Maharashtra

Jalna

CC/43/2012

Ramesh Vitthalrao Jogdand - Complainant(s)

Versus

Exe.Engineer MSEDC Ltd - Opp.Party(s)

Adv.Manish Raut

18 Sep 2012

ORDER

 
CC NO. 43 Of 2012
 
1. Ramesh Vitthalrao Jogdand
R/O:Karpudi,Jalna
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Exe.Engineer MSEDC Ltd
Mastgad,Jalna
Jalna
Maharashtra
2. Dy.Exe.Engineer (Rural Sub Division)MSEDC Ltd
Matgad,Jalna
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Rekha Kapdiya PRESIDING MEMBER
 HON'ABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe MEMBER
 
PRESENT:Adv.Manish Raut, Advocate for the Complainant 1
 
अड.जी.आर.कड
......for the Opp. Party
ORDER

 

(घोषित दि. 18.09.2012 व्‍दारा श्रीमती रेखा कापडिया, प्र.अध्‍यक्ष)
      अर्जदार हे गैरअर्जदार महावितरण वीज कंपनीचे ग्राहक असून गैरअर्जदार यांनी त्‍यांना वाढीव वीज बिलाची आकारणी केली. त्‍यांनी केलेल्‍या तक्रारीची दखल गैरअर्जदार यांनी घेतली नाही. म्‍हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
      अर्जदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीनुसार त्‍यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. दिनांक 22.08.2011 रोजी गैरअर्जदार यांनी त्‍यांना दिलेले वीज बिल दिनांक 12.09.2011 रोजी भरलेले आहे. हे बिल चुकीचे असल्‍याचे अर्जदाराचे म्‍हणणे आहे. या वीज बिला विरुध्‍द त्‍यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडे तक्रार केली. परंतू गैरअर्जदार यांनी त्‍याची दखल घेतली नसल्‍याचे अर्जदाराने तक्रारीत म्‍हटले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्‍या मीटरची तपासणी केली व प्रत्‍यक्ष वीज वापर कमी असताना देखील वाढीव वीज वापराचे बिल दिले. गैरअर्जदार यांनी लावलेले मीटर फॉल्‍टी असल्‍याचे अर्जदाराचे म्‍हणणे आहे. गैरअर्जदार यांनी दिलेले 16,430/- रुपयाचे वीज बिल चुकीचे असून ते रद्द करण्‍याची तसेच नुकसान भरपाई देण्‍याची मागणी अर्जदाराने केली आहे.
      अर्जदाराने तक्रारीसोबत वीज बिलाच्‍या प्रती व तक्रारीची प्रत जोडली आहे.
      गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्‍या जवाबानुसार त्‍यांना अर्जदाराची तक्रार मान्‍य नसल्‍याचे म्‍हटले आहे. ऑगस्‍ट 2011 मध्‍ये त्‍यांनी अर्जदारास 16226.86 रुपयाचे वीज बिल कमी करुन दिले आहे. अर्जदाराने मीटर बाबत केलेल्‍या तक्रारीची दखल घेऊन त्‍यांनी मीटरची पाहणी देखील केली आहे. अर्जदाराचे मीटर व्‍यवस्थितपणे वीज वापराची नोंद घेत असून अर्जदाराने स्‍थळ पाहणी अहवालावर सही देखील केलेली आहे. अर्जदारास डिसेंबर 2011 ते एप्रिल 2011 या काळात डोअर लॉकचे बिल आकारण्‍यात आले व रिडींग उपलब्‍ध झाल्‍यानंतर मे 2011 मध्‍ये अर्जदारास वीज बिलात 17834.58 चे क्रेडीट देण्‍यात आले. अर्जदाराने वीज बिलाची रक्‍कम भरलेली नसल्‍यामुळे त्‍यांचे आर्थिक नुकसान झालेले नाही. अर्जदारास देण्‍यात आलेल्‍या सेवेत त्रुटी नसल्‍याचे सांगून अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍याची विनंती मंचास केली आहे.
      अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन व सुनावणी वरुन असे आढळून येते की, अर्जदाराने घरगुती वापरासाठी गैरअर्जदार यांच्‍याकडून वीज पुरवठा घेतला आहे. त्‍यांचा ग्राहक क्रमांक 5100360337888 असा असून मीटरचा क्रमांक 6155444 असा आहे. गैरअर्जदार यांनी जुलै 2011 मध्‍ये मागील रिडींग 759 व चालू रिडींग 3614 असे दर्शवून अर्जदारास 2855 युनिट वापराचे बिल आकारले जे त्‍यांच्‍या वीज वापरापेक्षा जास्‍त होते. या वीज बिला विरुध्‍द त्‍यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडे अनेक वेळेस तक्रार केलेली दिसून येते. पण गैरअर्जदार यांनी त्‍याची दखल घेतलेली दिसून येत नाही. ऑगस्‍ट 2011 मध्‍ये गैरअर्जदार यांनी वीज बिलात 16226.86 रुपयाचे क्रेडीट दिलेले दिसून येते.परंतू जानेवारी 2012 ते एप्रिल 2012 या महिन्‍यात 551 युनिट प्रतिमाह वीज बिल आकारणी केली असल्‍याचे दिसून येते. पण मे 2012 च्‍या वीज बिलात रिडींग उपलब्‍ध झाल्‍यानंतर 17834.58 रुपयाचे क्रेडीट झाल्‍याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी दिनांक 09.03.2012 रोजी अर्जदाराच्‍या मीटरची पाहणी केली. या मीटर तपासणी अहवालाचे निरीक्षण केल्‍यावर मीटर योग्‍य प्रकारे वीज वापराची नोंद घेत असल्‍याचे नमूद केले आहे. मीटर पाहणी करणा-या गैरअर्जदार यांच्‍या प्रतिनिधीने मीटर रिडींग प्रमाणे वीज बिल आकारले असा शेरा दिलेला दिसून येतो. या स्‍थळ पाहणी अहवालावर अर्जदाराची सही आहे. व त्‍यांनी या आहवाला बाबत कोणताही आक्षेप नोंदविलेला दिसून येत नाही. अर्जदाराने मीटर चाचणी करुन देण्‍याबाबतही गैरअर्जदार यांच्‍याकडे अर्ज दिलेला दिसून येत नाही.
      वरील सर्व निरीक्षणावरुन मीटर रिडींग न घेता वीज बिल आकरणी करणे ही सेवेतील त्रुटी मानण्‍यात येते. अर्जदाराची तक्रार अंशत: मान्‍य करण्‍यात येते.     
 
आदेश
 
  1. गैरअर्जदार यांनी अर्जदारास आकारलेले व्‍याज व दंडाची रक्‍कम कमी करुन 30 दिवसात सुधारीत वीज बिल द्यावे.
  2. अर्जदाराने भरलेल्‍या रकमेची वजावट सुधारीत वीज बिलात करावी.
  3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेतील त्रुटी, मानसिक त्रास व खर्चाबद्दल रुपये 1,000/- तिस दिवसात द्यावे.         
 
 
[HON'ABLE MRS. Rekha Kapdiya]
PRESIDING MEMBER
 
[HON'ABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.