निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 03/12/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 16/12/2010 तक्रार निकाल दिनांकः- 07/02/2012 कालावधी 01 वर्ष.01महिना.22 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. रामविलास पिता रामप्रसाद अग्रवाल. अर्जदार वय 50 वर्ष.धंदा.शेती. अड.डी.यु.दराडे. रा.साखरखेडा ता.जिंतूर.जि.परभणी. विरुध्द 1 इक्सेल कॉप केयर लि. गैरअर्जदार. 184/87 एस.व्ही.रोड. अड.एस.एन.वेलणकर. जोगेश्वरी (पश्चिम)मुंबई- 400102. 2 गजानन फर्टिलायझर तर्फे मालक नृसिंह चौक जिंतूर.जि.परभणी. 3 कृषि अधिकारी. जिल्हा परीषद परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- (निकालपत्र पारित व्दारा श्रीमती. अनिता ओस्तवाल.सदस्या.) गैरअर्जदारांनी त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदारांनी ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा शेतकरी आहे.अर्जदाराने त्याच्या शेतात सोयाबिनचे पिक घेण्याचे ठरविले त्याची पूर्व तयारी म्हणून जमीनीची मशागत केली व तण उगवु नये म्हणून तणनाशक वापरण्याचा निर्णय घेतला त्यानुसार अर्जदाराने दिनांक 03/09/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या कडे तणनाशका संदर्भात चौकशी केली असता एक्सेल कंपनीचे मिरा 71 नावाचे औषध हे जर पेरणी पूर्वी 10 दिवस अगोदर जमीनीवर फवारले असता जमीनीत गवत उगवणार नाही असे गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास सांगीतले.त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवुन अर्जदाराने सामनेवाला क्रमांक 2 यांच्याकडून सामनवोला क्रमांक 1 यांच्या तणनाशकाचे 25 पाकीटे प्रत्येकी दर रु.60/- व दिनांक 05/07/2010 रोजी 10 पाकिटे ज्याचा दर प्रत्येकी रु. 56/- असे एकुण 35 पाकिटे एकुण रक्कम रु. 2060/- ला विकत घेतली.त्यावेळी सामनेवाला क्रमांक 2 यांच्याकडून वापरण्याची पध्दत समजावुन घेतली पुढे दिनांक 05/07/2010 रोजी 10 लिटर पाण्यात 100 ग्रॅमचे एक पॉकेट मिसळून चार एकर शेतावर तणनाशक फवारले दरम्यान दिनांक 05/07/2010 ते 15/07/2010 पर्यंत साखरतळा या गावात पाऊस पडला नाही तरीसुध्दा तणनाशकाचा तणावर कोणताही परिणाम झाला नाही.त्यामुळे दिनांक 12/08/2010 रोजी तक्रारदाराने सामनेवाला क्रमांक 1 व पंचायत समिती जिंतूर यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली तदनंतर दिनांक 05/09/2010 रोजी तालुका गुण निरीक्षक यांनी अर्जदाराच्या शेताची समक्ष पाहणी केली दिनांक 05/10/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 ने प्रत्यक्ष पाहणी करुन खोटा अहवाल तयार केला तण नाशकाचा परिणाम झाल्यामुळे अर्जदाराची 4 एकर शेत पडीक राहिले व तक्रारदार हा सोयाबीनचे पिक घेऊ शकला नाही त्यामुळे अर्जदारास बँकेचे व सोसायटीचे कर्ज फेडता आले नाही अर्जदाराला विनाकारण त्या रक्कमेवरचे व्याज भरावे लागले त्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदारांनी एका वर्षाचे शेतीच्या उत्पन्नाचे नुकसान रु. 80,000/- कर्जावरील व्याजापोटी रक्कम रु.10,000/- व मानसिक त्रासापोटी 5000/- व दाव्याच्या खर्चापोटी रक्कम रु.3000/- द्यावे.अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.4/1 ते नि.4/7 व नि.17/1 वर मंचासमोर दाखल केले आहे. मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1, 2 व 3 यांना तामील झाल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 ने नेमल्या तारखेस लेखी निवेदन दाखल न केल्यामुळे त्याच्या विरोधात No Say Order पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 3 ने शपथपत्र नि.12 वर दाखल करुन दिनांक 05/10/2010 रोजी शेतक-याच्या शेताची जिल्हा तक्रार निवारण समिती परभणीने प्रत्यक्ष पाहणी केल्याचे नमुद केले आहे व सोबत पुराव्यातील कागदपत्र नि.12/1 वर मंचासमोर दाखल केले आहे.गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी निवेदन नि.14 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे.गैरअर्जदार क्रमांक 1 चे म्हणणे असे की, कृषी अधिकारी पंचायत समिती जिंतूर यांनी बँच क्रमांक 137 च्या तणनाशकाचा नमुना गैरअर्जदार क्रमांक 2 च्या दुकानातून घेवुन पूणे येथे शासकीय प्रयोग शाळेत पाठवला असता त्यांनी दिनांक 20/10/2010 रोजी तणनाशक परिपूर्ण निर्दोष असल्याचा अहवाल दिला आहे.पुढे गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदार हा स्वतः शेती वहीती न करता बटाईने शेती देतो म्हणून तो ग्राहक या संज्ञेस पात्र नाही तसेच अर्जदाराने ब-याच गोष्टी मंचापासून दडवुन ठेवल्या आहेत तसेच अर्जदाराने तणनाशक वापरताना अयोग्य पध्दतीचे अनुसरुन केलेले आहे वास्तविक पाहता तण उगवल्यानंतर त्याची वाढ होऊ नये व ते नष्ट व्हावे या उद्देशाने तणनाशकाचा वापर केला जातो त्यामुळे तण उगवुच नये म्हणून आधीच तणनाशक वापरल्यास त्याचा काहीही उपयोग होत नाही हे सर्वश्रुत आहे त्यामुळे तणनाशकाचा वापर अर्जदाराने तणरोधक म्हणून केल्यामुळे त्याचा अपेषीत परिणाम दिसून आलेला नाही तसेच तणनाशकाची फवारणी केल्यानंतर पाऊस पडल्यामुळे ते वाहून गेले असावे असा ही निष्कर्ष पर्जन्यमान अहवाल वरुन निघतो तसेच कृषी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांनी दिलेला अहवाल हा ही अर्जदाराच्या कथनाला बळकटी देत नाही त्यामुळे वरील सर्व कारणास्तव अर्जदाराचा तक्रार अर्ज Compensatory Cost सह फेटाळण्याची विनंती गैरअर्जदार क्रमांक 1 ने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी निवेदनासोबत शपथपत्र नि.15 वर व पुराव्यातील कागदपत्रे नि.20/1 ते नि.20/13 वर मंचासमोर दाखल केले. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदारांनी त्रुटीची सेवा दिल्याचे अर्जदाराने शाबीत केले आहे काय ? नाही. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या कंपनीचे तणनाशकाचे एकुण 35 पाकीट गैरअर्जदार क्रमांक 2 कडून खरेदी केले होते.तदनंतर तणनाशकाची फवारणी अर्जदाराने त्याच्या शेतात केली.फवारणी केल्यानंतर तब्बल 8 ते 10 दिवस पाऊस पडला नाही तरी सुध्दा तणनाशकाचा काहीही परिणाम न झाल्यामुळे अर्जदाराची जमीन पडीक राहिली अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, तणनाशकाचा वापर तणरोधक समजून केल्यामुळे अर्जदारास अपेक्षीत असेलेला परिणाम मिळालेला नाही.अर्जदाराने चुकीच्या व अयोग्य पध्दतीने तणनाशकाची फवारणी केली त्यामुळे झालेल्या नुकसानीची जबाबदारी गैरअर्जदारावर टाकता येणार नाही.निर्णयासाठी महत्वाचा मुद्दा असा की, अर्जदाराने ठोसरित्या तणनाशक हे सदोष असल्याचे शाबीत केले आहे काय ? याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल कारण मंचासमोर गैरअर्जदाराच्या वतीने दाखल केलेल्या कागदपत्राची पाहणी केली असता गैरअर्जदाराने घेतलेल्या बचावास बळकटी मिळते नि.20/8 ते नि.20/10 वर माहितीपत्रकांची सत्यप्रती मंचासमोर दाखलल केल्या आहेत त्यामध्ये एक्सेल मिरा 71 या तणनाशकाच्या वापरण्याची पध्दत स्पष्ट केलेली आहे यात फवारणी करतांना तणाची उंची 6 ते 9 इंच असावी कारण या अवस्थेत तण हिरवेगार लुसलुशीत वाढीच्या अवस्थेत असल्याने एक्सेल मिरा 71 शोषणाची क्रीया जलद असेल तसेच शेतात पाणी देवुन तण उगवने व उगवलेले तण 14 दिवसाचे झाल्यानंतर मिरा -71 ची फवारणी करावी व फवारणी केल्यानंतर दुस-या अथवा तिस-या दिवशी लगेच जे पीक घ्यायचे आहे ते लावण्यास हरकत नाही अशा प्रकारच्या सुचना माहिती पत्रकात देण्यात आलेल्या आहेत अर्जदाराने तक्रार अर्जातून तण येण्यापूर्वीच तणनाशकाचा फवारा केलेला असल्याचे कथन केले आहे.यावरुन अर्जदाराने तणनाशकाचा योग्य वेळी योग्य पध्दतीने वापर केलेला नाही असेच मानावे लागेल पुढे किटकनाशक तक्रार निवारण समितीचा क्षेत्र निरिक्षण अहवाल अर्जदाराने नि.4/2 वर मंचासमोर दाखल केला आहे त्या अहवालात नमुद केलेल्या बाबीमुळे अर्जदाराच्या कथनाला बळकटी मिळत नाही.उलटपक्षी अहवाल तो अर्जदाराच्या हक्कात नसल्याचे जाणवते.पुढे फवारणी कधी केली असावी या बाबतीत दोन्ही पक्षांचे वेगळे कयास आहेत अर्जदाराचे म्हणणे असे की, दिनांक 05/07/2010 रोजी तणनाशक फवारले त्यानंतर दिनांक 15/07/2010 पर्यंत पाऊस पडलेला नाही त्यामुळे तणनाशक वाहून जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही.तर गैरअर्जदाराचा कयास असा की, अर्जदाराने दिनांक 03/07/2010 रोजी घेतलेल्या 25 पाकिटांची फवारणी त्याच दिवशी केली असावी व त्या तारखेला जिंतूर तालुक्यात जुलै महिन्यातील सर्वांत जास्त म्हणजे 11.1 मि.मी.पाऊस पडला व त्यामुळे फवारलेले तणनाशकाचा उपयोग न होता ते वाहून गेले असावे,परंतु मंचास दोन्ही बाजुंनी उपस्थित केलेले या संदर्भातील मुद्दे महत्वाचे वाटत नाही कारण मुळातच चुकीच्या वेळी तणनाशकाची फवारणी करण्यात आलेली आहे तण उगवल्या विना तणनाशकानाचा वापर केला असेल तर त्याचा योग्य असा फायदा होणार नाही.पुढे गैरअर्जदाराने 20/13 वर Insecticide Testing lab pune यांचा analysis report मंचासमोर दाखल केला आहे.यात Sample हे CBI / BIS Specification प्रमाणे असल्याचे नमुद केले आहे,परंतु अर्जदाराचे म्हणणे असे की, नमुना Sample ची बॅच नं त्याने खरेदी केलेल्या बॅच नं. पेक्षा वेगळा आहे वास्तविक पाहता अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 13 (1) (C) च्या तरतुदी नुसार Sample देवुन Lab Test ची मागणी करावयास हवी होती व त्यानंतर अर्जदारास सदरचे तणनाशक सदोष असल्याचे ठोसरित्या मंचासमोर शाबीत करता आले असते,परंतु अर्जदाराने तशी मागणी मंचासमोर केलेली नाही.म्हणून वरील सर्व बाबींचा सारासार विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |