::: आ दे श :::
( पारित दिनांक : २३/०२/२०१५ )
आदरणीय अध्यक्षा, मा.सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
१. विरुध्द पक्ष क्र.२ यांनी दाखल केलेला अर्ज निशानी १० यावरील आदेश दि.२३.०२.२०१५
विरुध्दपक्ष क्र.२ यांनी दाखल केलेला अर्ज वाचला व त्यावरील तक्रारकर्तेयांचे निवेदन वाचले.
२. तक्रारकर्ते यांनी ही तक्रार त्यांचे ऑगष्ट २०१४ चे विद्युत देयक ज्यावर विज कायदा २००३ कलम १३५ अन्वये विज चोरीचे देयक असे नमूद आहे ते रध्द करावे यासाठी ही तक्रार दाखल केली. तक्रारकर्त्याचे कथनही तसेच आहे कि, भरारी पथक वाशिम यांनी दि. २७.०८.२०१४ रोजी तक्रारकर्ते यांच्या विद्युतमीटरची तपासणी केली व त्या नंतर हे वरील विज देयक दिले. तक्रारकर्ते यांचे मते विरुध्दपक्षाने त्यांना खोटया विज चोरीच्या प्रकरणात अडकविले परंतू तक्रारीतील सदर देयकाचा वाद हा विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ अंतर्गत येतो त्यामूळे मा.सर्वोच्य न्यायालय यांच्या यु.पी.पॉवर कॉर्पोरेशन X अनिस अहमद निकाल तारीख १ जुलै २०१३ च्या निर्देशानुसार विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ अंतर्गत निर्गमीत केलेल्या देयकाचा वाद हा ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतुदी अंतर्गत मंचात चालु शकत नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.२ यांचा निशानी क्र.१० तक्रार खारीज करण्याबाबतचा अर्ज मंजुर करण्यात येतो.
या प्रकरणात मंचाचे अध्यक्षांचा कार्यकाल हा अकोला येथे असतांना हे प्रकरण वाशिम येथे दाखल झाले व हयात ईतर आदेश पारीत झालेले आहेत.
सबब खालील प्रमाणे आदेश पारीत केला.
अंतिम आदेश
१. तक्रारकर्ते यांची तक्रार अधिकार क्षेत्राअभावी खारीज करण्यात येते.
२. न्यायीक खर्चा बद्दल कोणतेही आदेश पारीत नाही.
३. उभयपक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
मा.सौ.एस.एम.उंटवाले,
अध्यक्षा
मा.श्री.ए.सी.उकळकर, मा.श्रीमती.जे.जी.खांडेभराड,
सदस्य सदस्या
दि. २३.०२.२०१५
स्टेनो/गंगाखेडे