जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/244 प्रकरण दाखल तारीख - 04/01/2009 प्रकरण निकाल तारीख – 10/03/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते. - सदस्य 1. संतोबा पि.नारायणराव चंदनवार, वय 65 वर्षे, धंदा निवृत्त कर्मचारी, अर्जदार. 2. बालाजी पि.संतोबा चंदनवार, वय 35, धंदा व्यापार, दोघे रा. विरसावरकरनगर,किनवट ता.किनवट, जि.नांदेड. विरुध्द. 1. कार्यकारी अभियंता, गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, विभाग, भोकर ता.भोकर जि.नांदेड. 2. सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, उपविभाग किनवट ता.किनवट जि.नांदेड. 3. कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, किनवट शहर ता.किनवट जि.नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.सी.डी.इंगळे गैरअर्जदार तर्फे वकील - अड.व्ही.व्ही.नांदेडकर निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदार यांनी आपली तक्रार नोंदविली ती खालील प्रमाणे. अर्जदार क्र. 1 व 2 हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत. विद्युत कनेक्शन हे 1975 सालाचे आहे. गैरअर्जदारांनी सप्टेंबर 2008 पर्यंत जेवढी विज वापरली तेवढे बिल पाठविले व ही सर्व बिले अर्जदाराने नियमित भरले व सप्टेंबर 2008 मध्ये 66 युनिटचे बिल दिले ते 190 चे बिल अर्जदाराने भरले आहे. यानंतर नोव्हेंबर 2008 ला जे विजेचे बिल आले यात गैरअर्जदार यांनी एकदम रुद्य32,334/- थकबाकी दर्श्विलेली आहे. अर्जदाराने नियमितपणे बिल भरुन सुध्दा थकबाकी कशी काय आली याची चौकशी करण्यासाठी गैरअर्जदाराच्या कार्यालयात ब-याच चकरा मारल्या परंतु कोणताही प्रतिसाद दिला नाही. शेवटी अर्जदारांनी लेखी तक्रार नोंदविली. गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्धी थकबाकी भरा बाकीची थकबाकी मी कमी करुन देतो असे सांगितल्यावरुन अर्जदाराने दि.24/03/2009 रोजी रु.15,000/- भरले. गैरअर्जदाराने आपल्या म्हणण्याप्रमाणे राहीलेली थकबाकी कमी केली नाही. उलट महिनेवारी बिलामध्ये जास्तीचे युनिट टाकुन जास्तीचा विद्युत आकारले व अन्याय केले. अर्जदाराने पुन्हा दि.05/10/2009 रोजी रु.15,000/- भरले. गैरअर्जदाराने महिनेवारी बिलामध्ये खालील प्रमाणे वाढ दर्शवीली आहे. सप्टेंबर 2008 2344 युनिट ऑक्टोंबर 2008 2344 युनिट डिसेंबर 2008 410 युनिट फेब्रुवारी 2009 426 युनिट मार्च 2009 430 युनिट एप्रिल 2009 554 युनिट मे 2009 1163 युनिट जुलै 2009 846 युनिट ऑगष्ट 2009 363 युनिट सप्टेंबर 2009 447 युनिट ही वाढ अवास्त असुन अन्याकारक आहे. अर्जदार घरगुती विजेचे वापर करतात. गैरअर्जदाराने बेकायदेशिररित्या थकबाकी लावली व चुकीची माहीती दिली व अन्याय केला म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, गैरअर्जदार यांचेकडे जमा केलेली थकबाकी बाबतचे रु.30,000/- परत करण्याचे आदेश करावेत तसेच वापर न करता जास्तीचे युनिट बिलामध्ये दर्शवुन सप्टेंबर 2008 ते सप्टेंबर 2009 पर्यंत विज वापराप्रमाणे ते कमी करण्याची आदेश करावे. सुमारे एक वर्षा पासुन सतत मानसिक त्रास दिल्याबद्यल रु.1,50,000/- देण्याचे आदेश व्हावेत. तसेच नवीन मिटर देण्याचे आदेश करण्यात यावे. गैरअर्जदारांना विद्युत पुरवठा खंडीत न करण्या पासुन पायबंद करावे अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले, याप्रमाणे गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी आपला लेखी जबाब एकत्रितरित्या दाखल केलेला आहे. अर्जदाराची तक्रार ही चुकीच्या माहीतीवर आधारीत आहे. अर्जदार क्र. 2 विजेच्या जोडणी बाबत काहाही संबंध नसतांना त्यांचे मार्फत प्रकरण दाखल केलेले आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराचे विरुध्द त्यांच्या वैयक्तिक पदनामाने दाखल केलेले आहे जेंव्हा की विज कायदा 2003 च्या कलम 168 अन्वये कोणतेही प्रकरण प्रतिवादी यांचे विरुध्द वैयक्तिकरित्या दाखल करता येत नाही. म्हणुन हे प्रकरण खारीज करण्या योग्य आहे. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना विनाकारण सहभागी करण्यात आले आहे. कंपनीचे प्रमुख या नात्याने कंपनीस प्रतिनीधीत्व करु शकतात. अर्जदाराने सप्टेंबर 2008 पर्यंत नियमितपणे बिले भरले हे त्यांनीच सिध्द करावयाचे आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराला जेवढे विज वापरले तेवढे बिल दिले ते बिल अर्जदाराने नियमिपणे भरले ही बाब चुकीची आहे. सप्टेंबर 2008 मध्ये अर्जदाराने केवळ 66 युनिटचा वापर केला व त्यामुळे 190 रुपयाचे बिल अर्जदाराने गैरअर्जदाराकडे भरले हे म्हणणे चुकीचे आहे. नोव्हेंबर 2008 मध्ये गैरअर्जदाराने अर्जदाराला थकबाकी नसते वेळेस विनाकारण रु.32,334/- ची थकबाकी दर्शविले हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. अर्जदाराने थकबाकीबद्यल विचारणा करण्यासाठी सतत दोन म्हणणे त्यांचे कार्यालयात चकरा मारल्या त्यांना प्रतिसाद दिला नाही हे म्हणणे खोटे आहे. तसेच अर्धी थकबाकी भरा व बाकीची थकबाकी माफ करतो हे म्हणणे खोटे आहे. महिनेवारी जास्तीचे युनिट टाकुन जास्तीचे विज आकारले हे अर्जदाराचे म्हणणे खोटे आहे. गैरअर्जदाराने महिनेवारी बिलामध्ये वाढ दर्शविली हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. गैरअर्जदार नमुद करतात की, सदर दर्शविलेली वाढ नसुन अर्जदाराने प्रत्यक्षरित्या उपभोग घेतलेल्या विजेचे युनिटची नोंद दर्शवीणारे सदरचे बिल आहे. गैरअर्जदाराने बेकायदेशिररित्या अर्जदारास थकबाकी लावली व चुकीची माहीती देऊन ती वसुल केली हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. विद्युत कनेक्शन तोडण्याची धमकी दिली हे अर्जदारचे म्हणणे खोटे आहे. नविन मिटर देण्याचे आदेश करावे ही मागणी हस्यास्पद आहे कारण यात काय खराबी आहे हे सांगीतलेले नाही.ऑक्टोंबर 2008 मध्ये अर्जदाराचे विज मिटरवर विजेचा वापर 6590 युनिटस आढळला त्यामुळे अधिकची रिडींग 2088 वजा करता एकुण वापरलेले युनिट 4502 चे बिल देण्यात आले ती रक्कम न भरल्या कारणाने थकबाकीमध्ये ती आली. गैरअर्जदाराने याबाबत सहानुभूतीने त्यात चौकशी केल्यानंतर या बिलाचे 14 महिन्यामध्ये वर्गीकरण करण्यात आले त्यातुन रु.11,894/- हि रक्कम वजा करता येण्या जोगी होती त्याप्रमाणे त्याची नोंद घेण्यात आली. फेब्रुवारी 2009 मध्ये ती रक्कम वजा केल्यानंतर उरलेली रक्कम रु.27,698/- देय राहीली होती. दि.24/03/2009 रोजी अर्जदाराने रक्कम भरण्यास असमर्थता व्यक्त केल्याने त्यांनी हप्ते पाडुन देण्याची विनंती केल्याने गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्यांना सवलत दिली. एकुण रु.15,000/- भरले त्यानंतर नियमितपणे विज वापरले. मार्च 2009 ते सप्टेंबर 2009 पर्यंत जे मिटरवरील रिडींगप्रमाणे बिल दिले याचा विजेचा वापर करुनही अर्जदाराने या कालावधीमध्ये कोणतीही रक्कम भरलेली नाही. प्रत्येक महिन्याचे बिल थकबाकी ठरली. अर्जदाराने त्याला विजेचे बिल भरावे लागु नये म्हणुन ही तक्रार दाखल केली त्यामुळे गैरअर्जदाराने कोणतीही त्रुटीची सेवा दिली नाही किंवा कोणतेही नुकसान करणारे विजेची बिल भरण्या भाग पाडले नाही. त्यामुळे अर्जदाराचा तक्रारअर्ज खर्चासह खारीज करावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर. 1. गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी अर्जदार सिध्द करतात काय? होय. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी म्हणण्यात असा मुद्या उपस्थित केला की,विज कायदा 2003 च्या कलम 168 नुसार कोणतेही प्रकरण प्रतिवादी यांचे विरुध्द वैयक्तिकरित्या दाखल करता येत नाही. परंतु सदरील प्रकरण हे पदनामाने दाखल केलेली आहे. अर्जदार यांनी आपल्या तक्रारअर्जात स्पष्ट केले आहे की, त्यांना सप्टेंबर 2008 पर्यंत जी विजेची देयके देण्यात आली ती योग्य असल्या कारणाने त्यांनी नियमितपणे सर्व बिले भरलेली आहेत, ही सर्व बिले व पावत्या अर्जदाराने दाखल केलेल्या आहेत. यावरुन सप्टेंबर 08 पर्यंत अर्जदार व गैरअर्जदार यात कुठलाही वाद नव्हता. यानंतर नोव्हेंबर 08 पासुन वाद सुरु झाला. यात नोंव्हेंबर 08 च्या बिलात गैरअर्जदारांनी एकदम थकबाकी रु.32,334/- दाखविले मागचे सर्व बिले भरलेले असतांना देखील एकदम एवढे बिल कसे आले त्यामुळे अर्जदार हैरान होण्याची शक्यता आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे तक्रार केली व विज पुरवठा खंडीत होऊ नये या भितीपोटी दि.24/03/2009 ला रु.15,000/- व दि.05/10/2009 ला रु.15,000/- असे एकुण रु.30,000/- चा भरणा गैरअर्जदाराकडे केला आहे. अर्जदाराने दाखल केलेले खालील प्रमाणे आहे. महिना बिले/वापरलेली युनिट एकुण बिल ऑगष्ट 97 2008- 2088 रिडींग निल सप्टेंबर 66 बिले भरली आहेत ऑक्टोंबर 4502 वादग्रस्त बिल नोंव्हेबर 08 260 1052- 35 डिसेंबर 08 410 2031-64 जानेवारी 09 276 1072-27 फेब्रुवारी 09 426 2403-79 मार्च 09 430 2584-19 एप्रिल 09 554 2897-00 मे 09 609 3298-83 जुन 09 203 1058-08 जुलै 09 846 5375-67 ऑगष्ट 09 363 1680-83 सप्टेंबर 09 447 2728-37 एकुण 26183 अर्जदाराच्या वकीलांनी युक्तीवाद करते वेळी हे दर्शवुन दिले आहे की, मे महिन्याचे बिल गैरअर्जदाराने 1163 युनिटचे दिलेले आहे जे की, सीपीएल प्रमाणे खरे युनीट 609 आहेत व बिलाची रक्कम ही रु.7,643.89 असे दर्शविलेले जे की चुकीचे असून सीपीएल मध्ये 3298-87 आहे जे मे महिन्यचे बिल गैरअर्जदाराने चुकीचे दिलेले आहे व थकबाकी चुकीची दर्शविलेली आहे. यात नोव्हेबर 08 पासुन अर्जदाराने आतापर्यंत गैरअर्जदारा तर्फे जी विज देयके देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे होणारी रक्कम रु.26,183/- ही व यापुढील ऑक्टोबर 09 चे आजपर्यंतची विज देयके भरलेली नाहीत. अर्जदाराने अडवान्स म्हणुन रु.30,000/- ची रक्कम परत मिळावी व वरील बिले हे चुकीचे आहेत ते दुरुस्त करुन मिळावेत अशी अर्जदाराची मागणी आहे. हे बिल आम्ही मिटर रिडींग प्रमाणे तपासले असता, मागील रिडींग व चालु रिडींग व त्यातुन प्रत्येक महिन्याचे वापरलेले विजेचे युनिट हे प्रोग्रसीव्ह आहेत. त्यामुळे नोव्हेंबर 08 ते सप्टेंबर 09 पर्यंतचे दिलेले विज देयके बरोबर आहेत असे आम्ही ठरवितो. यातुन एक बिल मे महिन्याचे चुकीचे दिलेले आहे की, एकुण रक्कमेतुन ते कमी करुन हे बिल दिले आहे व डिसेंबर, जानेवारी, एप्रिल, मे महिन्याचे बिल हे गैरअर्जदाराने यांनी दाखल केलेले सीपीएलवरुन घेण्यात आलेले आहेत. विज बिलाचा वाद जरी धरले तरी वादांती बिल सोडुन ते बिल अर्जदाराने नियमित पणे भरावे ही गोष्ट खरी आहे व गैरअर्जदार देखील नियमिपणे बिल स्विकारण्यासाठी पुर्ण रक्कम भरा असे म्हणतात. त्यामुळे हे असे पेंडींग राहते. सप्टेंबर 08 चे सीपीएल प्रमाणे रिडींग पाहीले असता, 2008 मागील 2008 चे चालु रिडींग म्हणजे वापरलेले युनीट निल दाखविलेले आहे व यासाठी सरासरी 66 युनिटचे बिल देण्यात आले, सप्टेंबरपर्यंतचे ठिक आहे. ऑक्टोंबरमध्ये एकदम मिटर रिडींगवरुन 4502 युनिटचे बिल आकारुन ऑक्टोंबरच्या बिलामध्ये जे सीपीएल प्रमाणे थकबाकी घेण्यात आले आहे. एकाच महिन्यामध्ये 4500 चा विज वापर बिल तर कदापी शक्य नाही. यात नक्की गडबड झालेली आहे. मात्र यानंतर व मिटर रिडींग प्रमाणे विज बिल बरोबर देण्यात आलेले आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी जबाबात अर्जदाराची तक्रार दाखल दाखल केल्यानंतर चुक झाली हे कबुल केलेले आहे व त्या पोटी रु.11,894/- ही रक्कम कमी करण्या जोगी होती, केली आहे व फेब्रुवारी 09 मध्ये ती दर्शविण्यात आली असे म्हटलेले आहे व साधारणतः रु.12,000/- ची चुक गैरअर्जदाराच्या निदर्शनास आली व एकुण रु.32,334/- थकबाकी चुकीची होती, याचे स्पष्टीकरण गैरअर्जदाराने केलेले नाही. त्यामुळे एकाच महिन्यामध्ये 4500 अर्जदाराचे घरगुती मिटर असल्या कारणाने इतका विज वापर कदापी शक्य नाही. त्यात गैरअर्जदारांनी चुक कबुल केली आहे. याचा अर्थ गैरअर्जदाराच्या प्रतिनीधीने ऑक्टोंबर महिन्यामध्ये चुकीचे रिडींग घेतली व रिडींग चुकीची घेतल्या कारणाने ती अडजस्ट करण्याच्या हेतुन 11897.52 कमी करण्याची तयारी दर्शविली व यानंतर अर्जदाराचे समाधान न झाल्या कारणाने गैरअर्जदार यांनी पुढील महिन्यामध्ये हे सर्व युनिट रिडींगद्वारे सेट केले, असा प्रकार दिसतो. एकंदरीत गैरअर्जदाराकडुन रिडींगमध्ये नक्की चुक झालेली आहे. गैरअर्जदाराने ऑक्टोंबर महिन्याचे सरासरी 250 युनिटचे बिल धरावे ते व यानंतर नोव्हेंबर 08 ते सप्टेंबर 09 पर्यंतचे विज देयकाप्रमाणे एकुण बिल रु.26,183/- यात ऑक्टोंबर चे सरासरी बिल 250 युनिट जे काय होईल ते अडजस्ट करुन ऑक्टोंबर महिन्याचे दुरुस्तीचे बिलासह येणारी एकुण विजेची रक्कम ही अर्जदाराने भरलेल्या एकुण रु.30,000/- रक्कमेतुन वजा करुन वसुल करुन घ्यावे. यात अर्जदाराचे रु.30,000/- अडव्हान्समध्ये जमा असल्या कारणाने इंट्रेस्ट एरिअर्स धरण्यात आले नाही. यात स्वतःहुन गैरअर्जदाराने घट करुन रु.12,000/- ची रक्कम धरलेली आहे. राहीलेले रु.18,000/- रक्कम त्यामध्ये आम्ही कमी करीत आहोत. अर्जदाराने सप्टेंबर 08 चे नंतर सप्टेंबर 09 पर्यंत एकही बिल भरलेले नाही. त्यामुळे त्यांना ही सर्व बिले भरणे भाग आहे. यानंतर ऑक्टोंबर 09 पासुन तो आजपर्यंत जे विजेचे बिल गैरअर्जदारांनी अर्जदारांना दिलेच असतील किंवा नसतील दिले व ती सर्व बिले द्यावेत व अर्जदाराने आजपर्यंतचे सर्व बिले भरुन आपले खाते नियमित करावे. वरील कारणामुळे अर्जदाराच्या मागणीप्रमाणे त्यांनी भरलेली रक्कम रु.30,000/- त्यांच्या बिलापोटी अडजस्ट करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना ती वापस देता येणार नाही. अर्जदार यांनी नवीन मिटर बदलून द्यावे अशी मागणी केलेली आहे व विजेचे मिटर खराब आहे याबद्यलची तक्रार केलेली दिसत नाही. परंतु आज मंचामध्ये मिटर विषयी अर्जदाराची तक्रार असेल तर गैरअर्जदार हे मिटर लॅब्रोटरीमध्ये टेस्ट करुन द्यावयास हवे होते व तसे तरी देखी नसेल तर नविन मिटर बदलून द्यावयास हवे होते परंतु अर्जदाराची तक्रार मिटर बदलण्यासंबंधी नसल्या कारणाने व नोव्हेंबर 09 पासुन ते आतापर्यंत मिटरची रिडींग प्रोग्रेसिव्ह दिसते व सप्टेंबर 09 नंतर अर्जदाराचे मिटरसंबंधी तक्रार नाही त्यामुळे मिटर कशासाठी बदलावयाचा याची गरज आम्हास वाटत नाही. अर्जदाराला हवे तर त्यांनी गैरअर्जदाराकडे अर्ज देऊन मिटर टेस्टींगचे पैसे भरुन टेस्ट करुन घ्यावे व आपले समाधान करुन घ्यावे. त्यामुळे त्याची ही मागणी मान्य करता येत नाही. गैरअर्जदारांनी नोव्हेंबर 08 चे बिलामध्ये रु.32,334/- एकदम जंपींग थकबाकी दाखविली तसेच मे 09 चे बिल चुकीचे युनिटचे दिले ही गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी धरुन आम्ही ती रद्य करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी ऑक्टोंबर 08 चे दिलेले 4502 युनीटचे बिल रद्य करण्यात येते त्या ऐवजी ऑक्टोंबर महिन्याचे सरासरी 250 युनिटचे बिल धरुन दुरुस्तीचे बिल द्यावे तसेच नोव्हेंबर 2008 ते सप्टेंबर 2009 पर्यंतचे एकुण बिल रु.26,183/- असे एकुण येणारे बिल अर्जदारांनी भरलेल्या रु.30,000/- या रक्कमेतुन अडजस्ट करुन घ्यावे. 3. अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्चा म्हणुन रु.2,000/- गैरअर्जदारांनी अर्जदार यांना द्यावेत, ही रु.7,000/- ची रक्कम गैरअर्जदार अर्जदाराच्या पुढील विज देयकात समावियोजीत करु शकतील. 4. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक |