ग्राहक तक्रार क्र. : 121/2014
दाखल तारीख : 05/06/2014
निकाल तारीख : 04/09/2015
कालावधी : 0 वर्षे 03s महिने 0 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) श्री. गुंडेराव भाऊराव कुलकर्णी,
वय – 70 वर्षे, धंदा – सेवानिवृत्त,
रा. इटकळ, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद.
हल्ली मुक्काम – 536,
दिक्षण कसबा, सोलापूर. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) कार्यकारी अभियंता,
महावितरण, तुळजापूर,
ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद.
2) सहाययक अभियंता,
महावितरण, तुळजापूर,
ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद.
3) कनिष्ठ अभियंता,
महावितरण, अणदुर,
ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.आर.एस.कोचेटा.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा.अध्यक्ष, श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे द्वाराः
विरुध्द पक्षकार (विप) वीज वितरण कंपनीने वापरलेल्या विजेपेक्षा जास्त युनिटचे बिल वसूल करुन सेवेत त्रुटी केली म्हणून भरपाई मिळावी म्हणून तक्रार कर्ता (तक) यांनी ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे
1) तक हा इटकळ ता.तुळजापूरचा रहिवाशी असून सेवानिवृत्त आहे. त्याने आपल्या घरी वीज कनेक्शन घेतले असून ग्राहक क्र.593940315515 असा आहे. वृध्दापकाळामुळे जुन 2014 पूर्वी 4 महिन्यापासून तक हा सोलापूर येथे आपल्या मुलाबरोबर राहात आहे. अधूनमधून इटकळ येथील आपल्या घरी तो येत जात असतो. विप यांनी मागील 3 वर्षापासून घरी येऊन प्रत्यक्ष मीटर तपासणी न करता व मीटर रिडींग न घेता तक ला वीज बिले दिली. तक ने दि.04.08.2011, 04.09.2013, 19.12.2013 व 18.03.2014 असे तक्रारी अर्ज विप ला पाठविले, विप ने कोणतीही दखल घेतलेली नाही. विप ने बनावट विद्युत देयके तक ला देऊन अप्रामाणिकपणे बिले वसूल केली. जानेवारी 2011 ते मार्च 2014 या कालावधीमध्ये विप ने 352 युनिट जास्तीचे बिल तक ला दिले. वास्तविक वीज वापर 943 युनिट इतका होता. मात्र विप ने 1295 युनिटचे बिल तक कडून वसूल केलेले आहे. दि.17.04.2014 रोजी प्रत्यक्ष मीटर रिडींग 5877 होते. मात्र दि.09.04.2014 च्या बिलामध्ये चालू मीटर रिडींग 5940 लिहीले आहे. विप चे वर्तन अत्यंत बेजबाबदार आहे. तक हा शिक्षकी पेशातून निवृत्त झालेला असून तत्वनिष्ठ व उच्च विचारसरणीचा आहे. विप च्या कारभारामुळे त्याला मानसिक व शारिरिक त्रास झालेला आहे. त्यामुळे विप कडून जादा वसूल केलेले रु.1760/- 12 टक्के व्याजाने परत मिळावे, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.25,000/- मिळावे व तक्रारीचा खर्च रु.5000/- मिळावा म्हणून तक ने ही तक्रार दि.05.06.2014 रोजी दाखल केलेली आहे.
2) तक ने तक्रारीसोबत दि.08.02.2011 चे बिल, दि.09.03.2011 चे बिल, दि.12.04.2011 चे बिल, दि.12.05.2011 चे बिल, दि.08.06.2011 चे बिल, दि.08.07.2011 चे बिल, दि.09.08.2011 चे बिल, दि.03.12.2011 चे बिल, दि.31.12.2011 चे बिल, दि.05.02.2012 चे बिल, दि.05.03.2012 चे बिल, दि.10.04.2012 चे बिल, दि.11.05.2012 चे बिल, दि.07.07.2012 चे बिल, दि.07.08.2012 चे बिल, दि.07.09.2012 चे बिल, दि.06.10.2012 चे बिल, दि.07.11.2012 चे बिल, दि.08.12.2012 चे बिल, दि.07.01.2013 चे बिल, दि.06.02.2013 चे बिल, दि.05.03.2013 चे बिल, दि.06.04.2013 चे बिल, दि.08.05.2013 चे बिल, दि.10.06.2013 चे बिल, दि.05.07.2013 चे बिल, दि.07.08.2013 चे बिल, दि.08.09.2013 चे बिल, दि.07.10.2013 चे बिल, दि.09.12.2013 चे बिल, दि.07.02.2014 चे बिल, दि.08.03.2014 चे बिल, दि.09.04.2014 चे बिल, दि.06.06.2011 चा अर्ज, दि.04.08.2011 चा अर्ज, दि.04.09.2013 चा अर्ज, दि.19.12.2013 चा अर्ज, दि.18.03.2014 चा अर्ज, पोस्टाच्या पावत्या इत्यादी कागदपत्राच्या प्रती हजर केलेल्या आहेत.
3) विप यांनी हजर होऊन दि.18.10.2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. विप यांनी मीटर रिडींग न घेता, बिले दिली हे विप ला कबून नाही. बनावट देयके दिले आहे हे विप ला मान्य नाही. विप हे तक चे देयके दुरुस्त करुन देण्यास तयार आहे. विप यांनी 3 वर्षापासून अप्रामाणिक वीज वापर दाखवून रक्कम वसूल केली हे नाकबूल आहे. जानेवारी 2011 ते मार्च 2014 या कालावधीत वापरलेल्या युनिटची पाहणी करुन विप ने बिल दुरुस्त केले आहे. तक ची रक्कम रु.522/- जास्त जमा असल्याचे आढळून आले आहे. ही रक्कम त्याचे खात्यावर जमा दाखवली असून येणा-या बिलामधून वळती केली जात आहे. त्यामुळे तकची तक्रार रदद होणेस पात्र आहे. विप ने म्हणण्यासोबत कंझ्यूमर पर्सनल लेजरचा, तक चे खात्याचा उतारा, हजर केलेला आहे.
4) तक ची तक्रार, त्याने दाखल केलेली कागदपत्रे, व विपचे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात, त्यांची उत्तरे आम्ही त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणासाठी लिहली आहेत.
मुद्दे उत्तर
1) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुद्दा क्र. 1 व 2ः-
5) तक च्या म्हणण्याप्रमाणे 4 महिन्यापासून म्हणजे फेब्रुवारी 2014 पासून तो सोलापूर येथे आपले मुलासोबत राहतो. इटकळ येथील घरात जाऊन येऊन करतो, म्हणजेच तेव्हापासून वीज वापर जवळ जवळ नाही. तक चे कथनानुसार जानेवारी 2011 ते मार्च 2014 या कालावधीत विप ने त्याचा 352 युनिट जास्त विज वापर दाखवून त्याचेकडून बिल वसूल केले. मात्र तक ची तक्रार दि.05.06.2014 रोजी दाखल केलेली आहे. ग्राहक तक्रार ही कारण घडलेपासून 2 वर्षाचे मुदतीत दाखल केली पाहिजे. तकने विप कडे पहिला अर्ज दि.10.06.2011 रोजी दिल्याचे दिसते. नंतर दि.04.09.2013 तसेच दि.19.12.2013, दि.18.03.2014, असे अर्ज पण दिल्याचे दिसते. दि.06.06.2011 पासून सातत्याने तक ने विप कडे तक्रारी दिल्याचे दिसते. त्यामुळे प्रस्तुत तक्रारीस मुदतीची बाधा येणार नाही. असे आमचे मत आहे.
6) विप ने कंझ्यूमर पर्सनल लेजरची प्रत हजर केली आहे ती जानेवारी 2010 पासून आहे. परंतू जानेवारी 2012 ते जून 2013 या कालावधीची हजर केलेल्या नाही. तक ने विद्युत देयकाच्या प्रती हजर केलेल्या आहे. जानेवारी 2011 च्या बिलाप्रमाणे मागील रिडींग 4997 तर चालू रिडींग 5011 वीज वापर 14 युनिट मागील 11 महिन्यातील वीज वापर युनिटमध्ये 32, 39, 65, 64, 59, 76, 214, 53, 53, 112, व 18 जून 2012 पासून जुलै 2013 पर्यंतमीटर रिडींग नोंदवले ते पुढीलप्रमाणे. 5210, 5348, 5395, 5415, 5467, 5496, 5517, 5539, 5562, 5590, 5617, 5677, 5719, 5786, 5892, त्यानंतर जुलै 2013 पासून मीटर रिडींग नोंदवले ते पुढीलप्रमाणे. 5786/5719, 5842, 5842, 5740/5709, 5844, 5894, 5912, 6112, 5940, 5877/5877, 5879, 5878/5838, 5878/5877 दि.15.11.2013 पूर्वीच्या 11 महिन्यात वापरलेले युनिट पुढीलप्रमाणे 31, 47, 56, 67, 42, 60, 27, 28, 23, 22, 21, डिसेबंर 2012 पूर्वीच्या 11 महिन्यात विज वापर दाखवला तो युनिटप्रमाणे 20, 50, 22, 47, 138, 150, 9, 9, 9, 9, 0,
7) वर म्हटल्याप्रमणे जून 2012 पासून रिडींग 5210 पासून 5842 पर्यंत वाढत गेली. जुलै 2013 मध्ये पून्हा 5719 पासून सुरुवात होऊन 5880 पर्यंत गेले. म्हणजे जुलै 2013 पूर्वी रिडींग 5719 च्या पूढे गेलेले नव्हते. असे असताना विप ने 5880 पर्यंतचे रिडींगचे बिल तक ला मागितले हे चुकीचे आहे. विप ने जादाचे बिल तक कडून वसूल केले आहे. तकचे म्हणणेप्रमाणे जानेवारी 2011 पासून 352 युनिटचे जास्तीचे बिल विप ने वसूल केले आहे. विप ने खोटे रिडींग दाखवून बिल वसूल केले, हे त्यांचेच रेकॉर्डवरुन दिसून येते.
8) आता विप चे म्हणणे आहे की, विप ने तक ला बिल दुरुस्त करुन दिलेले आहे. सिपीएल प्रमाणे तक चे रु.713/- जमा दाखवल्याचे दिसते. मात्र कोणते महिन्याचे जमा केले हे स्पष्ट नाही. दुस-यांना न कळणारे हिशोब विप ला देता येणार नाही. सगळयांना समजतील असे हिशोब देणे विप वर बंधनकारक आहे. विप ने सेवेत त्रुटी केली हे उघड आहे. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक ची तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे.
1) विप ने जानेवारी 2011 पासून प्रत्यक्ष वापराप्रमाणे तक चे बिलाची आकारणी करावी व दुरुस्त बिल तक ला द्यावे, व त्याप्रमाणे जादा रक्कम स्पष्टपणे दाखवून पुढील बिलामध्ये वळती करुन घ्यावी.
2) विप ने तक ला या पुढील बिले प्रत्यक्ष वापराप्रमाणे द्यावी.
3) विप यांनी तक यांना या तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावे.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
5) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता
विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी सदरबाबत मंचात अर्ज दयावा.
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.