Maharashtra

Jalna

CC/97/2012

Badrinath Maruti Pathade - Complainant(s)

Versus

Exe.Engineer MSCDCL,Jalna - Opp.Party(s)

Adv.Vipul Deshpande

20 Dec 2013

ORDER

 
CC NO. 97 Of 2012
 
1. Badrinath Maruti Pathade
R/O: Manalal Saraf Nager,Jalna
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Exe.Engineer MSCDCL,Jalna
Mastgad,Jalna
Jalna
Maharashtra
2. Deputy Exe.Engineer MSEDCL,Jalna
Urban Sub-Div.Mastgad,Jalna
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'ABLE MRS. Rekha Kapdiya MEMBER
 
PRESENT:Adv.Vipul Deshpande, Advocate for the Complainant 1
 
अड.जी.आर.कड
......for the Opp. Party
ORDER

(घोषित दि. 20.12.2013 व्‍दारा श्रीमती नीलिमा संत,अध्‍यक्ष)

 

तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 कलम 12 अंतर्गत केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार हे जालना येथील रहीवाशी असून गैरअर्जदारांचे ग्राहक आहेत. त्‍यांचा ग्राहक क्रमांक 510030486402 असा आहे. तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून घरगुती वापरासाठी वीज जोडणी घेतली होती व ते नियमितपणे विद्युत देयकांचा भरणा करत होते. जून 2012 नंतर तक्रारदारांचे मीटर बदलण्‍यात आले. त्‍यात त्‍यांचे रिडींग घेतल्‍याचे दिसते. परंतू समायोजित युनिट कोठून दाखवले याचा बोध होत नाही. जून 2012 च्‍या बिलात रुपये 16,000/- बाकी चुकीने दाखवली आहे. जून 2012 मध्‍ये तक्रारदारांनी रुपये 25,000/- ऐवढा भरणा केलेला आहे. तक्रारदारांनी वेळोवेळी गैरअर्जदार यांचेकडे जाऊन देयक दुरुस्‍तीची विनंती केली. परंतू गैअर्जदार यांनी त्‍यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. गैरअर्जदार यांचेकडून अर्जदाराला कधीही योग्‍य वापराप्रमाणे वीज देयके दिली जात नाहीत ही गैरअर्जदार तक्रारदारांना द्यायच्‍या सेवेत त्रुटी करत आहेत.
गैरअर्जदार कंपनीने दिनांक 01.10.2012 रोजीच्‍या बिलातील रुपये 60,867/- ऐवढी रक्‍कम भरण्‍याची नोटीस तक्रारदारांना दिली व वीज पुरवठा खंडित करण्‍याची धमकी दिली. म्‍हणून तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे. त्‍यात ते जून 2012 ते ऑक्‍टोबर 2012 या कालावधीतील विद्युत देयके रद्द करावीत, नुकसान भरपाई पोटी रुपये 50,000/- द्यावेत तसेच तक्रारदारांचा वीज पुरवठा खंडित करु नये अशी प्रार्थना करतात. तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीसोबत वादग्रस्‍त विद्युत देयके, गैंरअर्जदारांनी त्‍यांना पाठवलेली नोटीस अशी कागदपत्रे व तक्रारीचा निकाल लागेपर्यंत विजपुरवठा खंडित करण्‍यात येवू नये अशी प्रार्थना करणारा अंतरिम अर्ज दाखल केला आहे. तो अर्ज मंचाने दिनांक 09.11.2012 रोजी मंजूर केला आहे.
गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले. त्‍यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्‍यांच्‍या जबाबानुसार ऑक्‍टोबर 2011 च्‍या आधी बरेच दिवस तक्रारदारांना सरासरी 100 युनिटचे देयक जात होते. ऑक्‍टोबर 2011 ला वाचन घेतले तेव्‍हा एकूण वापर 1492 युनिट असे 12 महिन्‍यांचे बिल देण्‍यात आले व सरासरी 100 युनिट प्रमाणे तक्रारदारांनी भरलेली रक्‍कम रुपये 3,416/- वजा करण्‍यात आली. तक्रारदारांनी वापरलेल्‍या वीजेचे व न भरलेल्‍या रक्‍कमेचे रुपये 98,074/- चे देयक तक्रारदारांना देण्‍यात आले. जानेवारी 2012 मध्‍ये नियमाप्रमाणे त्‍यातून 52,347.85 ऐवढी रक्‍कम कमी करण्‍यात आली. दिनांक 06.07.2012 ला तक्रारदारांचे मीटर बदलले तेंव्‍हा त्‍यावर तक्रारदारांनी वापरलेल्‍या मागील वीजेचे युनिट 4566 एवढे होते व चालू महिन्‍याचे वाचन 189 युनिट असे होते. म्‍हणून तक्रारदारांना एकूण 59,035/- रुपयांचे वीज देयक देण्‍यात आले ते नियमाप्रमाणे बरोबर आहे.
तक्रारदारांना द्यायच्‍या सेवेत गैरअर्जदार यांनी कोणतीही त्रुटी केलेली नाही. म्‍हणून प्रस्‍तुत तक्रार नामंजूर करावी अशी प्रार्थना गैरअर्जदार करतात त्‍यांनी आपल्‍या जबाबासोबत तक्रारदारांचे सी.पी.एल दाखल केले आहे.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.विपुल देशपांडे व गैरअर्जदारांचे विद्वान वकील श्री.जी.आर.कड यांचा युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. दाखल कागदपत्रांचा अभ्‍यास केला त्‍यावरुन खालील गोष्‍टी स्‍पष्‍ट होतात.
1. तक्रारदारांचे आधीचे मीटर क्रमांक 1787295 हे होते ते दिनांक 06.07.2012 रोजी बदलण्‍यात आले त्‍यांचा नविन मीटर क्रमांक 00131206 असा होता. मीटर बदलले तेंव्‍हा त्‍यावरील मागील रिडींग 4566 युनिट ऐवढे होते. तक्रारदारांचे मीटर सदोष नव्‍हते. वरील सर्व गोष्‍टी नि.16/1 मीटर बदलल्‍याच्‍या अहवाला वरुन स्‍पष्‍ट होतात.
2. तक्रारदारांचे सी.पी.एल बघता जानेवारी 2012 पासून त्‍यांना R N A Reading Not available म्‍हणून सरासरी 100 युनिटचे वीज देयक देण्‍यात आलेले दिसते. त्‍यानंतर जुलै 2012 मध्‍ये मीटर बदलले तेंव्‍हा त्‍यावरील वाचन उपलब्‍ध झाले ते वर म्‍हटल्‍या प्रमाणे 4566 युनिट ऐवढे होते. त्‍यानुसार जुलै 2012 मध्‍ये वरील प्रमाणे 4565 ऐवढे युनिट समायोजित युनिट व 189 चालू रिडींग दाखवून एकूण 4753 युनिटचे देयक देण्‍यात आले आहे. जुलै 2012 मध्‍ये 4753 चे वीज देयकाची रक्‍कम न भरल्‍याने ती पुढील देयकात बाकी म्‍हणून दाखवण्‍यात आली आहे. ऑक्‍टोबर 2012 पासून जून 2013 पर्यंतच्‍या काळात तक्रारदारांना वीज वाचन घेऊन त्‍याप्रमाणेच देयके देण्‍यात आली आहेत. तक्रारदारांच्‍या सी.पी.एल वरुन तक्रारदारांनी एकूण थकबाकीपोटी डिसेंबर 2012 मध्‍ये रुपये 25,000/- व जानेवारी 2013 मध्‍ये रुपये 50,000/- एवढया रकमेचा भरणा केलेला आहे असे दिसते.
3. वरील विवेचनावरुन जुलै 2012 ते ऑक्‍टोबर 2012 या काळात तक्रारदारांना दिलेली विद्युत देयके त्‍यांनी पुर्वी वापरलेल्‍या व अदा न केलेल्‍या वीज देयकाच्‍या थकबाकी पोटीच आहेत असे दिसते. त्‍यामुळे तक्रारदारांनी प्रार्थना केल्‍या प्रमाणे त्‍यांना दिलेली विद्युत देयके रद्द करता येणार नाहीत. तसेच गैरअर्जदारांनी अशा थकीत देयकांची मागणी करुन तक्रारदारांना द्यावयाच्‍या सेवेत काहीही त्रुटी अथवा कमतरता केलेली नाही असा निष्‍कर्ष मंच काढत आहे.
म्‍हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.

आदेश

1. तक्रारदारांची तक्रर नामंजूर करण्‍यात येत आहे.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
 

 
 
[HON'ABLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Rekha Kapdiya]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.