(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे आहे. तक्रारदार हा गैरअर्जदार वीज वितरण कंपनीचा ग्राहक असून, त्याचा ग्राहक क्र.493010033086 असून मीटर क्र.9001155722 हा आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, तो नियमितपणे विद्युत देयकांचा भरणा करतो. गैरअर्जदराराने दि.07.02.2009 रोजी 1108 युनिटचे रक्कम रु.6,100/- चे वेगळया मीटर क्रमांक 16001155722 चे देयक दिले. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे दि.27.07.2009 रोजी मीटरमधे तांत्रिक दोष वाटत असून, मीटरची तपासणी करावी असा अर्ज दिला. त्यानंतर गैरअर्जदाराचे अधिका-यांनी मीटरची तपासणी करुन दि.30.12.2009 रोजी मीटर तपासणी अहवाल दिला. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे काही महिन्यांची देयके चुकीची दिलेली असून, सदर देयके दुरुस्त करुन द्यावीत अशी वारंवार मागणी केली. त्याचा सरासरी वीज वापर (2) 586/10 30 ते 70 युनिट असून गैरअर्जदाराने मीटरी रिडींग घेता अंदाजे युनिटची देयके दिलेली असल्यामुळे तक्रारदाराने भरली नाही. गैरअर्जदारास देयके दुरुस्त करुन योग्य देयके दिल्यास तक्रारदार देयकाची रक्कम भरण्यास तयार आहे असा अर्ज दिला. तक्रारदार पत्र्याचे शेडमधे राहात असून तो कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करीत नाही. गैरअर्जदाराने तक्रारदाराचा वीज पुरवठा दि.24.10.2010 रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता, बेकायदेशीररित्या खंडीत केलेला असल्यामुळे त्यास मानसिक त्रास झाला. अशा प्रकारे गैरअर्जदाराने तक्रारदारास त्रुटीची सेवा दिली, म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून प्रवास खर्च व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीस नोटीसची बजावणी होऊनही ते मंचात हजर झाले नाही. म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा प्रकरण चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला. तक्रारदाराने पुरावा म्हणून दाखल केलेले स्वतःचे शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराच्या वतीने अड.ए.एम.मामीडवार यांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास सप्टेंबर 2008 चे देयकावर मीटर क्र.9001155722 आणि डिसेंबर 2008 पासूने पुढील देयकावर मीटर क्र.1601155722 असा नमूद केलेला आहे. यावरुन गैरअर्जदाराने तक्रारदारास चुकीच्या मीटर क्रमांकाची देयके दिलेली असल्याचे स्पष्ट होते. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे दि.27.07.2009 रोजी मीटरमधे तांत्रिक दोष वाटत असून, मीटरची तपासणी करावी असा अर्ज दिला व सदर अर्ज गैरअर्जदारास त्याच दिवशी प्राप्त झाल्याचे गैरअर्जदाराचे ऑफीसचे सही, शिक्क्यावरुन दिसून येते. त्यानंतर गैरअर्जदारांचे अधिका-यांनी तक्रारदाराचे मीटरची तपासणी करुन दि.30.12.2009 रोजी मीटर तपासणी अहवाल दिला. सदर मीटर तपासणी अहवाल पाहिला असता, त्यामधे मीटर क्र.15572 एवढाच नमूद केलेला असून, मीटर रिडींग 11204, सील पोझीशन व ग्लास पोझीशन ओ के नमूद केली आहे, आणि गैरअर्जदाराचे ज्युनिअर इंजिनिअरने “pl. issue as per actual” असा शेरा लिहिलेला आहे. तसेच एकूण लोड या रकान्यासमोर व वापरण्यात येणा-या विद्युत उपकरणांसमोर काहीही लिहिलेले नाही. या मीटर तपासणी अहवालावरुन गैरअर्जदार तक्रारदारास अंदाजे युनिटचे व जास्तीच्या वीज वापराचे देयके देतात हे स्पष्ट होते. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचा वीज पुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता, दि.23.10.2010 रोजी खंडीत करणे चुकीचे आहे. त्यानंतर तक्रारदाराने दि.26.10.2010 (3) त.क्र.586/10 रोजी काही महिन्यांची चुकीची देयके देण्यात आलेली आहेत, ती देयके दुरुस्त करुन दिल्यास तक्रारदार देयकाची रक्कम भरण्यास तयार असल्याचा अर्ज गैरअर्जदारांकडे दिला व सदर अर्ज देखील गैरअर्जदारास त्याच दिवशी प्राप्त झाल्याचे दिसून येते. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदार यांना दिलेली देयके चुकीची असून, तक्रारदाराने वारंवार देयके दुरुस्त करुन दयावीत अशी मागणी करुनही देयके दुरुस्त करुन दिली नाहीत, आणि त्यांच्या तक्रारीबददल कोणतीही कार्यवाही मुदतीमधे केली नसल्याचे दिसून येते. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या ज्युनिअर इंजिनिअरने तक्रारदारास त्याच्या वीज वापराप्रमाणे देयके द्यावीत असा शेरा मीटर तपासणी अहवालामधे नोंदवूनही गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास देयके दुरुस्त करुन दिली नाहीत. अशा प्रकारे गैरअर्जदाराने तक्रारदारास त्रुटीची सेवा दिली असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास अंदाजे युनिटची व चुकीच्या मीटर क्रमाकांची देयके दिल्यामुळे मानसिक त्रास होणे साहजिकच आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने देयके दुरुस्त करुन द्यावीत अशी मागणी प्रस्तुत तक्रार अर्जात केली नाही, परंतू गैरअर्जदाराने तक्रारदाराचा वीज वापर किती झाला याची योग्य ती तपासणी करुन तक्रारदाराच्या विद्युत वापराप्रमाणे व त्याच्याच मीटर क्रमांकाची योग्य बिले देणे आवश्यक आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदाराने प्रवास खर्च रु.1,000/- मागितला आहे, परंतू त्याने प्रवास केला यासंबंधी कोणताही पुरावा दाखल केला नाही. म्हणून त्याची ही मागणी मान्य करता येणार नाही. परंतू गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रु.2,000/- देणे न्यायाच्या दृष्टीने योग्य आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.2,000/- निकाल काळाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावेत. 3) खर्चाबाबत आदेश नाही. 4) संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |