतात की, तक्रारकर्ता यांचा विद्युत पुरवठा बंद करण्यास श्री लेखराम हटवार यांनी आक्षेप घेतल्यामुळे वीज पुरवठा बंद करता आला नाही. त्यांच्या सेवेत न्युनता नसल्यामुळे सदर तक्रार ही खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
3. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांनी दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताऐवज, इतर पुरावा व
..2..
..2..
केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, श्री लेखराम नथ्थु हटवार हे तक्रारकर्ता यांच्या बहिणीचे नातू असून तक्रारकर्ता व त्यांच्यामध्ये नियमीत दिवाणी दावा क्रमांक 72/09 हा जुन-2009 पासून दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे. श्री लेखराम नथ्थू हटवार यांनी दिनांक 20/01/2010 रोजी विरुध्दपक्ष यांना पत्र देवून वीज पुरवठा बंद करु नये असे कळविले आहे. सध्या विवादित घरात श्री लेखराम नथ्थु हटवार हे राहात आहेत, विजेचा वापर करित आहेत व त्यांनी विजेच्या देयकांचा भरणा करण्याची तयारी दर्शविली आहे. तक्रारकर्ता या सदय स्थितीत साकोली येथे वास्तव्यास आहेत.
4. तक्रारकर्ता व श्री लेखराम नथ्थु हटवार यांच्यात विवादित घराबद्दल पार्टीशनचा दिवाणी दावा सुरु असल्यामुळे सदर ग्राहक तक्रारीत श्री लेखराम नथ्थु हटवार हे आवश्यक पार्टी होते परंतू तक्रारकर्ता यांनी त्यांना सदर ग्राहक तक्रारीत पार्टी न केल्यामुळे सदर ग्राहक तक्रार ही खारीज होण्यास पात्र आहे असे विद्यमान मंचाचे मत आहे.
असे तथ्य व परीस्थिती असतांना खालिल आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
तक्रारकर्ता यांनी दाखल केलेली ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात येत आहे.