Maharashtra

Jalna

CC/43/2011

Lalchand Hansrajji Runwal - Complainant(s)

Versus

EX.Engineer,Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd - Opp.Party(s)

V.V.Deshpande

24 Jun 2011

ORDER


REPORTSSurvey No.488 Opp. Krida Bhavan bypass road Jalna
CONSUMER CASE NO. 43 of 2011
1. Lalchand Hansrajji RunwalR/O Bhokardan Road,JalnaJalnaMaharashtra ...........Appellant(s)

Vs.
1. EX.Engineer,Maharashtra State Electricity Distribution Co.LtdR/O,Mastgad,JalnaJalnaMaharashtra2. Dy.EX.Engineer,Maharashtra State Electricity Distribution Co.LtdMastgad,JalnaJalnaMaharashtra ...........Respondent(s)


For the Appellant :V.V.Deshpande, Advocate for
For the Respondent :

Dated : 24 Jun 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

(दिनांक 24.06.2011 द्वारा श्री.डी.एस.देशमुख,अध्‍यक्ष)
 
    वीज वितरण कंपनीच्‍या सेवेत त्रुटी असल्‍याच्‍या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.
      तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्‍याचे अटोमोबाईल्‍सचे दुकान असुन सदर दुकानासाठी त्‍याने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून वीज जोडणी घेतलेली आहे. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने त्‍यांचेकडे बसविलेले मीटर ऑक्‍टोबर 2009 मध्‍ये बसविले होते. सदर मीटर संदर्भात वीज वितरण कंपनीने प्रत्‍यक्ष मीटर रिडींगनुसार देयके दिली नाहीत. म्‍हणून दिनांक 10.03.2010 रोजी गैरअर्जदाराकडे तक्रार देण्‍यात आली. परंतू गैरअर्जदाराने त्‍याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. त्‍याचप्रमाणे वीज वितरण कंपनीने चुकीचा ग्राहक क्रमांक व चुकीचा मीटर क्रमांक नमूद करुन देयके दिली होती. त्‍यानंतर पुन्‍हा त्‍यांनी दिनांक 03.05.2010 रोजी गैरअर्जदार वीज वितरण कंपनीला प्रत्‍यक्ष रिडींग प्रमाणे देयके देण्‍याबाबत विनंती केली. परंतू त्‍यानंतरही वीज वितरण कंपनीने कोणतीही कार्यवाही केली नाही. म्‍हणून गैरअर्जदार कंपनीच्‍या अधिका-याची प्रत्‍यक्ष भेट घेतली असता त्‍यांनी रुपये 25,000/- भरण्‍याबाबत दबाव आणला रुपये 25,000/- भरण्‍यात आले. त्‍यावेळी गैरअर्जदार कंपनीच्‍या अधिका-याने यापुढे योग्‍य वापराचे देयक देण्‍यात येईल असे सांगितले. परंतू दिनांक 04.02.2011 रोजी पुन्‍हा चुकीचे देयक देण्‍यात आले. अशा प्रकारे वीज वितरण कंपनीने चुकीची देयके देवून त्रुटीची सेवा दिली. म्‍हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, वीज वितरण कंपनीने त्‍यांना योग्‍य वापराची देयके देण्‍याबाबत आदेश द्यावा व नुकसान भरपाई द्यावी.
तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 2 (1) (ड) नुसार ग्राहक आहे काय ? आणि तक्रारदाराची तक्रार या मंचात चालू शकते काय ? असे प्राथमिक मुद्दे   सदर तक्रार दाखल करुन घेण्‍यासंदर्भात आमच्‍या समोर उपस्थित झाले. 
      तक्रारदाराने गैरअर्जदार महाराष्‍ट्र राज्‍य वीज वितरण कंपनीकडून अटोमोबाईल दुकानासाठी वीज जोडणी घेतलेली आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 2 (1) (ड) मधील व्‍याख्‍येनुसार व्‍यापारी कारणासाठी सेवा घेणारा ग्राहक या संज्ञेत बसत नाही. तक्रारदाराने अटोमोबाईलचे दुकान त्‍याच्‍या उपजिवीकेचे साधन असल्‍याचे म्‍हटले आहे. परंतू केवळ त्‍यामुळे तक्रारदार ग्राहकाच्‍या व्‍याख्‍येत बसू शकत नाही. तक्रारदाराने अटोमोबाईलचा व्‍यवसाय स्‍वंयरोजगारासाठी करीत असल्‍याचा उल्‍लेख तक्रारीमध्‍ये केलेला नाही. त्‍यामुळे कलम 2 (1) (ड) (ii) मधील व्‍याख्‍येनुसार तक्रारदार ग्राहक ठरत नाही. म्‍हणून तक्रारदाराची तक्रार या मंचात चालू शकत नाही.
      म्‍हणून खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येतो.
 
आदेश
 
1.      तक्रारदाराची तक्रार सुनावणीसाठी दाखल करुन न घेता फेटाळण्‍यात येते.
2.      तक्रारदारास आदेश कळविण्‍यात यावा.

HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBERHONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT ,