Maharashtra

Osmanabad

CC/14/164

Bhausaheb Shrirang Patil - Complainant(s)

Versus

Executive Engineer M.S.E.D.C.L. - Opp.Party(s)

R.S.Jagtap

23 Nov 2015

ORDER

DISTRICT CONSUMER REDRESSAL FORUM OSMANABAD
Aria of Collector Office Osmanabad
 
Complaint Case No. CC/14/164
 
1. Bhausaheb Shrirang Patil
R/o Shiradhon Tq. Kallmb Dist.Osmanabad
Osmanabad
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Executive Engineer M.S.E.D.C.L.
Osmanabad
Osmanabad
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.V. Kulkarni. PRESIDENT
 HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN MEMBER
 HON'BLE MR. M.B. Saste MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

ग्राहक तक्रार  क्र.  : 164/2014

                                                                                     दाखल तारीख    : 04/09/2014

                                                                                     निकाल तारीख   : 23/11/2015

                                                                                    कालावधी: 01 वर्षे 02 महिने 18 दिवस

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, स्‍मानाबाद

1.   भाऊसाहेब पि. श्रीरंगराव पाटील,

     वय - 60 वर्ष, धंदा – शेती,

     रा.शिराढोण, ता.कळंब, जि.उस्‍मानाबाद.                       ....तक्रारदार

 

                        वि  रु  ध्‍द

 

1.    महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी मर्या.,

      मार्फत कार्यकारी अभियंता,

(म.रा.वि.वि.कं) ताजमहाल टॉकीज जवळ,

उस्‍मानाबाद, ता.जि. उस्‍मानाबाद.

 

2.    सहाय्यक अभियंता,

      महाराष्‍ट्र विद्युत वितरण कंपनी,

उपविभाग कळंब, ता. कळंब, जि. उस्‍मानाबाद.               ..विरुध्‍द  पक्षकार

 

कोरम :       1)  मा.श्री.एम.व्‍ही.कुलकर्णी, अध्यक्ष.

                                    2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्‍या.

                  3)  मा.श्री.मुकुंद बी.सस्‍ते, सदस्‍य.

 

                                         तक्रारदारांतर्फे विधीज्ञ      :  श्री.आर.एस.जगताप.

                          विरुध्‍द पक्षकार तर्फे विधिज्ञ  :  श्री.व्‍ही.बी.देशमूख.

 

                न्‍यायनिर्णय

मा. सदस्‍य श्री.मुकुंद बी.सस्‍ते यांचे व्‍दारा:

1)   अर्जदार हा शेतकरी असून त्‍यांचे नावावंर मौजे शिराढोण ता. कळंब, जि. उस्‍मानाबाद येथे जमीन गट क्र.131/डव 19/ अ यामध्‍ये दोन ठिकाणी अंदाजे 03 एकर सिडचा गहू लावला होता. सदर जमीनीमध्‍ये विहीरीवर इलेक्‍ट्रीक मोटार 7.50 एच.पी.ची व पाईप लाईन केलेली आहे. विप यांचेकडून विद्युत पुरवठा घेतलेला आहे. तक विप चा ग्राहक आहे. अर्जजदाराच्‍या शेतातून पोलवरुन तारा टाकून पुढील शेतक-यास विद्युत पुरवठा केलेला आहे. अर्जदाराचा जवळापास 60/65 क्विंटल गहू झाला असता सदरील गव्‍हाच्‍या, ज्‍वारीच्‍या कडब्‍याच्‍या गंजी होता तसेच ताडपत्री होती. सदरी गंजीवरुन इलेक्‍ट्रीकच्‍या तारा गेलेल्‍या असून त्‍या तारांमध्‍ये झोळ पडलेला होता व वा-यामुळे सदरील तारांचे घर्षण होऊन तारा तुटून जमिनीवर पडल्या व तक चे गव्‍हाच्‍या व ज्‍वारीच्‍या पिकाची गंज जळून खाक झाल्‍सर. म्‍हणून विप यांना तोंडी व लेखी सुचना देऊन नुकसान भरपाई देण्‍यासाठी मागणी केली असता विप ने टाळाटाळ केली व दि.25/07/2014 रोजी नुकसान भरपाई देण्‍यास स्‍पष्‍टपणे नकार दिला म्हणून अर्जदारास हा दावा करणे भाग पडले म्‍हणून तक यास रु.6,50,000/- द.सा.द.शे.12 व्‍याज दराने घटनेच्‍या तारखेपासून पुर्ण रक्‍कम मिळेपर्यंत देण्‍याचा आदेश व्‍हावा तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.44,500/- विप कडून देण्‍याचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.

 

2)    तक्रारदाराने सदर तक्रारी सोबत सातबारा उतारा, आठ-अ चा उतारा, तलाठी यांचा अहवाल, पंचनामा, एफआयआर, विप यांना दिलेला अर्ज, विप चा अहवाल, लाईट बिल व फोटो इत्‍यादींच्‍या प्रती दाखल केल्‍या आहेत.

 

3)   विप यांना सदर बाबत नोटीस पाठवली असता त्‍यांनी आपले म्‍हणणे दि.20/01/2015 रोजी दाखल केले ते खालीलप्रमाणे.

 

4)     विप यांनी तक यांची तक्रार नामंजूर केली असून पेरणी व झालेल्‍या उत्‍पादनाबाबत तक यांनी पुरेसे पुरावे दिलेले नाहीत. सदरची घटना हि नैसर्गिक आपत्‍तीमुळे घडलेली असून सदर लाईन ही व्‍यवस्थित होती व सदरच्‍या लाईनबाबत घटनेपुर्वी कोणत्‍याही प्रकारची तक्रार नव्‍हती. सदर घटनेबाबत तलाठी व पोलिस यांनी केलेला पंचनामा हा परस्‍पर व तक्रारदारा यांचा फायदा व्‍हावा अशा दृष्‍टीने तयार केला आहे. विप यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केली नसल्‍याने विप हे सदर घटनेसाठी जबाबदार नाहीत म्‍हणून सदरची तक्रार रद्द करण्‍यात यावी असे नमूद केले आहे. 

 

5)    तक ची तक्रार त्‍यांनी दिलेले कागदपत्रे विप चे म्‍हणणे व विप ची कागदपत्रे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात आम्‍ही त्‍यांची उत्‍तरे त्‍यांचे समोर खालील दिलेल्‍या कारणासाठी लिहीली आहेत.

 

            मुद्दे                                      उत्‍तरे

1.  तक विप यांचा ग्राहक आहे काय                                  होय.

2.  विप ने सेवेत त्रूटी केली आहे काय ?                           होय

3.  तक ने नुकसान भरपाईची रक्‍कम सिध्‍द केली आहे काय.          नाही.

4.  तक अनुतोषास पात्र आहे काय ?                              होय.

5.  आदेश काय ?                                      शेवटी दिल्‍याप्रमाणे.

कारणमिंमासा

मुद्दा क्र.1  व 2 ः-

6)    तक्रारदार हा शिरढोण येथील रहिवाशी असून त्‍यांने विपकडून विद्युत पुरवठा घेतलेला आहे. सदरचा पुरवठा हा दि.06/11/2000 या वर्षापासून शेतीसाठी घेतलेला दिसून येतो व हया बाबी विप लाही मान्‍य असल्‍यामुळे तक हा ग्राहक व विप हा सेवा पुरवठदार हे नाते कायम होण्‍यास कोणतीही अडचण नाही.

मुद्दा क्र.3, 4 व 5 :

7)   तक ने त्याचे गट क्र.131/ड व 19/अ मध्‍ये सिडचा गहू अंदाजे 3 एकराचा पेरलेला होता. तसेच पिक काढून भरडण्‍यासाठी एकत्र करुन त्‍यांची गंज गट क्र.131/ड मध्‍ये लावली होती. तथापि दि.28/04/2014 रोजी तारा पडून शेतातील गव्‍हाच्‍या पीकांच्‍या गंज व ज्‍यारीचे पिकाच्‍या कडबयाची गंजी जळाल्‍या त्‍यामुळे तक्रादाराचे अंदाजे रु.6,50,000/- चे इतके नुकसान झाले.

 

8)   तक चे म्‍हणण्‍यानुसार विप ने सदरचे तारांची व्‍यवस्थितरित्‍या काळजी न घेतल्‍यामुळे इलेक्‍ट्रीक तारांमध्‍ये आवश्‍यक तो ताण नसल्याने तारांमध्‍ये झोळ पडून स्‍पार्कींग झाली व सदरची घटना घडली. या संदर्भात तक ने दाखल केलेले फोटो पुराव्‍या दाखल दाखल केले असून विद्युत निरीक्षक यांचा अहवाल दाखल केला आहे. यांच्‍या आधारे तक चा दावा मान्‍य करता येईल अशी परिस्थिती आहे.  

   

9)    विप ने घेतलेला मुख्‍य आक्षेप तक ने त्‍याचे झालेले नुकसानी संदर्भात उत्‍पन्‍नाचे पुरावे दिलेले नाही असे म्‍हणलेले आहे. तसेच सदरची घटना ही वादळी वा-यामुळे घडली आहे त्‍याबाबत विप ला जबाबदार धरता येणार नाही. विप चा आणखी एक आक्षेप असा की विद्युत निरिक्षकाचा अहवाल नाही ज्‍यामुळे नुकसानी संदर्भातील वास्‍तुस्थिती स्‍पष्‍ट होत नाही त्‍याच बरोबर कायदेशीर बाबी म्‍हणजे भारतीय विद्युत अधिनीयम कलम 36 चा कलम 42 (3) प्रमाणे लाईनच्‍या खालील बाजूस कोणासही कोणत्‍याही प्रकारे वापर करता येत नाही त्‍यामुळे तक ने कायद्याचे उल्‍लंघन केलेले आहे. त्‍यामुळे ही तक्रार चालू शकत नाही असे म्‍हणणे आहे. याप्रकारे आक्षेपा संदर्भात चर्चा करतांना तक ने दाखल केलेला अहवाल  तहसि‍लदार यांचा रिपोर्ट, पंचनामा, इलेक्‍ट्रीकल अॅक्‍सीडेंन्‍ट रिपोर्ट, पोलिस स्‍टेशनचा रिपोर्ट,  फोटोग्राफस यांची पाहणी केली असता त्‍यांच सोबत विद्युत निरिक्षक यांनी दि.23/07/2015 रोजी दाखल केलेला अभिप्राय याबाबत तक ची तक्रार स्‍पष्‍ट करण्‍यास पुरेसा आहेत असे मंचाचे मत आहे. दि.07/11/2014 चा तहसिलदार कार्यालय कळंब येथील नैसर्गीक आपत्‍ती  विभाग यांचे कडील अहवाल हा विद्युत स्‍पार्कीग गव्‍हाची बनीम व ताडपत्री जळल्‍या बाबत अभिप्राय दाखल आहे. दि.23/07/2015 यांचाही अहवाल हा लागू दाब उत्‍तरी तार मार्ग 3 फेस 4 वाय विद्युत वाहीनीचा 1 वायर दुस-या फेस वर पडली व स्‍पार्कींग होऊन त्‍याचे  ठिणगी पडली व गव्‍हाचे गंजीस आग लागून गहू जळाले अशा स्‍वरुपाचे अभिप्राय विद्युत निरिक्षकाने दिलेले दिसुन येते. तक चे दाखल केलेला फोटोग्राफ मधील पोल हा तिरका अवस्‍थेत म्‍हणजेच वाकडा झालेला दिसुन येतो. तारा एकात एक अडकलेल्‍या दिसुन येतात, 2 तारा ज्‍यामध्‍ये फेस वायर तुटलेली दिसुन येते त्‍या खालची बाजूस पेटलेले दिसुन येते तसेच जमीनीवर जाळ व राखेचे ढिगारे दिसुन येते. अर्थातच हा फोटो तक चे शेतातील आहेत किंवा कसे? याबाबतचा आक्षेप हा विप चा नाही याच सोबत अपघाताचे कारण म्‍हणून  कारणासाठी अभियंता यांनी जो अहवाल दिलेला आहे त्‍या मध्‍ये ही वाहीनी तारा जोरात हवेमुळे ऐकमेकांत अडकल्‍यामुळे फेस टू फेस होऊन जमीन वर पेटले तसेच आगीची ठिणगी  गवतावर पडून पडून श्री.भाऊसाहेब श्रीरंग यादव यांचे गहू कापणी केलेले गंजी होती ती जळाली अशा स्‍वरुपाचे स्‍पष्‍ट निवेदन विप चे कनिष्‍ठ अभियंता यांचे तर्फे दाखल करण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे घटना स्‍थळावर गव्‍हाचे गंजी होती या बाबत या न्‍यायमंचाचे दुमत नाही. अर्थात पंचनाम्‍यात म्‍हंटलेल्‍या वस्‍तु अंदाजे 60 क्विंटल एवढा एक हेक्‍टर 20 आर. मधील गहू, शिड प्‍लॉट, बियाणाचे 200 कडबा, ताडपत्री यांचे एकत्रित रक्‍कम रु.6,05,500/- चे नुकसान झाले त्‍याच सोबत तलाठयाने दाखल केलेला अहवाल देखील हीच रक्‍कम मान्‍य करतो. तथापि तक्रारदाराच्‍या सातबा-यावर गव्‍हाची नोंद नाही. त्‍याचबरोबर जळालेला हा गहू जर सिडस चा गहू होता तर सिड कंपन्‍याकडून खरेदी केलेल्‍या बियाणांचे अथवा प्रोग्रामचे / हंगामचा उल्‍लेख पुरावा म्‍हणून तक्रारदाराने दाखल करणे गरजेचे होते. तसेच इतर वस्‍तु जसे की ताडपत्री व कडबा इत्यादी बाबींची किंमत हि अंदाजानेच धरलेली दिसून येते. त्‍यामुळे जेव्‍हा तक्रारदार एखादी विशीष्‍ठ किंमत नुकसान भरपाई म्हणून मागणी करतो तेव्‍हा ती किंमत न्‍यायपुर्ण रितीने सिध्‍द करण्‍याची जबाबदारीही त्‍याच्‍यावरच येते. परंतु तक्रारदाराने नुकसान भरपाईची रक्कम सिध्‍द करता आली नाही म्‍हणून आम्‍ही तार्कीक व न्‍यायीक दृष्‍टीने हि रक्‍कम निश्चित करत आहोत. तक्रारदाराचा तीन एकरचा गव्‍हाचे उत्‍पन्‍न हे एकरी सरासरी 15 क्विंटल या हिशोबाने धरले तरी 45 क्विंटल गहू झाला असे मान्‍य करता येईल. अर्थात हा गहू पुर्णपणे भरडून तयार झाला नाही व त्‍याची फक्‍त गंजी लागलेली होती ही गोष्‍ट न्‍यायमंचाने लक्षात घेतली आहे. इतर बाबी जशा की ताडपत्री व दुसरा कडबा यांचाही रकमेबाबत अंदाजानेच विचार करावा लागतो त्यामुळे 45 क्विंटल X रु. 25/- प्रती किलो दराने =1,12,500/- व इतर वस्‍तुंचे रु.10,000/- नुकसान गृहीत धरुन रु.1,22,500/- एवढी नुकसान भरपाई मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहे.  

10)   विप चे जे आक्षेप आहे की ही घटना नैसग्रीक आपत्‍ती ने घडलेली आहे व त्‍याबाबत त्‍याला जबाबदार धरता येणार नाही. त्‍या बाबत विद्युत निरिक्षक यांचे मत पाहिले असता त्‍यामध्‍ये सदरची घटनाही वादळामुळे घडली असा कोठेही उल्‍लेख नाही. तथापि कनिष्‍ठ अभियंता यांनी जो अहवाल दिलेला आहे त्‍यामध्‍ये दुपारी 12.30 च्‍या सुमारास शॉर्ट सर्कीट होऊन आग लागली आहे असा उल्‍लेख आहे. अर्थात वादळ हे खूप मोठे असते तर विप चा हा बचाव निश्चितपणे मान्‍य करता आला असता पण हे वादळ सर्वसाधरण सोसाटयाचा वारा अशा स्‍वरुपाचा असावा कारण मोठया वादळामुळे पोल पडणे किंवा अनेक ठिकाणी अशा मोठया स्‍वरुपाचे नुकसान घडणे किंवा गवताच्‍या गंजी ऊडून जाणे अशा स्‍वरुपाच्‍या घटना घडू शकतात. विप चा हा मुद्दा स्‍पष्‍ट करण्‍यासाठी अनुषंगीक पुरावे देणेची जबाबदारी विपची होती. फक्‍त म्‍हणण्‍यामध्‍ये असे कथन करुन ती जबाबदारी संपत नाही. विद्युत तारा या नैसर्गीकरित्‍या शेतातुन जात असल्‍याने सर्व साधारणपणे निर्माण होणा-या परिस्थितीत पोल व विद्युत तारा या व्‍यवस्‍थीत राहतील व अशा सर्व साधारण परिस्थितीला तोंड देऊ शकतात अशी व्‍यवस्‍था असणे अपेक्षित आहे. असाधारण परिस्थितीमध्‍ये त्‍याला पर्याय असू शकत नाही हे समजु शकते परंतु अशी सुव्‍यवस्‍था निर्माण केली गेली आहे व ती देखभाल व दुरुस्‍तीव्‍दारे तशी ठेवली गेली आहे हे मान्‍य करण्यासारखी परिस्थितीत सादर केस मधील पुराव्‍यावरुन दिसुन येत नाही. त्‍यामुळे विप चा हा मुद्दा अमान्‍य करण्‍यात येतो. की बदलामुळे अधी परिस्थिती निर्यात झाली व त त्‍याच्‍या नियंत्रणाबाहेर (beyond control) होती.

11)   विप चा पुढे भारतीय विद्युत कायदा 42/3 कलम अन्‍वये विद्युत ताराच्‍याखाली कोणास कोणत्‍याही प्रकारे वापर करता येत नाही हा बचाव का मान्‍य करावा याचे स्‍पष्‍टीकरण विप ला देता आलेले नाही कारण शेतक-यांची पोल व तारा खालची जमीन ही तो विना वापर ठेऊ शकत नाही. अर्थात काळजी म्‍हणून ताराखाली जीवीत हानी होईल अथवा वित्‍तहानी होईल अशा स्‍वरुपाचा काळजी घ्‍यावयासाठी त्‍याने व्‍यवस्‍था करणे अपेक्षित नाही. हे जर केले नाही तर ही अशा तारामुळे परीसरात कोठेही पडून आग लागू शकते किंवा तारेमुळे शेतामध्‍ये लागलेली आग आजूबाजूला नुकसान करु शकते. या घटनेतही तारे खालच्‍या जमीनीच्‍या बाजूस पडलेल्‍या गंजीस आग लागलेली आहे त्‍यामुळे या बचावातही फारसे तथ्‍य आढळून येत नाही. तसेच भा.वि.का.42/3 मध्‍ये अशी तरतुद आहे की शेतक-यास प्रतिबंध असल्याचे आढळून येत नाही.

 

12)    विप ने दाखल केलेले काही न्‍यायनिवाडे ज्यामध्‍ये MSEB  विरुध्‍द बाबूलाल गांधी या मध्‍ये मा. वरीष्‍ठ आयोगाने विद्युत मधील अपील मान्‍य केलेले आहे. जिल्‍हा न्‍यायालयाने दिलेली नुकसान भरपाई अमान्‍य केलेली आहे. तथ्‍य परिस्‍थतीनुसार विद्युत निरीक्षकाचा अहवाल हा स्‍पार्कींग झालेली नसल्‍याबद्दल म्‍हणणे होते परंतु तो अहवाल जिल्‍हा न्‍याय मंचाने विद्युत निरिक्षक हा विद्युत मंडळाचा कर्मचारी आहे असे म्‍हणून अमान्‍य केले व हयाबाबत राज्‍य आयोगाने चुकीचे असल्‍याबाबत म्‍हंटलेले आहे तसेच आयोगाने यापुढे असेही म्‍हंटलेले आहे की जिल्‍हा न्‍यायमंचाने वस्‍तूस्थिती दर्शक मुद्दा किंवा निष्‍कर्षास पुरक असा मुद्दा निकाल पत्रामध्‍ये नोंदवलेला नाही व कार्यक्षेत्र नसतांना निकाल दिलेला आहे. प्रस्‍तुतच्‍या केसमध्‍ये विद्युत निरिक्षक तसेच कनिष्‍ठ अभियंता यांचा तहसिलदार यांचा अहवाल हा तारा पडल्‍यामुळे शॉर्टसर्कीट होऊन आग लागली असल्‍याबाबतचा आहे. अर्थात दोन्‍ही केस मधील परिस्थिती व पुराव्‍यामध्‍ये फरक असल्‍यामुळे सदरचा आयोगाचे निष्‍कर्षा संदर्भात वरिष्‍ठ न्‍यायालयाचा आधारे रक्‍कम मान्‍य करता येणार नाही.

 

13)   या नंतर दिलेले 2 निवाडे ज्‍यामध्‍ये प्रथम अपील 95/10 असि. इंजि. वि. मोतीलाल सोमाणी यामध्‍ये तक ला एल. टी. लाईन वरुन कनेक्‍शन दिले नव्‍हते असे तक चे म्‍हणणे होते व त्‍या संदर्भात रा. आ. It is averred specifically averred by opponents in their pleading that there is not relationship between parties as complainant and service provider and therefore complaint is not maintainable, District Consumer Forum without considering this issue wrongly held that opponents are service provider and therefore they are liable to pay damages. असे म्‍हंटलेले आहे हे विद्युत मंडळाचे अपील मान्‍य विप व तक चे ग्राहक व सेवा पुरवठादार नाते निर्माण होऊ शकत नसल्याने झाले आहे. प्रस्‍तुतचे केस मध्‍ये तक व विप यांचे मधील ग्राहक व सेवा पुरवठादार हे नाते सिध्‍द करण्‍यात तक यशस्‍वी झाला असून विप ने याबाबत आक्षेप घेतलेला नाही. अर्थात तक ने दाखल केलेले कागदपत्रे याच सोबत विप चा हा बचाव की तक हा विप चा थकबाकीदार आहे. हे तक ग्राहक व विप हे सेवा पुरवठादार असल्याचे यावरुन स्‍वयंस्‍पष्‍ट होते.

 

14)    तक हा थकबाकीदार असल्‍यामुळे त्‍यास ग्राहक म्‍हणजेच तक्रार दाखल करण्‍याचा हक्‍क नाही हा विपच्‍या लेखी युक्तिवादा मधील परीच्‍छेद क्र.10 चा अर्थ थकबाकीदार हा ग्राहक असू शकत नाही किंवा थकबाकीदार हा ग्राहक कसा असू शकत नाही ? याउलट थकबाकीदार म्‍हणूनच तो ग्राहक आहे ग्राहक आहे महणूनच थकबाकीदार आहे.     

                             आदेश

तक यांची तक्रार मंजूर करण्‍यात येते.

1. विप क्र.1 व 2 यांनी तक यांना नुकसान भरपाई पोटी रु.1,22,500/- (रुपये एक लक्ष बावीस  हजार पाचशे फक्‍त) द्यावे.

 

2. विप क्र.1 व 2 यांनी तक यांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्‍त) द्यावी.

 

3.   उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी विरुध्‍द पक्ष यांनी आदेश दिल्‍या तारखेपासुन तीस     दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,      सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न      केल्‍यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.

4.  उभय पक्षकारांना आदेशाच्‍या प्रमाणित प्रती निशु:ल्‍क देण्‍यात याव्‍यात.

 

 

 

 

    (श्री.एम.व्‍ही.कुलकर्णी)

         अध्‍यक्ष

  (श्री.मुकूंद.बी.सस्‍ते)                                  (सौ.विद्युलता जे.दलभंजन)

      सदस्‍य                                                      सदस्‍या 

                जिल्‍हा  ग्राहक  तक्रार  निवारण  मंच,  उस्‍मानाबाद..

 
 
[HON'BLE MR. M.V. Kulkarni.]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN]
MEMBER
 
[HON'BLE MR. M.B. Saste]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.