Maharashtra

Osmanabad

CC/14/10

Sahebrao Ganpatrao Doke - Complainant(s)

Versus

Executive Engineer MSEDCL - Opp.Party(s)

vaishali dhavne

19 Aug 2015

ORDER

DISTRICT CONSUMER REDRESSAL FORUM OSMANABAD
Aria of Collector Office Osmanabad
 
Complaint Case No. CC/14/10
 
1. Sahebrao Ganpatrao Doke
R/o Ganesh Nagar Osmanabad
Osmanabad
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Executive Engineer MSEDCL
Osmanabad
Osmanabad
Maharashtra
2. Assitant Engineer Maharashtra state electricity distribution co.ltd.
MSEDCL Osmanabad
Osmanabad
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.V. Kulkarni. PRESIDENT
 HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN MEMBER
 HON'BLE MR. M.B. Saste MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

ग्राहक तक्रार  क्र.   10/2014

                                                                                     दाखल तारीख    : 08/01/2014

                                                                                     निकाल तारीख   : 19/08/2015

                                                                                    कालावधी: 01 वर्षे 08 महिने 11 दिवस

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, स्‍मानाबाद

1.   श्री. साहेबराव पि. गणपतराव डोके,

     वय -65 वर्षे, धंदा – शेती,

     रा.गणेश नगर, उस्‍मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद.             ....तक्रारदार

                            

                            वि  रु  ध्‍द

1.    कार्यकारी  अभियंता श्री.

महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी लि.,

उस्‍मानाबाद, ता.जि. उस्‍मानाबाद.  

 

2.    मा. सहाययक अभियंता,

      म.रा.वि.वि. कं. उस्‍मानाबाद.                          ..विरुध्‍द  पक्षकार

 

कोरम :       1)  मा.श्री.एम.व्‍ही.कुलकर्णी, अध्यक्ष.

                                    2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्‍या.

                  3)  मा.श्री.मुकुंद बी.सस्‍ते, सदस्‍य.

           

                               तक्रारदारांतर्फे विधीज्ञ    :  श्री.वैशाली धावणे.

                       विरुध्‍द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री.व्‍ही.बी.देशमूख.

                        न्‍यायनिर्णय

मा. सदस्‍या श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्‍दारा:

अ) 1)   अर्जदार साहेबराव डोके हे गणेशनगर उस्‍मानाबाद येथील रहिवाशी आहेत. त्‍यांनी विप यांचे विरुध्‍द नुकसान भरपाईची तक्रार दाखल केलेली आहे.

 

2)   अर्जदार यांना मौजे शेरकर वडगा ता. जि. उस्‍मानाबाद येथे जमीन सर्वे 294 क्षेत्र 2 हे 6 आर ही जमीन मिळकत असून सदर जमीनीत अर्जदाराचे मालकीची स्‍वतंत्र विहिर असून सदर विहिरीवर मोटारी करीता विद्युत पुरवठा घेतलेला आहे. त्‍यांचा ग्राहक न.590010278491 असा आहे व ते ग्राहक आहेत.

 

3)   अर्जदाराची जमिन बागायत आहे व ते बागायती पिके घेतात व अर्जदाराच्‍या शेतातून विप यांची उत्‍तरपश्चिीम 11 के व्‍ही ची वाहीनी वाय फेज गेलेली आहे. आणि वायफेज इन्‍सूलेटर मधून विदयूत प्रवाह बाहेर येऊन तो पोलच्‍यासंपर्कात येऊन स्‍पर्किंग होऊन तार तुटून ठिणग्‍या उसाचे पाचटावर पडल्‍या व त्‍यामुळे ऊसाने पेट घेऊन संपूर्ण उस व ठिबक  जळून खाक झाला सदर घटनेची आकस्‍मात जळीत घटना क्र.7/13 अन्‍वये नोंद करुन  पंचनामा केला व तलाठी सज्‍जा उस्‍मानाबाद यांनी जाय मोक्‍यावर पंचनामा केला. घटना ही लाईटच्‍या तारा तुटून ठिणग्‍या पडल्‍यामुळे घडलेली असल्‍याचे स्पष्‍टपणे नमुद केलेले आहे व तसा अहवाल तलाठी यांनी दिलेला आहे तसेच विद्युत निरीक्षक अहवाल दि.14/08/2013 रोजी दिलेला आहे तसेच अर्जदारानी वेळोवेळी विप यांना विनंती करुनही नुकसान भरपाई अदा केलेली नाही. अर्जदाराने दि.05/06/2013 रोजी मे. जिल्‍हाधिकारी रा. उस्‍मानाबाद यांचेकडे अर्ज देऊन नुकसान भरपाई देणेबाबत निर्देशित करणेची विनंती केली होती. त्यानुसार जिल्‍हाधिकारी उस्‍मानाबाद यांनी त्‍यांचे दि.07/06/2013 रोजीचे पत्र जा.क्र. 2013/महसुल/ नैआ /1/ काकि/371 अन्‍वये विप यांचे अर्जावर योग्य ती कार्यवाही करुन उत्‍तर देणेबाबत आदेशीत केले. परंतू अद्याप पावेतो कसल्‍याही प्रकारचे उत्‍तर दिले नाही व रक्‍कम ही दिली नाही. अर्जदाराचा उस चांगल्‍या प्रकारे जोपासना केलेली असल्‍याने अर्जदारास 4 लाखापेक्षा जास्‍त ऊस मिळाला असता. अर्जदाराचे ठिबक ही जळून खाक झालेल आहे. अर्जदाराने वेळोवेळी अर्ज देऊन रकमेची मागणी केली परंतु रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केलेली आहे. म्हणून अर्जदाराने प्रस्‍तुतच्‍या तक्रारीमार्फत उसाचे रु.4,00,000/- ठिबक सिंचनाचे रु.1,50,000/-, मानसिक शारीरिक त्रासाचे रु.20,000/-, खर्चापोटी रु.10,000/- असे एकूण रु.5,80,000/- घटना घडल्या दिवसापासून 12 टक्‍के व्‍याज दराने देण्‍याचा आदेश व्‍हावा अशी विनंती केलेली आहे.

 

ब) 1.  विप यांनी अभिलेखावर म्‍हणणे दाखल केले आहे त्‍यांचे म्हणणे नुसार अर्जदाराची जमीन बागायत आहे व तो पीक घेत होता यांची माहिती नाही, उसाची लागवड केली होती हे म्हणणे खोटे असल्‍याचे म्‍हंटले आहे. तक्रारदाराच्‍या शेतातून 11 केव्‍ही ची उच्च दाब वाहीनी गेली हे खरे आहे हे मान्‍य आहे. परंतु घटना घडलेली अमान्‍य केलेली आहे. सदरची घटना पाहिलेली नसतांना विद्युत ठिणग्‍या पडून घडली आहे असे सांगून पंचनामे केले त्‍यामुळे त्‍याचा इन्‍कार केला जातो. ठिबक संच जळाला नसतानाही ठिबक संच जळाला असा उल्‍लेख केलेला आहे. ठिबक संच पाईप जमिनीत असल्‍याने व जे लोखंडी सामान असते ते जळू शकत नसते परंतु विप कडून पैसे मिळावेत म्हणून ठिबक संचाचा खोटा मजकूर लिहिली आहे.

 

2.   सदर घटनेस विप जबाबदार नसल्‍याने नुकसान भरपाई मागण्‍याचा अधिकार नाही. चार लाखापेक्षा जास्‍त उत्‍पन्‍न मिळाले असते हा खोटा मजकूर लिहिलेला आहे. उत्‍पन्‍नाबाबत पुरावा नाही. ऊस कारखान्‍यास गेलेला आहे. सदरची घटना स्‍पार्किंगमुळे घडलेली नसल्‍याने सरकार कडून नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून कलेक्टरकडे अर्ज देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्‍यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विनंती अर्जदाराने केलेली आहे. अर्जदाराने तक्रारी सोबत विज देयके, 7/12 विप कडे दिलेला अर्ज, जिल्‍हाधिकारी यांचा अधिक्षक अभियंता उस्‍मानाबाद यांना अर्ज, पोलिस निरीक्षक उस्‍मानाबाद यांना अर्जदाराचा अर्ज, घटनास्‍थळ पंचनामा, तहसिलदार उस्‍मानाबाद यांना अर्जदाराचा अर्ज, तहसिलदार यांचा पंचनामा, विद्युत निरीक्षकाचा अहवाल इ. कागदपत्राचे सुक्ष्‍म अवलोकन केले. दोन्‍ही विधिज्ञांनी दिलेला लेखी युक्तिवाद वाचला व तोंडी युक्तिवाद ऐकला असता आमचे विचारार्थ सदर प्रकरणात खालील प्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.

         मुद्दे                                   उत्‍तर

1) विप ने अर्जदार यांना देण्‍यात येणा-य सेवेत त्रुटी केली का

   आणि विप यांचे निष्‍काळजीपणामुळे अर्जदार यांचे

   उस पीक जळाल्‍याचे सिध्‍द होते का ?                             होय.

2) अर्जदार उसाची व ठिबक संच जळाल्‍याची नुकसान भरपाई

   मिळण्‍यास पात्र आहे का ?                                     होय.

3) काय आदेश ?                                        शेवटी दिल्‍याप्रमाणे.

                          कारणमिमांसा

मुद्दा क्र.1 व 2 :

1.    अर्जदाराने अभिलेखावर 7/12 उतारा, अर्जदार यांचे नावावर निर्गमित वीज आकार देयक इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. वास्‍तविक पाहता विप यांनी अर्जदार यांनी ऊस पिकाची लागण केल्याचे व शॉर्टसर्किट मुळे आग लागल्‍याचे अमान्‍य केले असले तरी अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्राचे खंडन करण्‍यासाठी व लेखी म्‍हणण्‍याच्‍या समर्थनार्थ उचित पुरावे अभिलेखावर दाखल केलेले नाहीत त्‍यामुळे मंचा समोर दाखल कागदपत्रावरुन अर्जदारांने ऊस पिकाची लागण केली होती आणि त्‍यांच्‍या शेतात एक स्‍वतंत्र विहिर आहे व त्‍यासाठी विप यांचे कडून विज पुरवठा घेत होते हे स्‍पष्‍ट होते.

 

2.    अर्जदाराचे ऊस पीक विद्युत तारांमधील घर्षणामुळे स्‍पार्किंग होऊन निर्माण झालेल्‍या ठिणग्यामुळे जळाले नसल्‍याचे विप यांनी नमुद केले असले तरी त्‍यांचे अख्‍त्‍यारीतील 11 केव्‍ही क्षमतेची तार तुटल्‍याने सदर घटना घडलेली आहे हे विप यांना मान्‍य करावेच लागेल. विप यांनी विद्युत तार तुटून दुर्घटना झाली त्‍याबाबत काय उचित कार्यवाही केली याचा कोणताही खुलासा किंवा कागदोपत्री पुरावा अभिलेखावर दाखल केला नाही. आमच्‍या मते अर्जदाराच्‍या शेतात उभ्‍या उसलेल्‍या ऊस पिकामध्‍ये तार तुटून पडण्‍याची क्रिया घडताना तारा एकमेकास घर्षण होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही आणि त्‍यामुळे ठिणग्या पडल्‍या व अर्जदाराचे ऊस पीक जळाले.

 

3.  विप यांचे कथनाप्रमाणे पोलिस पंचनामा व जबात नोंदविताना विप ला कळविलेले नाही. वास्‍तविक पाहता पंचनामा करणारी यंत्रणा स्‍वतंत्र असल्‍याचे पोलिस खात्‍याने पंचनामा किंवा जबाबात नोंदवितांना विप यांना बोलावले नसल्‍यास त्‍यास अर्जदास जबाबदार धरता येणार नाही उलट अर्जदाराच्‍या शेतातुन विदयूत वाहीनीची तार तुटल्‍याची माहिती असतांना व ऊस जळीत दुर्घटना घडल्‍यानंतर विप यांनी स्‍वत: काय कार्यवाही केली याचा उलगडा केला नाही केवळ तार तुटल्‍यामुळे व घर्षणामुळे ठिणग्‍या खाली पडल्‍या नाहीत व त्‍यामुळे पीक जळाले नाही हे त्‍यांचे म्‍हणणे पुराव्‍या अभावी मान्‍य करण्‍यास कठीण ठरते. विद्युत निरीक्षकांनी पत्राव्‍दारे जळीत उसाबाबत अभिप्राय अहवाल दिलेला आहे तो असा.

 

4.   दि.16/04/2013 रोजी श्री. नितीन साहेबराव डोके यांचे शेतातील उसाला 11 केव्‍ही उच्‍च दाब वाहिणीचा वाय फेज जोराच्‍या वा-यामुळे इन्‍सुलेटर मधून बाहेर येऊन पोलच्‍या संपर्कात येऊन स्‍पार्किंग होऊन ठिणग्‍या खाली पडल्‍याने खाली असणारे वाळलेले पाचट पेटले व उसाने पेट घेतला

 

5.   निर्विवादपणे विजेचे वितरण व पुरवठा करण्‍यासाठी उभारलेल्‍या उपरी तार मार्ग त्‍यांचे सलग्‍न विद्युत संच मांडणी ग्राहकांना वीज जोडणी देण्‍यात येणारी सर्व्‍हीस वायर इ. बाबत वेळोवेळी आवश्‍यक देखभाल व दुरुस्‍ती करुन सुरक्षित ठेवण्‍याची जबाबदारी विद्युत वितरण कंपनीवर आहे. आमच्‍या मते विद्युत दुर्घटना घडण्‍यामागे मानवी चुका निकृष्‍ट देखभाल विद्युत उपकरणांची चुक, अप्रशिक्षीत कर्मचारी वर्ग यांच्‍यातील असमन्‍वय यासह अनेक कारणे असू शकतात विद्युत व कायद्यानुसार अशा दुघर्टनाची चौकशी करण्‍याचे अधिकार विद्युत निरीक्षकांना आहेत आणि विद्युत दुर्घटनांची चौकशी करण्‍यासाठी ते सक्षम व तज्ञ व्‍यक्ति आहे.

 

6.  अर्जदाराच्‍या उभ्‍या असलेल्‍या उस पिकावर विद्युत वाहीणीची तार तुटून पडल्याने निर्माण झालेल्‍या ठिणग्‍यामुळे ऊस पिकाने पेट घेतला हे सिध्‍द करण्‍यासाठी अभिलेखावर आवश्‍यक व पुरेसे कागदपत्रे दाखल केलेले आहेत विजेच्‍या ठिणगया हया आग स्‍वरुपात असल्‍याने उसाचे पेट घेतला हे मान्‍य करावे लागेल. ऊस जळीत घटनेबाबत विद्युत निरीक्षकांनी नोंदविलेला अभिप्राय पाहता अर्जदाराचे ऊस पीक केवळ विप यांचे निष्‍काळजीपणामुळे जळाल्‍याचे व त्‍यांच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे सिध्‍द होते या निर्णयाप्रत आम्‍ही आलो आहोत. 

 

7.   विरुध्‍द पक्ष यांनी मा. राष्‍ट्रीय आयोगाचे रिव्‍हीजन पिटीशन 123/1993 चा आधार घेऊन सेवेत त्रुटी केली नाही आणि तक्रार मंचासमोर चालू शकत नाही असे म्‍हंटल आहे; परंतु सदर निवाडयात पुढे असे म्‍हंटले आहे की, Electric energy to some other consumer and if the like was defective it cannt to be said that there was deficiency in service to the complainant in his capacity as consumer of electricity from the electricity board.  असे तत्‍व निवाडयात विषद केलेले आहे परंतु सदर प्रकरणात अर्जदाराच्‍या नावाने विज देयक अभिलेखावर आहे व अर्जदाराला विप ने विद्यूत पुरवठा दिलेला आहे व अर्जदार विप चा ग्राहक आहे. त्यामुळे विप ने दाखल केलेला निवाडा सदर प्रकरणात लागू पडत नाही.

 

8.  तसेच मा.राज्‍य आयोग मुंबई यांचे कडेचे रजि क्र.2238/005 The Executive Engineer  V/s Mr. Vithal अशा निर्णयाचा आधार घेऊन अशा प्रकारचा विवाद ‘’ ग्राहक विवाद’’ होऊ शकत नाही आणि तक्रार मंचासमोर चालू शकत नाही असे म्हंटले आहे म्‍हणून अपिल कर्त्‍याचे अपिल मंजूर केलेले आहे.

 

9.   तसेच 1 (2010) PJ 63 राज्‍य आयोग रायपूर येथील छत्‍तीसगड स्‍टेट इलेक्‍ट्रीसिटी बोर्ड व इतर विरुध्‍द गोवर्धन प्रसाद शरंधर या निवाडयाचा आधार घेऊन अपिलातील विरुध्‍दपक्ष ग्राहक नाही आणि सदर कनेक्‍शन त्‍यांचे वडिलाचे नावे आहे म्‍हणुन तो ग्राहक नाही असे तत्‍व विषद करुन अपिल मंजूर केलेले आहे. मा. राज्‍य आयोगांच्‍या निर्णयाचा आधार घेऊन ऊस जळीत दुर्घटनेकरीता जबाबदारी निश्चित करण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे. परंतु उस पीक जळण्‍याच्‍या घटनेकरीता जाबाबदारी निश्चित करण्‍याबाबत मा.राष्‍ट्रीय मा. राष्‍ट्रीय आयोगाने दिलेल्या निवाडयाचा आम्‍ही परमर्श करीत आहोत मा. राष्‍ट्रीय आयोगाने कर्नाटक पॉवर ट्रान्‍समिशन कार्पा. लि. विरुध्‍द मनी थॉमस 2 (2006) C.P.I.245 (N.C.)  या निवाडयात विद्युत तारांच्‍या एकमेकाशी स्पर्श होऊन उडालेल्‍या ठिणग्‍यामुळे जळालेल्‍या पिकाच्‍या नुकसानीस कर्नाटक पॉवर ट्रान्‍समिशन कार्पा लि. यांना जबाबदार धरुन त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी असल्‍याचे म्हंटले आहे. असेच तत्‍व मा.राष्‍ट्रीय आयोगाने दि.असिस्‍टंट एकझीक्‍यूटीव्‍ह इंजिनीअर, इुबळी/विरुध्‍द/श्री.निलकंठ गौंडा सिध्‍द गौडा 1986-2004 कंझ्यूमर 7145 (N.S.) या निवाडयात विषद केले आहे.

 

10.  विरुध्‍द पक्ष यांच्‍या सेवेत त्रुटी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. अर्जदार हे विरुध्‍द पक्ष यांचे कडून ऊस पीक व ठिबक सिंचन संचाच्‍या नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र ठरतात. अर्जदाराने 2 हे 6 आर. एवढया क्षेत्रात लागवड केली होती व त्‍यासाठी 4,00,000/- (रुपये चार लक्ष फक्‍त) एवढी मागणी केलेी आहे तसेच ठिबक जळाल्‍यापोटी रु.1,50,000/- ची मागणी केलेली आहे. अर्जदार यांनी 5 एकर क्षेत्रातील ऊस पीक जळाल्‍यामुळे प्रति एकर 30 टनाप्रमाणे 150 टन ऊस उत्‍पादन व प्रतिटन रु.2,500/- दर गृहीत धरुन रु.3,75,000/- नुकसान भरपाई देणे आवश्‍यक वाटते असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

तसेच 2012 STPL(CL) 3306 NC  मा.राष्‍ट्रीय आयोग (दिल्‍ली)यांनी Dakshin Haryana Bijali Vitran Nigam Ltd. Vs. Gurujan Singh. या निवाडयात असे तत्‍व विषद केलेले आहे की,

6. We do not agree with him. He is the grandson of the ‘Consumer’ and as such, covered in the definition of  ‘Consumer’. They are paying the electric bill and thus have privity of contract with the respondent.  This argument was raised merely for its outright rejection.

 

7. The Second submission made by the Counsel for the petitioners is that the amount granted by the state Commission is on the higher side.

 

8.   We are not in agreement with the learned Counsel for the petitioners. The view taken by the State Commission is just and reasonable. It is pity that the life of a poor ‘Consumer’ costs only a paltry amount of Rs.3,00,000/-. The State Commission has taken a lenient view and , therefore, we do not interfere with it. The revision petition is dismissed.

 

    वरील विषद तत्‍व पाहता असे लक्षात येते कि अर्जदार हा वितरण कंपनीचे विज देयकाचा भरणा करत आलेला आहे. त्‍यामुळे अर्जदार हा ग्राहक होतो आणि वितरण कंपनीने केलेले रिव्‍हीजन पिटीशन खारीज केलेले आहे.  तसेच 2005 (LG Civil) 44713 I & K State of J&k ors V/s Mushtaq Ahmad Wani and Ors. All the witness examined by the plaintiff/respondents have deposed in one voice that deceased Shaban Wani died due to electrocution on 2 nd of July, 1996 at his field when he came in touch with walnut tree.  The said walnut tree was connected with gay wire.  High Tension Line without insulators and was carrying electric current which resulted into death of the deceased. The deceased was farmer by profession and was dealing with fruit business. He was earning Rs.5,000/- per month and his age was 27 years at the relevant point of time.  The witnesses have categorically deposed that death of the deceased was outcome of negligence of the defendants.  

    सदर प्रकरणात ही हाय टेन्‍शन वायरच्‍या वायफेज जोराच्‍या वा-यामुळे इन्‍सुलेटर मधून बाहेर येऊन पोलच्‍या संपर्कात येऊन ठिणग्या खाली पडल्याने ऊसाचे पाचटाने पेट घेतलेला आहे.

 

    वर नमूद न्‍यायनिवाडयात असे तत्‍व विषद केलेले आहे की, हाय टेन्‍शन लाईन च्‍या इन्‍सूलेटरच्‍या वायरमध्‍ये करंट होता व त्‍या उघड्या हाय टेन्‍शनच्‍या वायर मधील करंट हा वॉलनट ट्री मध्‍ये उतरला त्‍या वॉलनट ट्रीच्‍या संपर्कात व्‍यवसायाने शेतकरी असलेला अर्जदार आला त्‍याला हाय टेन्‍शन लाईनचा शॅक बसून तो मृत्‍यू पावला आणि ही सर्व जबाबदारी वितरण कपंनीच्‍या निष्‍काळजीपणामुळे झाली असे स्‍पष्‍ट केल्‍याने व सदर न्‍यायनिवाडयातील अर्जदार हा वितरण कपंनीचा ग्राहक आहे. आणि हाय टेन्‍शन लाईनच्‍या संपर्कात आल्‍याने हा ग्राहक वाद होतो. त्‍यामुळे नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे.

 

     त्‍याच प्रमाणे सदर प्रकरणात ही अर्जदाराच्‍या शेता मधील High tension ची वायर गेलेली आहे आणि त्‍याचा इन्‍सुलेटर मधून बाहेर येऊन पेालच्‍या संपर्कात येऊन स्‍पार्किंग होऊन ठिणग्‍या खाली पडल्याने खाली असणारे वाळलेले पाचट पेटले व उसाने पेट घेतला आणि हा वाद ग्राहक वाद आहे त्‍यामुळे वरील नमूद मा.उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा या प्रकरणात तंतोतंत लागू होतो असे आमचे मत आहे निश्चितच भारत हा शेती प्रधान देश आहे आणि 80 टक्‍के जनता ही शेतीवरच अवलंबून आहे आणि या शेतक-याचे वितरण कपंनीच्‍या निष्‍काळजीमुळे नुकसान झालेले आहे हे मान्‍यच करावे लागेल.

 

11.  निश्चितच अर्जदाराचे ऊस पिकाचे 160 टन नुकसान गृहीत धरुन नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत.

12. अर्जदार यांचे ऊस पिकात असलेला ठिबक सिंचन संच पाईप जळाल्यामुळे रु.1,50,000/- चे नुकसान झाल्याचे त्‍यांनी नमुद केलेले आहे. अभिलेखावर दाखल घटनास्‍थळ पंचनाम्‍यात ठिबक सिंचन संच पाईप जळाल्‍याचा उल्‍लेख आहे. परंतु अर्जदाराने ठिबक सिंचन पाईपचे मुल्‍य निश्चित किती होते. याबाबत पुरावा दाखल केलेला नाही. तरी सर्वसामान्‍य मुल्‍य मापन करता व घसारा ग्रहीत धरुन अर्जदार ठिबक सिंचन संच पाईप करीता रक्कम रु.25,000/- नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत या मतास आम्‍ही आलो आहोत.

13.  वरील विवेचनावरुन आम्‍ही या निष्‍कर्षापर्यंत पोहोचलो आहेत की अर्जदार ऊस पिकाची ठिबक सिंचनाची नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत. म्हणून मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.   

                              आदेश

तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.

1) विरुध्‍द पक्ष यांनी अर्जदार यांना जळीत ऊस पिकाच्‍या नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रु.3,75,000/-(रुपये तीन लक्ष पंच्‍यात्‍तर हजार फक्‍त) व जळीत ठिबक सिंचन संचाकरीता नुकसान भरपाई रक्‍कम रु.25,000/- (रुपये पंचवीस हजार फक्‍त) द्यावेत.

2) विरुध्‍द पक्ष यांनी अर्जदारास तक्रार खर्चाचे रक्कम रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्‍त) द्यावेत.

3) वर नमूद आदेशाची अंमलबजावणी विरुध्‍द पक्ष यांनी आदेश पारीत दिनांकापासून तीस दिवसात करावी.   

4) उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी विरुध्‍द पक्ष यांनी आदेश दिल्‍या तारखेपासुन  तीस दिवसात करुन विरुध्‍द पक्षकार यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विरुध्‍द पक्षकार यांनी न केल्‍यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.

6)  उभय पक्षकारांना आदेशाच्‍या प्रमाणित प्रती निशु:ल्‍क देण्‍यात याव्‍यात.

 

 

   

   (श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी)

         अध्‍यक्ष

  (श्री.मुकूंद.बी.सस्‍ते)                                  (सौ.विदयुलता जे.दलभंजन)

      सदस्‍य                                                      सदस्‍या 

                जिल्‍हा  ग्राहक  तक्रार  निवारण  मंच,  उस्‍मानाबाद.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 मा. अध्‍यक्ष श्री.एम.व्‍ही.कुलकर्णी, यांचे व्‍दारा,

      वरील मताशी मी सहमत नसून मी माझे निकालपत्र खालील प्रमाणे स्‍वतंत्ररित्‍या देत आहे.

1.    माझे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्‍यांची उत्‍तरे मी त्‍यांचे समोर खालील दिलेल्‍या  कारणासाठी दिलेली आहेत.

 

         मुद्दे                                        उत्‍तरे

1.  तक हा विप चा ग्राहक होतो काय ?                           नाही.

2.  विप ने सेवेत त्रूटी केली आहे काय ?                           नाही

3.  तक अनुतोषास पात्र आहे काय ?                              नाही.

4.  आदेश काय ?                                      अंतिम आदेशाप्रमाणे.

कारणमिंमासा

मुद्दा क्र.1 ते 4 :

2.    सुविद्य सदस्‍यांनी हे नमूद केले आहे की, तक च्‍या शेतात 11 के. व्‍ही. उच्‍च दाब  वाहिनी गेलेली आहे. वाहिनीची वाय फेज तार जोराच्‍या वा-यामुळे इन्‍सुलेटर मधून बाहेर येऊन पोलच्‍या संपर्कात येऊन ठिणग्‍या पडल्‍याने खाली असणारे पाचट पेटले व ऊसाने पेट घेतला. सुविद्य सदस्‍याने म्‍हटले आहे की, ठिणग्‍यामुळे ऊसाने पेट घेतला हे सिध्‍द करण्‍यासाठी पुरेसा पुरावा आहे. तक ने सुध्‍दा तक्रारीत म्‍हटले आहे की, विप यांची उत्‍तर पश्चिम 11 के. व्‍ही. उच्‍च दाबाची वाहिनी वाय फेज तक च्‍या शेतामधून गेला आहे. जी वीज  बिले हजर केले आहेत, त्‍याप्रमाणे मंजूर भार 5 एच.पी. दिसतो. शेतातील विहीरीवर इलेक्‍ट्रीकल पंप चालवण्‍यासाठी वीज कनेक्‍शन दिल्‍याचे दिसते. पोलिस पंचनाम्‍याचे अवलोकन केले असता त्‍याप्रमाणे सर्व्‍हे नंबर 294 मधून वीज वाहीनी गेल्‍याचे म्‍हटले आहे. जो नकाशा पंचनाम्‍यासोबत दाखवला आहे त्‍याप्रमाणे शेतामध्‍ये एक पोल आहे ज्‍यांला तारा जोडलेल्‍या आहेत. त्‍या तारा खालची पत्राशेड दाखवले आहे. पत्राशेड च्‍या पूढे पूर्वेला विहीर, पूर्व बांधावर बोअरवेल दाखवले आहे. विद्यूत पंप बोअरवेल वर आहे की विहीरीवर आहे यांचा उल्लेख नाही. पोल पासून विद्यूत पंपाकडे वीज पुरवठा केल्‍याचे दाखवण्‍यात आलेले नाही.

 

3.    विप चे म्‍हणणे की, उच्‍च दाब वाहीनीमूळे घटना घडली. त्‍यामुळे तक हा ग्राहक तक्रार करु शकत नाही. त्‍यामुळे तक्रार रद्द होणेस पात्र आहे. विप तर्फे ज्‍या केस लॉ चा आधार घेतला त्‍यांचा उल्‍लेख सुविद्य सदस्‍यांनी आपल्‍या आदेशात केला आहे. मात्र त्‍याबद्दल त्‍यांचे मताशी मी सहमत नाही. त्‍याचे कारण पूढे दिलेले आहे.

 

4.    मा.राष्‍ट्रीय आयोगाचे रिव्‍हीजन पिटीशन 125/1993 हरियाना इलेक्‍ट्रीसीटी बोर्ड वि. मोहनलाल या निवाडयात म्‍हटलेले आहे की, शेतावरुन जाणा-या दोन हाय टेशंन लाईन्‍स मध्‍ये स्‍पार्कीग झाल्‍यामुळे जर शेतातील पिक जळाले असेल तर त्‍यांने ग्राहक तक्रार होणार नाही. कारण ज्‍या लाईन मध्‍ये स्‍पार्क झाले त्‍यांचा शेतातील विहीरीसाठी देणा-या विज वाहीनीशी संबंध नव्‍हता. त्‍या वाहीनीवरुन वेगळयाच ग्राहकांना विज दिली जात होती. अशा लाईन मध्‍ये त्रुटी निर्माण झाली तर विप ने तक ला दिलेल्‍या सेवेत त्रुटी केली असे म्‍हणता येणार नाही. सुविद्य सदस्‍यानी महटले आहे की, तक च्‍या नांवाने विज देयक हे रेकार्डवर आहे. व विप ने तक ला विद्यूत पुरवठा केला. त्‍यामुळे हा निवाडा सदर प्रकरणात लागू पडत नाही.  या मताशी मी सहमत नाही.

 

5.    राज्‍य आयेागाचे अपील 2238/2005 कार्यकारी अभिंयता वि विठठल यांचाही उल्‍लेख सुविद्य सदस्‍यांनी केला आहे. तेथे टॉवर उभारताना ऊसाचे पिकातील नुकसान झाले होते. मात्र तो ग्राहक होणार नाही. असे म्‍हटलेले आहे. हा निवाडा का लागू होत नाही याबद्दल सुविद्य सदस्‍यानी काही म्‍हटलेले नाही.

 

6.    सुविद्य सदस्‍यांनी राष्‍ट्रीय आयोगाचा निवाडा II (2006) सीपीजे 245 कनार्टक ट्रान्‍सपोर्ट कॉपोरेशन वि मनी थॅामस चा उल्‍लेख केलेला आहे व त्यामुळे प्रस्‍तूत प्रकरण ग्राहक वाद होतो असे म्‍हटले आहे. मात्र तेथे नो टेंशन लाईन मध्‍ये दोष होता प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये हाय टेंशन लाईन मध्‍ये दोष होता. हाय टेन्‍शन लाईन पासून सरळ पूढे शेतातील विज पंपाला विद्यूत पुरवठा केला जात नाही कदाचित असा पुरवठा केला जात असल्‍यास ते दाखवण्‍याची जबाबदारी तक वर होती कारण विप ने हे नाकारलेले आहे. अशा परिस्थितीत तक हा विप चा ग्राहक होऊ शकत नाही असे माझे मत आहे म्‍हणून मुदा क्र.1 ते 3 चे उत्‍तर नकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करीत आहे.

                                आदेश

1)  तक ची तक्रार रद्द करण्‍यात येते.

2)  खर्चाबद्दल आदेश नाही.

 

3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील  कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.

4)  उभय पक्षकारांना आदेशाच्‍या प्रमाणित प्रती निशु:ल्‍क देण्‍यात याव्‍यात.

 

 

   

   (श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी)

         अध्‍यक्ष

  (श्री.मुकूंद.बी.सस्‍ते)                                  (सौ.विद्युलता जे.दलभंजन)

      सदस्‍य                                                      सदस्‍या 

                जिल्‍हा  ग्राहक  तक्रार  निवारण  मंच,  उस्‍मानाबाद.

 

 

 
 
[HON'BLE MR. M.V. Kulkarni.]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN]
MEMBER
 
[HON'BLE MR. M.B. Saste]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.