जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/263. प्रकरण दाखल तारीख - 04/12/2009 प्रकरण निकाल तारीख – 31/05/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. शिवाजी पि. गुंडप्पा मठपती वय 45 वर्षे, धंदा मजूरी अर्जदार रा.विष्णू नगर, घर नंबर 1-24-478, ता. जि. नांदेड विरुध्द. 1. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. साठे चौक, नांदेड. 2. सहायक कार्यकारी अभिंयता, 2.महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. गैरअर्जदार औद्योगिक वसाहत, शिवाजी नगर, 2.नांदेड. 3. सुर्यकांत पि. रामराव गायकवाड 3.रा.श्रीनगर, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड. नंदगिरी. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर. गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील - अड.सुनिल पाष्टेकर. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सूवर्णा देशमूख, सदस्या) गैरअर्जदार विज वितरण कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हे घर नंबर 1-24-478 विष्णू नगर नांदेड येथील रहीवासी असून अर्जदाराने सदरचे घर कमलाबाई जगन्नाथ सोमानी यांचेकडून दि.16.12.2005 रोजी नोंरणीकृत खरेदी खताच्या आधारे खरेदी केलेले आहे. खरेदी खत क्र.6489 असे असून सदरील घर कमलाबाई सोमानी यांनी अर्जदार यांचे नांवाने करुन दिलेले आहे. सदरील घरामध्ये अर्जदार त्यांच्या परिवारासोबत व त्यांची म्हातारी आई वडील व लहान मूलासोबत राहत असून तो कायदेशीर मालक आहे.घराचे खरेदी खत करुन देते वेळेस कमल यांनी घराचा ताबा अर्जदारास विज जोडणीसह दिलेला होता व तेव्हापासून अर्जदार नियमीत विज भरणा करीत आहेत. सदरील मिटर आजही कमलबाई हीचे नांवाने असून त्यांचा मिटर नंबर 02844124 व ग्राहक क्र.55001028803 असा आहे. सदरील मिटरचा अर्जदार उपभोग घेत असताना अचानक एका तिस-या व्यक्तीने त्यांचा मालकी ताबा नसल्याने त्यांने गैरअर्जदार यांचेकडे विज खंडीत करण्याचा अर्ज दिला व त्यामूळे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे प्रतिनीधी अर्जदाराच्या घरी विज पूरवठा खंडीत करण्याकरिता आले म्हणून अर्जदाराने सदरचा अर्ज मंचाकडे दाखल केला. विज पूरवठा खंडीत केला नाही तर अर्जदार व त्यांचे परिवाराला शांततामय वातावरणात जीवन जगता येईल व नैसर्गीक न्यायाच्या दृष्टीने व कायदयाच्या दृष्टोकोनातून योग्य असे आहे. दि.26.11.2009 रोजी गैरअर्जदार यांचे प्रतिनीधी अर्जदाराच्या घरी विज पूरवठा खंडीत करण्याकरिता आलेले होते पण अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे अर्ज देऊन विज पूरवठा खंडीत करण्यात येऊ नये म्हणून विनंती केली. पण गैरअर्जदार यांनी तसा आदेश कोर्टाकडून घेऊन या असे सांगून नीघून गेले. अर्जदार हे नियमितपणे विज बिलाचा भरणा करीत असून तरी गैरअर्जदार क्र.1 व 2 हे तिस-या व्यक्तीचे सांगणेवरुन अर्जदाराचा विज पूरवठा खंडीत करण्याकरिता आलेले आहेत तो विज पूरवठा खंडीत करु नये म्हणून अर्जदाराने मनाई हूकूम मिळण्यासाठी अर्ज केला. अर्जदाराने त्यांने कायदेशीररित्या खरेदी खताचे कागदपञ व रजिस्ट्रीची कॉपी दि.16.12.2005 रोजी खरेदी केलेल्या जागेची रजिस्ट्रीची कॉपी मंचासमोर दाखल केलेली आहे.तसेच विज बिलाच्या प्रती मंचापूढे दाखल केलेल्या आहेत. गैरअर्जदार क्र.3 यांनी देखील त्यांचे नांवे असलेले सदरील जागेचे रजिस्ट्री कॉपी दाखल केलेली आहे. जे की, दि.23.10.2009रोजीची आहे. जे त्यांनी बापू नरहारे यांचेकडून खरेदी केलेले होते. दि.4.7.2005 रोजीच्या जनरल पॉवर ऑफ अटोरनीं चे एक पञ तूळजाबाई सांगू यांचे नांवाचे तक्रारीमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. त्यामूळे अर्जदाराने ही तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, सदरील घर हे अर्जदाराच्या मालकीचे व ताब्याचे आहे व ते गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत त्यामूळे त्यांचा विज पूरवठा खंडीत न करण्याचा चिरकालीन मनाई हूकूम अर्जदाराचे हक्कात दयावा. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांना वैयक्तीक पदनामाने तक्रार दाखल करता येणार नाही. विज कायदा 2003 च्या कलम 168 अन्वये विज वितरण कंपनीच्या अधिका-याच्या विरुध्द वैयक्तीकरित्या कोणतेही प्रकरण दाखल करता येणार नाही. सदर प्रकरणामध्ये अर्जदाराचा प्रतिवादी यांचेशी ग्राहक आणि सेवा पूरवीणारी व्यक्ती असा कोणताही संबंध नाही.विज जोडणी ही कमलाबाई सोमानी हिचे नांवाने व त्यांच गैरअर्जदार यांच्या ग्राहक आहेत. अर्जदाराने सदरील घर विकत घेतले व त्यांची मालकी व ताबा उपभोगत आहेत ही बाब अर्जदार यांनी सिध्द करावयाची आहे. अर्जदाराने दाखल केलेले दि.167.12.2005 रोजीचे विक्रीपञ हे एका प्लॉटचे विक्रीपञ असून त्या संपूर्ण विक्रीपञामध्ये कोठेही घर असल्या बाबतचा उल्लेख नाही. ति-हाईत व्यक्तीच्या म्हणण्यावर गैरअर्जदार क्र.1 व 2 हे अर्जदाराचा विज पूरवठा खंडीत करण्यास आले होते हे म्हणणे खोटे आहे. दि.26.11.2009 व दि.27.11,2009 रोजी गैरअर्जदार क्र.1 व 2 हे अर्जदाराच्या घरी विज पूरवठा खंडीत करण्यासाठी आले होते हे म्हण्णे खोटे व चूकीचे आहे. अर्जदार हे नांदेडचे रहीवाशी आहेत ही बाब अर्जदाराने स्वतः सिध्द करावयाची आहे.अर्जदाराचा स्वतःसह ग्राहक म्हणवून धेण्याचा अटटाहास दूर्देवी आणि परिस्थितीशी विसंगत असा आहे. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक नसल्याकारणाने त्यांनी केलेली मागणी मंजूर करण्याचा कोणताही अधिकार नाही. गैरअर्जदार क्र.3 यांनी देखील सवतः मालक असल्यांचे सांगितले आहे त्यामूळे हा वाद सक्षम दिवाणी न्यायालय सोडवू शकते. त्यांचे म्हणण्याप्रमाणे अर्जदार हे आमचे ग्राहक नाहीत. त्यामूळे त्यांना ञूटीची सेवा दिली असे म्हणण्याचा अधिकार नाही. उलट पक्षी अर्जदाराचा अर्ज रु.10,000/- कॉस्ट सहीत खारीज करण्यात यावा अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र.3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराने दिलेली माहीती ही संपूर्णतः फसवी व खोटी आहे व ती गैरअर्जदार क्र.3 यांना अमान्य आहे. गैरअर्जदार क्र.3 हाच प्रॉपर्टीचा मालक असून उपभोग घेण्याचा अधिकार त्यांलाच आहे असे म्हटले आहे. म्हणून त्यांनी बिलाची रक्कम स्वतः भरुन विज पूरवठा खंडीत करण्याचा अर्ज दिला. गैरअर्जदार क्र.3 यांनी सदर मालमत्ता बापू पि. लिंबाजी नरहरे यांचेकडून तसेच श्रीमती कमलबाई भ्र. जगन्नाथ सोमानी यांचे संमतीने रजिस्ट्रर्ड दस्त क्र.8229/2009अन्वये खरेदी घेतले आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी सदर मालमत्ता ही विकत घेण्यापूर्वी बापू लिंबाजी नरहरे यांनी श्रीमती कमलाबाई जगन्नाथ सोमानी यांचे मार्फत मूख्यारआम म्हणून तूळसाबाई जयनारायण साबू यांचेकडून दस्त क्र.857/2005 अन्वये खरेदी त्यांचे नांवे महानगरपालीकेत नोंद देखील होती.अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिलेला अर्ज देण्याचा कूठलाही अधिकार अर्जदारास नाही. तसेच मनाई हूकूम मागण्याचा कूठलाही अधिकार अर्जदारास नाही. गैरअर्जदार क्र.3 यांनी विज बिलाची थकबाकी स्वतः भरुन विज पूरवठा खंडीत करण्याचा अर्ज देऊन सदर मिटर पी.डी.करण्याचा अर्ज दिला आहे. सदर मिटर हे फॉल्टी असल्यामूळे गैरअर्जदार क्र.3 यांस अवास्तव बिल भरणा करण्याची पाळी येऊ नये म्हणून गैरअर्जदार क्र.3 यांने गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे अर्ज दिला आहे. गैरअर्जदार क्र.3 यांने सदर मालमत्ता बापू लिंबाजी नरहरे यांचेकडून तसेच श्रीमती कमलाबाई सोमानी यांचे संमतीने रु.2,13,000/- विक्रीत किंमत देऊन रजिस्ट्रर्ड दस्त क्र.8229/2009 दि.23.10.2009 अन्वये खरेदी केले आहे. गैरअर्जदार क्र.3 यांचे नांवे मालमत्ता पञकामध्ये भागधारक नोंद क्र.7089 अन्वये ता.नि.भू.अ. कार्यालयात नोंद देखील झालेली आहे व तसेच गैरअर्जदार क्र.3 यांचे नांवे मालमत्ता पञक व पी.आर. कार्ड मध्ये नोंद झाली आहे. म्हणून अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा व रु.10,000/- नूकसान भरपाई दयावी असे म्हटले आहे. अर्जदार व गेरअर्जदार यांचे कागदपञ पाहता खालील प्रमाणे मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय व गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना ञूटीची सेवा दिली हे अर्जदार सिध्द करतात काय 2. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार हे घर नंबर 1-24-478 विष्णू नगर नांदेड येथील रहीवासी असून अर्जदाराने सदरचे घर कमलाबाई जगन्नाथ सोमानी यांचेकडून दि.16.12.2005 रोजी नोंदणीकृत खरेदी खताच्या आधारे खरेदी केलेले आहे. खरेदी खत क्र.1689 असे असून सदरील घर कमलाबाई सोमानी यांनी अर्जदार यांचे नांवाने करुन दिलेले आहे. सदरील घर अर्जदार व त्यांचे परिवारासहीत राहत असून तो कायदेशीर मालक आहे.घराचे खरेदी खत करुन देते वेळेस कमल यांनी घराचा ताबा अर्जदारास विज जोडणीसह दिलेला होता व तेव्हापासून अर्जदार नियमीत विज भरणा करीत आहेत. विजेचा उपभोग घेत आहेत. सदरील मिटर आजही कमलबाई हीचे नांवाने असून त्यांचा मिटर नंबर 02844124 व ग्राहक क्र.55001028803 असा आहे. सदरील मिटरचा अर्जदार उपभोग घेत असताना अचानक एका तिस-या व्यक्तीने त्यांचा मालकी ताबा नसल्याने त्यांने गैरअर्जदार यांचेकडे विज खंडीत करण्याचा अर्ज दिला व त्यामूळे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे प्रतिनीधी अर्जदाराच्या घरी विज पूरवठा खंडीत करण्याकरिता आले म्हणून अर्जदाराने सदरचा अर्ज मंचाकडे दाखल केला. दि.26.11.2009 रोजी गैरअर्जदार यांचे प्रतिनीधी अर्जदाराच्या घरी विज पूरवठा खंडीत करण्याकरिता आलेले होते पण अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे अर्ज देऊन विज पूरवठा खंडीत करण्यात येऊ नये म्हणून विनंती केली. पण गैरअर्जदार यांनी तसा आदेश कोर्टाकडून घेऊन या असे सांगून नीघून गेले. अर्जदार हे नियमितपणे विज बिलाचा भरणा करीत असून तरी गैरअर्जदार क्र.1 व 2 हे तिस-या व्यक्तीचे सांगणेवरुन अर्जदाराचा विज पूरवठा खंडीत करण्याकरिता आलेले आहेत तो विज पूरवठा खंडीत करु नये म्हणून अर्जदाराने मनाई हूकूम मिळण्यासाठी अर्ज केला. अर्जदाराने त्यांने कायदेशीररितया खरेदी खताचे कागदपञ व रजिस्ट्रीची कॉपी दि.16.12.2005 रोजी खरेदी केलेल्या जागेची रजिस्ट्रीची कॉपी मंचासमोर दाखल केलेली आहे.तसेच विज बिलाच्या प्रती मंचापूढे दाखल केलेल्या आहेत. गैरअर्जदार क्र.3 यांनी देखील त्यांचे नांवे असलेले सदरील जागेचे रजिस्ट्री कॉपी दाखल केलेली आहे. जे की, दि.23.10.2009रोजीची आहे. जे त्यांनी बापू नरहारे यांचेकडून खरेदी केलेले होते. दि.4.7.2005 रोजीच्या जनरल पॉवर ऑफ अटोरनीं चे एक पञ तूळजाबाई सांगू यांचे नांवाचे तक्रारीमध्ये दाखल करण्यात आलेले असून सदरील जागा बापू नरहारे यांनी सूर्यकांत गायकवाड यांचेकडून कशा आधारे घेतली या बददल कोणताही कागदोपञी पूरावा दाखल केलेला नाही. सदरील जागा ही बापू नरहारे यांचे नांवावर कशी आली हे कोठेही कागदपञामध्ये आढळून आलेले नाही. गैरअर्जदार हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांचे म्हणण्याप्रमाणे अर्जदार हे आमचे ग्राहक नाहीत. त्यामूळे त्यांना कोणतीही ञूटीची सेवा दिली असे म्हणण्याचा अधिकार नाही. उलट पक्षी अर्जदाराकडन रु.10,000/- कॉस्ट सहीत दावा रदद करण्यात यावा अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी देखील लेखी जवाब दाखल केलेला आहे. गैरअर्जदार क्र.3 हाच प्रॉपर्टीचा मालक असून उपभोग घेण्याचा अधिकार त्यांलाच आहे असे म्हटले आहे. म्हणून त्यांनी बिलाची रक्कम स्वतः भरुन विज पूरवठा खंडीत करण्याचा अर्ज दिला. म्हणून अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा व रु.10,000/- नूकसान भरपाई दयावी असे म्हटले आहे. दाखल केलेले सर्व कागदपञे पाहता अर्जदाराने सदरील जागा दि.16.12.2005 रोजी विकत घेतल्या संबंधीची कागदपञे दाखल केलेली आहेत व ही कागदपञे रजिस्ट्री कॉपी सर्वात आधीची असून ती प्रत्यक्ष जागा मालक श्रीमती कमलाबाई जगन्नाथ सोमानी हिने अर्जदारास विकली आहे. त्यानंतर आलेल्या रजिस्ट्री कॉपी व जनरल पॉवर ऑफ अर्टोरनीं ची कॉपी यांचा विचार करणे व प्रत्यक्ष साक्षी पूरावा घेणे मंचाच्या हददीत नसल्यामूळे आजघडीस जागेचे मालक हे शिवाजी गुंडप्पा मठपती हे आहेत या नीर्णयावर हे मंच आलेले आहे. आजपर्यत अर्जदाराने गैरअर्जदार यांची सर्व बिले वेळोवेळी भरलेली आहेत. त्यांची कोणतीही थकबाकी नसल्यामूळे गैरअर्जदार क्र.1 व 2 हे अर्जदाराचा विज पूरवठा खंडीत करु शकत नाहीत. गैरअर्जदार क्र.3 यांना काही तक्रार असल्यास त्यांनी दिवाणी न्यायालयात जाऊन दावा दाखल करुन त्यांची तक्रार सोडवून घ्यावी व त्यानंतर गरज पडल्यास मंचासमोर नवीन दावा घेऊन यावे तोपर्यत अर्जदार शिवाजी गूंडप्पा मठपती यांचा विज पूरवठा गैरअर्जदार यांनी खंडीत करु नये. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांची तक्रार मंजूर करण्यात येते. 2. अर्जदार यांचा विज पूरवठा गैरअर्जदार यांनी खंडीत करु नये. 3. उभयपक्षांना नीर्णय कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक |