जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/25. प्रकरण दाखल तारीख - 27/01/2010 प्रकरण निकाल तारीख – 31/05/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. सौ. कमल अशोकराव मोरे वय 44 वर्षे, धंदा व्यापार अर्जदार रा.सर्व्हे नंबर 220/सी, वाडी(बु.) ता. जि. नांदेड विरुध्द. 1. अधीक्षक अभिंयता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. विद्युत भवन, हिंगोली गेट, नांदेड. गैरअर्जदार 2. कार्यकारी अभिंयता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. नांदेड ता.जि.नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एन.एल.कागंणे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सूवर्णा देशमूख, सदस्या) गैरअर्जदार विज वितरण कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोंडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हे प्रतिष्ठीत नागरी असून ते गैरअर्जदार यांचे कायदेशीर ग्राहक आहेत. अर्जदाराने सूरु केलेला लघूउद्योग मे.साई आनंद आईस फॅक्टरी या नांवाने चालवित असून सदरील घेतलेले विज कनेक्शन हे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वापरण्यात येत असल्यामूळे अर्जदाराने हा अर्ज दाखल केलेला आहे. दि.12.3.2008 रोजी सर्व्हे नंबर 220/सी/वाडी ता.जि. नादेंड यातील औद्योगिक परिसरात अर्जदाराने विज जोडणी घेतलेली होती.ती विज जोडणी मिळण्यासाठी अर्जदाराने 2007 मध्ये अर्ज दाखल केला होता. त्याप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास विज जोडणी दिलेली होती. दि.27.12.2007 रोजी SE/NDC/TS/ESTIMATE/NO. 7056 नूसार विज जोडणी करता मंजूरी दिलेली होती. सदरील अर्जदाराच्या अर्ज मागण्यावरुन विजेचे उपकरणाचे उभारणे (Infrastructure) होणा-या खर्चाची रक्कम रु.2,92,7062- एवढया रक्कमेला मंजूरी देण्यात आली होती.अर्जदारास सदर रककम एस.एल.सी.या सदराखाली मागणी करण्यात आली होती. सदरचे इस्टीमेंट कॉस्टची रककम अर्जदाराने राखी इलेक्ट्रीकल यांचेकडून पायाभूत विज उभारणी व विकासासाठी वेळोवेळी खर्च केलेली आहे व त्यानंतर कनेक्शन चालू झालेले होते. त्यासोबत Quotation/Demand Note देण्यात आली.तांञिक मसूदा मंजूर करण्यात आल्यामूळे अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी भरलेली रक्कम रु.2,92,706/- ही विजेच्या मूलभूत उभारणी साठी दिलेली रक्कम असून ही रक्कम पूढील येणा-या विज बिलामधून नियमितरित्या वजावट व समायोजित करुन अर्जदाराला विज बिल देणे बंधनकारक होते परंतु सदरची रक्कम आजपर्यत विज बिलामध्ये समायोजित करुन वगळलेली नाही. दि.14.7.2008 रोजी अर्जदाराने सदरची रक्कम बिलातून वळती करुन देण्यात यावी अशा प्रकारचा अर्ज गैरअर्जदार यांना दिला आहे तरी आजपर्यत गैरअर्जदार यांनी सदरील रक्कम बिलामधून वळती केलेली नाही. ही सेवेतील ञूटी आहे म्हणून अर्जदाराने सदररचा अर्ज मंचासमोर दाखल केला. म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, सदरची रक्कम गैरअर्जदार यांनी अर्जदारास परत करावी व त्यावर मानसिक व शारीरिक ञासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रार दाखल करण्यापोटी रु.10,000/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास दयावेत अशा प्रकारची मागणी अर्जदाराने केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.त्याचे म्हणण्याप्रमाणे विज वितरण कंपनीच्या अधिका-यां विरुध्द त्यांचे वैयक्तीक पदनामाने सदरील तक्रार दाखल केली आहे परंतु ती विज कायदा 2003 च्या कलम 168 अन्वये दाखल करता येत नसल्यामूळे अर्जदाराने दाखल केलेली तक्रार खारीज करण्यात यावी. तसेच अर्जदाराने ज्या कारणासाठी विज पूरवठा घेतला आहे ते कारण व्यावसायीक असून विजेचा वापर व्यवसायासाठी करण्यात येत असल्यामूळे अर्जदाराला ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 2(1)(ड) नुसार ग्राहक म्हणून प्रकरण चालविता येणार नाही.जी व्यक्ती विज वापरते त्यांना त्यांचे विज बिल भरावेच लागते. अर्जदाराने जी रक्कम रु.2,92,706/- खर्च दाखवलेला आहे. ती रक्कम गैरअर्जदार यांचेकडे भरणा केलेली नाही. ती रक्कम अर्जदारांना फक्त स्वतःच्या विज वापरासाठी ( Dedicated Diostributon Facility) म्हणून 63 के.व्ही.ए. क्षमतेचा विद्यूत जनिञ उभारणीसाठी लागणा-या खर्चाचे अंदाजपञक आहे.विज वितरण कंपनीच्या दि.19.06.2008 रोजीच्या सर्कूलर क्र.25680 नुसार डि.डि. एफ. स्किममधील अशा प्रकारच्या उभारणीसाठी आवश्यक असणारा सर्व खर्च ग्राहकाने करावयाचा असतो व त्यांची परतफेड किंवा समायोजन करण्याची जबाबदारी विज वितरण कंपनीवर नसते.या परिपञकातील अट क्र.16 नुसार ही संपूर्ण रक्कम विज वितरण कंपनी ग्राहकाला खर्च करावयास सांगू शकते किंवा वसूल करु शकते. विज वितरण कंपनीला सदरील इस्टीमेंट कॉस्टच्या 1.3 टक्के इतकी रक्कम कामाची देखभाल,सूपरविजन प्रित्यर्थ अर्जदाराने रु.37,218/- भरलेले आहेत. रु.3668/- व कोटेशन फिस एवढीच रक्कम गैरअर्जदार यांनी भरली आहे. अर्जदाराने ही रक्कम गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे मार्गदर्शना खाली विकासासाठी ही रककम खर्च केली. रु.2,92,706/- ही रककम अर्जदाराने राखी इलेक्ट्रीकल यांचेकडे विज उभारणीसाठी दिलेली आहे व ती विज उभारणी व विकासासाठी खर्च केलेला आहे. प्रकरणामध्ये राखी इलेक्ट्रीकल यांना समाविष्ट केलेले नाही. दि.14.7.2008 रोजी अर्जदाराने दिलेला अर्ज गैरअर्जदाराने अमान्य केलेला आहे. अशा प्रकारची कोणतीही मागणी मागण्याचा अर्जदारास अधिकार नाही. म्हणून अर्जदाराचा तक्रार अर्ज कॉस्ट सहीत खारीज करण्यात यावा अशी मागणी केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञे पाहता खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तरे 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना ञूटीची सेवा दिली हे अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत या संदर्भात अर्जदार यांनी कायदेशीररित्या घेतलेले विज जोडणी यांचा ग्राहक क्र.550011123716 दिलेला असून त्याबददलचा पूरावा ही दाखल केलेला आहे म्हणून अर्जदार हे ग्राहक आहेत. या मूददयाचे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र.2 ः- अर्जदाराने सूरु केलेला लघूउद्योग मे.साई आनंद आईस फॅक्टरी या नांवाने चालवित असून सदरील घेतलेले विज कनेक्शन हे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वापरण्यात येत असल्यामूळे अर्जदाराने हा अर्ज दाखल केलेला आहे. दि.12.3.2008 रोजी सर्व्हे नंबर 220/सी/वाडी ता.जि. नादेंड येथील औद्योगिक परिसरात अर्जदाराने विज जोडणी घेतलेली होती.ती विज जोडणी मिळण्यासाठी अर्जदाराने 2007 मध्ये अर्ज दाखल केला होता. त्याप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास विज जोडणी दिलेली होती. दि.27.1.2.2007 रोजी SE/NDC/TS/ESTIMATE/NO. 7056 नूसार विज जोडणी करता मंजूरी दिलेली होती. सदरील अर्जदाराच्या अर्ज मागण्यावरुन विजेचे उपकरणाचे उभारणे (Infrastructure) होणा-या खर्चाची रक्कम रु.2,92,7062- एवढया रक्कमेला मंजूरी देण्यात आली होती. सदरचे इस्टीमेंट कॉस्टची रककम अर्जदाराने राखी इलेक्ट्रीकल यांचेकडून पायाभूत विज उभारणी व विकासासाठी वेळोवेळी खर्च केलेली आहे व त्यानंतर कनेक्शन चालू झालेले होते. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी भरलेली रक्कम रु.2,92,706/- ही विजेच्या मूलभूत उभारणी साठी दिलेली रक्कम असून ही रक्कम पूढील येणा-या विज बिलामधून नियमितरित्या वजावट व समायोजित करुन अर्जदाराला विज बिल देणे बंधनकारक होते परंतु सदरची रक्कम आजपर्यत विज बिलामध्ये समायोजित करुन वगळलेली नाही. दि.14.7.2008 रोजी अर्जदाराने सदरची रक्कम बिलातून वळती करुन देण्यात यावी अशा प्रकारचा अर्ज गैरअर्जदार यांना दिला आहे तरी आजपर्यत गैरअर्जदार यांनी सदरील रक्कम बिलामधून वळती केलेली नाही. ही सेवेतील ञूटी आहे म्हणून अर्जदाराने सदररचा अर्ज मंचासमोर दाखल केला. म्हणून सदरची रक्कम गैरअर्जदार यांनी अर्जदारास परत करावी व त्यावर मानसिक व शारीरिक ञासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रार दाखल करण्यापोटी रु.10,000/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास दयावेत अशा प्रकारची मागणी अर्जदाराने केली आहे. गैरअर्जदार हजर झाले व त्यांनी आपले लेखी जवाब दाखल केला आहे.त्याचे म्हणण्याप्रमाणे विज वितरण कंपनीच्या अधिका-यांना त्यांचे वैयक्तीक पदनामाने सदरील तक्रार दाखल केली आहे. ती तशा प्रकारे दाखल करता येत नसल्यामूळे अर्जदाराने दाखल केलेली तक्रार खारीज करण्यात यावी. तसेच अर्जदाराने ज्या कारणासाठी विज पूरवठा घेतला आहे ते कारण व्यावसायीक असून विजेचा वापर व्यवसायासाठी करण्यात येत असल्यामूळे अर्जदाराला ग्राहक म्हणून प्रकरण चालविता येणार नाही. अर्जदाराने जी रक्कम रु.2,92,706/- खर्च दाखवलेला आहे. ती रक्कम गैरअरर्जदार यांचेकडे भरणा केलेली नाही. विज वितरण कंपनीला सदरील इस्टीमेंट कॉस्टच्या 1.3 टक्के इतकी रक्कम कामाची देखभाल,सूपरविजन प्रित्यर्थ अर्जदाराने रु.37,218/- भरलेले आहेत. रु.3668/- व कोटेशन फिस एवढीच रक्कम गैरअर्जदार यांनी भरली आहे. अर्जदाराने ही रक्कम गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे मार्गदर्शना खाली विकासासाठी ही रककम खर्च केली. रु.2,92,706/- ही रककम अर्जदाराने राखी इलेक्ट्रीकल यांचेकडे विज उभारणीसाठी दिलेली आहे व ती विज उभारणी व विकासासाठी खर्च केलेला आहे. प्रकरणामध्ये राखी इलेक्ट्रीकल यांना समाविष्ट केलेले नाही. दि.14.7.2008 रोजी अर्जदाराने दिलेला अर्ज गैरअर्जदाराने अमान्य केलेला आहे. अशा प्रकारची कोणतीही मागणी मागण्याचा अर्जदारास अधिकार नाही. म्हणून अर्जदाराचा तक्रार अर्ज कॉस्ट सहीत खारीज करण्यात यावा अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार यांनी दि.20.5.2008 व दि.19.6.2008 रोजीचे दोन सर्कूलर दाखल केलेले आहेत. ज्यामध्ये गाईडलाईनस दिलेल्या आहेत. ज्यामध्ये स्पष्टपणे लिहीलेले आहे की, b) If the consumer/group of consumers wants early connections and opts to execute the work and bears the cost of infrastructure then the refund of the cost of infrastruacture will be given by way of adjustment through energy bills. अर्जदाराने दिलेले दि.14.7.2008 रोजीचा अर्ज पाहता आजपर्यत अर्जदाराच्या बिलातून सदरील इस्टीमेंट कॉस्टची रक्कम वळती करुन घेण्यात आलेली नाही हे सिध्द होते. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या बिलातून इस्टीमेंट कॉस्ट रक्कम रु.2,92,706/- बिलात समायोजित करावी या निर्णयावर हे मंच आलेले आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या सर्कूलर प्रमाणे अर्जदाराच्या बिलातून इस्टीमेंट कॉस्टची रककम समायोजित करावी असे स्पष्ट लिहीलेले आहे. म्हणून गैरअर्जदार यांनी दि.12.4.2008 पासून आजपर्यत रु.2,92,706/- वर 9 टक्के व्याज दराने झालेली रक्कम ही बिलातून समायोजित करावी. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या बिलातून रु.2,92,706/- ही रक्कम समायोजित करावी. 3. दि.12.4.2008 पासून ते आजपर्यत रु.2,92,706/- वर 9 टक्के व्याजाने होणारी रक्कम पूढील बिलात समायोजित करावी. 4. उभयपक्षांनी आपआपला खर्च सहन करावा. 5. उभय पक्षकारांना नीर्णय कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक |