(घोषित दि. 29.12.2014 व्दारा श्री सुहास एम आळशी, सदस्य)
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून वीज जोडणी घेतलेली असुन त्यांचा ग्राहक क्रमांक 510030223321 असा आहे. अर्जदार यांना डिसेंबर 2013 मध्ये गैरअर्जदार यांनी चुकीचे देयक रुपये 1,41,180/- दिले. त्याबाबत अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे देयक दुरुस्ती करुन देण्याची विनंती केली. त्यानंतर गैरअर्जदार यांनी देयक दुरुस्ती करुन अर्जदार यांना रुपये 60,000/- देयक भरणा करण्यास सांगितले. त्यानंतर अर्जदार यांनी सदरील देयक दिनांक 17.01.2014 रोजी भरणा केलेले आहे. सदर देयक भरणा करण्यापुर्वी गैरअर्जदार यांनी अर्जदार यास दिनांक 16.09.2013 रोजी रुपये 96,599/- रुपयाचे देयक दिले होते. त्या देयकाची दुरुस्ती करुन अर्जदाराने दिनांक 06.03.2014 रोजी रुपये 30,000/- च्या देयकाचा भरणा केला. अशा प्रकारे अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडून वेळोवेळी देयकांची दुरुस्ती करुन भरणा केलेला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना योग्य सेवा न देता त्रुटीची सेवा दिलेली आहे.
गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचेकडे कोणतीही थकबाकी नसताना दिनांक 21.01.2014 रोजी रुपये 1,47,310/- चे देयक दिलेले आहे. परंतु अर्जदाराने याच महिन्यात गैरअर्जदार यांचेकडे दिनांक 17.01.2014 रोजी रुपये 60,000/- च्या देयकाचा भरणा केलेला असतांना पुन्हा गैरअर्जदार यांनी दिनांक 21.01.2014 रोजी अर्जदार यांना वरील प्रमाणे रुपये 1,47,310/- चे देयक देऊन त्रुटीची सेवा दिलेली आहे. तसेच सदर देयकाचा भरणा न केल्यास त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची धमकीही अर्जदार यांना दिेलेली असल्याने अर्जदार यांनी मंचात तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांनी दिनांक 21.01.2014 रोजी दिलेल्या देयकामधून भरणा केलेले देयक रक्कम रुपये 60,000/- व रुपये 30,000/- वजा करुन सुधारीत देयक देण्याची विनंती केलेली आहे. तसेच मानसिक त्रासा बाबत रुपये 25,000/- व प्रकरणाचा खर्च म्हणून रुपये 5,000/- ची मागणी अर्जदार यांनी मंचास केली आहे.
गैरअर्जदार हे मंचा समोर हजर झाले. त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. ते जबाबात म्हणतात की, अर्जदार हा कमर्शिअल ग्राहक असल्याने व अर्जदारास कलम 126 अन्वये विद्यत देयक देण्यात आलेले असुन अर्जदाराने सदर देयकास आव्हान दिलेले आहे व 126 अन्वये दिलेल्या विद्युत देयकाबाबत कायद्याने मंचात गैरअर्जदार यांचे विरुध्द तक्रार दाखल करता येत नाही व त्यास आता मुदतही नाही.
अर्जदार यांनी घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेऊन बेकायदेशीर वीज वापर हॉटेल व्यवसायासाठी करीत होता. अर्जदाराच्या वीज मिटरची तपासणी करण्यासाठी भरारी पथकाचे उप कार्यकारी अभियंता व त्यांचे सहकारी दिनांक 10.09.2013 रोजी त्यांना असलेल्या अधिकारानुसार गेले असता अर्जदाराने वीज पुरवठा हा घरगुती कारणासाठी घेऊन प्रत्यक्षात हॉटेल व्यवसायासाठी म्हणजे कमर्शिअल वापरासाठी करण्यात येत होता. ही बाब तपासणी अधिकारी यांच्या तपासात निष्पन्न झाली. अर्जदाराचा वीज पुरवठा हा श्रीमती बसंताबाई भैय्यालाल सुरा यांचे नावे असुन प्रत्यक्षात वीज वापर हा दिलीप मेहरा हे हॉटेल व्यवसायासाठी करीत होते. सदर बाब वीज ग्राहक व उपभोक्ता वीज ग्राहक यांचे निर्देशनास आणून सर्वांसमक्ष स्थळ पाहणी अहवाल व इतर आवश्यक कागदपत्र तयार करण्यात आले. त्यावर सर्वांच्या स्वाक्ष-या आहेत. ग्राहक वीजेचा वापर कमर्शिअल वापरासाठी करत होता. परंतु वीज देयक हे घरगुती दराने जमा करीत होता. त्यामुळे गैरअर्जदाराची फसवणूक व अर्थिक नुकसान अर्जदार यांनी केलेले आहे. म्हणून अर्जदार यांची तक्रार फेटाळण्यात यावी व अर्जदार यांचेकडून गैरअर्जदार यांना नुकसान भरपाई म्हणून रुपये 10,000/- मिळावेत.
गैरअर्जदार यांचे विव्दान वकील श्री.जी.आर.कड यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. अर्जदार यांची तक्रार, गैरअर्जदार यांचे लेखी निवेदन व दाखल कागदपत्र यांच्या अभ्यासावरुन मंचाच्या खालील मुद्दे विचारात येतात.
मुद्दे निष्कर्ष
1.अर्जदार यांची तक्रार चालविण्याचा
अधिकार मंचास आहे काय ? नाही
2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणमिमांसा
मु्द्दा क्रमांक 1 साठी – अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून वीज जोडणी घेतलेली असुन त्यांचा ग्राहक क्रमांक 510030223321 असा आहे. अर्जदार यांना डिसेंबर 2013 मध्ये गैरअर्जदार यांनी चुकीचे देयक रुपये 1,41,180/- दिले. त्याबाबत अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे देयक दुरुस्ती करुन देण्याची विनंती केली. त्यानंतर गैरअर्जदार यांनी देयक दुरुस्ती करुन अर्जदार यांना रुपये 60,000/- देयक भरणा करण्यास सांगितले. त्यानंतर अर्जदार यांनी सदरील देयक दिनांक 17.01.2014 रोजी भरणा केलेले आहे. सदर देयक भरणा करण्यापुर्वी गैरअर्जदार यांनी अर्जदार यास दिनांक 16.09.2013 रोजी रुपये 96,599/- रुपयाचे देयक दिले होते. त्या देयकाची दुरुस्ती करुन अर्जदाराने दिनांक 06.03.2014 रोजी रुपये 30,000/- च्या देयकाचा भरणा केला. अशा प्रकारे अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडून वेळोवेळी देयकांची दुरुस्ती करुन भरणा केलेला आहे. ही बाब तिने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन दिसुन येते.
तसेच गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या नि.15 वरील लेखी जबाबाचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, अर्जदार हिला गैरअर्जदार यांनी जो वीज पुरवठा दिलेला आहे तो व्यवसायीक स्वरुपाचा आहे. सदर बाब अर्जदार हिने दाखल केलेल्या नि.5/3 वरील दाखल केलेल्या देयकानुसार सुध्दा दिसुन येते. तसेच वाणिज्य प्रयोजना करिता जो वीज पुरवठा देण्यात येतो त्या संबंधिताचा कोणताही वाद हा विद्यमान ग्राहक मंचाचे अधिकार क्षेत्रात येत नाही. अर्जदाराच्या वीज मिटरची तपासणी करण्यासाठी भरारी पथकाचे उप कार्यकारी अभियंता व त्यांचे सहकारी दिनांक 10.09.2013 रोजी त्यांना असलेल्या अधिकारानुसार गेले असता अर्जदाराने वीज पुरवठा हा घरगुती कारणासाठी घेऊन प्रत्यक्षात हॉटेल व्यवसायासाठी म्हणजे कमर्शिअल वापरासाठी करण्यात येत होता. ही बाब तपासणी अधिकारी यांच्या तपासात निष्पन्न झाली. अर्जदाराचा वीज पुरवठा हा श्रीमती बसंताबाई भैय्यालाल सुरा यांचे नावे असुन प्रत्यक्षात वीज वापर हा दिलीप मेहरा हे हॉटेल व्यवसायासाठी करीत होते. तसेच गैरअर्जदार यांनी अर्जदार हिला जे विद्युत देयक दिलेले आहे ते विद्युत देयक भारतीय वीज कायद्याच्या कलम 126 नुसार आकारणी करुन देण्यात आलेले आहे व मा.सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या U.P. Power Corporation V/s. Anis Ahemad या न्यायनिर्णयानुसार भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 126 प्रमाणे दिलेल्या वीज देयकाबाबतचा वाद चालवण्याचा या मंचाला अधिकार नाही. त्यामुळे वरील कारणास्तव अर्जदार हिचा अर्ज या ग्राहक मंचात चालविता येऊ शकणार नाही. करिता मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देऊन विद्यमान मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- अर्जदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.