Maharashtra

Jalna

CC/53/2012

Gajanan Hariharrao Bakshi - Complainant(s)

Versus

Exe.Engineer MSEDC Ltd - Opp.Party(s)

L.P.Mukim

18 Sep 2012

ORDER

 
CC NO. 53 Of 2012
 
1. Gajanan Hariharrao Bakshi
R/O:Sahyog Nager,Ambad Road,Jalna
jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Exe.Engineer MSEDC Ltd
Mastgad,Jalna
jalna
Maharashtra
2. Junior Engineer,MSEDC Ltd
Servey No.488,Jalna
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Rekha Kapdiya PRESIDING MEMBER
 HON'ABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe MEMBER
 
PRESENT:
 
अड.जी.आर.कड
......for the Opp. Party
ORDER

 

(घोषित दि. 18.09.2012 व्‍दारा श्रीमती रेखा कापडिया, प्र.अध्‍यक्ष)
      अर्जदाराने गैरअर्जदार महावितरण कंपनीकडून झेरॉक्‍स दुकानासाठी वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी मीटर रिडींग प्रमाणे बिल आकारणी न करता अंदाजे वीज बिल आकारले. अर्जदाराने या बाबत केलेल्‍या तक्रारीची दखल घेण्‍यात न आल्‍यामुळे त्‍यांनी सेवेतील त्रुटी म्‍हणून ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
      अर्जदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीनुसार त्‍यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडून झेरॉक्‍स मशिनसाठी वीज पुरवठा घेतला आहे. लोड शेडींगमुळे त्‍यांचा वीज वापर कमी असल्‍याचे अर्जदाराचे म्‍हणणे आहे. अर्जदाराने दिनांक 19.02.2010 पर्यंत वीज बिलाचा भरणा केलेला आहे. गैरअर्जदार यांनी त्‍यानंतर मीटरचे रिडींग न घेता अंदाजे वीज बिल दिल्‍यामुळे अर्जदाराने दिनांक 17.06.2011 रोजी गैरअर्जदार यांना मीटरवरील रिडींग प्रमाणे वीज बिल देण्‍याची विनंती केली. पण गैरअर्जदार यांनी त्‍याची दखल घेतली नाही. दिनांक 16.12.2011 रोजी गैरअर्जदार यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता त्‍यांचा वीज पुरवठा खंडीत केला. अर्जदाराने नोटीस दिल्‍यानंतर त्‍यांनी तो पुनर्रजोडणी करुन दिला. दिनांक 29.03.2012 रोजी गैरअर्जदार यांनी पुन्‍हा एकदा कोणतीही पूर्व सूचना न देता त्‍यांचा वीज पुरवठा खंडीत केला. त्‍यामुळे त्‍यांचे आर्थिक नुकसान होत असल्‍याचे अर्जदाराचे म्‍हणणे आहे. गैरअर्जदार यांनीवीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन देण्‍याची व नुकसान भरपाईची मागणी अर्जदाराने केली आहे.
      अर्जदाराने खंडीत केलेला वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन देण्‍याबाबत अंतरिम आदेश देण्‍याची विनंती मंचास केली आहे. या अंतरिम अर्जावर दिनांक 26.04.2012 रोजी सुनावणी घेऊन अर्जदाराने दिनांक 02.12.2011 च्‍या वीज बिला पैकी 7,000/- रुपये भरल्‍यास वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन द्यावा असा अंतरिम आदेश पारित करण्‍यात आला.
      गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्‍या जवाबानुसार अर्जदार त्‍यांचे ग्राहक असल्‍याचे त्‍यांना मान्‍य आहे. अर्जदाराच्‍या मीटरचे जेंव्‍हा रिडींग घेता आले नाही तेंव्‍हा त्‍यांनी सरासरीवर अधारीत वीज बिल दिले आहे. रिडींग उपलब्‍ध झाल्‍यानंतर त्‍यांना समायोजन करुन देण्‍यात आले आहे. ऑक्‍टोबर 2010 मध्‍ये रिडींग उपलब्‍ध झाल्‍यानंतर 3936.75 रुपयाचे अर्जदारास क्रेडीट देण्‍यात आले. अर्जदाराच्‍या तक्रारीनुसार त्‍यांनी मीटरची तपासणी सुध्‍दा केली आहे. वीज बिलाचा भरणा टाळण्‍याच्‍या उद्देशाने अर्जदाराने तक्रार दाखल केली असून ती खारीज करण्‍याची विनंती मंचास केली आहे.
      अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन व सुनावणी वरुन मंचास असे दिसून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्‍याकडून झेरॉक्‍स मशिनसाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्‍यांचा ग्राहक क्रमांक 5100300224688 असा असून मीटर क्रमांक 6504427405 असा आहे. गैरअर्जदार यांनी मंचात जानेवारी 2009 ते मे 2012 या कालावधीचे सी.पी.एल. जवाबासोबत जोडले आहे. या सी.पी.एल. चे अवलोकन केल्‍यावर जानेवारी ते मे 2009 या काळात अर्जदारास सरासरीवर अधारीत वीज बिल आकारण्‍यात आले. जून 2009 मध्‍ये अर्जदारास 19 महिन्‍याच्‍या कालावधीचे 624 युनिटचे बिल आकारण्‍यात आले असून या वीज बिलामध्‍ये 6303.40 रुपयाचे क्रेडीट देण्‍यात आल्‍याचे दिसून येते. जुलै 2009 ते जानेवारी 2010 या कालावधीत अर्जदारास पुन्‍हा सरासरीवर अधारीत वीज बिल आकारणी करण्‍यात आल्‍याचे दिसून येते. सी.पी.एल. मध्‍ये फेब्रूवारी 2010 मध्‍ये अर्जदाराचे जुने मीटर (क्रमांक 247386) बदलून त्‍याजागी (क्रमांक 4427405) या क्रमांकाचे नवीन मीटर बसविण्‍यात आले. फेब्रूवारी 2010 ते सप्‍टेबर 2010 या कालावधीचे अर्जदारास पुन्‍हा एकदा मीटर रिडींग न घेता सरासरीवर अधारीत वीज बिल देण्‍यात आले. ऑक्‍टोबर 2010 मध्‍ये मीटरचे रिडींग घेऊन 475 युनिट वीज वापराचे बिल आकारण्‍यात आले. या बिलातून 5936.75 रुपये क्रेडीट देण्‍यात आल्‍याचे दिसून येते. नोव्‍हेंबर 2010 तसेच मार्च 2011 हे दोन महिने वगळता अर्जदारास मे 2011 पर्यंत पुन्‍हा एकदा मीटर रिडींग न घेता सरासरीवर अधारीत वीज बिल देण्‍यात आले. सप्‍टेबर 2011 ते डिसेंबर 2011 त्‍याच प्रमाणे फेब्रूवारी 2012 ते एप्रिल 2012 या महिन्‍याचे देखील अर्जदारास सरासरीवर आधारीत बिल देण्‍यात आल्‍याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी रिडींग घेतल्‍यानंतर जरी अर्जदारास क्रेडीट दिले असले तरी या क्रेडीट रकमेतून व्‍याज व दंडाची रक्‍कम कमी केलेली दिसून येत नाही. मीटर रिडींग नियमितपणे न घेणे तसेच अर्जदारास सतत सरासरीवर आधारीत बिल आकारणे व या बिलात व्‍याज व दंडाची रक्‍कम लावणे ही सेवेतील त्रुटी मानण्‍यात येते. अर्जदाराने देखील सरासरीवर अधारीत बिल देण्‍यात येत आहे हे कारण सांगून वीज बिलाचा नियमितपणे भरणा केलेला दिसून येत नाही.  
 
आदेश
 
  1. गैरअर्जदार यांनी अर्जदारास व्‍याज व दंडाची रक्‍कम कमी करुन सुधारीत वीज बिल द्यावे.
  2. गैरअर्जदार यांनी नियमितपणे मीटर रिडींग न घेतल्‍यामुळे अर्जदारास मानसिक त्रास व खर्चापोटी 1,000/- रुपये 30 दिवसात द्यावे.   
 
 
[HON'ABLE MRS. Rekha Kapdiya]
PRESIDING MEMBER
 
[HON'ABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.