Maharashtra

Nanded

CC/08/394

Sunil Baliram Lokhande - Complainant(s)

Versus

Exe.Eng.MSED .C.Nanded - Opp.Party(s)

Adv.M.D.Deshpande

01 Apr 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/394
1. Sunil Baliram Lokhande Venkateshwara Nagar,Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Exe.Eng.MSED .C.Nanded Nanded.NandedMaharastra2. M.S.E.D.C.Ltd.Nanded.Nanded.NandedMaharastra3. Jr.Eng.MSEDC.Ltd.Nanded.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 01 Apr 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
प्रकरण क्र.394/2008.
                                                     प्रकरण दाखल दिनांक  20/12/2008.
                                                     प्रकरण निकाल दिनांक 01/04/2009.
                                                   
समक्ष         -    मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील       अध्‍यक्ष.
                       मा.श्रीमती. सुजाता पाटणकर.   सदस्‍या.
                       मा. श्री.सतीश सामते.                सदस्‍य.
 
डॉ.सुनिल पि.बळीराम लोंखडे                              
वय वर्षे 35, व्‍यवसाय खाजगी वैद्यकीय व्‍यवसाय,
रा. व्‍यंकटेश नगर, अंबीका मंगल कार्यालयासमोर
नांदेड जि. नांदेड.                                        अर्जदार
विरुध्‍द
1.   म.रा.वि.म. नांदेड
     मार्फत कार्यकारी अभिंयता, नांदेड.
2.   म.रा.वि. मं. नांदेड
     मार्फत उप कार्यकारी अभिंयता, विसावा               गैरअर्जदार    उद्यान समोर, नांदेड.
3.   म. रा. वि. मं. नांदेड
     मार्फत कनिष्‍ठ अभिंयता, तरोडा युनिट,
     विमानतळ रोड, नांदेड.
 
अर्जदारा तर्फे.           - अड.एम.डी.देशपांडे.
गैरअर्जदार क्र.1 ते 3 तर्फे - अड.विवेक नांदेडकर.
 
निकालपत्र
(द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
 
         गैरअर्जदार म.रा.वि. मं.नांदेड यांच्‍या ञूटीच्‍या सेवे बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे दाखल केली आहे.
 
                     प्रकरणाची हकीकत खालील प्रमाणे, अर्जदार यांनी शेत सर्व्‍हे नंबर 216 मध्‍ये शिवाजी कीशनराव मुळे व विठठल भूजंगराव हंबर्डे  यांनी मिळून बांधलेलया संकूलामध्‍ये एक दूकान नंबर 15 दि.10.01.2002 रोजी विकत घेतले आहे. ग्रामपंचायतीकडे रितसर प्‍लॉटचे हस्‍तांतरण करुन विज कनेक्‍शनसाठी नाहरकत प्रमाणपञ घेतले. गैरअर्जदार यांचेकडे विजेच्‍या मागणीसाठी त्‍यांचे कार्यालयात गेले असता त्‍यांनी अर्ज घेतला नाही व आवश्‍यक कागदपञ दिल्‍यानंतरही अर्ज स्विकारला नाही. म्‍हणून दि.07.02.2007 रोजी रजिस्‍ट्रर पोस्‍टाद्वारे अर्ज पाठवून दिला व कोटेशन देऊन त्‍याप्रमाणे रक्‍कम स्विकारावी म्‍हणून विनंती केली. अर्जदाराने वरील दूकानात दवाखाना सूरु केला आहे. तेथे विज पूरवठा नसल्‍यामूळे त्‍यांना ञास होत आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी संकूलाचे मालक शिवाजी मूळे व विठठल हंबर्डे  यांनी संकूमामध्‍ये एकूण 30 दूकाने असल्‍यामूळे पूर्ण दूकानाचे पैसे भरणा करावेत असे तोंडी सांगितले व नंतर दि.26.11.2008 रोजी गैरअर्जदार यांनी लेखी कळविले आहे. अर्जदाराने त्‍यांना सांगितले की, ते 30 दूकानाचे मालक नाहीत,  त्‍यातील फक्‍त नंबर 15 चे ते मालक आहेत. अर्जदार हे सतत 2003 पासून ते नोव्‍हेंबर 2008 पर्यत  गैरअर्जदारांना समक्ष भेटून सांगत आहे परंतु त्‍यांचा काही उपयोग झाला नाही. अर्जदाराची विनंती आहे की, गैरअर्जदाराने दिलेलया कोटेशन प्रमाणे रक्‍कम भरुन घेऊन त्‍यांना विज पूरवठा देण्‍यात यावा. झालेल्‍या मानसिक ञासाबददल रु.25,000/- मिळावेत म्‍हणून विनंती केली आहे.
 
              गैरअर्जदार क्र. 1 ते 3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराचा अर्ज हा वस्‍तूस्थितीनुसार कायदयाने त्‍यांचे विरुध्‍द चालू शकत नाही. अर्जदारास कोणतेही विज जोडणी देण्‍यात आलेली नाही. विज देण्‍या बाबतचा त्‍यांचा अर्ज प्रलंबित नाही. त्‍यामूळे अर्जदाराशी त्‍यांचा कोणताही करार झालेला नाही. सबब अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक नाहीत त्‍यामूळे ग्राहक संरक्षण कायदा,1986 मधील कलम 2(1)(ड)  नुसार हे प्रकरण दाखल करण्‍याचा त्‍यांना अधिकार नाही. शिवाय त्‍यांची मागणी ही व्‍यावसायीक उपयोगा बाबतची आहे म्‍हणून प्रयकरण खारीज करावे. अर्जदार हे एक बहूमजली व्‍यापारी संकूलात विजेची जोडणी मागणीचा अर्ज करीत आहे. ज्‍या व्‍यक्‍तीकडून अर्जदाराने सदर दूकान संकूलात खरेदी केलेले आहे. त्‍यांनी स्‍वतः विजेच्‍या जोडणीसाठी आवश्‍यक ते रोहीञ व इतर बाबीची सोय करावयास हवी होती. अशा प्रकारची सोय न करता फक्‍त एका दूकानासाठी विज जोडणी देता येत नाही. त्‍यामूळे अर्जदाराचा अर्ज खारीज करण्‍यात आला होता. त्‍या बाबतची सूचना अर्जदार यांना देण्‍यात आलेली होती. गैरअर्जदारांचा दूसरा आक्षेप असा आहे की, अर्ज हा मूदतबाहय झालेला आहे. 2003 मध्‍ये वादाचे कारण उदभवले. आजमितीस महाराष्‍ट्र राज्‍य विज मंडळ ही केवळ होल्‍डींग कंपनी असून विज वितरण करणारी कंपनी महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित आहे परंतु त्‍यांचे विरुध्‍द अर्जदाराने प्रकरण दाखल केलेले नाही. अर्जदाराने आपल्‍या तक्रारी अर्जामध्‍ये काही म्‍हणणे मांडले आहे. ती खोटी असून गैरअर्जदारांना मान्‍य नाही. अर्जदाराने दि.07.02.2007 रोजी रजिस्‍ट्रर पोस्‍टाने नोटीस पाठविली हे त्‍यांचे म्‍हणणे चूकीचे आहे. संकूलामध्‍ये 30 दूकाने असल्‍याकारणाने सर्व संकूलाची एकच फाईल तयार करावी. त्‍या करिता आवश्‍यक ते रोहीञ वगैरेची सर्व जबाबदारी पूर्ण करण्‍यासाठी गैरअर्जदार क्र.3 यांनी दिलेले पञ बरोबर आहे. त्‍यामूळे संकूलामध्‍ये जेव्‍हा एक जरी दूकान असले तरी पूर्ण संकूलासाठी रोहीञ उभारणी केल्‍याशिवाय त्‍यांला विज पूरवठा केला जाऊ शकत नाही. अर्जदाराने त्‍यांना मानसिक ञास झाल्‍या बाबतची मागणी चूकीची आहे. संकूलासाठी आवश्‍यक ती लाईन टाकणे व रोहीञ बसविण्‍यासाठी जागा उपलब्‍ध करुन देणे व यानंतर मागणीप्रमाणे रक्‍कम भरणे अशा सर्व बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे. म्‍हणून गैरअर्जदार यांची मागणी आहे की, अर्जदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा.
 
अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
          मूददे                               उत्‍तर
   1.   अर्जदार हे ग्राहक आहेत काय ?                 नाही.
   2.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द             नाही.
होते काय ?                      
 3. काय आदेश ?                         अंतिम आदेशाप्रमाणे
 
                          कारणे
मूददा क्र.1 व 2  ः-
 
              अर्जदार यांनी संकूलामध्‍ये दूकान नंबर 15 खरेदी केल्‍या बाबतचे खरेदी खत दाखल केलेले आहे. ते दि.30.01.2002 चे आहे.यानंतर जवळपास सहा वर्षानी अर्जदारांना विजेची गरज भासली म्‍हणून त्‍यांनी ऐवन फॉर्म दि.10.06.2006 रोजी भरुन गैरअर्जदारांकडे विजेची मागणी केलेली आहे व यावर दि.21.02.2006 रोजी ग्रामपंचायत वाडी यांचे नाहरकत प्रमाणपञ घेतले आहे. असे असताना गैरअर्जदार यांचेकडे ऐवन फॉर्म व आवश्‍यक ते कागदपञ दाखल केली या बाबतचा पूरावा अर्जदाराने दाखल केलेला नाही. परंतु दि.8.9.2008 रोजी अर्जदाराने गैरअर्जदारांना एक पञ लिहून व विजेची मागणी केली. यात दि.06.11.2007 रोजी गैरअर्जदार कनिष्‍ठ अभिंयता यांना पञ लिहून आपल्‍या संकूलाचा सर्व्‍हे केला आहे व यात 15 दूकाने खाली व वरच्‍या मजल्‍यावर 15 दूकाने आहेत. यावर संकूलाचे लेआऊट व विज पूरवठा करण्‍याची तीन प्रतीमध्‍ये फाईल विभागीय कार्यालयामध्‍ये देणे व त्‍यानुसार कोटेशन तयार करण्‍यात येईल असे सांगितले आहे. दि.24.11.2008 ला यांचे उत्‍तरही दिलेले आहे. यानंतर दि.27.11.2008 रोजी गैरअर्जदार यांना कायदेशीर नोटीस दिलेली आहे. असा पञव्‍यवहार व नोटीस या प्रकरणात दाखल आहे. गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणण्‍यातील परिच्‍छेद नंबर 7 एका बहूमजली संकूलात विजेची मागणी करण्‍यात आलेली आहे यासाठी आवश्‍यक ते रोहीञ व इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर उभारण्‍यासाठी 10   10   ची जागा दिली पाहिजे. 30 दूकानासाठी पूर्ण एसएलसी भरावयाचे असतात व हे काम पूर्ण केल्‍याशीवाय फक्‍त एक दूकानास अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार विज पूरवठा करता येत नाही.   स्‍वतंञ रोहीञ उभारणी करण्‍यासाठी आवश्‍यक ती लाईन टाकणे एकञित मिटर बसविण्‍यासाठी जागा उपलब्‍ध करुन देणे त्‍यासाठी आवश्‍यक तो अर्ज करणे. नियमानुसार सर्व गोष्‍टी करणे गरजेचे आहे व यासाठी बिल्‍डरचे नाहरकत प्रमाणपञची आवश्‍यकता आहे. हे सर्व बिल्‍डरकडून पूर्णत्‍वास नेल्‍या जाते. एका दूकानासाठी विज पूरवठा केल्‍या जाऊ शकत नाही. एकंदर हे सर्व पाहिले असता गैरअर्जदार कंपनीस अर्जदार यांच्‍या विज मागणी अर्ज ऐवन फॉर्म व त्‍यासंबंधी संकूलाचे इतर कागदपञ अजूनही जोडलेले नाहीत व गैरअर्जदारांनी कोटेशन ही दिलेले नाही. अशा परिस्थितीत अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहकच होऊ शकत नाहीत. त्‍यामूळे ग्राहक संरक्षण कायदा,1986 मधील कलम 2(1)(ड)  नुसार ग्राहक होऊ शकत नाहीत.
 
              विज मागणीसाठी मूख्‍यतः बिल्‍डर हा आवश्‍यक पार्टी आहे. एकंदर बाबी वरुन असे वाटते की, बिल्‍डरने 30 दूकाने विकल्‍यानंतर त्‍यांला विज पूरवठा करुन देण्‍याची जबाबदारी ही बिल्‍डरची आहे. संकूलाच्‍या उपलब्‍ध जागेमधून रोहीञ व विज पूरवठयासाठी लागणारे इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर व तसेच मिटर बसविण्‍यासाठी जागा देण्‍याची जबाबदारी ही बिल्‍डरची आहे. त्‍यामूळे या प्रकरणात बिल्‍डरला पार्टी करणे आवश्‍यक होते. अर्जदाराने या प्रकरणात बिल्‍डरला पार्टी केलेले नाही. गैरअर्जदार कंपनीने CE (District) –III/Circular/22197 Date 20.05.2008  दाखल केलेले आहे. यात सिरीयल नंबर 1 मध्‍ये  While releasing load in complex/s and where DTC is required to be established in that complex, the provision for land to accommodate DTC shall be made available by the developers from the space earmarked for amenities and public utilities be made available to MSEDCL on non chargeable basis by developer/ owners.  असे म्‍हटलेले आहे. अर्जदाराने बिल्‍डरला सोबत घेऊनच विज पूरवठयाची मागणी केलेली पाहिजे म्‍हणजे आवश्‍यक त्‍या बाबी पूर्ण केल्‍या जाऊ शकतील. अर्जदर या प्रकरणात ग्राहकच झालेला नाही व त्‍यामूळे त्‍यांना ग्राहक मंचामध्‍ये तक्रार करता येणार नाही व याशिवाय भविष्‍यात ग्राहक होण्‍यासाठी लागणारे सर्व कागदपञ व प्रोसीजर पूर्ण केले गेलेले नाही. म्‍हणून सरळ विज कंपनीस विज पूरवठाची मागणी त्‍यांना करता येणार नाही. याशिवाय अर्जदाराने गैरअर्जदाराकडून महाराष्‍ट्र राज्‍य विज मंडळ नांदेड असा उल्‍लेख केलेला आहे. विज पूरवठा करणारी कंपनी ही महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित अशा नांवाने आहे तेव्‍हा त्‍यांचे कायदेशीर नांवानेच गैरअर्जदार म्‍हणून त्‍यांचा उल्‍लेख केला गेला पाहिजे.
 
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                        आदेश
1.                                         अर्जदाराची तक्रार फेटाळण्‍यात येते.
 
2.                                         पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
 
3.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे,पाटील)       (श्रीमती.सुजाता पाटणकर)      (सतीश सामते)    
           अध्यक्ष.                                सदस्या                   सदस्‍य
 
 
 
 
 
जे.यु, पारवेकर
लघुलेखक.