द्वारासौ.मोहिनीजयंतभिलकर, सदस्या
अर्जदार श्रीमती केसरबाई उत्तमसिंग बैस यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,.......................
1. अर्जदार यांनी स्वतःचे घरी सन 1998 मध्ये गैरअर्जदार यांचेकडून विद्युत कनेक्शन घेतलेले आहे. त्याचा मीटर नं. 9005162681 आणि ग्राहक नं 430010242571 असा आहे. गैरअर्जदार यांनी पाठविलेली विद्युत बिले ही अर्जदार यांनी नियमित भरलेली आहेत.
2. गैरअर्जदार यांनी पाठविलेले एक महिन्याचे आकारणी बील हे दि. 1.7.06 ते 01.08.06 या कालावधीचे 21 युनिटचे रु.80/- चे बील अर्जदार यांनी भरले नंतर गैरअर्जदार यांनी दि. 1.8.06 ते दि. 1.9.06 या कालावधीचे 492 युनिट दाखवून व सप्टेंबर 2006 पासून मीटर फॉल्टी असल्यामुळे 90 रु.चे सरासरी बील दिले. गैरअर्जदार यांनी दर महिन्याला बील पाठवून नंतरच्या कालावधीचे 335 युनिट चे बील अर्जदार यांना दिले व मीटर सप्टेंबर 2006 पासून फॉल्टी असल्याचे सांगितले.
3. दि.01.11.06 ते दि. 01.12.06 या कालावधीतील बील पाठविण्यास गैरअर्जदार हे असमर्थ ठरले. नंतर दि. 01.12.06 ते दि. 01.01.07 या कालावधीचे 4335 युनिटचे बील अर्जदार यांना दिले. जानेवारी 2007 पासून घर बदं असल्याचे सांगून 4000 युनिट दाखवून डिसेंबर 2006 चे रु.25410.00 चे बील अर्जदार यांना दिले.
4. अर्जदार यांनी वारंवार विनंती केल्यावर गैरअर्जदार यांनी मीटर दुरुस्त किंवा बदलून न देता आकारणी बिलाची हमी देवून 335 युनिटचे रु.1000/- चे तात्पुरते बील दिले. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना 335 युनिटचे नंतरचे बील दिले. परंतु फेब्रुवारी 07 व जानेवारी 07 या महिन्यात 695 युनिट वापरलेले आहेत असा दावा केला व त्यात डिसेंबर 06 चे चुकिचे युनिट समायोजित केले आहे असे सांगितले. अर्जदार यांनी वारंवार चौकशी केल्यानंतर गैरअर्जदार यांनी रु.1000/- चे तात्पुरते बील हे 60 युनिटच्या वापराचे दिले.
5. शेवटी गैरअर्जदार यांनी खोटे बिल 695 युनिटच्या वापराचे एप्रिल 07 चे बील अर्जदार यांना दिले. जेव्हा मार्च 07 मध्ये शुन्य युनिट दाखविले होते. चालू बील हे रु.2650/- चे दिले . गैरअर्जदार यांनी मीटरची दुरुस्ती किंवा मीटर बदल करुन देण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले ही गैरअर्जदार यांच्या सेवेतील न्युनता आहे.
6. विद्युत पुरवठा खंडित करायचा नसेल तर निर्धारित वेळेच्या आत बिल भरण्यास गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सांगितले. परंतु वस्तुस्थिती अशी होती की, गैरअर्जदार यांनी सप्टेंबर06 पासून फॉल्टी मीटर दुरुस्त केले नाही. किंवा बदलून दिले नाही. त्यामुळे अर्जदार हया म्हाता-या बाईला त्रास झाला. अर्जदार यांनी दि. 1.9.06 ला विनंती अर्ज दिला त्यात मीटर दुरुस्त किंवा बदलून देण्याची विनंती केली परंतु गैरअर्जदार यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
7. अर्जदार मागणी करतात की, दि. 15.05.07 चे रु.2650/- चे बील हे रद्द करण्यात यावे. गैरअर्जदार यांनी जास्तीची घेतलेली रक्कम ही पुढील बिलात समायोजित करुन द्यावी. शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल व ग्राहक तक्रारीचा खर्च रुपये 2000/- अर्जदार यांना देण्यात यावा.
8. गैरअर्जदार हे आपल्या लेखी बयानात नि.क्रं. 13 वर म्हणतात की, अर्जदार यांनी नियमित बिले भरलेली नाहीत. कनिष्ठ अभियंता यांना अर्जदार यांचे मीटर ताबडतोब बदलून देण्यास सांगितले होते. अर्जदार यांची वादग्रस्त विद्युत बिल ही विचाराधीन आहेत. अर्जदार यांचा विद्युत पुरवठा हा अजुन पर्यंत बंद केलेला नाही. अर्जदार यांची ही तक्रार खर्चासह खारीज होण्यास पात्र आहे.
कारणे व निष्कर्ष
9. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, पुरावा यावरुन असे निदर्शनास येते की, लेखी उत्तरात नि.क्रं. 13 मध्ये गैरअर्जदार यांनी असे मान्य केले आहे की, वादग्रस्त विद्युत बिले ही विचाराधीन आहेत. त्यामुळे गैरअर्जदार यांनी विद्युत बिले ही बरोबर नसल्याचे कबुल केलेले दिसते.
असे तथ्य व परिस्थिती असतांना खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
- अर्जदार यांचे दि. 15.05.07 चे रु 2650/- चे विद्युत बिल हे रद्द करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार यांनी देयकापोटी जास्तीची रक्कम घेतलेली असल्यास ती पुढील देयकात समायोजित करण्यात यावी.
- गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.3000/- व ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु.1000/- द्यावेत.
- गैरअर्जदार यांनी आदेशाचे पालन आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत करावे. अन्यथा ते ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 27 प्रमाणे दंडाहर्य कारवाईस पात्र असतील.