::: आ दे श :::
( पारित दिनांक : 26/10/2015 )
माननिय सदस्य श्री.ए.सी.उकळकर, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणात, अर्जदार/तक्रारकर्ता यांनी, दिनांक 16/10/2015 रोजी, लेखी पुरसिस, रेकॉर्डवर सादर केली, त्यामधील मजकूराचा, थोडक्यात आशय, आढळून येतो, तो येणेप्रमाणे -
वरील प्रकरणात विरुध्द पक्ष यांनी विद्युत पुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे प्रकरण चालविणे नाही, ते खारीज व्हावे. इतर विनंती/मागणी सुध्दा पुढे चालविणे नाही, करिता प्रकरण काढून टाकण्यात यावे. ही विनंती.
अशास्थितीत, सदर तक्रार प्रकरणातील कार्यवाही, कायमची, येथेच, थांबविण्यात येत असून, सदर तक्रार, नस्तीबध्द करण्याचे निर्देश, देण्यात येत आहेत व अशाप्रकारे, सदर तक्रार प्रकरण, कायमचे, निकाली काढण्यात येत आहे.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री.ए.सी.उकळकर) (सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri