- आदेश निशाणी क्र.1 वर -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 28 मे 2015)
1. सदर तक्रार विद्युत मीटर बसवून विद्युत पुरवठा करण्याबाबत दाखल केली असून, तक्रारीचा थोडक्यात आशय येणेप्रमाणे.
2. सदर तक्रार अर्ज नोंदणी करुन, अर्जदाराचे प्राथमिक सुनावणी करीता ठेवण्यात आले असता, अर्जदारा तर्फे वकील यांनी प्राथमिक सुनावणीचे वेळी सदर प्रकरणात अनावधानाने काही बाबी आणि दस्त अर्जदाराच्या अर्जात नमूद करायच्या राहून गेल्याने सदर तक्रार काढून घेण्याची परवानगी मिळण्याकरीता अर्ज नि.क्र.6 नुसार दाखल केला. सदर अर्ज नि.क्र.6 वर मंचाचे आदेश पारीत.
3. नि.क्र.6 अर्ज व त्यावरील मंचाचे आदेशानुसार अर्जदारास प्रकरण काढून घ्यावयाचे असल्याने, सदर प्रकरण निकाली काढणे योग्य होईल, असे आमचे मत आहे. सबब, पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
// नि.क्र.1 वर आदेश //
1. अर्जदाराचे नि.क्र.6 वर दाखल अर्जाचे अनुषंगाने अर्जदारास सदर तक्रार मागे घेऊन, तक्रार दुरुस्ती करुन पुन्हा दाखल करण्याची परवानगीसह तक्रार काढण्यात येते.
(Complaint disposed by way of withdraw)
2. तक्रारीची मुळ प्रत सोडून उर्वरीत प्रती अर्जदाराला परत देण्यात यावे.
3. अर्जदाराने तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
4. अर्जदारास आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 28/5/2015