निकालपत्र (पारित दिनांक 20 नोव्हेंबर, 2010) व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा. 1. तक्रारकर्ता श्री गौरीशंकर महिपाल दमाहे हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक असून त्यांचा ग्राहक क्रमांक 430782002508 हा आहे. तक्रारकर्ता यांनी सदर ग्राहक तक्रार ही वीज देयकासंबधी केली असून मागणी केली आहे की, त्यांना वीजेचे थकीत बिल भरण्यासाठी 14 हप्ते पाडून देण्याचा आदेश व्हावा तसेच पहिला हप्ता भरल्यावर वीज सुरु करण्याचा निर्देश विरुध्दपक्ष यांना देण्यात यावा व तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक व आर्थीक नुकसानभरपाई म्हणून रुपये 1,00,000/- विरुध्दपक्ष यांचेकडून मिळावेत. ..2.. ..2.. 2. विरुध्दपक्ष त्यांच्या लेखी जबाबात म्हणतात की, तक्रारकर्ता यांनी वीज देयकाची रक्कम न भरल्यामुळे त्यांची वीज बंद करण्यात आली. तसेच तक्रारकर्ता हे वीजेचा चोरुन वापर करीत असल्यामुळे त्यांची ग्राहक तक्रार ही खर्चासह खारीज करण्यात यावी. कारणे व निष्कर्ष 3. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताऐवज, इतर पुरावा व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी जास्त रिडींग आल्यामुळे दिनांक 25/02/2005 रोजी विरुध्दपक्ष यांचेकडे मिटर तपासणीकरीता अर्ज दिला व टेस्टींग करीता रुपये 30/- ही रक्कम दिनांक 29/08/2005 रोजी विरुध्दपक्ष यांचेकडे जमा केली व दिनांक 06/11/2006 चे पत्रानुसार मिटर बरोबर असल्याचा अहवाल विरुध्दपक्ष यांचे कडून तक्रारकर्ता यांना देण्यात आला. 4. विद्युत देयकाची रक्कम भरण्यासाठी विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना तीन हप्ते पाडून दिले. तक्रारकर्ता यांनी त्यातील दोन हप्त्यांची रक्कम भरलेली आहे तर एका हप्त्याची रक्कम भरलेली नाही. तक्रारकर्ता यांनी दिनांक 21/09/2007 नंतर कोणत्याही देयकांची रक्कम विरुध्दपक्ष यांचेकडे भरलेली नाही. 5. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांचे कनेक्शन हे दिनांक 05/07/2008 रोजी नेहमीकरीता बंद (P.D.) केले व त्याचा अहवाल दिनांक 01/09/2008 रोजी तयार केला. तक्रारकर्ता यांनी सदर ग्राहक तक्रार ही दिनांक 06/09/2010 रोजी दाखल केली आहे. तक्रारकर्ता यांना सदर ग्राहक तक्रार ही दाखल करण्यास फक्त 5 दिवसांचा विलंब झालेला आहे. न्यायाच्या दृष्टीकोनातून तो मंजूर करण्यात येत आहे. 6. तक्रारकर्ता यांच्यावर विज देयकांची रुपये 10,630/- ही एकूण थकबाकी आहे. 7. विरुध्दपक्ष त्याच्या लेखी जबाबात म्हणतात की, दिनांक 23/06/2009 रोजी तक्रारकर्ता हे वीजेची चोरी करीत असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांचे विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली. विरुध्दपक्ष यांनी वीज चोरीच्या आकारणीची एकूण रक्कम किती याची माहिती त्यांच्या लेखी जबाबात दिलेली नाही. मात्र युक्तीवाद करत असतांना तक्रारकर्ता यांचेवर विदयुत कायदा, 2003 प्रमाणे संबंधीत न्यायालयात प्रकरण सुरु असल्याचे सांगीतले. 8. विरुध्दपक्ष यांनी IV (2008) CPJ 97 व III(2006) CPJ 414 हे केस लॉ रेकॉर्डवर दाखल केलेले आहेत. ते तथ्य व परीस्थिती भिन्न असल्यामुळे सदर प्रकरणास लागू होत नाहीत. ..3.. ..3.. असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे. आदेश 1. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना विद्युत देयकाची एकूण रक्कम रुपये 10,630/- याचे दरमहा एक याप्रमाणे तीन हप्ते पाडून दयावेत. 2. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांना पहिल्या हप्त्याची रक्कम व वीज चोरीकरीता अकारणी करण्यात आलेल्या रक्कमेचा एक भाग म्हणून लाक्षणिक रक्कम म्हणून एकूण रुपये 5,000/- याचा भरणा विरुध्दपक्ष यांचेकडे करावा. 3 तक्रारकर्ता यांनी पहिल्या हप्त्याची रक्कम रुपये 3543/- व विज चोरीच्या आकारणीची रक्कम रुपये 5000/-अशा एकूण रुपये 8543/-चा भरणा विरुध्दपक्ष यांचेकडे केल्यानंतर 8 दिवसांचे आत विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांची वीज सुरु करुन दयावी. 4. फौजदारी न्यायालयातील तक्रारकर्ता यांचे विरोधातील कलम 135 अन्वये सुरु असलेल्या प्रकरणाचा निकाल तक्रारकर्ता यांच्या बाजूने लागल्यास रुपये 5000/- ही रक्कम विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्या पुढील देयकांत समायोजित करुन दयावी. (श्रीमती अलका उ. पटेल) (श्री अजितकुमार जैन) (श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे) सदस्या, सदस्य, अध्यक्षा, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गोंदिया न्यायमंच, गोंदिया न्यायमंच, गोंदिया.
| [HONORABLE Smt. Patel] Member[HONORABLE Smt. Potdukhe] PRESIDENT[HONORABLE Shri. Ajitkumar Jain] Member | |