Maharashtra

Ahmednagar

CC/17/9

Atul Balasaheb Lagad - Complainant(s)

Versus

Executive Engineer, Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd. - Opp.Party(s)

Dethe M. B.

13 Dec 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/17/9
( Date of Filing : 05 Jan 2017 )
 
1. Atul Balasaheb Lagad
R/o.S.B.79/71, Plot No.70, Bolhegaon, Ambedkar Chowk, Tal.Ahmednagar, Dist.Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Executive Engineer, Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.
Bhistbag Vibhag, Tal.Nagar, Dist.Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Dethe M. B., Advocate
For the Opp. Party:
Dated : 13 Dec 2019
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – १३/१२/२०१९

 (द्वारा मा.सदस्‍या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)

___________________________________________________________

१.   तक्रारदार हे बोल्‍हेगाव, अहमदनगर येथील रहिवासी असुन त्‍यांनी सामनेवाले यांच्‍याकडुन विद्युत पुरवठा घेतलेला आहे. तक्रारदाराचा मिटर क्रमांक ५८०४४०४९१० असा असुन ग्राहक क्रमांक १६२०१४६१४२९० असा आहे. तक्रारदार हे बोल्‍हेगाव येथे राहत असुन त्‍यांनी सदरच्‍या गाळ्यामध्‍ये त्‍याच्‍या व कुटुंबाच्‍या  उपजिवीकेकरीता कॉस्‍मेटिक वस्‍तु विक्रीचा व्‍यवसाय करत होते. म्‍हणुन जुन २०१५ मध्‍ये सदर गाळ्यामध्‍ये कामकाज चालु केले. तसेच फर्निचर वगैरेचे काम  सुमारे ६ महिने चालले. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडुन विद्युत पुरवठा दिनांक ०३-०६-२०१५ रोजी घेतला होता. तक्रारदाराने पुढे असे कथन केले की, दिनांक १२-११-२०१५ ते १२-१२-२०१५ चे अवास्‍तव बील सामनेवाले यांनी पाठवीले आहे. तक्रारदाराचे मिटर बंद असतांना रिडींग कॉलममध्‍ये १ युनिट दर्शवून १२८६ युनिट इतका वापर झाल्‍याचे दाखवून व मोघम स्‍वरूपाची रक्‍कम रूपये १३,५२६/- असे बील दिले आहे. सामनेवाले यांनी मिटरची कोणतीही तपासणी न करता चुकीचे बिल दिलेले आहे. अशाप्रकारे सामनेवाले यांनी सदोष सेवा तक्रारदाराला दिलेले आहे. तक्रारदाराने मिटर बदलुन मिळणेकरीता सामनेवाले यांच्‍याकडे तक्रार केली. मात्र त्‍यांनी विद्युत मिटर बदलुन दिले नाही. मिटरमध्‍ये   तांत्रीक दोष असतांनादेखील अवाजवी बील पाठविलेले आहे. माहे फेब्रुवारी २०१६ चे दिनांक १२-०१-२०१६ ते १२-०२-२०१६ रोजीचे २०० युनिट वीज वापर दर्शवुन रक्‍कम रूपये २१५२.९४/- चे रक्‍कम रूपये ४८५८.८६/- थकबाकी दाखवुन असे एकुण ७०१० रूपयाचे वीज बील दिले तसेच माहे जुन चे २३७ युनिट वीज वापर दर्शवुन रक्‍कम रूपये २६१०.५०/- चे तसेच रक्‍कम रूपये १२६१९.३०/- रकमेची थकबाकी दाखवुन रूपये १५,२३०/- चे बील दिले. तसेच माहे ऑक्‍टोबर २०१६ चे १०७ युनिट वीज वापर दाखवुन रक्‍कम रूपये १३६१.३०/- चे रक्‍कम रूपये १८८५६.६९/- थकबाकी दाखवुन असे एकुण रक्‍कम रूपये २०,२२०/- चे वीज बील तक्रारदार यांना दिले आहे. तक्रारदाराने वापराप्रमाणे ५० ते ६० एकमहिन्‍याप्रमाणे वीज बील भरण्‍याची तयारी दर्शवीली तरी तक्रारदाराला सामनेवाले यांनी बेकायदेशीर बीले पाठविली. अशाप्रकारे तक्रारदाराला मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास झाल्‍यामुळे तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल करून परिच्‍छेद क्रमांक १२ प्रमाणे मागणी केली आहे.

२.   सामनेवाले यांना नोटीस पाठविण्‍यात येऊन प्रकरणात हजर झाले नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍याविरूध्‍द निशाणी १ वर ‘एकतर्फा’ आदेश पारीत करण्‍यात आला.

३.   तक्रारदाराने दाखल केलेले केलेले कागदपत्र, शपथपत्र तसेच त्‍यांचे वकील श्री.एम.बी. देठे यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.

अ.नं.   

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत    काय ?

होय

(२)

तक्रारदार हे तक्रारीत नमुद मागणी मिळण्‍यास पात्र आहे काय ?

होय  

(३)

आदेश काय

अंतिम आदेशा प्रमाणे

कारणमिमांसा

४.  मुद्दा क्र. (१) :   तक्रारदार हे बोल्‍हेगाव, अहमदनगर येथील रहिवासी असुन त्‍यांच्‍या व कुटुंबाच्‍या  उपजिवीकेकरीता कॉस्‍मेटिक वस्‍तु विक्रीचा व्‍यवसाय करणेसाठी गाळा खरेदी केला होता. त्‍या ठिकाणी त्‍यांनी विद्युत पुरवठा सामनेवाले यांच्‍याकडुन घेतला होता. त्‍याचा मिटर क्रमांक ५८०४४०४९१० असा असुन ग्राहक क्रमांक १६२०१४६१४२९० असा आहे. ही बाब स्‍पष्‍ट करणेसाठी तक्रारदाराने प्रकरणात विद्युत बिले दाखल केलेली आहेत. त्‍यावरून स्‍पष्‍ट होते की, तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍याकडुन विद्युत पुरवठा घेतला होता. सबब मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

५.  मुद्दा क्र. (२) :   तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या कॉस्‍मेटीकच्‍या व्‍यवसायासाठी सन २०१५ मध्‍ये गाळा खरेदी केला होता व सामनेवाले यांच्‍याकडुन दिनांक   ०३-०६-२०१५ रोजी विद्युत पुरवठा घेतला आहे. सदरचे कालावधीमध्‍ये  तक्रारदाराने फर्निचरचे काम केले होते. तक्रारदाराने तक्रारीत असे तक्रारीत कथन  केले आहे. तसेच त्‍यांनी पुढे कथन केले की, त्‍यांचे मिटर बंद असतांना दिलेले रिडींग कॉलममध्‍ये १ युनिट दर्शवून १२८६ युनिट इतका वापर झाल्‍याचे दाखवून  रक्‍कम रूपये १३,५२६/- असे बील दिले. तसेच तक्रारदाराने असे कथन केले आहे की, त्‍याचे मिटर दुरूस्‍ती करून मिळावे म्‍हणुन सामनेवाले यांच्‍याकडे तक्रार केली. परंतु सामनेवाले यांनी मिटर दुरूस्‍त करून दिले नाही व तक्रारदाराला डिसेंबर २०१५ नंतर जानेवारी २०१६ ते ऑक्‍टोबर २०१६ पर्यंत मिटर नादुरूस्‍त  असतांना एकुण रक्‍कम रूपये २०,२२०/- चे बील पाठविले. सदरचे तक्रारदाराच्‍या  कथनासाठी मंचाने प्रकरणात दाखल असलेल्‍या बिलांचे अवलोकन केले असता असे आढळुन आले की, तक्रारदाराने डिसेंबर २०१९, जानेवारी २०१६, जुन २०१६, सप्‍टेंबर २०१६ ची बिले दाखल केली आहेत. तक्रारदाराला सप्‍टेंबर २०१६ चे बील रक्‍कम रूपये २०,२१०/- आलेले दिसुन येते. परंतु सदरचे बील तक्रारदाराने भरले नाही व त्‍यापुर्वीचे बील प्रकरणात दाखल केलेले नाहीत. त्‍यामुळे त्‍यापुर्वीची बिले तक्रारदाराने भरली आहे किंवा नाही ही बाब मंचाला स्‍पष्‍ट झाली नाही. थकबाकीच्‍या बिलाच्‍या कॉलमध्‍ये थकबाकीची रक्‍कम दर्शविली आहे. तसेच त्‍यावरील रिडींग या कॉलमध्‍ये ‘LOCKED’ असे नमुद आहे. यावरून असे स्‍पष्‍ट होते की, रिडींग सामनेवाले यांना घेता आले नाही. त्‍यामुळे तक्रारदाराची किती रक्‍कम थकीत होती, ही बाब बिलात नमुद आहे, परंतु तक्रारदाराने नियमीत बिले भरलेबाबतचा पुरावा दाखल नाही. त्‍यामुळे मंचासमोर तक्रारदाराला आलेली बिले ही किती कालावधीची आहे व ती जादा आली किंवा नाही ही बाब अपु-या पुराव्‍या अभावी स्‍पष्‍ट झाली नाही. तक्रारदाराने तक्रारीत मागणी केली आहे की, बिलाची रक्‍कम कमी करून द्यावी. परंतु दाखल पुराव्‍यावरून असे स्‍पष्‍ट होते की, तक्रारदाराने बिले भरलेली नाहीत. तक्रारीतील सदरची मागणी तक्रारदाराला देता येणार नाही. तक्रारदाराने संपुर्ण बिले सादर करणे गरजेचे होते. परंतु तसे केले नाही. त्‍यामुळे बिले अवाजवी आली किंवा नाही, ही बाब मंचासमक्ष स्‍पष्‍ट झाली नाही.

     तसेच तक्रारदाराने मिटर क्रमांक ५८०४४०४९१० नादुरूस्‍त असल्‍याने तो बदलुन द्यावा, अशी सामनेवाले यांच्‍याकडे मागणी केली. परंतु तक्रारदाराने लेखी तक्रार केल्‍याबाबतचा कोणताही दस्‍त प्रकरणात दाखल नाही व बिलावर कुठेही मिटर फॉल्‍टी असल्‍याचा शेरा नाही. त्‍यामुळे मिटर नादुरूस्‍त होते, असे म्‍हणता येणार नाही. मात्र सामनेवाले हे नोटीस बजावणी होऊनही मंचात हजर झाले नाही व तक्रारीतील कथन खोडुन काढले नाही. त्‍यामुळे मंचासमक्ष तक्रारदाराने मिटर दुरूस्‍ती करून मिळावे ही मागणी केली किंवा नाही, ही बाब मंचात हजर राहुन त्‍याचे म्‍हणणे सादर करून स्‍पष्‍ट करणे गरजेचे होते. परंतु सामनेवाले हे मंचात हजर झाले नाही.  तक्रारदाराने तक्रारीत जे कथन केले ते ग्राह्य धरून सदरचे मिटर नादुरूस्‍त आहे किंवा नाही, ही बाब स्‍पष्‍ट होणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदाराचा मिटर क्रमांक ५८०४४०४९१० ज्‍याचा ग्राहक क्रमांक १६२०१४६१४२९० असा आहे, या मिटरची तपासणी करून द्यावी, या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍याकडे कोणती तक्रार केली याबाबतचे दस्‍त दाखल केलेले नाहीत. त्‍यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली, असे म्‍हणता येणार नाही. तक्रारदाराने कथन केले त्‍या कथनाला ग्राह्य धरून केवळ मिटर तपासणी करणेबाबतचा आदेश करण्‍यात येतो. सबब मुद्दा क्र.२ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

६.  मुद्दा क्र. (३) : मुद्दा क्रमांक १ व २ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.   

आदेश

१.  तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

 

२. सामनेवाले यांनी तक्रारदाराला त्‍याचे मिटर क्रमांक ५८०४४०४९१० ज्‍याचा ग्राहक क्रमांक १६२०१४६१४२९० असा आहे या मिटरची आदेशाचे दिनांकापासुन विद्युत कायदा २००३ चे निर्णयानुसार तक्रारदाराचे मिटरची तपासणी करून द्यावी.

 

३.  उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

 

४.  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 

५.  तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.