जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 4/2017 तक्रार नोंदणी दि. :-12/04/2017
तक्रार निकाली दि. :-3/05/2017
निकाल कालावधी :- 21 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- राजेंद्रसिंह श्यामसुंदरसिंह मरकाम (ठाकूर),
वय - 74 वर्षे, व्यवसाय – धान भरडाई (जॉब वर्क) ारडा
मु.पो.पुराडा, ता.कुरखेडा, जि.गडचिरोली.
ग्राहक क्र.498120000037
पिन कोड 441209
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- 1) मा.कार्यकारी अभियंता,
म.रा.विद्युत वितरण कंपनी मर्यादित,
विभाग गडचिरोली.
2) मा.उपकार्यकारी अभियंता,
म.रा.विद्युत वितरण कंपनी मर्यादित,
उपविभाग कुरखेडा.
3) मा.कनिष्ठ अभियंता,
म.रा.विद्युत वितरण कंपनी मर्यादित,
केन्द्र पुराडा, ता.कुरखेडा, जि.गडचिरोली
पिन कोड 441209.
अर्जदार :- स्वतः
गैरअर्जदार क्र.1 ते 3 :- श्री.नितेश लोडल्लीवार, अधिवक्ता.
गणपूर्ती :- (1) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्यक्ष (प्र.)
(2) श्री सादीक मोहसीनभाई झवेरी, सदस्य
- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, रोझा फु.खोब्रागडे, अध्यक्ष (प्र.))
(पारीत दिनांक : 3 मे 2017)
1. अर्जदार यांनी, सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा अन्वये दाखल केली. अर्जदाराने गैरअर्जदाराविरुध्द न्युनतापुर्ण सेवेबाबत व प्रकरणाचा खर्च व झालेल्या मानसिक, शारिरीक ञासापोटी खर्च मिळावा याकरीता तक्रार दाखल केली.
2. सदर तक्रार नोंदणी करुन, विरुध्दपक्षाविरुध्द नोटीस काढण्यात आली. सदर तक्रार दिनांक 3.5.2017 रोजी मंचासमोर गैरअर्जदार क्र.1 ते 3 च्या लेखी उत्तरासाठी ठेवली असता, गैरअर्जदार क्र.1 ते 3 मार्फत वकालतनामा दाखल करण्यात आला व लेखी उत्तर दाखल करण्यास पुढील तारीख मिळण्याकरीता अर्ज सादर करण्यात आला. अर्ज मंजूर करण्यात आला. दरम्यान, अर्जदार यांनी नि. क्र.8 वर अर्ज दाखल करुन अर्जदार यांनी गैरअर्जदाराविरुध्द दाखल केलेल्या तक्रारीची पुर्तता करण्याचे गैरअर्जदाराकडून आश्वासन देण्यात आल्यामुळे, अर्जदार तक्रार मागे घेत आहे, असे कळविले..
3. अर्ज नि.क्र.8 नुसार अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात आपसात समझोता झालेला असून अर्जदार यांना सदर तक्रार यापुढे चालविण्यास इच्छुक नसल्याबाबत विनंती केलेली असल्याने सदर तक्रार निकाली काढणे योग्य होईल, असे या मंचाचे मत आहे. सबब, पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
अर्जदाराची तक्रार परत घेतल्यामुळे निकाली.
( Complaint disposed by way of withdraw)
गडचिरोली.
दिनांक :- 3/5/2017.