Maharashtra

Parbhani

CC/11/158

Ganesh Keshav Sanap - Complainant(s)

Versus

Executive Engin.MSEDC.Ltd.Parbhani and other - Opp.Party(s)

Adv.M.R.Kshirsagar

11 Apr 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/158
 
1. Ganesh Keshav Sanap
R/o At.Post.Wagdari Tq.Gangakhed
Parbhani
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Executive Engin.MSEDC.Ltd.Parbhani and other
Jintur Road,Parbhani
Parbhani
Maharashtra
2. AssistentEngineer,MSEDC.Ltd.
Adovcate Colany,Gangakhed Tq.Gangakhed
Parbhani
Maharashtra
3. Junir Engineer,MSEDC.Ltd.Gangakhed
Gramin-2 MSEDC.Ltd.Adovcate Colany,Gangakhed
Parbhani
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. C. B. Pandharpatte PRESIDENT
 HONABLE MRS. Sujata Joshi Member
 HONABLE MRS. Anita Ostwal Member
 
PRESENT:Adv.M.R.Kshirsagar, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

 

निकालपत्र

                    

 

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी

 

अध्यक्ष -         श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.                 

सदस्या                                                                                         सदस्या

  सुजाता जोशी B.Sc.LL.B.                                                     सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.              

 

 

    

1)    तक्रार क्रमांक 101/2011                         तक्रार दाखल दिनांकः-  13/04/2011

                                                                 तक्रार नोंदणी दिनांकः-    04/05/2011

                                                                 तक्रार निकाल दिनांकः-  11/04/2012

                                                                 कालावधीः- 11 महिने.   07 दिवस.

 

 

1     माधव पिता दिलीपराव सानप.                                    अर्जदार.                                                 

वय 21 वर्षे.धंदा.शेती.                                                               रा.मु.वागदरी,पो,पिंपळदरी,ता.गंगाखेड.जि.परभणी.                         

      विरुध्‍द

 

1     कार्यकारी अभियंता.                                          गैरअर्जदार.

   महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कं.लि.                                                                                 

   परभणी.                

2     उप कार्यकारी अभियंता.

      महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कं.लि.

      गंगाखेड.

3     शाखा अभियंता ग्रामीण.

      महाराष्‍ट्र राज्‍य विज पारेषण कं.मर्यादित गंगाखेड.

 

 

 

 

 

 

 

2)      तक्रार क्रमांक  108/2011                     तक्रार दाखल दिनांकः-  29/04/2011

                                                                     तक्रार नोंदणी दिनांकः-   04/05/2011

                                                                     तक्रार निकाल दिनांकः- 11/04/2012

                                                                     कालावधीः- 11 महिने. 07 दिवस.

 

2     सौ.इंदुबाई भ्र.वसंतराव सानप.                                     अर्जदार

      वय 47 वर्ष,धंदा-शेती.                            

      रा.मु.वागदरी पो.पिंपळदरी,ता.जि.परभणी.

           विरुध्‍द

1     कार्यकारी अभियंता.                                         गैरअर्जदार.

   महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कं.लि.                                                                                 

   परभणी.                

2     उप कार्यकारी अभियंता.

      महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कं.लि.

      गंगाखेड.

3     शाखा अभियंता,

      ग्रामीण, महाराष्‍ट्र राज्‍य विज पारेषण कं.

      मर्यादित.गंगाखेड.

 

3)      तक्रार क्रमांक 158/2011                    तक्रार दाखल दिनांकः-  12/08/2011

                                                                     तक्रार नोंदणी दिनांकः-   18/08/2011

                                                                     तक्रार निकाल दिनांकः-  11/04/2012

                                                                     कालावधीः- 07 महिने. 24 दिवस.

3     गणेश पिता केशव सानप.                                            अर्जदार

      वय 20 वर्ष,धंदा शेती.                           

      रा.मु.वागदरी,पो.पिंपळदरी ता.गंगाखेड.जि.परभणी.

             विरुध्‍द

1     कार्यकारी अभियंता.                                            गैरअर्जदार.

   महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कं.लि.                                                                                 

   परभणी.                

2     सहाय्यक अभियंता.

      महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कं.लि.

      वकील कॉलनी,गंगाखेड,ता.गंगाखेड जि.परभणी.

3     कनिष्‍ठ अभियंता (ग्रामीण -2)

      महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कं.लि.

      वकिल कॉलनी,गंगाखेड,ता.गंगाखेड जि.परभणी.

---------------------------------------------------------------------------------------

    अर्जदारातर्फे अड.एम.आर.क्षिरसागर आणि गैरअर्जदारातर्फे अड.जी.आर.सेलूकर.

---------------------------------------------------------------------------------------       

     कोरम  -    1)    श्री.सी.बी.पांढरपट्टे.      अध्‍यक्ष.

2)        सौ.सुजाता जोशी.                   सदस्या.                                              3)        सौ.अनिता ओस्तवाल.                 सदस्‍या.

-------------------------------------------------------------------------------------------------------     

                  ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे.अध्‍यक्ष.  )

द्राक्ष बागायत शेतीसाठी घेतलेल्‍या कृषी पंपाचा विज पुरवठा अचानक बंद केल्‍यामुळे बहारात आलेल्‍या द्राक्ष फळबागेची झालेली नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी प्रस्‍तुतच्‍या तक्रारी आहेत.

वरील सर्व प्रकरणातील अर्जदार मौजे वागदरी जिल्‍हा परभणी येथील रहिवासी शेतकरी आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 विज वितरण कंपनीचे गंगाखेड व परभणी येथील अधिकारी आहेत.तिन्‍ही तक्रार अर्जातील अर्जदारांच्‍या तक्रारीतील स्‍वरुप आणि त्‍यावर गैरअर्जदार यांनी सादर केलेले लेखी म्‍हणणे एकसारखेच असल्‍यामुळे संयुक्‍त निकालपत्राव्‍दारे प्रकरणाचा निर्णय देण्‍यात येत आहे.

तक्रार अर्जातील थोडक्‍यात हकीकत खालील प्रमाणे.

प्रकरण क्रमांक 101/2011 मधील अर्जदाराच्‍या मालकीची गट नंबर 47 क्षेत्र 1 हेक्‍टर 15 आर प्रकरण 108/2011 मधील अर्जदाराच्‍या मालकीची गट नं. 47 क्षेत्र 3 हेक्‍टर 47 आर आणि प्रकरण 158/2011 मधील अर्जदाराच्‍या मालकीची गट नंबर 26 क्षेत्र 1 हेक्‍टर 48 आर शेत जमिनीत माहे एप्रिल 2009 मध्‍ये अर्जदारांनी गावा जवळच्‍या पिंपळदरी साठवण तलावाचे पाणी द्राक्ष बागेसाठी उचलून घेण्‍यासाठी गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 कडून विद्युत मोटारीचे कनेक्‍शन घेतलेले होते. तिन्‍ही अर्जदारांनी आपले शेतीत राष्‍ट्रीय फळबाग बोर्डाचे मार्गदर्शन व मंजुरी घेवून द्राक्ष पीकाचे फळबाग लागवडीसाठी बँक ऑफ महाराष्‍ट्र गंगाखेड यांच्‍याकडून कर्ज घेवुन जानेवारी 2008 मध्‍ये शेतामध्‍ये पूर्व मशागत करुन आवश्‍यक ती साधन सामुग्रीसाठी खर्च करुन सोलापूर येथून द्राक्षाची रोपे आणून लावगड केली होती. मार्च 2009 पर्यंत द्राक्ष रोपांची योग्‍य रितीने वाढ झालेली होती मार्च 2009 नंतर उन्‍हाळयात फळबागेस पाणी कमी पडू लागल्‍याने अर्जदारांनी गैरअर्जदाराकडून कृषी पंप विद्युत मोटारीसाठी विज कनेक्‍शन घेतलेले होते.अर्जदारांचे पुढे म्‍हणणे असे की, पिंपळदरी साठवण तलाव हा लाभक्षेत्र विकास प्राधिकरण औरंगाबाद जायकवाडी पांटबंधारे विभाग क्रमांक 1 परभणी यांचे अंतर्गत तयार करण्‍यात आला असून तलावातील पाणी शेती सिंचनासाठी वापरण्‍यात येते,भिजणा-या क्षेत्रात तांदुळवाडी वागदरी व कडयाचीवाडी या हद्दीतील शिवाराचा समावेश आहे.कडयाचीवाडी येथे पिंपळदरी साठवण तलावा अंतर्गत श्री.संत माधवबाबा पाणी वाटप सहकारी संस्‍था मर्यादित स्‍थापन केली असून सदर संस्‍थेकडे  पाणी पट्टी भरुन त्‍यांनी परवाना घेतलेला आहे फळबागेतील द्राक्ष पीकाचा बहर चांगला आला असतांना अचानकपणे गैरअर्जदार क्रमांक 1 ने तारीख 17/08/2009 रोजी पिंपळदरी साठवण तलावातील सर्व कृषी पंप ग्राहकांचा विद्युत पुरवठा बंद केला.विद्युत पुरवठा खंडीत करण्‍यापूर्वी गैरअर्जदारांनी अर्जदारांना कोणतीही लेखी पूर्व सुचना दिलेली नव्‍हती. विद्युत पुरवठा खंडीत केल्‍यामुळे बागेला आवश्‍यक पाणी पुरवठा न झाल्‍याने द्राक्ष पीकाचे नुकसान होत असल्‍याबद्दल गैरअर्जदारांकडे तक्रार केलेनंतर 25/09/2009 रोजी विद्युत कनेक्‍शन जोडले, परंतु मधल्‍या काळात जवळ जवळ 40 दिवस विद्युत पुरवठा खंडीत झाल्‍यामुळे द्राक्ष पीकाचे प्रचंड नुसार झाले. द्राक्षांचे वेल सुकले.त्‍याबाबतची लेखी माहीती अर्जदारांनी माहितीच्‍या अधिकाराखाली गैरअर्जदारांकडे मागितली असता तारीख 26/03/2010 च्‍या पत्रातून त्‍यांनी तहसिलदार यांचे दिनांक 17/08/2009 आदेश क्रमांक 174 नुसार त्‍यानी विद्युत पुरवठा खंडीत केला होता असे कळवले.सोबत तहसिलदाराच्‍या आदेशाची छायाप्रतही पत्रासोबत जोडली होती. अर्जदारांचे म्‍हणणे असे की, संबंधीत तहसिलदाराचे आदेश चुकीचे व बेकायदेशिर होते कारण पिंपळदरी साठवण तालावात मुळीच पाणी टंचाई नव्‍हती आवश्‍यक ती शेती सिंचनासाठी पाणीसाठी उपलब्‍ध होता असे असतांनाही पुन्‍हा गैरअर्जदारांनी तारीख 24/04/2010 रोजी अर्जदारांना कोणतीही पूर्व सुचना न देता इलेक्‍ट्रीक मोटारीचा विद्युत पुरवठा बंद केला तो पुढे 4 ते 5 महिने बंदच राहिला त्‍यामुळे अर्जदारांची द्राक्षांची बाग जळून गेली व फार मोठे आर्थिक नुकसान झाले अर्जदारांचे पुढे म्‍हणणे असे की, गैरअर्जदारांनी कृषी पंपाचा विद्युत पुरवठा बेकायदेशिररित्‍या बंद करुन सेवेतील त्रुटी केली आहे व हलगर्जीपणा केलेला आहे व त्‍यामुळे पीकांचे झालेल्‍या नुकसानीस गैरअर्जदार हेच सर्वस्‍वी जबाबदार आहेत.म्‍हणून ग्राहक मंचाकडून कायदेशिर दाद मागण्‍यासाठी प्रस्‍तुतच्‍या तक्रारी दाखल करुन प्रकरण क्रमांक 101/2011 मधील अर्जदाराने गैरअर्जदाराकडून रु.17.43 लाख पीकाची नुकसान भरपाई, मानसिकत्रास व सेवात्रुटी बद्दल रु.1,00,000/- आणि अर्जाचा खर्च रु.10,000/- तसेच प्रकरण क्रमांक 108/2011 मधील अर्जदाराने गैरअर्जदाराकडून पीकाची नुकसान भरपाई रु. 17.43 लाख, मानसिकत्रास व सेवात्रुटी बद्दल रु.1,00,000/- आणि अर्जाचा खर्च रु.10,000/-, तसेच प्रकरण क्रमांक 158/2011 मधील अर्जदाराने पीकाच्‍या नुकसान भरपाईपोटी रु.17.47 लाख, मानसिकत्रास व सेवात्रुटीची नुकसान भरपाई रु.1,00,000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- मिळावा अशी मागणी केली आहे.

तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ अर्जदारांनी आपले शपथपत्रे ( नि.2)  आणि पुराव्‍यातील कागदपात प्रकरण 101/11 मध्‍ये नि.5 लगत जमिनीचे 7/12 उतारे पाणी वाटप संस्‍थेकडे भरलेल्‍या पाणी पट्टीच्‍या पावत्‍या,परवाने सहाय्यक अभियंता.म.रा.वि.वि.कं.गंगाखेड यांचे 26/03/2010 चे पत्र फळबागासाठी बँक ऑफ महाराष्‍ट्र कडून घेतलेले कर्ज रक्‍कमेच्‍या धनादेशाची छायाप्रत वगैरे 16 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.तसेच युक्तिवादाच्‍या वेळीही नि.27 लगत शेतातील द्राक्ष बागेचे फोटो दाखल केलेले आहेत.

तक्रार अर्जावर लेखी म्‍हणणे सादर करण्‍यासाठी तिन्‍ही प्रकरणातील गैरअर्जदारांना नोटीसा पाठविल्‍यावर त्‍यांनी दिनांक 11/10/2011 रोजी लेखी जबाब तिन्‍ही प्रकरणात दाखल केले आहेत.

गैरअर्जदारांनी तक्रार अर्ज परिच्‍छेद क्रमांक 1 ते 6 मधील मजकूर वैयक्तिक माहिती अभावी साफ नाकारला आहे. अर्जदारांनी एप्रिल 2009 मध्‍ये त्‍यांना कृषी पंपाचे इलेक्‍ट्रीक मोटारीसाठी विद्युत कनेक्‍शनसाठी अर्ज व कोटेशन भरले होते हे त्‍यांना मान्‍य आहे,परंतु गैरअर्जदारांनी अर्जदारांना जुलै 2009 मध्‍ये विद्युत कनेक्‍शन दिले होते हे अर्जदारांचे म्‍हणणे त्‍यांनी साफ नाकारले आहे.अर्जदारांनी तक्रार अर्जात नमुद केले प्रमाणे शासनाच्‍या निर्णया नुसार कडयाचीवाडी येथील पिंपळदरी साठवण तलावा अंतर्गत श्री.संत माधव बाबा पाणी वाटप सहकारी संस्‍था स्‍थापन करण्‍यात आली आहे.त्‍या तलावातून तांदूळवाडी वागदरी व कडयाची वाडी या गावातल्‍या शिवारांचा समावेश आहे हे देखील गैरअर्जदारांना मान्‍य आहे,परंतु अर्जदारांनी विद्युत कनेक्‍शन घेतल्‍यावर सदर संस्‍थेकडे पाणी पट्टी भरुन पाणी परवाना घेतला होता हे अर्जदारांचे कथन त्‍यांनी नाकारले आहे.तारीख 17/08/2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 ने पिंपळदरी साठवण तलावातील सर्व कृषी पंप ग्राहकांचा विद्युत पुरवठा बंद केला याबाबत गैरअर्जदारांनी असा खुलासा केला आहे की,वर्ष 2009 मध्‍ये पावसाळयाच्‍या दिवसात पाऊस वेळेवर पडला नव्‍हता तो अत्‍यल्‍प होता त्‍यामुळे पिंपळदरी परिसरातील सर्व गावामध्‍ये पाणी टंचाईच्‍या परिस्थितीमुळे त्‍या साठवण तलावातील तलावा खेरीज अन्‍य पाण्‍याचा स्‍त्रोत उपलब्‍ध नव्‍हता म्‍हणून तहसिलदार गंगाखेड यांच्‍या आदेशा नुसार सदर तलावातील शेतीसाठी जल उपसा करणा-या मोटारी बंद करण्‍यात आल्‍या होत्‍या.तशा आदेशाचे तहसिलदार गंगाखेड यांनी तारीख 17/08/2009 चे आदेश क्रमांक 174 चे लेखी पत्रही गैरअर्जदारास दिलेले होते सदर विद्युत पुरवठा गैरअर्जदारांनी स्‍वतः‍हुन मुळीच बेकायदेशिररित्‍या खंडीत केलेला नव्‍हता. अर्जदारांनी माहितीच्‍या अधिकारखाली खुलासा मागितल्‍या नंतर तहसिलदार गंगाखेड यांचा आदेश क्रमांक 174 ची प्रतही त्‍यांना दिलेली होती.साठवण तलावातील लोकांचे कनेक्‍शन डी.पी.वरुन ज्‍या तारखेला बंद करण्‍यात आले त्‍या तारखेस अर्जदार गैरअर्जदारांचे ग्राहक नव्‍हते. विद्युत पुरवठा खंडीत करण्‍याच्‍या अथवा पुन्‍हा चालू करण्‍याची कार्यवाही तहसिलदार व जिल्‍हाधिकारी यांच्‍या आदेशानुसारच झालेली आहे.गैरअर्जदारांनी जाणून बुजून  साठवण तलावातील कृषी पंपाचा विद्युत पुरवठा स्‍वतःहून खंडीत केलेला नाही.अथवा त्‍या बाबतीत त्‍यांचेकडून सेवात्रुटी अथवा हलगर्जीपणा झालेला नाही.त्‍यामुळे  तक्रार अर्जात नमुद केले प्रमाणे द्राक्ष बागेच्‍या पाणी पुरवठा अभावी बाग जळून द्राक्ष पीकांच्‍या झालेल्‍या नुकसानीस गैरअर्जदार मुळीच जबाबदार ठरु शकत नाहीत.अतिरिक्‍त स्‍पष्‍टीकरणामध्‍ये पुढे असा खुलासा केला आहे की, तहसिलदार यांच्‍या आदेशानुसार सुरवातीला विद्युत पुरवठा खंडीत केल्‍यानंतर त्‍यांनी तारीख 25/09/2009 रोजी दुसरा आदेश पाठवुन साठवण तलावातील शेतक-यांचे मोटारीचे कनेक्‍शन पुर्ववत जोडून द्यावे असे कळविले नुसार विद्युत पुरवठा पुर्ववत चालू केला होता साठवण तालावातील कृषी पंपाचा विद्युत पुरवठा बंद करण्‍याची कार्यवाही व जोडून देण्‍याची कार्यवाही जिल्‍हाधिकारी व तहसिलदार यांच्‍या आदेशानुसारच केलली होती.त्‍यामुळे जिल्‍हाधिकारी व तहसिलदार प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये आवश्‍यक पार्टी ठरतात. सदर प्रकरणी ते आवश्‍यक पार्टी असतांनाही प्रकरणात अर्जदारांनी त्‍यांना सामिल केले नसल्‍यामुळे तक्रार फेटाळण्‍यात यावी. अर्जदारांना गैरअर्जदारांकडून विद्युत पुरवठा खंडीत केलेल्‍या काळात दिलेला होता व गैरअर्जदारांचे ते ग्राहक होते हे ठोसरित्‍या शाबीत केलेले नाही तसा पुरावा दिलेला नाही त्‍यामुळे ही तक्रार फेटाळण्‍यात यावी. नुकसान भरपाईची मागणीही गैरअर्जदारांनी साफ  नाकारुन गैरअर्जदारांकडून भरमसाठ रक्‍कम उकळण्‍याच्‍या हेतूने अर्जदारांनी त्‍यांच्‍या विरुध्‍द खोटे व चुकीचे आरोप करुन भरमसाठ रक्‍कमेची मागणी केलेली आहे.सबब अर्जदारांच्‍या तक्रारी खर्चासह फेटाळण्‍यात याव्‍यात.अशी शेवटी विनंती केली आहे.

लेखी जबाबाचे पुष्‍टयर्थ तिन्‍ही प्रकरणात सब इंजिनियर गंगाखेड युनिट यांची शपथपत्रे दाखल केली आहेत.तसेच पुराव्‍यातील कागदपत्रात प्रकरण क्रमांक 101/2011 मध्‍ये (नि.21) लगत एकुण 14 कागदोपत्री पत्रव्‍यवहाराच्‍या व तहसिलदार व जिल्‍हाधिकरी यांच्‍या आदेशाच्‍या छायाप्रतीही दाखल केलेल्‍या आहेत.

      तक्रार अर्जाच्‍या अंतिम सुनावणीच्‍या वेळी अर्जदारां तर्फे अड.माधुरी क्षिरसागर आणि गैरअर्जदारांतर्फे अड.गणेश सेलूकर यांनी युक्तिवाद केला.

निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.

             मुद्दे.                                       उत्‍तर.                                                                         

1     अर्जदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2(1)(डी)(ii)

      मधीलग्राहक व्‍याख्‍येतील तरतुदी नुसार मंचापुढे चालणेस पात्र

      आहे काय ?                                              नाही.

2     तारीख 17/08/2009 रोजी पिंपळदरी साठवण तलावातील

      शेतीसाठी पाणी पुरवठा करणा-या विद्युत पंपाचा विज पुरवठा

   गैरअर्जदारांनी अचानक खंडीत केला त्‍या तारखेस अर्जदार

   गैरअर्जदारांचे ग्राहक होते काय ?                              नाही.                                

3     गैरअर्जदारांनी बेकायदेशिररित्‍या कोणतीही पूर्व सुचना न देता

      पिंपळदरी साठवण तलावातील कृषी पंपाचा विद्युत पुरवठा बंद

      करुन सेवात्रुटी केली आहे काय ?                              नाही.                           

4     तक्रारी मध्‍ये जिल्‍हाधिकारी परभणी व तहसिलदार गंगाखेड हे

   आवश्‍यक पार्टी असतांनाही प्रकरणात सामिल केले नाही म्‍हणून

   नॉन जॉंईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज़ या तत्‍वाची तक्रारींना बाधा

   येते काय ?                                               होय.

5     अर्जदारांनी तक्रार अर्जातून मागणी केलेली नुकसान भरपाई

   गैरअर्जदाराकडून मिळणेस पात्र आहेत काय ?            अंतिम आदेश प्रमाणे.      

                               कारणे.

मुद्दा क्रमांक 1

     तिन्‍ही प्रकरणातील अर्जदारांनी द्राक्ष बागेला इरीगेशन सिस्‍टीमव्‍दारे पाणी पुरवठा करण्‍यासाठी शेती पंपाचे विज कनेक्‍शन घेतलेले होते ही अडमिटेड फॅक्‍ट आहे. द्राक्ष बागायतीव्‍दारे मिळणारे उत्‍पन्‍न हे मुख्‍यतः नगदी पीक सदरात मोडत असल्‍याने त्‍याचा व्‍यापारी कारणीसाठीच (कमर्शियल पर्पज) वापर केला जातो हे अर्जदारांना ही नाकारता येणार नाही.अर्जदारांनी गैरअर्जदारा विरुध्‍द प्रस्‍तुतच्‍या ज्‍या तक्रारी केलेल्‍या आहेत त्‍याचा आशय असा आहे की, द्राक्ष बागेतील झाडांना फळ लागण्‍याचा ऐन बहरात जुलै, ऑगस्‍ट 2009 मध्‍ये पाण्‍याची अत्‍यंत गरज होती त्‍यावेळीच साठवण तलावातून पाण्‍यासाठी घेतलेल्‍या विद्युत पंपाचा विज पुरवठा गैरअर्जदारांनी कोणतीही पूर्व सुचना न देता सुमारे सलग 40 दिवस खंडीत केल्‍यामुळे रोप वाळून गेली व मिळणा-या उत्‍पनाचे फार मोठे नुकसान झाले त्‍याला गैरअर्जदार हेच सर्वस्‍वी जबाबदार आहेत.म्‍हणून कायदेशिर दाद मागितली आहे. त्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2 (1) (डी) मधील ग्राहक व्‍याख्‍येतील तरतुदी नुसार अर्जदार गैरअर्जदारांचे ग्राहक होतात काय ? हा मुद्दा उपस्‍थीत झाला आहे.ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2 (1) (डी) (ii) नुसार  ग्राहकांने विकत अथवा भाडयाने घेतलेली सेवा ही वाणिज्‍य प्रयोजनासाठी तथा व्‍यापारी कारणासाठी घेतली असेल तर त्‍या सेवेचा समावेश ग्राहक संज्ञेत येणार नाही व संबंधीत सेवात्रुटीची कायदेशिर दाद ग्राहक म्‍हणून ग्राहक संरक्षण कायद्याखाली तक्रारकर्त्‍याला मागता येणार नाही. असे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे. अर्जदारांनी द्राक्ष फळबाग  शेतीसाठी गैरअर्जदारांकडून घेतलेले विज कनेक्‍शन याच सदरात येते. द्राक्ष बागेतून मिळणा-या उत्‍पन्‍नाची विक्री करुन व्‍यापारी कारणासाठीच मुख्‍यतः हा शेती व्‍यवसाय होत असल्‍याने व ते नगदी पीक असल्‍याने अर्जदारांची तक्रार ग्राहक मंचात मुळीच चालणेस पात्र नाही असे आमचे मत आहे.या संदर्भात रिपोर्टेड केस 1995 (2) सी.पी.जे.पान 434 ( राष्‍ट्रीय आयोग) मध्‍ये अशाच प्रकारच्‍या प्रकरणात मा.राष्‍ट्रीय आयोगाने असे मत व्‍यक्‍त केले आहे की,

Point :-  Drip irrigation system to errigate lands for graps cultivation, --With Motive to earn profit comes under commercial activity Relief dcclined under C.P. Act. हे मत अर्जदाराच्‍या प्रकरणाला ही तंतोतंत लागु पडते त्‍यामुळे प्रस्‍तुतच्‍या तक्रारी मंचापुढ चालणेस पात्र नसल्‍यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येत आहे.

मुद्दा क्रमांक 2

        तिन्‍ही तक्रार अर्जांचा मेरीटच्‍या दृष्‍टीकोनातून देखील निर्णय द्यावयाचा झाल्‍यास आणि तिन्‍ही अर्जदारांच्‍या तक्रारी ग्राहक म्‍हणून मंचापुढे चालू शकतात असे क्षणभर ग्राहय धरले तरी पुराव्‍यातील कागदपत्रातून असे दिसून येते की, अर्जदारानी द्राक्ष बागेसाठी गैरअर्जदारांकडून पिंपळदरी साठवण तलावातील पाणी विद्युत पंपाव्‍दारे उचलण्‍यासाठी प्रत्‍येकी 10 हॉर्सपॉवर विद्युत पंपाचे माहे जुलै 2009 मध्‍ये विद्युत कनेक्‍शन्‍स घेतले होते असे अर्जदाराचे म्‍हणणे आहे.युक्‍तीवादाच्‍या वेळी अर्जदारातर्फे अड माधुरी क्षिरसागर यांनी पुराव्‍यातील नि.5/9 वरील माहितीच्‍या आधिकाराच्‍या अर्जावर गैरअर्जदारांकडून 26/03/2010 रोजी दिलेल्‍या माहिती मध्‍ये अर्जदारांना जुलै 2009 मध्‍ये विज कनेक्‍शन दिले असल्‍याचे गैरअर्जदारांनी म्‍हंटलेले आहे असे मंचास दाखविले याउलट गैरअर्जदार तर्फे अड सेलुकर यांनी नि.5/14  वरील अर्जदाराच्‍या विद्युत बिला वरील नोंदीकडे मंचाचे लक्ष वेधून विद्युत बिलावर विज पुरवठा जारी केल्‍याची तारीख 30/11/2009  अशी असल्‍याचे दाखवुन दिले. त्‍यामुळे अर्जदारांना नेमक्‍या कोणत्‍या तारखेला गैरअर्जदाराकडून शेती पंपाच्‍या विद्युत जोडणी दिली याबाबत संदिग्‍धता राहिली आहे व प्रत्‍यक्षात विज पुरवठा केव्‍हा दिला. हे दोन्‍ही पक्षकारांकडून कायदेशिररित्‍या ठोस पुराव्‍यातून शाबीत झालेले नाही अर्जदाराच्‍या तक्रारी नुसार गैरअर्जदारांनी त्‍यांना विज कनेक्‍शन जोडून दिल्‍यानंतर तारीख 17/08/2009 रोजी कोणतीही पूर्व सुचना न देता अचानकपणे विद्युत कनेक्‍शन तोडून सुमारे 40 दिवस विज पुरवठा खंडीत केला असे अर्जदारांचे म्‍हणणे आहे, परंतु पुराव्‍यातील नि.5/14 वरील विज बिलातील नोंदीनुसार अर्जदारांना जर विज कनेक्‍शन माहे नोव्‍हेंबर 2009 मध्‍ये दिलेले असल्‍याचे दिसून येत असल्‍यामुळे जुलै 2009 मध्‍ये विद्युत पंपाचा विज पुरवठा खंडीत करण्‍याच्‍या वेळी अर्जदार गैरअर्जदारांचे ग्राहक नव्‍हते ही बाब स्‍पष्‍ट होते त्‍यामुळे जुलै 2009 ते नोव्‍हेंबर 2009 पर्यंत विज पुरवठा खंडीत केल्‍यामुळे अर्जदारांना तोशिष लागण्‍याचे काहीही कारण नाही व त्‍या कालावधीत अर्जदार गैरअर्जदारांचे ग्राहक नव्‍हते त्‍यामुळे मुद्दा क्रमांक 2 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येत आहे.

मुद्दा क्रमांक 3 व 4

        अर्जदारांच्‍या शेती पंपाचा विज पुरवठा गैरअर्जदारांनी कोणतीही पूर्व सुचना न देता अचानकपणे खंडीत करुन सेवात्रुटी केली आहे असे अर्जदारांचे म्‍हणणे आहे, परंतु पुराव्‍यातील वस्‍तुस्थिती लक्षात घेता नि.21/1 आणि नि.21/2 वरील पत्रांचे अवलोकन केले असता तारीख 17/08/2009 रोजी तहसिल गंगाखेड यांनी शाखा अभियंता महाराष्‍ट्र राज्‍य इरीगेशन क्रमांक विभाग गंगाखेड यांना पत्र पाठवुन जिल्‍हाधिकारी यांच्‍या आदेशानुसार दामपुरी तालुका गंगाखेड येथील साठवण तलावातील पाणी उपसा बंद

करण्‍याबाबत कळविले असल्‍याचे दिसते. आदेशाच्‍या प्रती गैरअर्जदारांना पाठवुन गैरअर्जदारांनी त्‍या आदेशाच्‍या प्रती त्‍यांना मिळाल्‍या संबंधीची सही शिक्‍क्‍या नुसार नोंदही केली असल्‍याचे दिसते. त्‍यामुळे जिल्‍हाधिकारी व तहसिलदार यांच्‍या आदेशा नुसारच गैरअर्जदारांनी साठवण तालावातील पाणी उपसा त्‍या परिसरातील पिण्‍याच्‍या पाण्‍याची खुप टंचाई निर्माण झाल्‍यामुळे शेती पंपाचा पाणी पुरवठा बंद करण्‍याचे आदेश दिलेले होते.व त्‍या आदेशा प्रमाणेच गैरअर्जदारांनी त्‍यांचे पालन केलेले होते हे गैरअर्जदारातर्फे पुराव्‍यात दाखल केलेल्‍या वरील पत्रातील मजकुरातून स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे अर्जदारांच्‍या म्‍हणण्‍या प्रमाणे गैरअर्जदारांनी साठवण तालावातील विद्युत पंपाचा विज पुरवठा अचानकपणे कोणतीही पूर्व सुचना न देता खंडीत केला हा अर्जदारांचा आक्षेप मुळीच मान्‍य करता येणार नाही. युक्तिवादाच्‍या वेळी अर्जदारातर्फे अड माधुरी क्षिरसागर यांनी असे ही निवेदन केले की, तहसिलदाराच्‍या पत्रात पिंपळदरी साठवण तलावात पाण्‍याचा साठा कमी आहे असा कोठेही उल्‍लेख नसतांना बेकायदेशिररित्‍या गैरअर्जदारांनी पिंपळदरी सिंचना खालील शेती पंपाचे विज कनेक्‍शन खंडीत केलेले हाते त्‍यामुळे नुकसान भरपाईस गैरअर्जदारच जबाबदार ठरतात हा युक्तिवाद देखील पुराव्‍यातील वरील वस्‍तुस्थिती वरुन चुकीचा ठरला आहे.नि.21/2 वरील पत्रावरुन अर्थातच जिल्‍हाधिकारी व तहसिलदार यांच्‍या आदेशानुसारच गैरअर्जदारांनी साठवण तलावातील विद्युत पंपाचा विज पुरवठा पिण्‍याच्‍या पाण्‍याची तिव्र टंचाई त्‍या भागात निर्माण झाल्‍यामुळे खंडीत केलेला होता त्‍यामुळे जिल्‍हाधिकारी व तहसिलदार तक्रारी मध्‍ये आवश्‍यक पार्टी ठरतात. अर्जदारांनी त्‍यांना तक्रारीत सामिल करावयास हवे होते व त्‍यांच्‍या कृतीमुळे विज पुरवठा खंडीत केलेला असल्‍यामुळे तेच आवश्‍यक पार्टी ठरतात.अर्जदारांनी या वस्‍तुस्थितीकडे दुर्लक्ष करुन फक्‍त विद्युत कंपनी विरुध्‍द प्रस्‍तुतच्‍या तक्रारी दाखल केलेल्‍या असल्‍यामुळे नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या कायदेशिर तत्‍वाची तिन्‍ही तक्रारींना बाधा येते. व तक्रार अर्ज फेटाळण्‍यास पात्र ठरतात. कारण अर्जदारांनीच स्‍वतःहूनच तक्रार अर्जातील परिच्‍छेद 12 मध्‍ये तहसिलदारांचे आदेश सर्वथा चुकीचे व बेकायदेशिर आहेत असे नमुद केलेले आहे म्‍हणजेच अर्जदारांना देखील त्‍यांच्‍या शेती पंपाचा विज पुरवठा जिल्‍हाधिकारी व तहसिलदारांच्‍या आदेशा नुसारच खंडीत केला होता हे त्‍यांना ठाउक असतांनाही तहसिलदार अथवा जिल्‍हाधिकारी हे अर्जदारांच्‍या प्रकरणात आवश्‍यक पार्टी असतांनाही त्‍यांना सामिल केलेले नसल्‍यामुळे गैरअर्जदारांकडून सेवात्रुटी झाली असे मुळीच म्‍हणता येणार नाही.

मुद्दा क्रमांक 5

       अर्जदारांच्‍या म्‍हणण्‍या प्रमाणे तारीख 17/08/2009 रोजी द्राक्ष फळबागासाठी घेतलेला विज पुरवठा बेकायदेशिर गैरअर्जदारांनी खंडीत केल्‍यानंतर अर्जदारांनी गैरअर्जदारांकडे तशी लेखी अर्जाव्‍दारे विचारणा केली होती,परंतु यासंबंधीचा कोणताही ठोस पुरावा मंचापुढे सादर केलेला नाही किंवा युक्तिवादाच्‍या वेळीही त्‍याबाबत अर्जदारातर्फे खुलासा देण्‍यात आलेला नाही पुराव्‍यातून दुसरी विसंगती अशी दिसून येते की. तक्रार अर्ज परिच्‍छेद क्रमांक 6 मध्‍ये अर्जदारांनी स्‍वतःच असे कबुल केले आहे की, गैरअर्जदारांकडून शेती पंपाचा विज कनेक्‍शन घेण्‍यापूर्वी अर्जदार त्‍यांची चुलती इंदुबाई सानप ( प्रकरण 108/2011 मधील अर्जदार) व चुलते गणेश सानप यांच्‍या शेतातील विहिरीतून डिझेल पंपाव्‍दारे पिकांना व बागेला पाणी पुरवठा करुन घेत होते. म्‍हणजेच अर्जदारांच्‍या शेतातील पिकांना पाणी पुरवठाची पर्यायी सोय उपलब्‍ध होती हे स्‍पष्‍ट होते त्‍यामुळे गैरअर्जदारांकडून  विज कनेक्‍शन खंडीत करण्‍यामुळे पाण्‍या अभावी अर्जदारांची द्राक्ष बाग जळाली हे म्‍हणणे विसंगत वाटते व पाण्‍या अभावी द्राक्ष बाग जळाली हे अर्जदाराचे म्‍हणणे खोटे असल्‍याचे असे आमचे मत आहे.

         प्रकरण क्रमांक 108/2011 मधील नि.32/1 वरील पुराव्‍याचे अवलोकन केले असता विज बिलांवर ग्राहक म्‍हणून अर्जदार इंदुबाईचे नाव दिसून येत नाही सदरचे बिल राहूल वसंतराव सानप यांचे नावाचे आहे म्‍हणजेच राहूल हा गैरअर्जदारांचा ग्राहक असतांना प्रकरण 108/11 मध्‍ये इंदुबाई ही तक्रारदार कशी ? हा प्रश्‍न पडतो. तक्रार अर्जामध्‍ये इंदुबाईने गैरअर्जदारां विरुध्‍द प्रस्‍तुतची तक्रार का दाखल केली आहे याचाही स्‍पष्‍ट खुलासा तक्रार अर्जात कोठेही केलेला नाही त्‍यामुळे प्रकरण 108/2011 मधील तक्रारदार गैरअर्जदारांची ग्राहक नसतांना तक्रार दाखल केलेली असल्‍यामुळे फेटाळण्‍यास पात्र ठरते.

        दुसरी गोष्‍ट अशी की, प्रकरण क्रमांक 101/2011 मधील अर्जदाराने दाखल केलेल्‍या पुराव्‍यातील नि.5/14 वरील बिलावर अर्जदाराला दिलेले विज कनेक्‍शन तांदुळवाळी सर्व्‍हे नंबर 4 करता दिल्‍याची नोंद आहे अर्जदाराने मात्र वाघदरी ( पिंपळवाडी शिवारातील ) शेतात गैरअर्जदारांकडून कनेक्‍शन घेतले असल्‍याचे कथन केले आहे.या बाबतीत देखील विसंगती आढळून येत असल्‍यामुळे अर्जदाराने वस्‍तुस्थिती लपविलेली असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

       तिन्‍ही प्रकरणातील अर्जदारांनी गैरअर्जदाराकडून शेती पंपाचा पाणी पुरवठा अचानक बंद केल्‍यामुळे द्राक्ष बाग वाळून गेली व लाखो रुपयांचे नुकसान झाल्‍याचे कथन करुन प्रकरण 101/2011 मधील अर्जदाराने रु.17.43 लाख, प्रकरण क्रमांक 158/2011 मधील अर्जदाराने रु.17.47 लाख आणि प्रकरण क्रमांक 108/2011 मधील अर्जदाराने रु.17.43 लाख इतकी भरमसाठ रक्‍कमेची नुकसान भरपाई गैरअर्जदारांकडून मागितलेली आहे.परंतु त्‍या झालेल्‍या नुकसानी संबंधीचा कोणताही सबळ व ठोस पुरावा उदाः महसुल खात्‍या मार्फत करुन घेतलेला रितसर पंचनामा किंवा झालेल्‍या नुकसानी संबंधी बाबतचा तज्ञांचा अहवाल लगत शेतक-यांचे साक्षी पुरावे. या पैकी एकही कागद दाखल केलेला नाही. व तोच एक कायदेशिर सबळ पुरावा ठरतो. त्‍यामुळे नुकसान भरपाईची मागणी देखील मोघमच केलेली आहे हे स्‍पष्‍ट दिसते. तक्रार अर्जामध्‍ये विशेषतः  प्रकरण क्रमांक

108/2011 मधील अर्जदाराने चुलत्‍यांच्‍या शेतातील विहिरीचे पाणी सर्व अर्जदार डिझेल पंपाव्‍दारे शेतातील पिकांना गैरअर्जदाराकडून कृषी पंपाचे विज कनेक्‍शन मिळण्‍यापूर्वी पाणी पुरवठा करुन घेत होते. हे स्‍वतःहूनच मान्‍य केलेले आहे त्‍यामुळे ऐन बहरात आलेल्‍या द्राक्ष पिकांचा गैरअर्जदारांकडून पाणी पुरवठा अचानक बंद केल्‍यामुळे अर्जदाराच्‍या बागेला पाणी पुरवठा करण्‍याची कसलीही अन्‍य उपलब्‍धता नव्‍हती अशी वस्‍तुस्थिती नसतांना गैरअर्जदारांवर खोटे आरोप करुन नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे.असेच यातून अनुमान निघते.कारण बहरात आलेल्‍या बागेला पाणी पुरवठा तलावातील पाणी पुरवठा बंद झाल्‍यानंतर अर्जदार मुळीच गप्‍प बसले नसते हे कुणीही नाकारु शकणार नाही. अर्जदारांनी पुराव्‍यात शेताचे फोटो जरी दाखल केलेले असले तरी फोटो वरुन द्राक्ष बागेचे नुकसान झाले हे मुळीच शाबीत होत नाही.तिसरी गोष्‍ट अशी की. अर्जदारांनी विज अधिनियम रेग्‍युलेशन 2005 चे कलम 12 व कलम 17 अन्‍वये गैरअर्जदारांकडे तक्रार केली नसल्‍यामुळे देखील अर्जदारांच्‍या प्रस्‍तुत तक्रारींना कायदेशिर बाधा येते.व गैरअर्जदारां विरुध्‍द कारयदेशिर कारण घडु शकत नाही.      

 

मुळातच गैरअर्जदारांनी शेती पंपाचा खंडीत व पुन्‍हा पूर्ववत जोडून दिलेला पाणी पुरवठा हा जिल्‍हाधिकारी व तहसिलदार यांच्‍या आदेशा नुसार त्‍या भागातील पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या तिव्र टंचाईमुळे केलेला होता हे पुराव्‍यात आलेलेच आहे. गैरअर्जदारांनी आदेशा नुसार केलेली ती कारवाई जनहितार्थ व त्‍या भागातील बहुसंख्‍य लोकांच्‍या गरजेसाठी केलेली असल्‍यामुळे त्‍या कारवाई मधून गैरअर्जदारांकडून सेवेतील त्रुटी झाली असे मुळीच म्‍हणता येणार नाही. या संदर्भात रिपोर्टेड केस 2008 (3) C.P.C. पान 188 (राष्‍ट्रीय आयोग) मध्‍ये असे मत व्‍यक्‍त केले आहे की,       

 

Disconnection – Supply of Electric pump disconnected as per direction of Govt. due to severe scarcity of drinking water – public demand for drinking water is supreme compared to individual demand for irrigation –No deficiency in service proved. हे मत प्रस्‍तुत प्रकरणांना तंतोतंत लागु पडते.       

       वरील सर्व बाबी विचारात घेता मेरीटच्‍या दृष्‍टीकोनातून ही अर्जदारांनी गैरअर्जदारां विरुध्‍द केलेली तक्रार खोटी व दिशाभुल करणारी असून गैरअर्जदारांकडून कोणतीही सेवात्रुटी झालेली नाही असे आमचे स्‍पष्‍ट मत  आहे.व या कारणामुळे देखील तिन्‍ही तक्रारी फेटाळण्‍यास पात्र ठरतात. व अर्जदार कोणतीही नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाहीत.सबब आम्‍ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत.             

                             

                              आदेश

 

1     तक्रार क्रमांक 101/2011, 108/2011 आणि 158/2011 फेटाळण्‍यात येत आहे.

2     पक्षकारांनी आपला खर्च आपण स्‍वतः सोसावा.

3     आदेशाच्‍या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्‍यात.

 

 

 

 

श्रीमती अनिता ओस्‍तवाल.          सौ.सुजाता जोशी.           श्री.सी.बी.पांढरपट्टे.       सदस्‍या.                      सदस्‍या.                    अध्‍यक्ष.

 

 
 
[HONABLE MR. C. B. Pandharpatte]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Sujata Joshi]
Member
 
[HONABLE MRS. Anita Ostwal]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.