ग्राहक तक्रार क्र. : 28/2014
दाखल तारीख : 28/01/2014
निकाल तारीख : 23/04/2015
कालावधी: 01 वर्षे 04 महिने 06 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्री. नवनाथ उर्फ जगन्नाथ दगडू कांबळे,
वय - 64, धंदा – शेती,
रा.रुई (ढोकी) ता. व जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विज वितरण, कंपनी लि.
उस्मानाबाद. जि. उस्मानाबाद.
2. उपकार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विज वितरण, कंपनी
लि. कार्यालय, तेर ता.व जि. उस्मानाबाद.
3. मे. कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी,
लि. कार्यालय, ढोकी, जि. उस्मानाबाद,
3. श्री. पांडूरंग अनंत होगले वय 40 वर्षे,
धंदा – सावकारी, रा. कसबे तडवळे. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. प्र. अध्यक्ष.
2) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : स्वत:.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे : श्री.व्ही.बी. देशमूख.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते, यांचे व्दारा.
अ) 1. तक्रारदार (तक) यांची मौजे रुई ढोक येथील जमिन गट कम्र. 128 चे मालकीची असून विप कडून सन 1995 दरम्यान वीज जोडणी घेतली. त्याचा ग्राहक क्र.590170022965 असून सन 2012 पर्यंत स्वत: वीज कंपनीकडे बिले भरलेली आहेत. दरम्यान गट क्र.128 जमीनीसंबंधी विप क्र.4 यांचेशी दिवाणी कोर्टात वाद चालू असतांना विप क्र. 3 यांनी बेकायदेशीररित्या कोणतीही पुर्व सुचना न देता अगर कसलीही नोटिस न देता तक चे वीज जोडणी विप क्र. 4 यांना बेकायदा वर्ग करुन देऊन माझे वीज कनेक्शन खोडसाळपणे बंद केले आहे व माझे सन 2009 पासून 2013 पर्यंत पाणी वापर बंद पडून शेती पिकाचे रु.5,00,000/- चे नुकसान व मानसिक नुकसान झाले. म्हणून ही तक्रार दाखल केली असून विप यांनी सदर वीज कनेक्शन पुर्ववत मला सुरु करुन मिळणेविषयी विप क्र. 1 ते 3 यांना हुकूम व्हावा व नुकसान भरपाई पोटी रु.5,00,000/- मिळावे अशी विनंती केली.
2. अर्जदार यांनी तक्रारी सोबत गट क्र.128 सातबारा उतारा, बोअर घेतल्याची पावती, बोरवेल घेतल्याचे प्रमाणपत्र, वीज भरणा केलेली पावती, तीन वीज बिल, भरणा केल्याची पवती, तक्रार अर्ज, बोअर ची नोंद फेरफार, आर.सी.एस.29/17 बाबतचे का्गदपत्रे, मंचाच्या अभिलेखावर दाखल केली आहेत,
ब) सदर प्रकरणी मंचामार्फत विप क्र.1 ते 3 यांना नोटिस काढली असता त्यांनी दि.02/09/2014 रोजी आपले म्हणणे अभिलेखावर दाखल केले ते पुढीलप्रमाणे. विप क्र. 4 यांनी सदर जमीन गट क्र.128 कायमची खरेदी केली असल्यामुळे सध्य परिस्थीतीत तक्रारदार यांच्या नावाने मालकीबाबतचे कोणतेही प्रकारचे कागदपत्र दिसून येत नाही. शिवाय सदर बोअरच्या पाण्याचा कोण वापर करतो याच्याशी या विप चा काहीही संबंध येत नाही. विप क्र. 4 यांच्या अर्जाप्रमाणे विप यांनी चौकशी करुन व कागदपत्रांची चौकशी करुन नियमाप्रमाणे विप क्र.4 यांच्या नावे विदयुत जोडणी दिली. तक यांनी तसे नियमाप्रमाणे कागदपत्रे दिली नसल्याने त्यांना विदयुत पुरवठा देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. विप क्र.4 यांच्या विरुध्द दिवाणी कोर्टात रे.दि.दा. नं.29/11 व 62/11 दाखल केलेला आहे हे सदरची तक्रार दाखल करण्यापुर्वी दाखल केलेले असून त्यामुळे सदरची तक्रार चालवू शकत नाही. तक ग्राहक या संज्ञेत येत नसल्यामुळे मे. कोर्टास ग्राहक म्हणून सदरची तक्रार चालवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही.
क) तक्रारदाराची तक्रार व त्यानी दाखल केलेली कागदपत्रे तसेच विप यांचे महणणे व त्यंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले तसेच उभयतांचा युक्तिवाद ऐकला असता आमचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्ये उपस्थित होतात.
मुदये उत्तर
1) सदरची तक्रार चालविण्याचा या न्यायमंचास
अधिकार आहे काय ? नाही.
2) तक्रादार व गैरतक्रारदार यांचे मधील ग्राहक व
सेवा पुरवठादार नाते आहे काय ? नाही.
3) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही.
ड) मुद्दा क्र. 1 :
1) तक्रारदाराने जमीन गट नं.128 मध्ये स्वत:च्या खर्चाने समर्सिबल दि.06/09/1994 मे व 1995 दरम्यान विप यांच्याकडून विज जोडीणी घेतली. सदरचर विज जोडणी घेऊन देयके ही 2012 पर्यंत भरलेली आहेत. सदरचे वीज कनेक्शन हे सन 2009 रोजी विप क्र.1 ते 3 ने तोडून विप क्र.4 ला जोडणी करुन दिली व तक्रारदाराचे नुकसान केले व अशा स्वरुपाचा अर्ज 2014 मध्ये बोअर वीज कनेक्शनच्या मिटरप्रमाणे ग्राहक क्र. 590170022965 वीज बिज 2012 पर्यंत स्वत: भरलेली आहेत. तक्रारदाच्या स्वत:च्या म्हणण्यानुसारच त्यांच्या नावचे कनेक्शन हे आता विप क्र.4 च्या नावे झालेले आहे. अभिलेखावरील दाखल वीज देयके पाहिली असता ती 2011 पर्यंतची दिसून येतात. तकच्याच म्हणण्यानुसार विप क्र. 4 व त्याच्यामध्ये जमीनीचे मालकीबाबत दिवाणी न्यायालयात 2011 सालापासून वाद प्रलंबित असून त्याच्याच म्हणण्यानुसार विप क्र.1 ते 3 यांनी तक चा पाणी वापर बंद केलेला आहे यावरुन वसूली नोंदीची तपासणी केली असता सातबा-यावरील भुमापनची तपासणी केली असता 663 फेरक्रमांकाने नवनाथ दगडू कांबळे यांची जमीन पांडूरंग अनंत होगले यांनी बोअरवेलसह विकत घेतलेली दिसून येते. त्यामुळे साहजिकच विप क्र.1 ते 3 यांनी रेकॉर्डच्या आधारे विप यांनी जुने कनेक्शन रद्द करुन नवीन खरेदीदार म्हणून होगले यांना वीदयूत जोडणी दिली असणे शक्य आहे व ते वावगेही नाही. तक्रारदार व विप क्र.4 यांच्यामधील वाद हा दिवाणी स्वरुपाचा आहे व त्याच्चाशी विप क्र. 1 ते 3 चा काहीही संबंध नाही ते त्या दाव्यातील पक्षकारही नाहीत त्यामुळे त्यांनी या न्यामंचाच्या कार्यक्षेत्र म्हणजे सेवेतील त्रुटी अथवा अनुचित व्यापार पध्दती याच्या स्वरुपाने कोणतीही त्रुटी केली नसून सद्य स्थितीत सदर प्रकरण हे दिवाणी न्यायालयात न्यायनिर्णीत झाल्यानंतर जमीनीवरील मालकी हक्काच्या बाबतीत न्यायनिर्णय स्पष्ट झाल्यावर जो कायदेशीर जमीनीचा मालक असेल त्याच्या नावाने पुन्हा एकदा विदयुत जोडणी देण्यासाठी विप क्र. 1 ते 3 यांना कोणतीही अडचण असण्याचे कारण नाही. त्यामुळे विप क्र.1 ते 3 यांनी कोणत्याही स्वरुपातील सेवेतील त्रुटी केली नसून सद्य स्थितीत त्यांनी घेतलेला निर्णय उपलब्ध कागदपत्राच्या नोंदीच्या आधारे असून या नोंदीमध्ये बदल झाल्यास विप क्र. 1 ते 3 यांनी योग्य ती विदयूत जोडणी नावातील बदलानुसार देतील त्यास या न्यायमंचाचा कोणताही आक्षेप असण्याचे कारण नाही म्हणून विप क्र.1 ते 3 चा सदयस्थितीत म्हणजे तक्रारीच्या कालावधीत तक्रारदार हा ग्राहकही नाही मात्र तो त्या पुर्वी होता त्यामुळे विप क्र.1 ते 3 व 4 यांना या न्यायमंचाव्दारे सेवेतील त्रुटीबाबत कसल्याही स्वरुपात जबाबदार धरता येणार नाही.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य प्र.अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.