Maharashtra

Kolhapur

CC/09/129

Bajirao Ishwara Kande - Complainant(s)

Versus

Executive Engineer, Maharashtra State Electricity Board Co. Ltd Rural Division-2, - Opp.Party(s)

Adv. Bahirshet D.A.

31 Jan 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/09/129
1. Bajirao Ishwara KandeA/p Doulatwadi, Tal. Kagal, Dist.Kolhapur.2. Vilas Iswara KanadeDaulatwadi. Tal-Kagal,Kolhapur3. Sarjerao Iswara kanade.Daulatwadi. Tal-Kagal,Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Executive Engineer, Maharashtra State Electricity Board Co. Ltd Rural Division-2,Tarabai Park,Kolhapur.Kolhapur.Maharastra2. Suppdt.Engineer.Maharashtra State Electricity Boad.Tarabai Park.Kolhapur3. Asst.Engineer.Maharashtra State Electricity Board.Sub Divi.Murgud.Tal-Kagal.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Adv. Bahirshet D.A. for the complainants
Adv.K.M.Bhosale/Sadanand B. Patil for the Opponents

Dated : 31 Jan 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.31.01.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.3 यांनी म्‍हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, सामनेवाला क्र.3 यांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. तक्रारदारांच्‍या वकिलांनी लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           तक्रारदारांनी त्‍यांच्‍या शेतीसाठी सामनेवाला विद्युत कंपनीकडून त्‍यांच्‍या शेतातील बोअरसाठी 5 एच्.पी.चा विद्युत कनेक्‍शन घेतला आहे. सदरचे कनेक्‍शन सन 2003 पासून पूर्णपणे बंद आहे. त्‍यामुळे सदर बोअरमधून तक्रारदारांनी सन 2003 सालापासून केंव्‍हाही पाणी उपसा केलेला नाही. दि.14.02.2009 रोजी सामनेवाला यांचे वायरमन यांनी सदर बोअरवरील वीज कनेक्‍शन तोडून वीज कनेक्‍शनची मूळ विद्युत लाईनवरुन बोअरवरती घेतलेले कनेक्‍शन वरील पेटी व त्‍यामधील मेनस्विच, स्‍टार्टर, फ्युज इत्‍यादी काढून नेलेले आहे. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या गट नं.342 अ मध्‍ये सुर्यफुलाची लागण केलेली होती.   सामनेवाला यांच्‍या सदर कृत्‍यामुळे ईश्‍वरा गणपती कानडे यांच्‍या मालकीच्‍या विहीरीवरील कनेक्‍शनच्‍या आधारे पाणी वापर करता न आलेने तक्रारदार यांच्‍या सुर्यफुलाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांकडून रुपये 40,000/- चा भरणा केलेशिवाय वीज कनेकशन जोडता येत नाही अशी मागणी केली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून वीज चोरी केलेबाबत खोटया मजकूराची नोटीस काढून तक्रारदार यांचेकडून रुपये 18,000/- दंड वसूल केला आहे. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या शेतीच्‍या पिकाकरिता श्री.जोतिराम राऊ बेलेकर यांचेकडून रुपये 7,950/- इतक्‍या रक्‍कमेचे ऊस पिकासाठी सन 2006-07 साली पाणी विकत घेतले आहे. तसेच, बाजीराव ईश्‍वरा कानडे यांचेकडून रुपये 17.07.2007 रोजी रुपये 4,500/- इतक्‍या रक्‍कमेचे पाणी विकत घेतले आहे. सामनेवाला यांचे कृतीमुळे तक्रारदारांचे 1,90,950/- इतके नुकसान झाले आहे. सबब, सदरची रक्‍कम, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/- देणेबाबत सामनेवाला यांना आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे. 
 
(3)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत गट नं.342/अ, ब चे 7/12 उतारे, मशागतीची खर्च पावती, वीज चोरीचे बिल, सामनेवाला क्र.1 ते 3 यांना पाठविलेली नोटीस, मोटर दुरुस्‍ती पावती, बियाणे खरेदी पावती, पाणी विकत घेतलेची बिले इत्‍यादीच्‍या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(4)        सामनेवाला विद्युत कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणणे देवून तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी श्री.विलास ईश्‍वरा कानडे यांचे नांवे असणारे एजी-190 या वीज कनेक्‍शन संदर्भात बरीचशी माहिती लपवून ठेवली आहे. सदर विलास कानडे यांना 5 एच्.पी.चे कनेक्‍शन देणेत आले होते. सदर कनेक्‍शनचे आधारे तक्रारदर हे दि.28.01.2001 रोजीपर्यन्‍त अविरतपणे वीज वापर करत होते. जानेवारी 2009 मध्‍ये सामनेवाला क्र.3 यांचेकडील वायरमन सदर कनेक्‍शनची पाहणी करणेस गेले असता तक्रारदारांनी सदर कनेक्‍शनचे मिटरमधून वीज वापर न करता बेकायदेशीररित्‍या मेन स्‍वीचमधून डायरेक्‍ट विद्युत प्रवास करुन घेतलेचे निदर्शनास आले. सदरचे कनेक्‍शन हे शेतीकरिता असताना घरगुती वापरालादेखील वीज जोडून घेतली होती. याबाबत तक्रारदारांना विचारणा केली असता त्‍यांनी उडवाउडवीची उत्‍तरे देणेस सुरवात केली. त्‍यावेळी तक्रारदारांना वीज चोरी करुन फौजदारी गुन्‍हा केला असल्‍याने पोलीस तक्रार करणार असलेबाबत कळविले. त्‍याचवेळी तक्रारदारांनी गयावया करुन वीज चोरीबाबत दंड व बिल भरणेस तयार आहे, पोलीस कारवाई करु नका अशी विनंती केली. त्‍याप्रमाणे तक्रारदारांना चोरी केलेल्‍या वीजेची आकारणी, पुर्नजोडणावळ तसेच दंड असे मिळून एकूण रुपये 24,480/- इतके बिल दि.03.02.2009 रोजी दिले आहे. सदरचे बिल त्‍यांनी 8 दिवसांत भरणेचेही कबूल केले.  त्‍यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांवर कोणतीही पोलीस कारवाई केली नाही.  तथापि, तक्रारदारांनी या बाबीचा गैरफायदा घेवुन दंडाची अथवा वीज चोरीचे बिल जमा केले नाही. त्‍यामुळे सामनेवाला यांनी दि.28.01.2009 रोजी विलास ईश्‍वर कानडे यांचे नांवे असलेले एजी-190 चे कनेक्‍शन तोडले आहे व सदरची कारवाई नियमानुसार केली आहे.  तक्रारदारांच्‍या एजी-190 या कनेक्‍शनमधून वीज चोरी केलेबाबतचे फोटो दाखल केले आहेत.   तक्रारदारांचे गट नं.342-अ मधील बोअरवेल हे सन 2003 पासून बंद असल्‍याने नुकसानीस सामनेवाला हे जबाबदार असणेचा प्रश्‍नच नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. 
 
(5)        सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ठयर्थ तक्रारदारांनी वीज चोरी केलेबाबतचा अहवाल, वीज चोरी आकार भरले असलेबाबत व पुर्नजोडणी करणेबाबत दिलेला आदेश, वीज बिल भरलेबाबतची पावती इत्‍यादीच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.
 
(6)        या मंचाने उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. प्रस्‍तुत प्रकरणी वीज चोरीबाबतचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. उपलब्‍ध रेकॉर्ड पाहिले असता तक्रारदारांनी वीज चोरी केली असलेचे दिसून येते. सदर प्रकरणी वीज चोरीचा मुद्दा असल्‍याने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदीचा विचार करता तसेच इंडियन इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्‍ट 2003 यातील तरतुदींचा विचार करता सदरची तक्रार चालविणेचे कार्यक्षेत्र या मंचास येत नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
आदेश

1.    तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते.

2.    खर्चाबाबत आदेश नाही.


[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT