जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 334/2011
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 18/07/2011
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 16/04/2014
सैयद लतीफ सैयद रहमत,
उ.व.सज्ञान, धंदाः व्यवसाय,
रा.नागदोली, म्हसावद, ता.जि.जळगांव. ..... तक्रारदार
विरुध्द
1. व्यवस्थापक,नोकीया इंडीया प्रा.लि.महिपालपुर,
सेकंड फलोअर, कर्मशियल प्लाझा, रेडीसन हॉटेल,
नॅशनल हायवे नं.8 जवळ, महिपालपुर,
न्यु दिल्ली व इतर 3. ..... विरुध्द पक्ष.
कोरम –
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष.
श्री.चंद्रकांत मो.येशीराव सदस्य.
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
--------------------------------------------------
नि.क्र.1 वरीलआदेशव्दाराःश्री.विश्वास दौ.ढवळे, अध्यक्षः उपरोक्त तक्रार अर्जाचे कामी तक्रारदार व त्यांचे वकील माहे मार्च,2013 पासुन नेमलेल्या पुढील तारखांना सतत गैरहजर. तक्रारदाराने माहे मार्च,2012 पासुन तक्रार अर्जाचे कामी कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. आज रोजी देखील नेमलेल्या तारखेस तक्रारदार व त्यांचे विधिज्ञांचा पुकारा केला असता ते आजही गैरहजर आहेत. तक्रारदाराची व त्यांचे वकीलांची प्रस्तुत कामी सततची गैरहजेरी पाहता तक्रारदारास त्याची तक्रार पुढे चालविण्यात काहीएक स्वारस्य राहीले नसल्याचे स्पष्ट होते. परिणामी तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा,1986 च्या कलम 13(2)(सी) अन्वये त्याच्या अधिकारास बाधा न येता फेटाळण्यास पात्र आहे. यास्तव आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज तक्रारदाराच्या हक्कास बाधा न येता अंतिमरित्या निकाली
काढण्यात येतो.
2) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
ज ळ गा व
दिनांकः- 16/04/2014.(श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.