Maharashtra

Jalgaon

CC/08/440

Deelip Nathmal Sikhwal - Complainant(s)

Versus

Executive Emgineer M.S.E.D.C. - Opp.Party(s)

Adv. Yadav

05 Oct 2009

ORDER

 
Complaint Case No. CC/08/440
 
1. Deelip Nathmal Sikhwal
Jalgaon
Jalgaon
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Executive Emgineer M.S.E.D.C.
Jalgaon
Jalgaon
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. B.D. Nerkar PRESIDENT
 HON'ABLE MR. C.M. Yeshirao Member
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
                  तक्रार क्रमांक 440/2008
                  तक्रार पंजीबध्‍द करण्‍यात आले तारीखः – 19/03/2008
                  सामनेवाला यांना नोटीस लागलेली तारीखः 27/05/2008.
                  तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-05/10/2009
 
 
 
 
      श्री.दिलीप नथमल सिखवाल,
उ.व.45 वर्षे, धंदाः व्‍यापार,
      रा.बालाजी पेठ, जळगांव.                      ..........      तक्रारदार
      विरुध्‍द
कार्यकारी अभियंता,
महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादीत,
मटन मार्केट जवळ, अर्बन डिव्‍हीजन, जुना पॉवर हाऊस,
जळगांव.                                   .......    सामनेवाला.
        
                        न्‍यायमंच पदाधिकारीः- 
                        श्री. बी.डी.नेरकर                       अध्‍यक्ष.
                        अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव           सदस्‍य.
 
                        अंतिम आदेश
                   ( निकाल दिनांकः 05/10/2009)
(निकाल कथन न्‍याय मंच अध्‍यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून   )
 
            तक्रारदार तर्फे श्री सुरजपाल रामपाल यादव वकील हजर
सामनेवाला तर्फे कैलास एन. पाटील वकील हजर.
 
                  सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्‍तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
            1.     तक्रारदाराचे वडील नथमल रुपचंद मारवाडी यांचे नांवे सामनेवाला यांनी विज ग्राहक क्र.110011077650, जुना क्रमांक 7/173 घरगुती विज पुरवठया करिता दिलेला असुन आजही विज पुरवठा चालु आहे.    तक्रारदार यांनी विज बिल भरणा केला असुन एकुण रु.4,000/- सामनेवाला यांचेकडे भरणा केलेले आहेत.    तक्रारदाराचे वडील दि.24/7/1999 रोजी मयत झाले असुन तक्रारदार हे वारस आहेत.    सबब तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.    तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे वेळोवेळी तक्रार करुनही विज मिटरची दुरुस्‍ती न करता सामनेवाला यांनी तक्रारदारास नादुरुस्‍त मिटरचे दि.1/1/2006 ते दि.31/12/2006 या दरम्‍याने कालावधीत दरमहा 95 युनीटचा वापर दर्शवुन अंदाजे 250 युनीट वापर दाखवुन सरसकट रु.29,410/- चे चुकीचे विज देयक देण्‍यात आले.    मिटर क्रमांक 9010021860 हे नादुरुस्‍त असुन त्‍यात न वापरलेले युनीटस दर्शविण्‍यात आले आहेत.   एप्रिल,2007 ला 86 युनीट वापर दाखविला असुन हिवाळयात सप्‍टेंबर,2007 ला 513 युनीट दाखविले आहेत तसेच ऑक्‍टोंबर,2007 मध्‍ये शुन्‍य युनीट दाखविले आहे अशा प्रकारे चुकीचे युनीट दाखवुन विज देयक देण्‍यात आले आहे.    सबब मिटर क्रमांक 9010021860 प्रमाणे 29/2/2008 पर्यंत रक्‍कम रु.29,410/- चे विज देयक रद्य करण्‍यात येऊन नवीन मिटर बसविण्‍यात यावे व नवीन मिटरचे पुढील सहा महीन्‍यात वापर झालेले विज युनीटचे सरासरी दरमहा वापरलेले विज युनीट प्रमाणे विज आकाराचे दरमहा प्रमाणे विज देयक दुरुस्‍त करुन देण्‍यात यावे, कॅपॅसीटर दंड, व्‍याज, दंड इतर आकार आणि बेकायदेशीर आकारलेली रक्‍कम रद्य करण्‍यात यावी, तसेच तक्रार अर्जाचे निकाल होईपावेतो सामनेवाला यांनी विज पुरवठा बंद करु नये असे आदेश व्‍हावेत अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
            2.    सामनेवाला यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. श्री.नथमल आर.मारवाडी यांनी 7/173 बालाजी पेठ, जळगांव या ठिकाणी घरगुती वापरासाठी विज पुरवठा घेतला असुन त्‍याचा ग्राहक क्र.110011077650 असा असुन विज वापराची नोंद करण्‍यासाठी मिटर सिरियल क्रमांक 10021860 ब‍सविण्‍यात आला आहे.    दि.1/8/2005 पासुन 28 जानेवारी,2008 पावेतो ग्राहकास मिटर रिडींग प्रमाणे विज बिले देण्‍यात आलेली होती. ग्राहकाने शेवटचे विज बिल दि.24/8/2005 रोजी अदा केलेले होते.   परंतू त्‍यानंतरचे काळात विज वापरुन देखील विज बिले अदा केलेली नाहीत. दि.28/1/2008 रोजी तक्रारदाराचे जुने मिटर बदलविण्‍यात आलेमुळे मिटर बदल अहवालाची नोंद बिलींग विभागाकडे न झाल्‍यामुळे फेब्रुवारी,2008 ते जुलै,2008 या काळातील विज बिले म.रा.वि.नियामक आयोग (विद्युत पुरवठा संहिता आणि पुरवठयाच्‍या इतर अटी) विनिमय 2005 कलम 15.3 नुसार सरासरी 250 युनीटचे विज बिल देण्‍यात आले होते व ऑगष्‍ट,2008 चे विज बिलात सदर सरासरी विज बिलांची वजावट करुन देण्‍यात आलेली आहे.   दि.31/10/2008 अखेर तक्रारदाराकडे एकुण रु.35,930/- एवढी विज बिलापोटी थकबाकी आहे.    सदरची थकबाकी न भरण्‍याचे उद्येशाने तक्रारदाराने प्रस्‍तुतचा खोटा तक्रार अर्ज मे.मंचासमोर दाखल केला आहे.   सबब तक्रारदाराची तक्रार रद्य करण्‍यात यावी व तक्रारदाराकडुन सामनेवाला यांना नुकसानी दाखल रु.10,000/- मिळावेत अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे.  
            3.    तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे,  त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व उभयंतांचा युक्‍तीवाद ऐकला असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
            1.     सामनेवाला यांनी तक्रारदारास अवास्‍तव
                  विज देयक देऊन सदोष व त्रृटीयुक्‍त सेवा
                  दिलेली आहे काय ?                          ...... नाही
      म्‍हणून आदेश काय                 अंतिम आदेशाप्रमाणे
निष्‍कर्षाची कारणेः-
4.              मुद्या क्रमांक 1 तक्रारदाराचे वडीलांचे नांवे सामनेवाला विज
वितरण कंपनीकडुन ग्राहक क्रमांक 110011077650 अन्‍वये विज कनेक्‍शन घेतलेले होते व त्‍याचा मिटर सिरियल क्रमांक 10021860 असा होता ही बाब वादातीत नाही.   तथापी सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.1/1/2006 ते दि.31/12/2006 या कालावधीत दरमहा 95 युनीटचा वापर दाखवुन अंदाजे 250 युनीट वापर दर्शवुन सरसकट रक्‍कम रु.29,410/- चे अवास्‍तव देयक दिल्‍याची तक्रार तक्रारदाराने उपस्थित केलेली आहे.     सामनेवाला विज वितरण कपंनीने प्रस्‍तुत प्रकरणी हजर होऊन म्‍हणणे दाखल केलेले असुन तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे.     तक्रारदारान दि.24/8/2005 रोजी रक्‍कम रु.4,000/- चा भरणा केलेनंतर विज वापर करुनही एकदाही सामनेवाला यांचेकडे विज देयकापोटी रक्‍कम भरणा केलेली नसल्‍याने तसेच तक्रारदाराचा जुना मिटर बदलविल्‍यामुळे मिटर बदल अहवालाची नोंद बिलींग विभागाकडे न झाल्‍याने फेब्रुवारी,2008 ते जुलै,2008 या काळातील विज बिले महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत नियामक आयोग ( विद्युत पुरवठा संहीता आणि पुरवठयाच्‍या इतर अटी) विनिमय 2005 कलम 15.3 नुसार सरासरी 250 युनीटचे विज बिल देण्‍यात आले असल्‍याचे प्रतिपादन केलेले आहे.     तसेच तक्रारदाराकडे दि.31/10/2008 अखेर एकुण रक्‍कम रु.35,930/- एवढी विज बिलापोटी थकबाकी असल्‍याचे कथन केलेले आहे.    सामनेवाला यांनी सदर कथना पुष्‍ठयर्थ तक्रारदाराचे ग्राहक क्रमांक 110011077650 चे मार्च,2005 ते जुन,2008 या कालावधीतील सी.पी.एल. Consumer Personal Ledger   दाखल केलेले असुन त्‍याचे बारकाईने अवलोकन केले असता माहे ऑगष्‍ट,2005 मध्‍ये थकबाकी रु.2,959.44, व्‍याज रु.3,514.76, एकुण देयक रु.6,865.66 डी.पी.सी.चार्जेस रु.5.80 पैकी एकुण रक्‍कम रु.4,000/- दि.24/8/2005 रोजी तक्रारदाराने भरणा केलेले असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.    तथापी दि.24/8/2005 नंतर विज देयकापोटी सामनेवाला यांचेकडे विज बिलापोटी एकही रक्‍कम भरणा केलेली नसल्‍याचे सी.पी.एल.वरुन स्‍पष्‍ट होते.   तक्रारदाराने देखील त्‍याचे तक्रारीसोबत वादातील देयक दि.4/3/2008 देयक क्र.175 वगळता सामनेवाला विज वितरण कंपनीकडे विज बिलापोटी नियमीत रक्‍कम भरणा केलेबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही.     या उलट तक्रारदार हा विज वितरण कंपनीचा थकबाकीदार आहे ही बाब सामनेवाला यांनी दाखल केलेंल्‍या तक्रारदाराचे सी.पी.एल.वरुन स्‍पष्‍ट झालेली आहे.   सामनेवाला यांनी तक्रारदारास योग्‍य त्‍या कायदयाचे पालन करुन महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत नियामक आयोग ( विद्युत पुरवठा संहीता आणि पुरवठयाच्‍या इतर अटी) विनिमय 2005 कलम 15.3 नुसार सरासरी 250 युनीटचे विज बिल रक्‍कम रु.29,410/- चे बिल योग्‍य असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.    यावरुन सामनेवाला यांनी तक्रारदारास अवास्‍तव विज देयक देऊन कोणतीही सदोष सेवा दिलेचे स्‍पष्‍ट होत नाही.    सामनेवाला यांनी तक्रारदारास योग्‍य त्‍या कायदेशीर मार्गाचा वापर करुन दिलेले बिल योग्‍य असल्‍याचे सामनेवाला यांनी शाबीत केलेले असल्‍याने तसेच तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार फेटाळण्‍या योग्‍य असल्‍याचे निष्‍कर्षाप्रत हा मंच आलेला असल्‍याने तत्‍कालीन अध्‍यक्ष, जिल्‍हा ग्राहक मंच, जळगांव यांनी प्रस्‍तुत तक्रार प्रकरणी दि.19/3/2008 रोजी दिलेले तुर्तातुर्त आदेश रद्य करण्‍यात येतात.   सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
                        आ    दे    श 
            ( अ )       तक्रारदाराची तक्रार फेटाळण्‍यात येते.
            ( ब )       खर्चाबाबत आदेश नाही.
            ( क )       उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्‍क्‍याची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
 
  गा 
दिनांकः- 05/10/2009.
 
                  (श्री.चंद्रकांत मोहन येशीराव )        ( श्री.बी.डी.नेरकर )
                            सदस्‍य                       अध्‍यक्ष 
                                         जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव
 
 
[HON'ABLE MR. B.D. Nerkar]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. C.M. Yeshirao]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.