जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/170 प्रकरण दाखल तारीख - 18/06/2010 प्रकरण निकाल तारीख – 07/10/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. भारत दत्ताञय कामळजकर वय 39 वर्षे, धंदा शेती अर्जदार रा. कामळज ता.मुदखेड जि. नांदेड ह.मु. गणेश नगर, नांदेड विरुध्द. 1. अधिक्षक अभिंयता महाराष्ट्र राज्य विद्यूत कंपनी लि. गैरअर्जदार विद्यूत भवन,हिंगोली रोड, नांदेड. 2. कार्यकारी अभिंयता महाराष्ट्र राज्य विद्यूत कंपनी लि. विद्यूत भवन, हिंगोली रोड, नांदेड. 3. कनिष्ठ अभिंयता महाराष्ट्र राज्य विद्यूत कंपनी लि. उमरी रोड, मुदखेड ता.मुदखेड जि.नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.चौधरी ऐ.व्ही. गैरअर्जदार क्र. 1 त 3 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार विज वितरण कंपनी यांच्या सेवेच्या ञूटी बददल अर्जदार तक्रारीत म्हणतात की, ते मूळचे कामळज येथील रहीवासी असून शेत गट नंबर23 क्षेञफळ 1 हेक्टर 40 आर चे मालक असून त्यापैकी 80 आर जमिनीमध्ये त्यांने ऊस घेतला आहे. शेतात पंपासाठी गैरअर्जदार यांचेकडून ग्राहक नंबर 551220321971 द्वारे विज कनेक्शन घेतले आहे. गैरअर्जदार यांची विज मूख्य प्रवाहीका अर्जदार यांचे शेतातून गेलेली आहे. त्यांच्या तारा एकमेंकाला घर्षन करीत असल्यामूळे स्पार्कीग होत राहते, या बाबत गैरअर्जदार यांना बराच वेळ तक्रारही केली आहे. पण त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. दि.31.10.2009 रोजी दूपारी 11.45 वाजता विद्यूत मूख्य प्रवाहीकेचे 11 के.व्ही. लाईनच्या शार्टसर्कीटमूळे स्पार्कीग होऊन अर्जदार यांच्या शेतातील ऊस तोडणी योग्य होता त्यावर काही पाचट वाळलेल्या असल्याकारणाने स्पार्कीगमूळे आग लागली. अर्जदार यांचा 60 आर ऊस पूर्णपणे जळून नूकसान झाले. या बाबत गैरअर्जदा क्र.3 यांना दि.3.11.2009 रोजी तक्रार देण्यात आली व संबंधीत पोलिस स्टेशन मूदखेड येथे गून्हा नंबर 08/2009 दि.3.11.2009 रोजी नोंदविण्यात आला. पोलिसांनी येऊन घटनास्ळांचा पंचासमक्ष पंचनामा केला. यात रु.1,48,470/- चे नूकसान झाल्याचे म्हटले आहे. नांदेडचे सहायक विद्यूत निरीक्षक यांचे दि.9.11.2009 च्या पञाप्रमाणे त्यांनी चौकशी करुन अर्भीप्राय दिला. त्यात दि.6.1.2010 रोजीच्या पञात 11 के.व्ही. कट पाईट पोल वरील जंपर्सना टॉप क्लिप नसल्याने पोल व जंपर मधील अंतर कमी होऊन फेज व पोल मधील धातूच्या भागामध्ये स्पार्कीग होऊन ऊसास आग लागली. जळालेला ऊस भाऊराव सहकारी साखर कारखान्याने नेला तो 30 दिवसानंतर नेला त्यामूळे ऊसाचे वजन घटले.शेतात एकरी 50 टन उत्पन्न होते. परंतु वजन घटल्यामूळे 100 टन ऊस होण्याऐवेजी फक्त 29 टन ऊस झाला. अर्जदाराला 70 टन ऊसाचे नूकसान झाले. अर्जदारास रु.2125/- टन प्रमाणे रु.1,48,470/- चे नूकसान झाले. त्यात जळालेला ऊस 20 टक्के कमी भावाने साखर कारखाना घेतो म्हणजे रु.10,000/- कमी केले. म्हणून अर्जदाराचे रु.1,58,470/- चे नूकसान झाले. या सर्व प्रकारामूळे अर्जदारास मानसिक व आर्थीक ञास झाला म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, रु.1,48,470/- 18 टक्के व्याजासह मिळावेत. तसेच मानसिक ञासाबददल रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 ते 3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले संयूक्त म्हणणे दाखल केलेले आहे. कंपनीने विज पूरवठा देताना कोणताही दोष केलेला नाही. अर्जदाराने 80 आर जमिनीत ऊसाची लागवड केली होती. दि.31.10.2009 रोजीला स्पॉर्कीगमूळे आग लागली ही घटना त्यांना अमान्य असून 80 आर जमिनीतील पूर्ण ऊस जळून नूकसान झाले हे म्हणणे खोटे आहे असे म्हटले आहे. गैरअर्जदार यांना त्यांनी लेखी कळविले हे पण त्यांनी अमान्य केले आहे. शेतात कमीत कमी एकरी 50 टन ऊस उत्पन्न होते हे अर्जदाराचे म्हणणे खोटे आहे असे म्हटले आहे. म्हणून त्यांची मागणी प्रमाणे रु.1,48,470/- नूकसान भरपाई देण्यास ते जबाबदार नाहीत व यासाठी कोणतेही सक्षम कागदपञाची पूर्तता केलेली नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. अर्जदार किती रक्क्म मिळण्यास पाञ आहे ? आदेशाप्रमाणे. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांचे नांवावर 1.40 हेक्टर शेती असल्याबददल 7/12 दाखल केलेला आहे. 7/12 वर ऊस लागवडीची नोंद जरी नसली तरी यावर्षी ऊस लावल्याबददल तलाठयाचे प्रमाणपञ दाखल केलेले आहे. यात 80 आर ऊसाची लागवड केल्याची नोंद आहे. दि.31.10.2009 रोजी दूपारी 11.45 वाजता विद्यूत मूख्य प्रवाहीकेचे 11 के.व्ही. लाईनच्या शार्टसर्कीटमूळे स्पार्कीग होऊन अर्जदार यांच्या शेतातील ऊस तोडणी योग्य होता त्यावर काही पाचट वाळलेल्या असल्याकारणाने स्पार्कीगमूळे अर्जदार यांचा 60 आर ऊस पूर्णपणे जळून नूकसान झाले. याबददल अर्जदार यांनी पोलिस स्टेशनला कळविले. गून्हा नंबर8/2009 याप्रमाणे दि.3.11.2009 रोजी पोलिसांनी पंचनामा केला. अंदाजेक 60 आर क्षेञातील ऊस जळाला असे म्हटले आहे. झालेल्या नूकसान भरपाईसाठी अर्जदाराने कनिष्ठ अभिंयता विज वितरण कंपनी मूदखेड यांचेकडे तक्रार केली होती. त्यानुसार कनिष्ठ अभिंयता विज वितरण कंपनी मूदखेड (आर) यांनी अर्जदाराच्या नांवाने पञ लिहीले आपण ऊस जळीत प्रकरणी नूकसान भरपाई मिळण्यासाठी मागणी कागदपञाची पूर्तता केरा. यात पोलिस पंचनामा व एफ.आय.आर , तहसीलदार मूदखेड यांची नूकसानीबददल मूल्यनीर्धारण प्रत, नूकसान भरपाई मिळणे संबंधी रक्कमेची मागणी केलेला अर्ज, इत्यादी कागदपञ मागितले आहेत. ते पञ पाहिले तर असे वाटते की, गैरअर्जदार यांनी ऊस जळून झालेले नूकसान त्यांना मान्य आहे. फक्त किती नूकसान दयावे याबददलची कागदपञे मागितली आहेत. दि.3.11.2009 रोजी घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. पंचनाम्याप्रमाणे आगीचे कारण शॉर्टसर्किट आहे. गैरअर्जदाराच्या विज कनेक्शन नंबर 551220321971 याबददलचे बिल दाखल केलेले आहे. यात अजून एक पूरावा विज निरिक्षक यांचे दि.6.1.2010 रोजीचे प्रमाणपञ, याप्रमाणे त्यांनी त्यांचा अभीप्राय दिला असून यात 11 के.व्ही. कट पाईट पोल वरील जंपर्सना टॉप क्लिप नसल्याने पोल व जंपर मधील अंतर कमी होऊन फेज व पोल मधील धातूच्या भागामध्ये स्पार्कीग होऊन ऊसास आग लागली. यांचा अर्थ अर्जदार यांचे शेतामधून 11 के.व्ही. लाईन गेलेले आहे. त्यांचे तारा लोबकळत होत्या व वा-यामूळे सारखे स्पार्कीग होत होते. त्यावर ठीणग्या पडून अर्जदार यांचा ऊस जळाला.वरील सर्व पूराव्यावरुन गैरअर्जदार यांचे निष्काळजीपणामूळे ऊस जळाला हे सिध्द होते. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांनी 80 आर क्षेञामध्ये 100 टन ऊस झाला असता असे म्हटले आहे. तलाठयाच्या प्रमाणपञाप्रमाणे 80 आर ऊसाची लागवड केली होती म्हणजे 2 एकर ऊस लागवड केली होती. अर्जदार म्हणतात याप्रमाणे एकरी 50 टन उत्पन्न झाले असते यासाठी कोणताही ठोस पूरावा दाखल केला नाही. पण यासाठी अर्जदाराला मागील तिन वर्षात कारखान्यास किती ऊस घातला यांचे प्रमाणपञ दिले असते तर त्यांना तेवढा ऊस होत होता असे म्हणता आले असते. परंतु गैरअर्जदार यांनी वर्ष 2009-10 या हंगामासाठी दि.1.11.2009 रोजीचे मूख्य शेतकी अधिका-याने 60आर क्षेञातील ऊस जळाला आहे असे म्हटले आहे. तेव्हा 20 आर ऊस चांगला होता व बाकी जळालेला होता. यात जळालेला ऊस याबददल भाऊराव साखर कारखाना यांचे बिलाप्रमाणे अर्जदारास 27 टनाचे ऊसाचे नूकसान झाले आहे. यांची एकूण रक्कम रु.38,000/- अर्जदारांना मिळाले आहेत. आता अर्जदाराचे 80 आर मध्ये 50 टन नव्हे तर एकरी सरासरी उत्पन्न 40 टन ऊस एकरी होऊ शकते म्हणजे एकूण 80 टन ऊस अर्जदारास झाला असतो. यापैकी 20 आर मधील ऊस चांगला होता म्हणजे त्या ऊसाचे पूर्ण रक्कम मिळाली असे म्हणता येईल व नूकसान भरपाई मिळण्यासाठी असलेला ऊस हा दिड एकर मध्ये आहे. क्षेञ 1.5 x 40 एमटी = 60 टन, कारखान्यात घातलेला ऊस 27 टन वजा जाता एकूण 33 टन ऊसाचे नूकसान झाले आहे. यात कारखान्याने हमी भाव रु.1425/- दिलेला आहे व नंतर वाढीव भाव रु.700/- असे एकूण रु.2125/- भाव वर्ष 2009 साठी होता. गैरअर्जदार यांनी आपले म्हणण्यात रु.2125/- भाव नव्हता असे कूठेही म्हटलेले नाही. म्हणून यानंतर वाढीव भावाप्रमाणे रु.2125/- भाव धरल्यास एकूण 33 टन x रु.2125/- = रु.70125/- मिळण्यास अर्जदार पाञ आहेत. यातून जळीत वसूली म्हणून कारखान्याने रु.4081/- + रु.4843/- = असे एकूण रु.8924/- जळीत ऊसाबददल कमी दिलेले आहेत.एवढे नूकसान अर्जदारांना मिळाले पाहिजे पण प्रार्थने मध्ये त्यांनी ही रक्कम मागितली नाही म्हणून यांचा विचार करता येणार नाही. म्हणजे सरासरी एकूण रु.70,125/- एवढी नूकसान भरपाई मिळण्यास अर्जदार पाञ आहेत तसेच त्यावर तक्रार दाखल दि.28.07.2010 पासून 9 टक्के व्याज मिळण्यास अर्जदार पाञ आहेत. तसेच अर्जदारास झालेल्या मानसिक ञासाबददल रु.3,000/-व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मिळण्यास ते पाञ आहेत. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश काढीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना ऊसाचे नूकसान भरपाई बददल रु.70,125/- व त्यावर प्रकरण दाखल दि.28.07.2010 पासून 9 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.3,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- दयावेत. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER | |