जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/134. प्रकरण दाखल तारीख - 28/04/2010 प्रकरण निकाल तारीख – 25/08/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. आनंद पि. नामदेव सूर्यवंशी वय 48 वर्षे, धंदा शेती अर्जदार रा.दाभड ता. अर्धापूर,जि. नांदेड विरुध्द. 1. कार्यकारी अभिंयता,(ग्रामीण) महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण कंपनी मर्यादित, मुख्य कार्यालय, विदयूत भवन, नांदेड. 2. सहायक अभिंयता महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण कंपनी मर्यादित, अर्धापूर. गैरअर्जदार 3. कनिष्ठ अभिंयता, महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण कंपनी मर्यादित, उपवीभाग अर्धापूर, परिक्षेञ दाभड ता.अर्धापूर जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.बी.व्ही.भूरे गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांचे निष्काळजीपणा बददल अर्जदार यांनी मानसिक ञासासाठी रु.50,000/- ची मागणी केली आहे. या प्रकरणाची हकीकत खालील प्रमाणे, अर्जदार हे दाभड येथील शेतकरी आहेत, त्यांनी गैरअर्जदार यांनी दिलेली सर्व विज देयके तसेच शेवटचे विज देयक दि.10.09.2009 रोजी भरले आहे. असे असताना गैरअर्जदाराने विज कनेक्शन दि.08.10.2009 रोजी तोडले. यासाठी अर्जदाराने गेरअर्जदार यांचेकडे तक्रार दिली व दि.21.10.2009 रोजी अर्ज दिला व त्यात विज पूरवठा तोडण्याचे कारण विचारले. तेव्हा गैरअर्जदाराने त्यांना उध्दट वागणूक दिली व अर्जदाराने दिलेल्या तक्रार अर्जाचे उत्तर दि.15.03.2010 पर्यत दिले नाही. अर्जदाराने पूर्ण बिल भरले असताना त्यांना जवळपास एक महिना अंधारात राहण्याची पाळी आली. यानंतर गैरअर्जदाराने दि.21.10.2009 रोजी विज पूरवठा सूरु करुन दिला. यात अर्जदाराच्या मूलाचे शैक्षणीक नूकसान झाले व त्यांना मानसिक ञासही झाला. म्हणून ही तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. विजेचे कनेक्शन बददल वाद नाही. परंतु अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी दि.10.09.2009 रोजी विज बिल भरले असतानाही दि.08.10.2009 रोजी कनेक्शन तोडले ही बाब वस्तूस्थितीची संपूर्ण माहीती करुन न घेता करण्यात आलेली आहे. अर्जदाराने दि.21.10.2009 रोजी अर्ज देऊन विज कनेक्शन तोडल्याचे कारण विचारले व गैरअर्जदाराने उध्दट वागणूक दिली हे म्हणणे अत्यंत चूकीचे व खोटे आहे. शिवाय अर्जदाराच्या तक्रार अर्जात दि.15.03.2010 रोजी पर्यत उत्त्र दिले नाही हे म्हणणेही चूकीचे आहे. त्यामूळे विज बिल भरले असून त्यांना अंधारात राहण्याची पाळी आली हे म्हणणे चूकीचे आहे. त्यानंतर दि.22.10.2009 रोजी विज पूरवठा दिला त्यामूळे जवळपास एक महिना अंधारात रहावे लागले. त्यामूळे मूलाचे शैक्षणीक नूकसान झाले हा आरोप गैरअर्जदार यांना मान्य नाही. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे यादीमध्ये अर्जदार यांचे नांव आहे,यांचा उलगडा परिच्छेदाचे असलेल्या शेवटी करण्यात आलेला आहे.अर्जदाराचा विज पूरवठा जाणूनबूजून कपात केला हे अर्जदाराचे म्हणणे खोटे आहे व शिवाय जे कर्मचारी विज पूरवठा खंडीत करण्यासाठी आले त्यांचे नांवे वेगळे आहेत. दि.05.11.2009 रोजीच्या यादीतील विज कपात करण्यासाठी आलेल्या कर्मचा-याचे नांवात विसंगती आहे. अर्जदाराने मागितलेली नूकसान भरपाई ही चूक आहे. गैरअर्जदार कंपनी ज्या ग्राहकाकडे थकबाकी आहे त्यांना जनमिञाकडून थकीत विज बिल भरण्यासाठी सूचना देण्यात येते व यानंतर विज तोडणीचा कार्यक्रम हाती घेण्यात येतो. त्यांची यादी आधीच देण्यात आलेली होती. याप्रमाणे दि.08.10.2009 रोजी दाभड येथे एकूण 34 ग्राहकाचा विज पूरवठा खंडीत करण्यात आलेला होता. यांची यादी सोबत जोडलेली आहे. अर्जदाराचा विज पूरवठा विनाकारण तोडण्यात आला हे म्हणणे चूक आहे परंतु अर्जदाराचा विज पूरवठा तात्काळ जोडून देण्यात आला. यामूळे त्यांना नूकसान भरपाई मागण्याचा अधिकार नाही. सबब अर्जदाराची तक्रार खोटी असून ती खर्चासह खारीज करावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी कलम 6(1) याप्रमाणे माहीतीच्या अधिकाराखाली गैरअर्जदार कंपनीकडून माहीती मागितली, याप्रमाणे अर्जदाराने दि.21.10.2009 रोजी अधिक्षक अभिंयता यांचेकडे तक्रार दिली होती तो अर्ज शिवाय अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात याप्रमाणे ऑगस्ट,2009 चे विज देयक दाखल केलेले आहे. हे विज देयक पाहिले असता त्यांनी दि.10.09.2009 रोजी दाभड येथील पोस्ट ऑफिसमध्ये विज देयक भरल्याची नोंद त्यावर आहे. दि.05.11.2009 रोजी सहायक अभिंयता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित अर्धापूर यांनी त्यांचे माहीतीच्या अर्जाबददल उत्तर दिलेले आहे. यात त्यांनी दि.08.10.2009 रोजी ज्या विज ग्राहकाकडे थकबाकी होती त्यांची विज तोडण्यासाठी कर्मचारी गेले होते त्यांची नांवे जी.पी इंगोले (जनमिञ), ए.एच.पठाण., शे.अहेमद, एस.आर. लोणे असे दिले आहे. यात गैरअर्जदार यांनी असे म्हटले आहे की, ही कर्मचा-याची यादी व अर्जदार म्हणतात ती यादी यात विसंगती आहे. दि.31.08.2009 रोजी जी ग्राहकाची यादी दिलेली आहे त्यात ग्राहक क्र.551460232941 या ग्राहक नंबरवर आनंद नामदेव दाभड यांचे नांव असून रु.1789/- Arrears दाखवलेले आहे. अर्जदारांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटल्याप्रमाणे त्यांनी ते विज देयक दि.10.09.2009 रोजी भरले व तक्रारीनुसार दि.08.10.2009रोजी त्यांचा विज पूरवठा खंडीत करण्यात आला, यावरुन असे दिसून येते की, अर्जदाराने विजेचे देयक अदा केल्यानंतर कनेक्शन तोडण्यात आले. गैरअर्जदाराने जे कागदपञ दाखल केलेले आहेतयात 34 लोकांची विज पूरवठा खंडीत केलेल्या ग्राहकाची यादी आहे. यात आनंद नामदेव यांची नोंद दिसून येत नाही. पूर्ण रेकॉर्ड अंती तपासल्यानंतर हे स्पष्ट होते की, अर्जदाराने विज बिल भरले आहे परंतु गैरअर्जदार यांचे रेकॉर्ड नुसार अर्जदाराचा विज पूरवठा तोडला गेलेला नाही. परंतु असे जरी असले तरी अर्जदाराने विज पूरवठा तोडल्याचे दि.08.10.2009 रोजी तक्रार दाखल केलेली आहे व तक्रार अर्ज गैरअर्जदार यांचे वरिष्ठाकडे दिल्याची नोंद केली होती. असे असताना गैरअर्जदार यांनी आपले लेखी म्हणण्यात विज पूरवठा तोडला नाही असा कोणताही आक्षेप न घेता आपले म्हणण्याच्या परिच्छेद नंबर 16 मध्ये असा उल्लेख केलेला आहे की, विज पूरवठा विनाकारण तोडण्यात आला हे म्हणणे चूकीचे आहे. अर्जदाराचा विज पूरवठा तात्काळ जोडून देण्यात आलेला आहे त्यामूळे त्यांला नूकसान भरपाई मागण्याचा अधिकार नाही असे म्हटले आहे. यांचा अर्थ गैरअर्जदाराने अर्जदाराचा विज पूरवठा तोडलेला होता हे दिसून येते.देयक अदा केलेले असताना गैरअर्जदाराची कृती ही नियमबाहय ठरवली जाते. शेतकरी हे अडाणीच असतात परंतु अर्जदार हे शेतकरी असताना त्यांनी माहीतीच्या अधिकाराचा उपयोग करुन सर्व कागदपञ जमवून तक्रार दाखल केली ही बाब निश्चितच वाखणण्याजोगी आहे. गैरअर्जदाराने नंतर विज पूरवठा पूर्ववत जोडून दिलेला आहे. त्यामूळे ही बाब शिल्लक नाही परंतु अर्जदाराला जो मानसिक ञास झाला त्या बाबत त्यांना मोबदला मिळणे हे ओघाने आलेच. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. सर्व गैरअर्जदार यांनी एकञित व संयूक्तीकरित्या हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना दिलेल्या ञूटीच्या सेवेमूळे झालेल्या मानसिक ञासाबददल रु.5,000/- दयावेत. 3. दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्य. जयंत पारवेकर, लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] PRESIDING MEMBER | |