ग्राहक तक्रार क्र. : 175/2014
दाखल तारीख : 27/08/2014
निकाल तारीख : 26/08/2015
कालावधी: 0 वर्षे 07 महिने 10 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. लक्ष्मण रघुनाथ पवार (मयत),
तर्फे विकास लक्ष्मण पवार,
वय - 35 वर्ष, धंदा – शेती,
रा. उदतपुर, ता.लोहारा, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
उस्मानाबाद. ता.जि. उस्मानाबाद.
2. सहाय्यक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
लोहारा ता. लोहारा, जि. उस्मानाबाद.
3. कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,
सास्तुर ता. लोहारा, जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.जे.डी.कदम(पाटील).
विरुध्द पक्षकार तर्फे विधिज्ञ : श्री.व्ही.बी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
विरुध्द पक्षकार (विप) विज वितरण कंपनी यांचेकडे कृषी पंपासाठी विद्यूत पुरवठा मिळण्याचा अर्ज करुन डिपाझीट भरुनही विद्यूत पुरवठा दिला नाही व त्यामुळे पिकांना पाणी न देता आल्यामुळे नुकसान झाले म्हणून विप ने विद्यूत पुरवठा द्यावा व झालेले नुकसान भरुन दयावे म्हणून तक्रारकर्ते (तक) ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पूढीलप्रमाणे आहे.
1. तक हा ऊदतपूर ता. लोहारा जि.उस्मानाबाद चा शेतकरी आहे. त्यांला गट नंबर 39, 39(3), 48, 48(1) व 49(5) अशा एकूण 7 एकर जमिनी असून जमिन काळी कसदार आहे. तक ने जमिनीत विहीर घेतली. व त्यांस भरपूर पाणी लागले. तक ने विहीरीवर विद्यूत पंप बसवण्यासाठी दि.30.12.2009 रोजी विप कडे विद्यूत कनेक्शनची मागणी केली कोटेशनची रककम रु.2,950/- सीआरए रु.2500/- सीटीसी रु.100/- ए जी रु.100/- पी. एफ. रु.50/- असे एकूण रु.5,000/- विप क्र.2 कडे जमा केले. तक याने विप कडे वेळोवेळी कनेक्शन देण्याची मागणी केली. विप ने त्याबाबत टाळाटाळ केली. तक ने दि.27.06.2012 रोजी अॅड.पवार यांचे मार्फत नोटीस पाठवून कनेक्शन देण्याची मागणी केली. तथापि विप यांनी मार्च 2012 ते मार्च 2014 या कालावधीसाठी ग्राहक क्र.597330809911 याचे बिल रु.15,360/- ची मागणी केली. प्रत्यक्षात कनेक्शन दिले नसताना केलेली बिलाची मागणी अन्यायकारक आहे. तक ला मानसिक त्रास झाला व विद्युत पुरवठा न मिळाल्यामूळे नुकसान झालेले आहे. ते रु.4,50,000/- आहे. त्यामुळे बेकायदेशीर बिल रद्द करावे त्वरीत विज जोडणी द्यावी नुकसानीपोटी रु.4,50,000/- द्यावे व मानसिक त्रासापोटी रु.30,000/- द्यावे म्हणून तक ने ही तक्रार दि.29.09.2014 रोजी दाखल केली आहे.
2. तक ने तक्रारीसोबत रु.5000/- भरल्याची दि.30.12.2009 ची पावती हजर केली आहे. सर्व्हे नंबर 48 (1) साठी ही पावती असल्याचे दिसते.एप्रिल मे जुन 15 या कालावधीचे दि.30.07.2014 चे रु.546/- चे बिल हजर केले आहे. त्यामध्ये थकबाकी रु.14,814/- दाखवलेी आहे.
3. विप यांने या कामी आपले म्हणणे दिलेले नाही. मात्र दि.27.04.2015 रोजी लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. त्यामध्ये तक चे म्हणणे नाकारले आहे. मात्र दिलेले बिल चुकीने दिले असे म्हटलेले आहे. त्याचप्रमाणे तक ला देण्यासाठी 1 X 63 KVA डीटीसी मंजूर केल्याचे म्हटलेले आहे. त्यानुसार काम पुर्ण करुन तक्रारदारास विद्यूत पुरवठा सुरु करता येईल असे म्हटले आहे. तक हा विप चा ग्राहक नाही असे म्हटले आहे. तसेच तक्रार मुदतीत नसल्याचे म्हटले आहे. विप यांनी असाही अर्ज दिला की, लोहारा कार्यकारी अभिंयता तुळजापुर यांचे कार्यक्षेत्रात येते त्यामुळे विप क्र.1 कार्यकारी अभिंयता उस्मानाबाद यांचे नांव कमी करुन कार्यकारी अभिंयता तुळजापुर यांना पक्षकार करावे. विप चा तो अर्ज मंजूरही झालेला आहे. मात्र तक ने तशी दुरुस्ती केलेली नाही.
4. तक ची तक्रार, त्यांने दाखल केलेली कागदपत्रे, तसेच विप चे म्हणणे, यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात आम्ही त्यांची उत्तरे त्यांचे समोर खालील दिलेल्या कारणासाठी लिहीली आहेत.
मुद्दे उत्तरे
1. विप ने सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय.
2. तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 व 2 :
5. दि.30.12.2009 ची पावती हे दाखवते की सर्व्हे नंबर 48 (1) मध्ये 5 एच पी चे कनेक्शन मिळण्यासाठी विप क्र.2 ने तक कडून रु.5000/- भरुन घेतले. तक ने सर्व्हे नंबर 48 (1) चा उतारा अगर कोणत्याही जमिनीचा उतारा हजर केला नाही. तक चे म्हणणे की, त्यांने आपल्या जमिनीत विहीर खोदली आहे. मात्र ते दाखवण्यास 7/12 उतारा हजर केलेला नाही. कदाचित सर्व्हे नंबर 48 (1) मध्ये 30.12.2009 पुर्वीच विहीर खोदलेली असेल काही वेळा शेतकरी विद्यूत कनेक्शनसाठी आधी अर्ज करतात व शेतामध्ये विहीर त्यानंतर खोदतात. प्रत्यक्षात विहीर खोदून झाली हे 7/12 उतारा दाखल केला असता तरच कळले असते.
6. विप ने म्हटले आहे की, विप ने तक ला विद्यूत कनेक्शन दिले नसल्यामुळे तक हा विप चा ग्राहक नाही. मात्र विप ने तक कडून डिपाझिट भरुन घेतलेले आहे. त्यानंतर विप ने तक ला विद्यूत पुरवठा करणे व तक ने विप ला त्याबद्दल विज देणे हे अपेक्षित आहे. म्हणजेच विप ने तक ला सेवा पुरवण्याचे कबूल केले व तक याने विप ला त्याबद्दल बिल देण्याचे कबूल केले. हे उघड होत आहे. त्यामुळे तक हा विप चा ग्राहाक संरक्षण कायद्याप्रमाणे ग्राहक होतो.
7. विप चे म्हणणे आहे की, महावितरण आपल्या दारी या योजने अंतर्गत मागेल त्यांला डिमांड प्रत्यक्ष पाहणी न करता देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्ष पाहणी केले असता तक चे सर्व्हे नंबर 36 मध्ये विद्यूत पुरवठयासाठी डिपी ची सोय नव्हती. तसेच एलटी ची लाईनही नव्हती. त्यामुळ तक ला विद्यूत पुरवठा करण्यात आलेला नाही. आता 1 X 63 KVA चा डिटीसी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानुसार काम पुर्ण करुन तक ला विद्यूत पुरवठा सुरु करता येईल. मात्र विप ने तक ला जुन 2014 अखेरचे बिल दिले असून मागील थकबाकी रु.14,814/- दाखवली आहे. मात्र तक ला विद्यूत पूरवठा दिला नाही हे विप ने स्पष्टपणे कबूल केलेले आहे. व बिल चुकीने दिले हे पण कबूल केलेले आहे.
8. दि.30.12.2009 रोजी कोणत्याही कारणाने तक कडून डिमांडची रक्कम भरुन घेतल्यानंतर लवकरात लवकर विज पुरवठा देणे ही विप ची जबाबदारी होती. सुमारे सहा वर्षाचा कालावधी जाऊन सुध्दा जर विज पुरवठा दिला नसेल तर ही विप ची सेवेतील त्रुटी आहे. विप चे म्हणणे की, त्यांची महावितरण आपल्या दारी ही योजना होती.म्हणजेच त्या योजनेनुसार मागेल त्यांला विज पुरवठा देण्याची योजना व त्यासाठी आर्थिक तरतूद केलेली असणार. जर सहा वर्षाचे कालावधीत विद्यूत पुरवठा देता आला नाही तर ही विप ची सेवेतील त्रुटी असून त्यांस इतर कोणतेही नांव देता येणार नाही.
9. वर म्हटल्याप्रमाणे तक ने आपल्या जमिनीचे 7/12 उतारे हजर केलेले नाहीत. त्याचप्रमाणे आपले जमिनीत विहीर असून तिला पुरेसे पाणी आहे याबददलही पुरावा दिलेला नाही. त्यामुळे तथाकथीत नुकसान मान्य करता येणार नाही. मात्र सहा वर्षापासून विद्यूत पुरवठा न दिल्यामुळे विप यांनी तक ला रु.10,000/- भरपाईपोटी द्यावेत हे न्याय होईल. त्याचप्रमाणे चुकीने दिलेले बिल सुध्दा रदद करावे लागेल. म्हणून आम्ही मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश करतो.
आदेश
1. तक ची तक्रार अंशतः खालील प्रमाणे मंजूर करण्यात येते.
2. विप क्र.2 व 3 यांनी तक ला दिलेले दि.30.07.2014 चे बिल थकबाकीसह पुर्णपणे रद्द करण्यात येते.
3. विप क्र.2 व 3 यांनी तक यांला दोन महिन्याचे कालावधीत विद्यूत पुरवठा चालू करुन द्यावा.
4. विप क्र.2 व 3 यांनी तक यांला नुकसान भरपाई म्हणून रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त) द्यावेत.
5. विप क्र.2 व 3 यांनी तक ला या तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/-(रुपये तीन हजार फक्त) द्यावेत.
6. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाने परत न्यावेत.
7. उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.
8. उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद..