जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 206/2012 तक्रार दाखल तारीख – 18/09/2012
तक्रार निकाल तारीख– 20/02/2013
रावसाहेब पि.त्रिंबक नाईकवाडे
वय 50 वर्षे धंदा शेती
रा.चौसाळा, ता.जि.बीड ... अर्जदार
विरुध्द
कार्यकारी अभिंयता,
भीमाशंकर शुगर मिल प्रा.लि. ... गैरअर्जदार
पारगांव ता.वाशी जि.उस्मानाबाद.
समक्ष - श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
तक्रारदारातर्फे - अड.टी.व्ही.जाधव,
गैरअर्जदारा तर्फे - कोणीही हजर नाही.
---------------------------------------------------------------------------------------
नि 1 वरील आदेश
दिनांक- 20.02.2013
(द्वारा- श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदारांनी गैरअर्जदार साखर कारखान्यात ऊस गाळप करण्यासाठी 16 टन 205 किलो ऊस प्रति टन रु.1800/- प्रमाणे एकूण रक्कम रु.29,160/- एवढया किंमतीचा जानेवारी 2012 पर्यत दिलेला असून गैरअर्जदार यांनी तक्रारदारांची थकबाकी नसताना सदर रककम कपात केली. हरीभाऊ रंगनाथ या व्यक्तीने सिध्दीविनायक नागरी पतसंस्था चौसाळा पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जास तक्रारदार जामीनदार असून सदर व्यक्ती मयत झाल्यामुळे पतसंस्थेचे कर्ज थकीत झाले आहे. यामुळे गैरअर्जदार यांनी तक्रारदारांच्या ऊसाचे बिल पतसंस्थेकडे जमा केले आहे अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदार व गैरअर्जदार यांचे मध्ये ग्राहकाचे नाते प्रस्थापित झाल्याचे दिसून येत नाही. तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार ग्राहक या संज्ञेत येत नाही. अशा परिस्थितीत सदर प्रकरण न्याय मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार प्राथमिक अवस्थेत फेटाळून लावण्यात येते.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड