जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/11 प्रकरण दाखल तारीख - 05/01/2010 प्रकरण निकाल तारीख – 19/04/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.एस.आर.देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य मोहंमद शकिल अहेमद पि.मोहंमद नासेर, वय वर्षे सज्ञान, धंदा शिक्षण, अर्जदार. रा.धनेगांव पंकजनगर ता. जि.नांदेड. विरुध्द. 1. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. गैरअर्जदार. मार्फत 1 उप कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या, उप विभागीय एस/डी.एन. कार्यालय, वजिराबाद,नांदेड. 2. कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. उप विभागीय एस/डी.एन. कार्यालय,धनेगांव, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.मुजाहेद हुसेन. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.व्हि.व्हि.नांदेडकर. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्य) अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार हा मोहंमद नासेर पि.मोहंमद मौलाना यांचा कायदेशिर वारस आहे. त्यांचा मृत्यु दि.08/09/2008 रोजी झालेला आहे. अर्जदाराचा ग्राहक क्र.550010717809 व नविन मिटर क्र.9010227094 असा आहे, विद्युत पुरवठा हा नऊ वर्षा पासुन घेतलेला आहे. अर्जदार हा मयताचा कायदेशिर मुलगा व वारस आहे. ज्या घरामध्ये हे विद्युत मिटर स्थित आहे. त्याचा वापर अर्जदार सुध्दा करीत आहे व त्यंचे विद्युत देयक अर्जदार हेच भरतात. वर्ष 2004 पासुन अर्जदार यांचा मिटर नादुरुस्त असल्याने गैरअर्जदार यांच्याकडे लेखी तक्रार दि.29/10/2004 रोजी केला. जुना मिटर क्र.900460480 हा जुलै 2007 पासुन बंद होता. दि.30/08/2007 रोजी व दि.24/12/2007 रोजी अर्जदाराने लेखी तक्रार गैरअर्जदाराला दिली तरी सुध्दा अर्जदार यांना चुकीचे बिल देण्याचे चालुच ठेवले. अर्जदार यांनी चुकीचे व मनमानी बिल येत असल्याने कंटाळुन दि.21/06/2008 रोजी पुन्हा गैरअर्जदार यांना लेखी तक्रार मिटर बदलने अथवा दुरुस्त करण्यासंबंधी दिली. अर्जदाराच्या तक्रारीवर गैरअर्जदार यांनी सप्टेंबर 2008 मध्ये जुने मिटर बदलून नविन मिटर क्र.9010227094 बसवीले व नविन मिटर मध्ये अर्जदाराचा विद्युत वापराचा अचुक रिडींग येत होते. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अचानकपणे येवुन अर्जदाराच्या मिटरची तपासणी केली व त्यांना असेसमेंट बिल रु.1,07,800/- व कंपाऊडिंग चार्जेस रु.20,000/- त्यांच्या मनाप्रमाणे व स्वतःच्या गैरकारभार लपविण्यासाठी दि.24/09/2009 रोजी दिले. अर्जदार यांचा विद्युत पुरवठा दि.24/09/2009 रोजी खंडीत केला. घरातील मंडळी अंधारात असल्यामुळे विद्युत पुरवठा पुर्ववत करण्याची विनंती केली. गैरअर्जदार यांनी दि.24/09/2009 रोजी कोणतीही पुर्व सुचना न देता अर्जदाराचा विद्युत पुरवठा खंडीत केला. म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, रु.1,07,800/- आणि कंपाऊडींग बिल रु.20,000/- दि.24/09/2009 चे रद्य करावे, व विद्युत पुरवठा पुर्ववत सुरु करावा. सदर प्रकरणांतील गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली ते हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला त्यांचे म्हणणे असे की, विज कायदा 2003 च्या कलम 168 अन्वये अधिका-या विरुध्द वैयक्तिकरित्या दाखल करता येत नाही. सदर प्रकरणांत अर्जदाराला विजेचे जे बिल देण्यात आले होते ते बिल चोरुन वापरलेल्या विजेबद्यल विज कायदा 2003 चे कलम 135 प्रमाणे व त्या सोबत तडजोडीचे बिल विज कायदा चे कलम 152 अन्वये दिलेले होते. बिल रु.1,07,800/- रुपयाचे विज बिल दिलेले होते तसेच तडजोडीचे बिल रु.20,000/- चे होते. तपासणी अहवालामध्ये विजेचा अनाधिकृत वापर व विजेची चोरी सापडली होती त्यास अनुसरुन हे बिजेचे बिल देण्यात आलेले असतांना अर्जदारांनी त्याची संपुर्ण रक्कम भरलेली नाही. मो.नासेर यांचा मृत्यु दि.08/09/2008 रोजी झालेला आहे ही बाब ही अर्जदाराने स्वतः सिध्द करावयाची आहे. वर्ष 2004 पासुन अर्जदाराचे मिटर नादुरुस्त असल्याने गैरअर्जदार यांचेकडे दि.29/10/2004 रोजी तक्रार केली व गैरअर्जदारानी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले हे अर्जदाराचे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. अर्जदाराच्या घरातील मिटर क्र.900460480 हा जुलै 2007 पासुन बंद होता हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. दि.21/06/2008 रोजी पुन्हा मिटर बदलणे अथवा दुरुस्त करण्यासंबंधी तक्रार दिली तरी सुध्दा गैरअर्जदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. अर्जदाराकडील स्थळ तपासणीमध्ये आढळलेल्या बाबीवरुन हे स्पष्ट होत होते की, सदरील मिटरवर अर्जदाराने त्यांनी वापलेल्या विज बिलाची योग्य ती नोंद होऊ दिलेली नाही. सदर बिल आपल्या मनाप्रमाणे आणि स्वतःचा गैरकारभार लपविण्यासाठी दि.24/09/2009 रोजी दिले ही बाब खोटी व चुकीचे आहे. असेसमेंट व कंपाऊडीं बिल देण्या अगादेर चौकशी न करता देयक दिलेली आहे हे म्हणणे खोटे व चुकीचे आहे. कार्यालयीन नियमित पध्दतीनुसार दि.23/09/2009 रोजी मो.नासेर मो. मौलाना यांच्या नोव असलेल्या धनेगांव येथील रहिवाशी मिटरची तपासणी करण्यासाठी विज वितरण कंपनीचे सक्षम अधिकारी जायमोक्यावर गेले असता, व त्यांनी अर्जदाराच्या घरातील विज जोडणीची बारकाईने पाहणी केली व त्यांना असे आढळुन आले की, येथे मो.नोसर यांच्या नावचे विजेचे कनेक्शन असून त्यांचा मंजुर भार 0.50 किलोवॅट असून अनआधिकृत भार 4.92 किलोवॅट इतका होता. याचा अर्थ मंजुर असलेल्या क्षमतेपेक्षा जास्त विज खेचली जात होती. दिसत्या परिस्थितीचा पंचनामा जायमोक्यावर तयार करण्यात आला आणि अर्जदाराच्या घरी असलेले विजेचे मिटर क्र.10227094 तेथेच अक्युचेक यंत्राद्वारे तपासण्यात आले आणि त्या तपासणीमध्ये असे आढळले की, सदर मिटर हे 76.93 टक्के संथ गतीने चालत होते. जायमोक्यावर मिटर उघडुन पाहिले असता, त्यामध्ये असे आढळले की, मिटरमधील लाल रंगाच्या दुयम न्युट्रल सिटी सेकंडरी आणि फेज वायर पीसीबी पासुन तोडलेली आढळली व त्यामुळे या दोन्ही बाबी केल्यामुळे विजेच्या जोडणीच्या यंत्राशी अर्जदाराने स्वतः चुक केल्याचे दिसून येत होते. दिसत्या पिरस्थितीचा स्थळ पंचनामा जायमोक्यावर करण्यात आला. त्यावर उपविभागीय अधिकारी आणि सक्षम अधिका-यांच्या सहया आहे. प्रकरणांतील अर्जदार यानेही ग्राहक प्रतिनीधी म्हणुन सही केलेली आहे. मिटर संथ करुन चोरलेल्या विजेच्या एककांची नोंद करण्यासाठी प्रसतावित दरनुसार विजेचे युनिटस काढण्यात आले. या दरम्यान 2424 युनिटस मिटरवर दर्शविण्यात आले होते, 76ण्93 टक्के युनिटसची नोंद होवू दिलेली नव्हती. विजेचे बिल रु.1,07,096.64 इतके झाले होते सदर बिल हे जवळच्या ट्रॅक्शनला गोलाकार करुन डॅमेज्ड मिटर चार्जेससह विज चोरीचे देयक रुद्य1,07,800/- इतके झाले आणि जवळपास 5 किलोवॅट घरगुती वापराचा अनाधिकृत विज पुरवठा सापडल्याने कलम 152 नुसार ठरवून दिलेल्या प्रचलित दराने म्हणजे रु.4,000/- प्रती किलोवॅट या दराने 5 किलोवॅटची तडजोडीची रक्कम रु.20,000/- इतकी ठरविण्यात आली व ही दोन्हीही बिले अर्जदाराला दुस-या दिवशी देण्यात आलेली होती. मिटरमध्ये अवरोध टाकुन विजचोरी करुन विज मिटरला प्रत्यक्षरित्या वापरल्या पेक्षा कमी विजेची युनिट नोदवण्यास लावले होते व ही बाब उघड झाल्याने अर्जदार हा पश्चातापदग्ध झाला होता व त्यामुळे अर्जदाराने दि.23/09/2009 रोजी प्रतिवादी क्र. 1 यांना पत्र लिहून विनंती केली की, विज चोरीची जी काही रक्कम निघेल ती रक्कम भरण्यास मी जबाबदार आहे. आणि तयार देखील आहे व पोलिस कार्यवाही करुन ये अशी विनंती केली. गैरअर्जदारांनी दाखल केली ज्याचा गुन्हा क्र.4841/09 असा असुन त्या फिर्यादीची प्रतीक्षा सोबत जोडयात येत आहे. गैरअर्जदारांनी अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेतील त्रुटी दिलेली नाही. म्हणुन अर्जदाराचा अर्ज सर्वसाधारण आणि विशेष रु.10,000/- खर्चासह खारीज करावा अशी विनंती केली आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय? होय. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 - अर्जदार यांनी जी तक्रार दाखल केली आहे यात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, त्यांचे वडील मो.नासेर मो.मौलाना यांचा दि.08/09/2008 रोजी मृत्यु झाला म्हणुन अर्जदार हा ग्राहक क्र.550010717809 यांचे कायदेशिर वारस आहे. अर्जदाराने विद्युत ग्राहक क्रमांक त्यांच्या नांवे करुन घेतले नसले तरी त्यामुळे त्यांना मिळणारा लाभ किंवा हक्क नाकारता येणार नाही. म्हणुन हे लाभार्थी म्हणुन तक्रार नोंदवू शकतात. अर्जदाराच्या तक्रारीप्रमाणे सप्टेंबर 2008 रोजी नव्याने मिटर क्र.9010247094 बसविण्यात आले आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदाराच्या घरी जाऊन मिटरची तपासणी केली व त्यांना असेसमेंट बिल रु.1,07,800/- व कंपाऊडींग म्हणुन रु.20,000/- चे असे दोन बिल दिले आहेत व हे नंतर न भरल्या कारणाने दि.24/09/2009 रोजी त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. यात अर्जदार म्हणतात की, त्यांना कुठलीही सुचना न देता घराचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. यात गैरअर्जदार यांनी दि.24/09/2009 रोजी स्पॉट इन्स्पेक्शन रिपोर्ट तयार केला असुन याप्रमाणे मिटर कनेक्शनमध्ये सिल टॅम्पर्ड, मिटरमध्ये छेडखानी केलेली आहे असे म्हटलेले असुन अर्जदार यांचा मंजुर भार 0.50 किलोवॅट कनेक्टीव्ह लोड 4.92 होता म्हणजे मंजुर भारापेक्षा जास्त विज ते वापरत होते त्यांनी अक्युचेकने मिटर तपासले असे म्हटलेले आहे. तेंव्हा मिटर हे 76.93 टक्के पेक्षा संथ गतीने चालते असे आढळुन आले. म्हणुन त्यांनी विज कायदा 2003 सेक्शन 35 प्रमाणे कार्यवाही करुन असेसमेंट बिल दिलेले आहे ज्यावर अर्जदाराची स्वतःची सही आहे. नियमाप्रमाणे जप्ती पंचनामा करण्यात आलेला पंचनामा याप्रकरणांत दाखल आहे. गैरअर्जदारानी असेसमेंट बिल तयार करावे विजेची 12 महिन्याचे एकुण वापर 8092 असे दाखविण्यात आले असुन यासाठी 12 महिन्याचे बिल तयार करुन दंड म्हणुन डब्बल केलेले आहे. एकंदरीत विज कायदा 2003 सेक्शन 126 प्रमाणे वरील बिल बरोबर असल्याचे आढळुन येते या शिवाय दि.23/09/1999 रोजी अर्जदाराने भरारी पथकाने केलेल्याय तपासनी नुसार मीटरमधील दोष यावर जबाबदारी स्विकारुन दिलेले निर्धारीत बिल तडजोड रक्कम भरण्याची तयारी दर्शविलेली आहे म्हणजे फक्त तडजोड करण्याची तयारी दर्शविलेले आलेले अर्ज दिलेले होते मग गैरअर्जदाराने दिलेले असेसमेंट बिल भरण्याची जबाबदारी अर्जदारावर येते व त्यासंबंधात तडजोडीची रक्कम भरणे आवश्यक आहे हे नंतर झाल्यामुळे गैरअर्जदाराने पोलिस स्टेशनला अर्जदाराच्या विरुध्द गुन्हा नोंदविलेला आहे. अर्जदारहे असेसमेंट बिल व कंपाऊडींगची रक्कम आजपर्यंत भरलेली नाही. मिटरमध्ये जे काही युनिट आलेले आहे त्याप्रमाणे गैरअर्जदाराने 2424 युनिट रेकॉर्ड केलेले आहे. आधीची रिडींग 95 व नंतरची मिटर रिडींग 02567 असे दाखविण्यात आलेले आहे व मिटर संथ गतीने चालते म्हणुन 76.93 टक्क्याने ते वाढलेले आहे. गैरअर्जदाराने सरळ सरळ बारा महीन्याचा हीशोब करुन पेनॉल्टीसह डब्ल करुन असेसमेंट बिल दिलेले आहे हे बिल भरतांना मागील बारा महिन्याचे स्लो रिडींगचे बिल अर्जदाराने भरले आहे व ही भरलेली बिल असेसमेंट बिलात आलेले आहे त्याच रिडींगवरुन हे बिल हीशोब करण्यात आलेले आहे. म्हणुन ही काही मागील बारा महिन्याचे बिल असतील ते भरलेले बिल या असेसमेंट बिलात कमी करणे आवश्यक आहे. गैरअर्जदाराने मिटर हे अक्युचेकने चेक केलेले आहे. हे मिटर लॅब्रोटरीमध्ये पाठवून टेस्ट करुन त्याची रिडींग घेणे आवश्यक होते हे गैरअर्जदाराने केलेले नाही म्हणजे एकंदरीत रिडींग कमी अधिक पर्यायाने बरोबर जरी असले तरी क्रोमोलेट करणे आवश्यक होते ते न करुन गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केलेली आहे. म्हणुन मानसिक त्रासास ते जबाबदार आहेत. अर्जदारांना जे असेसमेंट बिल दिलेले आहे ते ग्राहक म्हणुन त्यांचे बरोबर केलेले बिल हे बरोबर आहे का चुक व त्यांनी सेवेत काय त्रुटी केली हे ग्राहक म्हणुन बघणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे बिल दुरुस्त करुन दिलेले आहे. कंपाऊडची रक्कम स्विकारावयाची आहे की नाही ते ग्राहक व गैरअर्जदार कंपनी या दोघामधील विषय आहे. कंपाऊडींग बिल स्विकारल्यास गैरअर्जदारांना पोलिस केस मागे घ्यावे लागेल अन्यथा विज चोरीचा गुन्हा जोपर्यंत सिध्द होत नाही तोपर्यंत विज चोरी आहे असे म्हणता येणार नाही या विषयीची वेगळी फिर्याद फौजदारी न्यायालयात गैरअर्जदार चालवू शकतात व फौजदारी न्यायालयात चोरी निष्पन्न झाल्यास जी काही सजा व दंड देतील ते अर्जदारावर बंधनकारक राहील. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. 2. अर्जदार यांचे ग्राहक क्र.550010717809 याबद्यल गैरअर्जदार यांनी दिलेले दि.23/09/2009 चे असेसमेंट बिल अर्जदारांनी रु.1,07,096.64 गैरअर्जदार कार्यालयात भरावे. 3. दि.23/09/2009 पासुन 12 महिन्याचे गैरअर्जदारांनी जे काही बिल भरलेली असेल ती रक्कम यातुन कमी करण्यात यावी. मीटर टेस्टींगसाटी प्रयोग शाळेत न पाठविल्यामुळे दंड व मानसिक त्रासाबद्यल रु.5,000/- व दावा खर्चाबद्यल रु.2,000/- गैरअर्जदारांनी अर्जदारांना द्यावे. हे बिल भरल्या बरोबर अर्जदाराचा विद्युत पुरवठा पुर्ववत करण्यात यावा. 4. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक |