Maharashtra

Washim

CC/3/2015

Sheikh Yusuf Sheikh Imam Naurangabadi - Complainant(s)

Versus

Executive Engg. Maharashtra State Electricity Distribution Company.Ltd.-Washim - Opp.Party(s)

Adv.S.J.Amge, Adv.R.N.Kamble, Adv.N.M.Watore

30 Jul 2015

ORDER

Judgment
Final Order
 
Complaint Case No. CC/3/2015
 
1. Sheikh Yusuf Sheikh Imam Naurangabadi
At. Mohgavhan (Dube)
washim
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Executive Engg. Maharashtra State Electricity Distribution Company.Ltd.-Washim
Vidyut Bhavan, Civil Line
Washim
Maharashtra
2. Sub Exe. Engg. Maharashtra State Electricity Distribution Company.Ltd.-Washim
Pusad Naka
Washim
Maharashtra
3. Junior Engg. Maharashtra State Electricity Distribution Company.Ltd.-Washim
Near of Krishiuttapnna Bajar Samiti
Washim
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smt. S.M.Untwale PRESIDENT
 HON'BLE MR. A.C.Ukalkar MEMBER
 HON'BLE MRS. J.G.Khandebharad MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                                          :::     आ  दे  श   :::

                                   (  पारित दिनांक  :   30/07/2015  )

आदरणीय अध्‍यक्षा, मा. सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार  : -

1)  ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्‍वये, सादर करण्‍यात आलेल्‍या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्‍यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,

     तक्रारकर्त्‍याची मौजे मोहगव्‍हान ता.जि.वाशिम येथे सर्व्‍हे नं. 10/4 व 10/5 मध्‍ये शेतजमीन आहे. तक्रारकर्त्‍याने बोराळा लघुसिंचन तलावावरुन त्‍यांचे वरील शेतामध्‍ये पाणी आणण्‍यासाठी विरुध्‍द पक्षाकडे विदयुत कनेक्‍शन मिळणेकरिता अर्ज केला. त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष यांचे कार्यालयामार्फत दिनांक 01/10/2013 रोजी पावती क्र. 976 प्रमाणे रुपये 8,700/- घेवून कोटेशन मंजूर करण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याने दिनांक 05/10/2013 रोजी 8,700/- रुपयाचा भरणा केल्‍यानंतर, विरुध्‍द पक्षाव्‍दारे तक्रारकर्त्‍याला विदयुत मिटर / ग्राहक क्रमांक 32860001061 देण्‍यात आले व शेतातील मोटरपंपाला विदयुत पुरवठा पुरविण्यात आला. विदयुत पुरवठा दिल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने आपल्‍या शेतामध्‍ये गव्‍हाचे पीक पेरले व त्‍याला पाणी देणे सुरु केले.  गव्‍हाचे पीक चांगल्‍या स्थितीत असतांना विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कोणतीही पुर्वसुचना न देता दिनांक 07/12/2013 रोजी तक्रारकर्त्याच्‍या शेतातील विदयुत पुरवठा खंडित केला. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे गव्‍हाचे पीक पाण्‍याअभावी सुकून गेले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे त्‍याचदिवशी म्‍हणजे दिनांक 07/12/2013 रोजी व त्‍यानंतर दिनांक 16/12/2013, 26/12/2013, 06/01/2014 व दिनांक 22/01/2014 रोजी विनंती अर्ज केले. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विदयुत पुरवठा पुर्ववत केला नाही.  म्‍हणून तक्रारकर्त्‍याने दिनांक 06/01/2014 रोजी जिल्‍हाधिकारी, वाशीम यांच्‍यासमक्ष लोकशाही दिनी तक्रारअर्ज केला.  तरीही, विरुध्‍द पक्षाने विदयुत पंपाचा विदयुत पुरवठा पुर्ववत केला नाही.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या शेतातील विदयुत पंपाचा विदयुत पुरवठा कोणतीही पुर्वसुचना न देता खंडित केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे 3,00,000/- रुपयाचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले. याबाबत तक्रारकर्त्‍याचा भाऊ नामे शेख इस्‍माईल इमाम नौरंगाबादी यांनी प्रकरण क्र. 06/2014 दाखल केले होते परंतु ते प्रकरण तांत्रिक बाबीवरुन सन्‍माननीय न्‍यायमंचाने खारिज केले. त्‍या प्रकरणात दि. 01/10/2014 रोजी कृषी पंपाला विदयुत जोडणीचा आदेश झाला होता, परंतु अदयापपर्यंत रोहित्र बसवून कृषी पंपाचा विदयुत पुरवठा सुरु केला नाही. त्‍यामुळे अंदाजे 5,000/- रुपयाचे डिझेल तक्रारकर्त्‍याला पाणी देण्‍यासाठी लागले आहे. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने ही तक्रार नव्‍याने दाखल करुन विनंती केली की, तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर होऊन, शेतातील विदयुत पंपाचा विदयुत पुरवठा पुर्ववत करण्‍याचा आदेश दयावा तसेच आर्थिक व मानसिक त्रासापोटी 3,00,000/- रुपये नुकसान भरपाई देण्‍याचा आदेश पारित व्‍हावा.

तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्‍यासोबत अंतरिम विदयुत जोडणीचा आदेश होणेबाबत अर्ज व दस्‍तऐवज यादीप्रमाणे एकुण 29 दस्‍त पुरावे म्‍हणुन जोडलेले आहेत.

2)   विरुध्द पक्ष यांचा लेखी जबाब  -

    वरील प्राप्‍त तक्रारीची विरुध्‍द पक्ष यांना नोटीस काढल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी त्‍यांचा लेखी जबाब (निशाणी-8 प्रमाणे) मंचात दाखल केला. त्‍यानुसार विरुध्‍द पक्षाने त्‍यांचेविरुध्‍दचा बहुतांश मजकूर नाकबूल करुन, पुढे विरुध्‍द पक्षाचे  अधिकचे कथनात थोडक्‍यात म्‍हणणे आहे की, तक्रारकर्त्‍याचे भाऊ नामे शेख इस्‍माईल यांनी दिनांक 06/02/2014 रोजी दाखल केलेली तक्रार क्र. 06/2014 ही दिनांक 31/12/2014 रोजी खारिज झाल्‍यामुळे चिडून जावून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास त्रास देण्‍याच्‍या उद्देशाने खोटी तक्रार दाखल केली आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षास झालेल्‍या त्रासापोटी तक्रारकर्त्‍याकडून प्रत्‍येकी रुपये 3,00,000/- नुकसान भरपाई द्यावी. तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या शेतामध्‍ये एक गैरकायदेशीर जास्‍तीचा वीज खांब लावलेला आहे, अशाप्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाची दिशाभूल केली. तसेच शेजारील विद्युत पंप कनेक्‍शन असलेल्‍या लोकांनी तक्रारकर्त्‍याच्‍या विरुध्‍द तक्रारी केलेल्‍या आहेत. त्‍याच्‍या प्रती पूर्वीच्‍या खारीज केलेल्‍या प्रकरणात लावलेल्‍या आहेत. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचा विदयुत पुरवठा खंडित करण्‍यात आला आहे. तक्रारकर्त्‍याने ही तक्रार खोटी व खोडसाळपणे केली असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार ही खर्चासह खारिज करण्‍यांत यावी. विरुध्‍द पक्षाने त्‍यांचा जबाब शपथेवर सादर केला.

3)   कारणे व निष्कर्ष -

     या प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार, सोबत दाखल केलेले सर्व दस्‍तऐवज, विरुध्‍द पक्षाचा लेखी जबाब, तक्रारकर्त्‍यातर्फे दाखल प्रतिज्ञालेख व उभय पक्षांचा लेखी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्‍कर्ष कारणे देवून नमुद केला, तो येणेप्रमाणे.

     या प्रकरणात उभय पक्षामध्‍ये वादातीत नसलेल्‍या बाबी अशा आहेत की, या प्रकरणाच्‍या आधी तक्रारकर्त्‍याने तक्रार क्र. 6/2014 ही शेख इस्‍माईल शेख इमाम नौरंगाबादी यांना अधिकारपत्र देवून, याच प्रकरणातील वादासंबंधी दाखल केली होती व तिचा निकाल 31/12/2014 रोजी, तक्रारकर्त्‍याला कायद्यातील तरतुदीनुसार योग्‍य ती नवीन तक्रार दाखल करण्‍याची मुभा देवून, तसा आदेश मंचाने पारित केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणात तक्रारकर्त्‍याचे नाव वगळता, सर्व कागदपत्रे अथवा तक्रारकर्त्‍याची मागणी, विरुध्‍द पक्षाचा बचाव व उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्‍तऐवज हे प्रकरण क्र. 6/2014 मधीलच आहे.  विरुध्‍द पक्षाला ह्या बाबी मान्‍य आहेत की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे व त्यांनी त्‍यांच्‍या शेत जमिनीमध्‍ये बोराळा लघुसिंचन तलावावरुन पाईप लाईन व्‍दारे शेतामध्‍ये पाणी आणण्यासाठी विरुध्‍द पक्षाकडे विदयुत कनेक्‍शन मिळणेकरिता अर्ज केला होता, व विरुध्‍द पक्षाने रक्‍कम रुपये 8,700/- स्विकारुन त्‍यांना दिनांक 05/10/2013 रोजी विदयुत मिटर देवून शेतातील मोटर पंपाला विदयुत पुरवठा पुरविला होता.  तक्रारकर्त्‍याने असा युक्तिवाद केला की, विरुध्‍द पक्षाने कोणतीही पुर्वसुचना न देता त्‍यांचा सदर विदयुत पुरवठा हा दिनांक 07/12/2013 रोजी खंडित केला होता, त्‍यामुळे पाण्‍याअभावी गव्‍हाचे पीकाचे अंदाजे रुपये 3,00,000/- या रकमेचे नुकसान झाले. पुढे तक्रारकर्त्‍याने असा युक्तिवाद केला की, विरुध्‍द पक्षाने प्रकरण क्र.61/2014 मध्‍ये कबुली दिल्‍यानुसार नविन रोहित्र दिले व आज रोजी तक्रारकर्त्‍याचा विदयुत पुरवठा सुरळीत सुरु आहे, त्‍यामुळे विदयुत पुरवठा खंडित करणेबाबतचा कोणताही वाद तक्रारकर्त्‍याचा नाही. त्‍यामुळे आता या प्रकरणात मंचाला तक्रारकर्त्‍याची नुकसान भरपाई रुपये 3,00,000/- विरुध्‍द पक्षाकडून देण्‍याचा आदेश व्‍हावा, या प्रार्थनेबद्दलच विचार करावयाचा आहे. त्‍याबाबत मंचाने प्रकरण क्र.61/2014 मधील दस्‍तऐवज जे रेकॉर्डवर तक्रारकर्त्‍याने दाखल केले आहे, ते तपासले. त्‍यानुसार असा बोध होतो की, विरुध्‍द पक्षाचे कनिष्‍ठ अभियंता श्री. दिलीप रामचंद्र मनगटे यांना उप कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि. कंपनी मर्यादित, उपविभाग वाशिम यांनी मौजे मोहगव्‍हाण येथील अनधिकृतपणे दिलेल्‍या कृषी पंपाच्‍या विदयुत पुरवठयाविषयी चौकशी करुन तसा अहवाल सादर करण्‍यास सांगितले होते व त्‍यानुसार श्री. मनगटे यांनी दिलेले बयाण तपासता, त्‍यात असे आढळते की, तक्रारकर्त्‍याच्‍या वतीने शे. युसूफ शे. इमाम यांना कृषी पंपासाठी विदयुत कनेक्‍शन मिळणेबाबतचा अर्ज विरुध्‍द पक्षाच्‍या कार्यालयाला प्राप्‍त झाल्‍यानंतर, श्री. अ.वि.वानखडे यांनी एका पोलचे अनधिकृतपणे काम केले होते व त्‍यावरुन सदर विदयुत पुरवठा देण्‍यासाठी चुकीचे सर्व्हिस लाईनचे सर्वे त्‍यांनी उपलब्‍ध करुन दिले होते. म्‍हणजे विरुध्‍द पक्षाचा आक्षेप की, तक्रारकर्त्‍याने अवैधरित्‍या दुस-या व्‍यक्‍तीकडून विरुध्‍द पक्षाची पुर्व परवानगी न घेता बेकायदेशीररित्‍या एक पोल उभा करुन विदयुत जोडणी करुन घेतलेली आहे, यात मंचाला तथ्‍य आढळते.  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची नुकसान भरपाईची मागणी मंचाला मंजूर करणे योग्‍य वाटत नाही.  

     सबब अंतिम आदेश पारित केला तो पुढीलप्रमाणे.

                     :: अंतीम आदेश ::

1.   तक्रारकर्ता यांची तक्रार खारिज करण्‍यात येते.

2.   न्‍यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही. 

3.   उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 

 

(श्रीमती जे.जी. खांडेभराड)    (श्री. ए.सी.उकळकर)   ( सौ. एस.एम. उंटवाले )  

      सदस्या.                      सदस्य.               अध्‍यक्षा.

Giri   जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.

 SVG

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MRS. Smt. S.M.Untwale]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. A.C.Ukalkar]
MEMBER
 
[HON'BLE MRS. J.G.Khandebharad]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.