Maharashtra

Jalna

CC/76/2016

Salim Ahemad Nathani - Complainant(s)

Versus

Executive Engineer MSEBoard Jalna - Opp.Party(s)

20 May 2016

ORDER

Dist Consumer Disputes Redressal Forum, Jalna
Survey No.488 Bypass Road, Jalna
 
Complaint Case No. CC/76/2016
 
1. Salim Ahemad Nathani
Behind Allama Iqbal school Dukhi Nagar, Main Road
Jalna
Maharshtra
...........Complainant(s)
Versus
1. Executive Engineer MSEBoard Jalna
Gandhi Chaman Old Jalna
Jalna
Maharshtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. NILIMA SANT PRESIDENT
 HON'BLE MR. Suhas M.Alshi MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकाल

(घोषित दि. 20.05.2016 व्‍दारा श्रीमती नीलिमा संत, अध्‍यक्ष)

            तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार प्रतिपक्ष यांचे विरुध्‍द सेवेत कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदाराचे थोडक्‍यात म्‍हणणे आहे की, त्‍यांनी प्रतिपक्ष यांचेकडे विद्युत जोडणी मिळण्‍यासाठी रितसर अर्ज केला परंतू प्रतिपक्ष यांनी त्‍यांना विद्युत जोडणी दिली नाही व महंमद ताहेर यांच्‍या नावाचे बिलाची थकबाकी त्‍यांचेकडे मागितली. अशा त-हेने अर्ज करुनही विद्युत जोडणी न देणे ही प्रतिपक्षाने त्‍यांना द्यावयाच्‍या सेवेत केलेली त्रुटी आहे म्‍हणून तक्रारदारानी ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारी अंतर्गत त्‍यांनी प्रतिपक्षाला विद्युत जोडणी देण्‍याचा आदेश व्‍हावा. त्‍याचप्रमाणे प्रतिपक्षाने त्‍यांचेकडून महंमद ताहेर यांच्‍या थकबाकीची मागणी करु नये असा आदेश व्‍हावा अशी प्रार्थना केली आहे.

            तक्रारदारानी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत तक्रारदार अंध असल्‍याबाबतचे प्रमाणपत्र, प्रतिपक्षाने तक्रारदारांना दिलेले लेखी उत्‍तर, महंमद ताहेर यांच्‍या नावाचे विद्युत देयक, प्रतिपक्ष यांचा सर्वेक्षण अहवाल, तक्रारदारानी त्‍यांची राहती जागा महंमद ताहेर यांचेकडून विकत घेतली त्‍याबाबतचे विक्रीपत्र अशी कागदपत्रे दाखल केली आहे.

            तक्रारदारांचा प्राथमिक युक्‍तीवाद ऐकला. दाखल कागदपत्राचे वाचन केले. दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदारानी प्रतिपक्ष यांचेकडे विद्युत जोडणी घेण्‍यासाठी दि.18.04.2016 रोजी अर्ज केल्‍याचे दिसते. व त्‍या अर्जावर लगेचच कार्यवाही करुन दि.21.04.2016 रोजी प्रतिपक्षाने त्‍यांना वरील जागेवर जुनी थकबाकी आहे त्‍यामुळे नवीन विद्युत जोडणी देता येणार नाही असे उत्‍तर दिल्‍याचे दिसते. तक्रारदारानी प्रतिपक्ष यांचेकडे कोणतीही रक्‍कम विद्युत जोडणीसाठी भरलेली नाही. अशा परिस्थितीत तक्रारदार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2(1) (d) अंतर्गत प्रतिपक्ष यांचा ग्राहक होऊ शकत नाही असे मंचाला वाटते. मा.राष्‍ट्रीय आयोगाने 2015 NCJ 238 (NC) या निकालपत्रात “Mere presentation of application for allotment of a flat/plot, does not confer the status of “consumer” as defined under Section 2(1)(d) of C.P. Act.” असे मत व्‍यक्‍त केले आहे. वरील न्‍यायनिवाडा प्रस्‍तुत तक्रारीस लागू पडतो असे मंचाला वाटते.  तक्रारदार ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत प्रतिपक्षाचे ग्राहक होत नसल्‍यामुळे मंचाला ही तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र नाही असा निष्‍कर्ष मंच काढत आहे व तक्रारदाराची तक्रार योग्‍य ते अधिकारक्षेत्र नसल्‍यामुळे प्राथमिक अवस्‍थेत फेटाळत आहे.

आदेश

 

  1. तक्रारदार यांची तक्रार प्राथमिक अवस्‍थेत फेटाळण्‍यात येत आहे.
  2. खर्चा बाबत आदेश नाहीत.

 

 

        श्री सुहास एम.आळशी                          श्रीमती नीलिमा संत

               सदस्‍य                                     अध्‍यक्ष

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना

             

 

 
 
[HON'BLE MRS. NILIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Suhas M.Alshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.