ग्राहक तक्रार क्र. 106/2013
अर्ज दाखल तारीख : 03/08/2013
अर्ज निकाल तारीख : 28/11/2014
कालावधी: 01 वर्षे 03 महिने 25 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. सौ. शशिकला उध्दवराव शिंदे,
वय-55 वर्षे, धंदा – घरकाम,
रा.रामनगर, उस्मानाबाद, ता.जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. कार्यकारी अभियंता,(लवटे साहेब)
एम.ए.लवटे,
महाराष्ट्र राज्य विदयुत वीज वितरण कंपनी लि.
कार्यालय सोलापूर रोड, उस्मानाबाद.
2. कनिष्ठ अभियंता, होनमाने
महाराष्ट्र राज्य विदयुत वीज वितरण कंपनी लि.,
उपविभागीय कार्यालय, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा. श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा. सौ.विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा. श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एम.टी.आपचे.
विरुध्द पक्षकारातर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी.देशमूख.
निकालपत्र
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारदार शशिकला उध्दवराव शिंदे, उस्मानाबाद येथील रहीवाशी असून तिने घरगूती वापरासाठी विपकडून वीज पुरवठा घेतला आहे. त्यांचा जुना ग्राहक क्र.R5950 तर नवीन ग्राहक क्र.590010059501 असा आहे. तक्रारदार वीज वापर करत असतांना विपने मिटर सदोष असल्यामुळे बदलून नवीन मिटर बसविले. तक्रारदार नियमितपणे वीज बिल भरत आलेली आहे.
अचानक ऑक्टोबर 2012 मध्ये जास्त युनिटचे बिल विपने दिले. बिल चुकले असल्यामुळे दि.29/10/2012 रोजी तिने अर्ज दिला त्यावर विपने दुरुस्ती बिल रु.3,500/-चे दिले. पुन्हा दि.22/11/2012 रोजी रु.3,340/- चे बिल तक्रारदाराने भरले. पुर्वी सप्टेंबर 2012 चे 741 युनिटचे बिल दिले होते. एप्रिल 2012 मध्ये 752 युनिटचे बिल दिले. फेब्रुवारी 2012 पासून विपने चुकीचे बिले दिलेले आहेत ते दुरुस्त करण्याची मागणी केली असता विपने दुरुस्त करून दिलेले नाही. दि.25/04/2013 रोजी तक्रारदाराने नोटीस पाठविली त्यानंतरही दुरुस्ती केलेली नाही म्हणून वीज बिल दुरुस्ती करुन देण्याच्या मागणीसाठी ही तक्रार केलेली आहे. सदोष सेवेसाठी नुकसान भरपाई रु.50,000/- तक्रारीचा खर्च रु.5,000/- ची मागणी या तक्रारीव्दारे केली आहे. तक्रारदाराने तक्रारीसोबत दि.25/04/2013 रोजीची नोटीसची स्थळप्रत, दि.29/10/2012 च्या अर्जाची स्थळप्रत सप्टेंबर 12 चे बिल त्याचप्रमाणे पुढील महीन्याचे बिल हजर केलेले आहे. दि.20/09/2012 रोजी अखेरचे, दि.20/11/2012 अखेरचे, दि.20/12/2012 अखेर, दि.20/01/2013 अखेर, दि.20/02/2013 अखेर, दि.20/03/2012 अखेर, दि.20/04/2013 अखेर, दि.20/05/2013 अखेरचे वीज बील हजर केले आहे.
2) विप क्र.1 व 2 यांनी दि.14/02/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केले आहे. ऑक्टोबर 2012 मध्ये जास्त युनिटचे बिल दिले हे नाकबूल केले आहे. दि.29/10/2012 रोजीच्या अर्जाप्रमाणे बिल दुरुस्त केले परंतू तक्रारदाराने ते भरले नसून तक्रारदाराने दि.22/11/2013 रोजी रु.6,840/- भरले. फेब्रुवारी 2012 पासून चुकीचे बिल दिलेले नाही परंतु पाहणी केली असता मार्च 2013 पुर्वी तक्रारदाराला वापरापेक्षा कमी युनिटचे बिल देण्यात आले होते. मार्च 2013 मध्ये प्रत्यक्ष वापराचे युनिट बिले देण्यात आले. जानेवारी 2013 ते एप्रिल 2013 या कालावधीत वीज विभागणी करुन रु.1,840/- कमी करुन बिल रु.6,610/-चे देण्यात आले. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार रदद होण्यास पात्र आहे. असे नमूद केले आहे.
3) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) विप क्र.1 यांनी अर्जदार यांच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) अर्जदार रिलीफ मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
मुददा क्र.1 व 2 चे विवेचन:
4) दि.20/09/2012 अखेरील महीन्याचे वीज बिलाची पाहणी केली असता मागील रिडींग 2,147 युनिट व चालू रिडींग 2,888 युनिट दाखविले असून वीज वापर 741 युनिट दाखविला आहे. त्यापुर्वी ऑक्टोबर 2011 पासून दरमहाचा वीजेचा वापर पुढीलप्रमाणे युनिटमध्ये नोंदविलेला आहे. 144, 99, 79, 54, 120, 186, 141, 130, 118, 187, 108 याचा अर्थ सप्टेंबर 2012 मध्ये जवळ जवळ 7 पट वीज वापर वाढला होता असा होतो. नंतर रु.7,109/- वरुन ते बिल कमी करुन रु.3,500/- चे दिल्याचे दिसते. पुढचे बिल 1408 युनिटचे आहे ते रु.6,840/- च्या पैकी रु.3,500/- वजा जाता रु.3,340/- चे दिलेले आहे. दि.20/11/2012 अखेरीस महीन्याचे 235 युनिटचे रु.1,600/- चे बिल दिले व ते पुन्हा कमी करुन रु.900/- चे दिल्याचे दिसते. पुढे दि.20/12/2012 ऑक्टोबर या महीन्यासाठी 214 युनिटचे बिल फक्त रु.70/- चे दिले आहे.
5) दि.20/01/2013 अखेर 1 युनिट रिडींग असतांना 100/- युनिट चे 470/- चे बिल दिले आहे. त्या पुढील रिडींग एकच दाखवून 145 युनिटचे, त्यानंतर 752 युनिट तक्रारदार चा वीज वापर दाखवून रु.7,030/- चे बिल दिले आहे. त्या नंतर 213 युनिटचे रु.1,287/- चे बिल दिले आहे.
6) दि.20/11/2012 पर्यंत बिलाची पुर्तता झाल्याचे दिसते. महीन्याच्या महीन्याला मिटर रिडींग न घेता विपने मन मानेल तशी रिडींग लिहून बिल दिल्याचे दिसते. ऑगस्ट 2012 पर्यंतच विचार करता पुर्वीचे 12 महीन्यात सरासरी 100 युनिट वापर होता. परंतु 6 महीन्यात 1408 युनिट जादा वापर दाखवून ऑगस्ट 12 मध्ये रु.6840/- चे बिल दिेल्याचे दिसते म्हणजेच दरमहा 200 युनिटपेक्षा जास्त अधिक युनिट तक्रारदाराने वापरले असे विपचे म्हणणे दिसते. म्हणजेच तेथे दरमहाचा सरासरी वापर 300 युनिटपेक्षा जास्त होता. त्या पुढील 2 बीलामध्ये महीना वापर 200 युनिटच्या जवळपास असून पुन्हा 100 युनिटच्या जवळपास वापर दाखविला आहे. परंतू नियमीत योग्य मिटर रिडींग न घेता संपूर्णपणे गोंधळ करुन ग्राहकाला खर्चात व त्रासात टाकण्याची ही विपची कृती असल्याने विपने सेवते त्रुटी केली हे उघड आहे.
7) वरीलप्रमाणे विवेचनावरुन तक्रारदाराचा सरासरी दरमहाचा वापर 200 युनिट दिसून येतो त्यामुळे दि.20/12/2012 रोजी पासून दरमहा 200 युनिट वापराप्रमाणेच तक्रार दाखल तारखेपर्यंतचे वीज बिल दुरुस्ती करुन देणे विपवर बंधनकारक आहे. तक्रारदार रिलीफ मिळण्यास पात्र आहे म्हणुन मुददा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो व पुढीलप्रमाणे आदेश करातो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) विप क्र.1 व 2 यांनी दि.21/11/2012 पासून तक्रार दाखल तारखेपर्यंत दरमहा रु.200/- युनिट वापराप्रमाणे तक्रारदाराचे बिल दुरुस्त करुन दयावे व त्यापुढे वापराप्रमाणे वीज बिल दयावे व मागील बाकी मागू नये.
3) विप क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास तक्रारीचा खर्च रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) दयावा.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.