::: आ दे श :::
( पारित दिनांक :३०/०३/२०१५ )
आदरणीय सदस्य, मा.श्री.ए.सी.उकळकर, यांचे अनुसार : -
..२.. तक्रार क्र.४१/२०१४
१. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे, कलम : १२ अन्वये, सादर करण्यात
आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,
तक्रारकर्ती ही वाशिम येथील कायम स्वरुपी रहिवाशी असुन रेनॉल्ड हॉस्पीटल येथे परिचारिकेचे काम करते.
विरुध्दपक्ष हे मागील १५ वर्षापासुन तक्रारकर्तीला नियमित विद्युत पुरवठयाची सेवा देत आहेत. दि.१९.०७.२०१४ रोजी तक्रारकर्ती ही बाहेर गेलेली होती त्यावेळी विरुध्दपक्ष क्र.२ व ३ हे त्यांच्या (तक्रारकर्तीच्या) घरी आले व विद्युत देयकाची अंतीम तारीख २१.०७.२०१४ ही असतांना सुध्दा तक्रारकर्ती यांची विद्युत जोडणी बेकायदेशिरपणे तोडली ही बाब जेंव्हा तक्रारकर्तीच्या लक्षात आली त्यावेळी तक्रारकर्ती हीने त्यांच्या नातेवाईकांन मार्फत सदरहु देयकाची रक्कम त्याच दिवशी जमा केली. जमा केलेल्या रकमेचा पावती क्र.२३१९१३४ असुन विद्युत पुरवठयाचा ग्राहक क्र.३२६०१०१४८५५६ असा आहे.
तक्रारकर्तीने आज पर्यंत विरुध्दपक्षाचे देयकांची रक्कम बाकी ठेवली नाही. तक्रारकर्ती ही विरुध्दपक्षाच्या कंपनीची अतिशय चांगली ग्राहक असुन ती विद्युत देयकाची रक्कम नेमुण दिलेल्या मुदतीच्या आत भरणा करते. विरुध्दपक्षाने आपल्या ग्राहका सोबत अनुचित व्यापाराचे अवलंबन केले आहे तसेच विद्युत देयकाची अंतिम तारीख न पाहता विद्युत पुरवठा खंडीतकरुन आपल्या सेवेमध्ये हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे तक्रारकर्तीला
..३.. तक्रार क्र.४१/२०१४
मानसिक धक्का पोहोचला आहे. तसेच समाजामध्ये व आजु-बाजुला राहणा-या शेजा-यामध्ये मानहानी झालेली आहे.
तक्रारकर्तीने या सर्व बाबीची माहिती रजिष्टर पोष्टाने वकिला मार्फत नोटीस पाठवुन विरुध्दपक्षाला दिलेली होती.
तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाला रजिष्टर नोटीस पाठवून सुध्दा झालेल्या मानसि, शारिरीक व मानहानी बद्दल विरुध्दपक्षाने कोणत्याही प्रकारची दखल न घेता उलटपक्षी तक्रारकर्तीस नुकसान भरपाई बाबत पैश्याची मागणी करीत आहे. या वरुन स्पष्ट होते कि, विरुध्दपक्षाने जाणुन-बुजून हेतुपुरस्सर तक्रारकर्तीला त्रास व्हावा या साठी तिचा विद्युत पुरवठा खंडीत केलेला होता. त्यामुळे तक्रारकर्तीचे परिवारातील सदस्यांना त्रास सहन करावा लागला होता.
तरी तक्रारकर्तीची विनंती आहे की, सदर तक्रार मंजुर होऊन. तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक, शारिरीक, मानहानी, आर्थीक त्रासा बद्दल व विरुध्दपक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्या बद्दल नुकसान भरपाई म्हणुन विरुध्दपक्षाकडून प्रत्येकी रु.५०,०००/- व तक्रार खर्च रु.१०,०००/-मंजुर होऊन तक्रारकर्तीला देण्याचा आदेश व्हावा.
सदर तक्रार तक्रारकर्तीने शपथेवर दाखल केलेली असुन त्या सोबत एकुण ०६ दस्ताऐवज पुरावे म्हणुन दाखल केलेले आहे.
२) विरुध्द पक्ष १ ते ३ यांचा लेखी जवाब ः- सदर तक्रारीची मंचा तर्फे नोटिस प्राप्त झाल्या नंतर विरुध्दपक्षाने त्यांचा लेखी जवाब सादर करुन, तक्रारकर्तीचा विद्युत ग्राहक क्र.३२६०१०१४८५५६ हा आहे. तसेच तक्रारकर्ती ही
विरुध्दपक्षाचे ग्राहक असल्यामुळे नियमित विद्युत पुरवठयाची सेवा देत आहेत
..४.. तक्रार क्र.४१/२०१४
हे म्हणने विरुध्दपक्ष यांना कबुल असुन ईतर सर्व कथन फेटाळुन अधिकच्या कथनात असे नमुद केले आहे की,
तक्रारकर्ती यांच्या कडे विरुध्दपक्ष यांचे थकित असलेले बिलाचा भरणा न केल्यामुळे विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्तीचा विद्युत पुरवठा नियमानुसार बंद केला.
सदरहु बिलाचा भरणा करण्या करीता संबंधीत विभागाचे कनिष्ठ अभियंता जि.डी.बर्वे व लाईनमन वि.पि.नानोटे यांनी वारंवार तक्रारकर्तीकडे विचारणा केली असता व त्यांना बिलाचा भरणा करण्या करीता सुचना केली असता त्यांनी संबंधीत बिलाचा भरणा वेळेवर केलेला नसल्यामुळे संबंधीत विरुध्दपक्ष यांना नियमानुसार विद्युत पुरवठा बंद करणे भाग पडले.
तक्रारकर्तीने दिलेल्या रजिष्टर पोष्टाच्या नोटीसीचे उत्तर विरुध्दपक्ष यांनी वेळेवर व योग्य वेळी दिले त्या बाबत वाद नाही.
तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष यांच्या विरुध्द मुद्दामहून व जाणुन-बुजून खोटी तक्रार केल्याने विरुध्दपक्ष यांना झालेल्या मानसिक, शारिरीक, मानहानी, आर्थीक त्रासा बद्दल रु.५०,०००/- तक्रारकर्तीकडुन विरुध्दपक्ष यांना देण्याचा आदेश व्हावा व तक्रारकर्तीकडुन विरुध्दपक्ष यांना केलेल्या तक्रारीच्या संपुर्ण खर्चा बद्दल रु.१०,०००/- देण्याचा आदेश व्हावा ही विनंती केली.
तक्रारकर्ती ने विरुध्दपक्ष यांच्या विरुध्द केलेली खोटी व बिनबुडाची तक्रार खारीज करण्यात यावी ही विनंती केली.
3) कारणे व निष्कर्ष ः-
प्रकरणातील तक्रारकर्तीची तक्रार तक्रारकर्तीने दाखल केलेले दस्ताऐवज, तक्रारकर्तीचे प्रतिज्ञापत्र व उभयपक्षाचा तोंडी युक्तीवाद यांचे मंचाने काळजीपूर्वक
..५.. तक्रार क्र.४१/२०१४
अवलोकन करुन पूढील निष्कर्ष कारणे देऊन आदेश पारित केला तो येणे प्रमाणे,
तक्रारकर्तीने युक्तीवाद केला, कि तक्रारकर्तीही विरुध्दपक्षाची ग्राहक असुन, तीचा विद्युत पुरवठा ग्राहक क्र.३२६०१०१४८५५६ असा आहे. विरुध्दपक्षाने विद्युत देयकाची अंतिम तारिख न पाहता तक्रारकर्तीचा विद्युत पुरवठा खंडीत करुन त्यांच्या सेवेमध्ये निष्काळजीपणा बाळगुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे. सदर बाबीची तक्रारकर्तीने वकिला मार्फत रजिष्टर पोष्टाने विरुध्दपक्षाला नोटिस दि.३१.०७.२०१४ रोजी दिली त्याच्या उत्तरात विरुध्दपक्षाने ही बाब मान्य केली आहे कि, तक्रारकर्ती ही विरुध्दपक्षाची ग्राहक आहे व विद्युत पुरवठा हा कार्यकारी अभियंता यांच्या आदेशावरुन व नियमा नुसार खंडीत केलेला आहे. विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीचा विद्युत पुरवठा हेतुपुरस्सर व त्रासदेण्याच्या उद्देशाने कुठलीही पुर्व सुचना न देता खंडीत करुन तक्रारकर्तीची मानहानी आर्थिक व शारिरीक नुकसान केलेले आहे म्हणून एकुण ६०,०००/- रुपयाची नुकसान भरपाई विरुध्दपक्ष देण्यास पात्र आहे.
विरुध्दपक्षाने युक्तीवाद केला कि, विरुध्दपक्षाच्या कर्मचा-यांनी तक्रारकर्तीला बिलाचा भरणा करण्याबाबत सुचना केली असता सदरहु बिलाचा भरणा वेळेवर केलेला नसलयामूळे तक्रारकर्तीचा विद्युत पुरवठा खंडीत करणे भाग पडले.
उभयपक्षाचा युक्तीवादावरुन व कागदपत्राच्या अवलोकनावरुन असे दिसुन येते कि, विरुध्दपक्षाने विद्युत देयकाची अंतिम तारिख ही २१.०७.२०१४ असतांना सुध्दा तक्रारकर्तीचा विद्युत पुरवठा दि.१९.०७.२०१४ रोजी खंडीत केलेला आहे. ही
..६.. तक्रार क्र.४१/२०१४
बाब नियम बाहय असतांना सुध्दा विरुध्दपक्षाने त्यांच्या नोटिसच्या उत्तरामध्ये व लेखी जबाबामध्ये मान्य करुन उलट कायदेशीर असल्याबाबत नमुद केलेले आहे. विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीचा विद्युत पुरवठा विद्युत कायदयाच्या कलम ५६ अंतर्गत कुठलिही पुर्वसुचना न देता खंडीत केलेला आहे. म्हणून तक्रारकर्ती ही विरुध्दपक्षाकडून तिला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
सबब अंतिम आदेश पारित केला. तो येणे प्रमाणे.
अंतिम आदेश
१. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
२. विरुध्दपक्ष क्र.१ ते ३ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई पोटी व प्रकरणाचा न्यायीक खर्च मिळून एकत्रीत रक्कम रु. १०,०००/- (अक्षरी दहा हजार) तक्रारकर्तीला द्यावे.
३. विरुध्दपक्ष यांनी सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासुन ४५ दिवसाचे आत करावे.
४. उभयपक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
मा.श्रीमती.जे.जी.खांडेभराड, मा.श्री.ए.सी.उकळकर मा.सौ.एस.एम.उंटवाले,
सदस्या सदस्य अध्यक्षा
दि. ३०.०३.२०१५
स्टेनो/गंगाखेडे