जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.2009/67 प्रकरण दाखल दिनांक – 18/03/2009. प्रकरण निकाल दिनांक – 22/07/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. श्री.शिवानंद पि. माधवराव कस्तुरे वय, 43 वर्षे, धंदा शेती, रा.डोंगरगांव ता.मुदखेड, जि.नांदेड. अर्जदार विरुध्द 1. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी म. नांदेड मार्फत मुख्य कार्यकारी अभिंयता, विदयुत भवन, नांदेड. गैरअर्जदार 2. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी म. नांदेड मार्फत, कनिष्ठ अभिंयता, बारड, ता.मुदखेड, जि. नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.साईनाथ कस्तुरे. गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - अड.विवेक नांदेडकर. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार हे मौजे डोंगरगांव ता. मुदखेड येथील रहीवासी असून शेत जमिन गट नंबर 119 चे मालक आहेत. अर्जदार यांचा ग्राहक क्र.550290252989 या द्वारे त्यांनी विज पूरवठा घेतला आहे. शेत जमिन ही बागायती असल्यामूळे त्यांने सन 2007 च्या मार्च महिन्यात तिन एकर ऊसाची लागवड केली. त्यांची व्यवस्थीत मशागत करुन सन 2008 च्या एप्रिल महिन्यात ऊसाचे पिक तोडणीसाठी तयार झाले होते. अर्जदाराच्या शेतात सरासरी 70-80 मे.टन प्रति एकर ऊस येण्यासारखा होता. अर्जदाराच्या शेतामधून विज पूरवठा करणारी तार गेली आहे. डि.पी.देखील शेतातच आहे. परंतु गैरअर्जदार क्र.2 च्या निष्काळजीपणामूळे लाईनची बरोबर देखभाल झाली नाही. तारा लूज होऊन ऊसाच्या शेतामधील पिकावर लोबकळत होत्या. अशा स्थितीत दि.2.4.2008 रोजी त्यांचे ताराचे घर्षणामूळे स्पार्कीग होऊन आगीच्या ठीणग्या पडून अर्जदाराच्या शेतातील संपूर्ण तिन एकरमधील ऊस जळाला व अर्जदाराचे रु.1,00,000/- चे नूकसान झाले. पोलिस स्टेशन बारड येथे दि.2.4.2008 रोजी तक्रार दिलयावर त्यांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला. यानंतर दि.4.4.2008 रोजी विद्यूत निरीक्षक यांना घटनेची सूचना प्राप्त झाल्यामूळे त्यांने येऊन पाहणी केली. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे निष्काळजीपणामूळे ऊस जळाला असा अहवाल दिला. अर्जदाराने स्वतः खाजगी वाहनाने ऊस तोडून कारखान्यास दिला. अर्जदार हा भाऊराव सहकारी साखर कारखान्याचा सभासद आहे. जून 2008 मध्ये गैरअर्जदाराकडे अर्ज करुन ऊसाच्या नूकसान भरपाईची मागणी केली. ऊसाची लागवडीसाठीचा खर्च रु.40,000/- सन 2007-08 चे अंदाजे उत्पन्न रु.1,00,000/- व इतर खर्च रु.60,000/- असे एकूण रु.2,00,000/- ची मागणी केली आहे व त्यावर 12 टक्के व्याज मागितले आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार ही निव्वळ गृहितकांच्या आधारावर दाखल केलेली आहे. गैरअर्जदाराने सेवेत कोणतीही ञूटी केली नाही. गैरअर्जदाराने वैयक्तीक पदनामाने दाखल केलेली तक्रार अधिका-याच्या विरुध्द आहे. त्यामूळे विज कायदा 2003 अन्वये खारीज करावी. अर्जदाराला ज्या ठिकाणी विज पूरवठा केलेलो आहे तेथे शेतात कोणताही कसूर केलेला नाही. अर्जदाराची जमिन ही कसदार व बागायती असून तेथे एक बारमाही पाणी असणारी विहीर आहे हे म्हणणे खोटे आहे. अर्जदाराने सन 2006-07 मध्ये प्रति एकर रु.6,000/- खर्च केला हे म्हणणे अमान्य आहे. अर्जदाराचे पिक एप्रिल महिन्यात तोडणीसाठी तयार झाले होते हे म्हणणे खोटे आहे व त्यांना सरासरी उत्पन्न 70 ते 80 मे.टन हे ही म्हणणे मान्य नाही.अर्जदाराच्या शेतातून उच्च पूरवठा करणारी लाईन गेली आहे यावीषयी म्हणावयाचे नाही परंतु डि.पी. आहे हे म्हणणे खोटे आहे. त्यामूळे दि.2.4.2008 रोजी घर्षनामूळे स्पार्कीग होऊन आग लागली हे म्हणणे खोटे आहे व पोलिसाने व तलाठयाने घटनेच्या दूस-या दिवशी पाहणी केली व पंचनामा केला हे गैरअर्जदारांना माहीत नाही. साखर कारखान्याने अर्जदाराचा ऊस नेण्यास टाळाटाळ केली हे म्हणणे खोटे व चूकीचे आहे. विद्यूत निरीक्षक यांनी दिलेला अहवाल गैरअर्जदार यांना मान्य नाही. गैरअर्जदाराने विद्यूत संच योग्य प्रकारे ठेवलेले आहे व त्यांची देखभाल देखील केलेली नाही. अर्जदाराने ज्या ऊसा बददल तक्रार दाखल केलेली आहे ते कागदपञ परस्पर विसंगत आहेत. त्यामूळे त्यांना नूकसान भरपाई मागता येणार नाही. त्यामूळे अर्जदार यांचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. अर्जदार हे किती नूकसान भरपाई मिळण्यास पाञ आहेत ? आदेशाप्रमाणे. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदाराने गैरअर्जदाराकडून ऐजी-55 हे अग्रीकल्चर विज कनेक्शन घेतले आहे. त्यांचा ग्राहक क्र.550290252989 असा आहे. या बददल देयक दाखल केलेले आहे. दि.2.8.2008 रोजी अर्जदाराचे शेत सर्व्हे नंबर 119 त्यातील तिन एकर ऊसास आग लागली अशी तक्रार दिली आहे. या बाबतचा अर्ज प्रस्तूत प्रकरणात दाखल केलेलो आहे. तसेच पोलिसांनी दि.2.4.2008 रोजी म्हणजे त्याच दिवशी घटनास्थळचा पंचनामा केला. यानुसार मौजे डोंगरगांव येथील शेत गट नंबर 119 मध्ये ऊसाचे पिकास तार तूटून आग लागली असे म्हटले आहे. या बाबत शेतक-याने तलाठयास सूचना केली होती. त्यानुसार तलाठयाने दि.3.4.2008 रोजी घटनास्थळचा पंचनामा केला. त्यात एकूण क्षेञफळ 1 हेक्टर 20 आर असून 0.70 आर ऊस जळून खाक झाल्याचे म्हटले आहे. अंदाजे नूकसान रु.43,500/- झालयाचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी विद्यूत निरीक्षक यांना आगीचे खरे कारण जाणून घेण्यासाठी पञ लिहीले असता विद्यूत निरीक्षक यांनी येऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यांचे दि.29.4.2008 रोजीच्या अहवालानुसार श्री.कस्तुरे यांचे शेतातील ट्रान्सफारमधील जवळ बाजूने 11 के.व्ही. ची तार पंक्चर होऊन ते खाली जमिनीवर पडले व तार आऊटगोईग च्या बाजूने तार तूटल्याने विज पूरवठा बंद झाला नाही व स्पार्कीग होऊन ठीणग्या ऊसाचे पाचवटयावर पडून व त्यामूळे अर्जदार यांचा दोनएकर ऊस जळून गेला. एकंदर पंचनामा, विद्यूत निरिक्षकाचा अहवाल हे पाहिले असता शेतक-याच्या ऊसास आग लागली व ऊस जळून पिकाचे नूकसान झाले व ही नूकसान भरपाई गैरअर्जदार यांनी अद्यापही अर्जदार यांना दिली नाही. यानुसार सेवेत ञूटी केल्याचे दिसून येते. अर्जदारांनी त्यांचे तक्रार अर्जात तिन एकर ऊस लावला असे म्हटले आहे. शेतक-याचा 7/12 पाहिला असता यावर शिवानंद कस्तुरे यांचे नांवावर 1 हेक्टर क्षेञफळ व 2007-08 च्या पे-यानुसार ऊस 1 हेक्टर 40 आर मध्ये पेरा दाखवलेला आहे परंतु तलाठयाने केलेला पंचनाम्यामध्ये त्यापैकी 0.70 आर ऊस जळाला असे म्हटले आहे. म्हणजे जवळपास पावने दोन एकर ऊस जळाल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने आपल्या तक्रार अर्जात सन 2007-08 चे उत्पन्न रु.1,00,000/-, ऊस जळाल्याचा खर्च रु.60,000/- असा मागितले आहे. जेव्हा ऊस तयार झाल्यानंतर त्यांचा बाजारभावाप्रमाणे उत्पन्न धरल्यास म्हणजे विक्रीचा रेट धरल्यास ऊस लागवडीचा खर्च व इतर खर्च अर्जदार यांना मागता येणार नाही. तलाठयाने आपल्या पंचनाम्यात रु.43,500/- चे नूकसान झाले असे म्हटले आहे. अर्जदाराने भाऊराव सहकारी साखर कारखान्यात यांचे वजानाचे स्लीप लावलेली आहे. यात दि.23.3.2007 रोजी अर्जदाराच्या नांवाने घातलेला ऊस 6.550 टन, 15.200, 14.280, 13.6, 12.770, असे दर्शविलेले आहे म्हणजे एकूण 2007 रोजी 62.38 टन ऊस गेल्याचे म्हटले आहे. एवढा ऊस व 2006-07 चा पेरा 1.40 एवढा दाखवलेला आहे. म्हणजे दूस-या वर्षी 2007-08 ला जो ऊस होता तो खोडवा होता. म्हणजे अर्जदारास एकूण उत्पन्न 62.38 मै. टन झालेले आहे व दूस-या वर्षी खोडवा असल्यामूळे या उत्पन्नात घट होईल यांचे वजन अंदाजे 50 टन होईल व त्या वेळेचा ऊसाचा भाव रु.800/- गृहीत धरल्यास म्हणजे रु.40,000/- चा ऊस होऊ शकतो. म्हणजे तलाठयाचा अंदाज जवळपास खरा दिसतो. अर्जदाराने स्वतः जळालेला ऊस कारखान्यास दिला असे म्हटले आहे. तेव्हा जळालेल्या ऊसाची किंमत 25 टक्के जरी धरली तरी ती रु.10,000/- होते म्हणून एकूण नूकसान रु.40,000/- व त्यातून जळालेल्या ऊसाची किंमत रु.10,000/- कमी केल्यास अर्जदाराचे खरे नूकसान रु.30,000/- चे झालेले आहे. म्हणून अर्जदार हा एवढी रक्कम मिळण्यास पाञ आहे. ही रक्कम गैरअर्जदाराने न देऊन सेवेत ञूटी केलेली आहे. त्यामूळे अर्जदार यांना मानसिक ञास ही झालेला आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना जळालेल्या ऊसाच्या नूकसान भरपाई बददल रु.30,000/- व त्यावर दावा दाखल केलेल्या दिनांकापासून म्हणजे दि.18..3.2009 पासून 9 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |