जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 145/2013 तक्रार दाखल तारीख – 23/09/2013
निकाल तारीख - 18/03/2015
कालावधी - 01 वर्ष , 05 म. 25 दिवस.
मुबारक उस्मानसाब शेख,
वय – 45 वर्षे, धंदा – मजुरी,
रा. बोधेनगर, लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लि.,
तर्फे कार्यकारी अभियंता, सर्कल ऑफीस,
जुना पावर हाऊस, साळे गल्ली,
लातुर.
2) अभियंता,
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लि.,
झोनल ऑफीस, साळे गल्ली, लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. एम.डी.इंगळे.
गैरअर्जदारातर्फे :-एकतर्फा
निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार हा लातुर येथील रहिवाशी आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन विज पुरवठा घेतलेला असून त्याचा ग्राहक क्र. 610550431834 आहे. अर्जदाराचे दोन वर्षापुर्वी जुने मीटर गैरअर्जदाराने बदलुन नवीन मीटर दिले आहे. अर्जदारास जुन 2013 मध्ये विज वापर 100 युनिटचा दाखविला असुन, रिडींगच्या रखान्यात RNA (Reading not available ) असा शेरा दिला असुन, मे 2013 च्या विदयुत बिल रक्कम रु. 10,150/- इतकी आहे. अर्जदाराने जास्तीच्या बिला बद्दल गैरअर्जदार यांच्या अधिका-याशी संपर्क साधला असता थकबाकी असल्याचे सांगून त्रास देत आहे. अर्जदाराने दि. 19/08/2013 रोजी विदयुत बिल दुरुस्त करुन दिल्यास बिल भरण्यास तयार आहे. अशी विनंती गैरअर्जदाराकडे केली आहे. गैरअर्जदाराने बिल दुरुस्त न करुन दिल्यामुळे सदरचे प्रकरण दाखल करण्यात आले आहे. अर्जदाराने तक्रारी अर्जात मीटर रिडींगप्रमाणे विदयुत बिल गैरअर्जदाराने भरुन घ्यावे व मानसिक, शारीरीक त्रासापोटी रु. 5,000/- मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणुन शपथपत्र दिले आहे, व त्यासोबत जुलै-2013 विज बिल व पावती मे 2013 चे विज बिल व पावती, डिसेंबर 2012 चे विज बिल व पावती दाखल केली आहे.
गैरअर्जदाराविरुध्द दि. 02/08/2014 रोजी प्रकरण एकतर्फा करण्यात आले आहे.
अर्जदाराने दाखल केलेला तक्रारी अर्ज, व पुरावा म्हणून दिलेले शपथपत्र, व त्यासोबतची कागदपत्रे याचे अवलोकन केले असता.
अर्जदाराने मोबदला देवून गैरअर्जदाराकडुन विदयुत कनेक्शन घेतलेले आहे. सदरचा मोबदला गैरअर्जदाराने स्विकारल्यामुळे अर्जदार हा ग्राहक होतो. अर्जदाराचा ग्राहक क्र.610550431834 आहे. अर्जदारास दि. 05/08/13 रोजी रक्कम रु. 10,150/- चे विदयुत बिल दिल्याचे दिसुन येते. अर्जदारास दि. 04/07/13 रोजी रु. 440/- चे विदयुत बिल दिले आहे. सदरील बिलावर चालु रिडींगच्या रकान्यात RNA म्हणजे Reading not available असा उल्लेख केला असून, मागील रिडींग 1 अशी नमुद केलेले दिसुन येते. अर्जदाराने सदरचे विदयुत बिल दि. 27/07/2013 रोजी भरले आहे, त्याचा पावती क्र; 2156265 आहे. अर्जदारास दि. 04/06/2013 रोजी विदयुत बिलावर चालू रिडींग RNA व मागील रिडींग 4334 व युनिट 52 दिसुन येते. अर्जदाराने वेळोवेळी विदयुत बिल भरलेले दाखल केलेल्या पावत्यावरुन दिसुन येते. गैरअर्जदाराने अर्जदारास विदयुत वापराप्रमाणे बिल दिल्याचे दिसुन येत नाही. अर्जदारास सदरचे बिल 2275 युनिटचे दिले आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास सदरचे विदयुत बिल देवून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन व सेवेत त्रुटी केल्याचे सिध्द होते. म्हणून अर्जदार हा सदरचे बिल दुरुस्त करुन मिळण्यास पात्र असल्याचे सिध्द होते. अर्जदारास जुन – 2013 चे अतिरिक्त दिलेले विदयुत बिल रक्कम रु. 10,150/- रद्द करुन अर्जदारास महाराष्ट्र विदयुत नियामक आयोग 2005 च्या विदयुत पुरवठा संहितेनुसार अर्जदारास जुन-2013 विदयुत देयक देण्यात यावे, व मानसिक, शारिरीक त्रासापोटी व तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रु. 6,000/- अनुतोष मिळण्यास पात्र आहे. गैरअर्जदाराविरुध्द सदरचे प्रकरण एकतर्फा करण्यात आले आहे, यावरुन गैरअर्जदारास सदरील तक्रारी बद्दल उजर असल्याचे दिसत नाही. हे सदर न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास जुन - 2013 चे रु. 10,150/- चे
बिल रद्द करण्यात यावे..
3) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास जुन – 2013 चे विदयुत
वापराप्रमाणे विदयुत बिल महाराष्ट्र विदयुत नियामक आयोग 2005 च्या विदयुत
पुरवठा संहितेनुसार अर्जदारास विदयुत बिल आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
4) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 3 चे पालन मुदतीत न
केल्यास अर्जदारास रु. 2,000/- दंड देण्यात यावा.
5) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 3,000/- (अक्षरी तीन हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.
3,000/- (अक्षरी तीन हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.