::: आ दे श :::
( पारित दिनांक : 29/06/2015 )
आदरणीय अध्यक्षा, मा. सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेला अर्ज निशानी 10 यावरील अंतिम आदेश
- विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेला अंतरीम आदेश रद्द करण्याबाबत व केस खारिज करणेबाबतचा वरील अर्ज (निशाणी-10) वाचला व त्यावरील तक्रारकर्ते यांचे निवेदन वाचले.
- तक्रारकर्ते यांनी ही तक्रार, त्यांचे माघारी दिनांक 27/01/2015 रोजी विरुध्द पक्षाचे कर्मचा-यांनी त्यांच्या घरातील विज पुरवठा खंडीत करुन, विज मिटर काढून नेल्याबाबत दाखल केली.
- विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या निशाणी-10 अर्जानुसार, सदरहू प्रकरणात तक्रारकर्ता प्रल्हाद काळबांडे यांचेवर कलम-135 विद्युत अधिनियम कायदा प्रमाणे अपराध नं. 654/2015 दिनांक 07/02/2015 रोजी पोलीस स्टेशन जालना येथे दाखल असून, पवनकुमार गणेश टिकार यांनी फीर्याद नोंदविली आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कलम 126, 135 इलेक्ट्रीसिटी अॅक्ट नुसार कोणत्याही व्यक्तीवर अपराध दाखल झाला असेल तर त्या व्यक्तीला वि. जिल्हा ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल करण्याचा हक्क व अधिकार नाही.
वि. मंचाच्या मते विरुध्द पक्षाने दाखल केलेली कागदपत्रे एफ.आय. आर. ची प्रत, तपासणी अहवाल यानुसार तक्रारीतील वाद हा विद्युतकायदा 2003 चे कलम 135 अंतर्गत येतो. त्यामूळे मा.सर्वोच्च न्यायालय यांचा निवाडा, यु.पी.पॉवर कॉर्पोरेशन X अनिस अहमद, निकाल तारीख 1 जुलै 2013 च्या निर्देशानुसार, विद्युत कायदा 2003 चे कलम 135 अंतर्गत प्रस्तुत तक्रारीतील वाद मोडतो व हा वाद ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतुदी अंतर्गत मंचात चालु शकत नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष यांचा निशानी क्र. 10 अंतरीम आदेश रद्द करण्याबाबत व तक्रार खारीज करण्याबाबतचा अर्ज मंजुर करण्यात येतो.
या प्रकरणात मंचाचे अध्यक्षांचा कार्यकाल हा अकोला येथे असतांना हे प्रकरण वाशिम येथे दाखल झाले व हयात ईतर आदेश पारीत झालेला आहे. सबब खालील प्रमाणे आदेश पारीत केला.
अंतिम आदेश
1. विरुध्द पक्ष यांचा निशानी क्र. 10 अंतरीम आदेश रद्द करण्याबाबत व तक्रार खारीज करण्याबाबतचा अर्ज मंजुर करण्यात येतो. त्यामुळे तक्रारकर्ते यांची तक्रार अधिकार क्षेत्राअभावी खारीज करण्यात येते.
2. न्यायीक खर्चाबद्दल कोणताही आदेश पारीत नाही.
3. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svg