::: आ दे श :::
( पारित दिनांक : 31/10/2017 )
माननिय सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणात, अर्जदार/तक्रारकर्ता यांनी, दिनांक 05/10/2017 रोजी, लेखी पुरसिस, रेकॉर्डवर सादर केली, त्यामधील मजकूराचा, थोडक्यात आशय, आढळून येतो, तो येणेप्रमाणे -
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाविरुध्द भरमसाठ विद्युत बिल आकारणीबाबत तक्रार दाखल केली. परंतु त्यानंतर, बिलामध्ये विरुध्द पक्षाने दुरुस्ती करुन विद्युत मिटर रिडींगप्रमाणे तक्रारकर्त्याला बिल दिले व ते तक्रारकर्त्याने भरले असल्यामुळे, आज रोजी विरुध्द पक्षाविरुध्द कोणतीही तक्रार राहिली नाही. तरी प्रस्तुतचा तक्रार अर्ज काढून टाकण्यात यावा.
अशास्थितीत, सदर तक्रार प्रकरणातील कार्यवाही, कायमची, येथेच, थांबविण्यात येत असून, सदर तक्रार, नस्तीबध्द करण्याचे निर्देश, देण्यात येत आहेत व अशाप्रकारे, सदर तक्रार प्रकरण, कायमचे, निकाली काढण्यात येत आहे.
(श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri