जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 108/2012 तक्रार दाखल तारीख – 11/09/2012
निकाल तारीख - 16/05/2015
कालावधी - 02 वर्ष , 08 म. 05 दिवस.
रशिद अहमदखॉ पठाण,
वय – 45 वर्षे, धंदा – मजुरी,
रा. पंढरपुर ता. देवणी, जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
- कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि.कं.म.उदगीर.
- सहाय्यक अभियंता,
“महावितरण’’
जुना पॉवर हाउसजवळ,
उदगीर (ग्रामीण) ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. वसुधा देशपांडे.
गैरअर्जदारातर्फे :- अॅड. के.एच.मुगळीकर.
निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार हा मौजे पंढरपुर ता. देवणी जि. लातुर येथील रहिवाशी असून, केशव दुर्गादास पटवारी यांच्या सर्वे नं. 8 मधील शेतात मौजे पंढरपुर येथील शेतीत शेतमजुर म्हणून काम करतो. सदर शेतातुन उच्च दाबाची वाहिनी गेली आहे. सदर विदयुत वाहिन्या वा-यामुळे सैल होऊन जमीनी पर्यंत आल्या होत्या. सदरची माहिती गैरअर्जदारास अर्जदाराने व शेतमालकाने तोंडी दिली होती. अर्जदार हा दि. 09/08/2011 रोजी शेतात काम करत असताना जोराचा वारा सुटल्यामुळे, सदरची सैल पडलेली विदयुत वाहिनी वा-यामुळे आणखी खाली येवून विदयुत शॉक लागुन अर्जदार दुर दगडावर जावून पडला. अर्जदारास उपचारासाठी सरकारी दवाखाना उदगीर येथे अॅडमीट केले.
सदर घटनेची माहिती शेत मालकाने दि. 16/08/2011 व अर्जदाराने दि. 06/09/2011 रोजी गैरअर्जदाराने दिली. अर्जदाराने सदर घटनेची माहिती देवून दि. 09/09/2011 रोजी पोलीस स्टेशन देवणी येथे तक्रार नोंदविली. गैरअर्जदाराने दि. 17/09/2011 रोजी अर्जदारास नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. अर्जदाराने दि. 16/12/2011 व दि. 01/02/2012 रोजी गैरअर्जदारास नोटीस दिली.
अर्जदाराने तक्रारी अर्जात रक्कम रु. 4,00,000/- ची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जा सोबत पुरावा म्हणून शपथपत्र दिले आहे व त्या सोबत एकुण 07 कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदाराने लेखी म्हणणे दिले आहे. अर्जदार हा ग्राहक नाही. सदरची तक्रार योग्य नाही. सदरची तक्रार मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नाही. अर्जदार व शेत मालक दुर्गादास पटवारी यांनी विदयुत वाहिन्या सैल झाल्याची तक्रार गैरअर्जदारास दिली नाही. अर्जदार हा शेतात काम करत असताना दि. 09/08/2011 रोजी सैल पडलेल्या विदयुत वाहीन्याचा शॉक लागून दगडावर पडुन जखमी झाले हे अर्जदाराने सिध्द करावे. गैरअर्जदाराने दि. 17/09/2011 रोजी अर्जदारास भेटून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले नाही. गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केली नाही. अर्जदाराने मेडिकल पेपर्स अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले नाही. अर्जदाराने पोलीस पेपर्स व पंचनामा दाखल केला नाही. अर्जदारांची तक्रार खारीज करण्यात यावी.
अर्जदाराचा तक्रारी अर्ज, दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्रे तसेच गैरअर्जदारांचे लेखी म्हणणे व दि. 23/07/2014 रोजी युक्तीवाद याचे अवलोकन केले असता.
अर्जदाराने केशव दुर्गादास पटवारी मौजे पंढरपुर येथे सर्वे नं. 8 मध्ये शेती असल्याचा व त्याच्या शेतातुन उच्च दाबाच्या विदयुत वाहिन्या गेल्याचा पुरावा दिलेला नाही. अर्जदार हा केशव दुर्गादास पटवारी यांच्या शेतात शेतमजुर म्हणून कामास असल्याबद्दलचा पुरावा नाही. अर्जदाराने दि. 20/11/2014 रोजी शेत मालकास गैरअर्जदार क्र. 3 म्हणून पार्टी करण्याचा अर्ज दिला आहे. सदरील अर्जावर गैरअर्जदार व अर्जदाराने स्टेप्स घेतली नाही. अर्जदार हा दि. 09/08/2011 रोजी शेतात काम करत असताना उच्च दाबाच्या वाहिन्या सैल पडल्यामुळे विदयुत शॉक लागून अपघात झाला. सदर अपघातामध्ये अपंगत्व आले, सदर घटना घडल्याचा पुरावा दिसुन येत नाही. अर्जदाराने सदरच्या घटनेची माहिती गैरअर्जदाराने दि. 06/09/2011 रोजी दिली. सदरचा अर्ज दाखल आहे. अर्जदाराने सदर घटनेची माहिती गैरअर्जदारास घटना घडल्यानंतर एक महिन्यानी दिली आहे. सदर घटनेचा पंचनामा नाही. अर्जदाराने देवणी पोलीस स्टेशनला 1 महिन्यानंतर दि. 08/09/2011 रोजी तक्रार दिली आहे. सदर अर्ज दाखल आहे. अर्जदार याने गैरअर्जदार यांच्याकडुन सेवा घेण्यासाठी मोबदला दिला नाही किंवा करार झालेला नाही, त्यामुळे अर्जदार हा ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम (2) (डी) नुसार ग्राहक होत नाही. अर्जदार व शेतमालक केशव दुर्गादास पटवारी गैरअर्जदाराचा ग्राहक असल्याचा पुरावा नाही. सदरची तक्रार न्यायमंचाच्या कार्यक्षेत्रात येत नाही. परंतु सदर प्रकरणात अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होत नसल्यामुळे, सदरचे प्रकरण नामंजुर करण्यात येत आहे. सदर न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2) खर्चाबाबत काही आदेश नाही.
(श्री. अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.