निकालपत्र :- (दि.17.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी वकिलपत्र कमी करीत असलेबाबतची पुरससि दाखल केली. तसेच, सामनेवाले हे गैरहजर आहेत. तसेच, तक्रारदारही गैरहजर आहेत. सबब, प्रस्तुतची तक्रार हे मंच गुणवत्तेवर निकाली काढीत आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांना त्यांच्या हॉटेल व्यवसायाकरिता सामनेवाला विद्युत कंपनीकडून विद्युत कनेक्शन घेतले आहे, त्याचा ग्राहक क्र.266511510597 असा असून मिटर क्र.8031020353 असा आहे. तक्रारदारांनी सामनेवाला विद्युत कंपनीकडे विद्युत देयके वेळोवेळी भरणा केलेली आहेत. सन 2007 मध्ये सदोष मिटर नं. 8031020353 तक्रारदारांना पूर्व सुचना न देता काढून नेले व दोष असलेले मिटर क्र.8031551605 सदरचे मिटर कनेक्शनला जोडला. त्यावर येणारे रिडींग सदोष येवू लागले. याबाबत सामनेवाला यांना कळविणेत आले. अशी वस्तुस्थिती असताना सामनेवाला यांनी रुपये 94,950/- इतक्या रक्कमा भरलेल्या आहेत. तरीही सामनेवाला यांनी दोषयुक्त मिटरमधूनच तक्रारदारांना बिल देत आहेत. मिटर दुरुस्तीबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे मानसिक-शारिरीक त्रासापोटी रुपये 1,25,000/-, सामनेवाला यांचे कार्यालयात हेलपाटे मारावे लागले त्याचे रुपये 6,300/-, तक्रारीचा खर्च रुपये 7,000/- व सध्याचा दोष असलेल्या मिटरऐवजी पूर्वीचा मिटर क्र. 8031020353 बसविणेचा आदेश व्हावा व देयके दुरुस्त करुन द्यावीत. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत वटमुखत्यारपत्र, सामनेवाला यांना दि.25.06.08, दि.06.09.08 रोजी दिलेले अर्ज, दि.20.02.07, दि.17.04.07, दि.19.07.07, दि.27.12.07, 04.02.08, दि.07.03.08 इत्यादी वीज बिलांच्या पावत्या, दि.03.04.08 रोजीची सामनेवाला यांनी वीज पुरवठा खंडित करणेबाबतची नोटीस, वालचंद कॉलेज यांचा टेस्ट रिपोर्ट इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला विद्युत कंपनीने तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, मिटर क्र. 8031020353 हा सदोष नव्हता. सदर मिटरवरील रिडींग पहाणेकरिता मिटर रिडर गेले असता सदर मिटरवरील टर्मिनल कव्हर नसलेचे दिसून आले. त्यामुळे सदर मिटर काढून दुसरे मिटर बसविले व पूर्वीचा मिटर प्रयोगशाळेत तपासला असता सदरचा मिटर 20 टक्के हळू फिरत असलेचे दिसून आलेने 6 महिन्याच्या फरकाचे बिल रुपये 23,880/- तक्रारदारांना पाठविले. त्यानंतर मिटरबाबत तक्रार आली असता सामनेवाला कंपनीने मिटर क्र.30804412 बसविला. सदर मिटरची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ओके रिपोर्ट आला. सामनेवाला यांनी त्यांच्या बिलाबाबत त्यांच्याकडील ग्राहक मंच यांचेकडे तक्रार केली. तसेच, विद्युत लोकपाल यांचेकडे अपीलही केलेले आहे. तक्रारदारांनी केलेले सदरचे अपील सुनावणी होवून नामंजूर केले आहे. तक्रारदारांनी बिलाबाबत कोणतीही रक्कम भरणा केलेली नाही. इत्यादीचा विचार करता तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ दि.27.03.07 रोजीचा टर्मिनल कव्हर बदलणेबाबत दिलेला आदेश, दि.04.04.07 रोजीचे अहवाल, दि.18.09.00 चे पत्र व फरकाचे बिल, दि.25.06.07 व दि.31.07.07 रोजीचा अर्ज, दि.03.08.07 रोजीचे मिटर तपासणीबाबतचे पत्र, दि.17.08.07 रोजीचे पत्र, दि.07.09.07 रोजीचा अहवाल, ग्राहक कक्षाचा नोव्हेंबर 07 चा आदेश, दि.29.12.07 रोजीचा अहवाल, दि.0.01.08 रोजीचा टेस्ट रिपोर्ट, दि.11.01.08 रोजीचा निकाल, दि.21.02.08 रोजीचे अपिल, विद्युत लोकपाल यांचेकडे तक्रारदारांनी केलेला अर्ज व निकाल, दि.03.04.08 रोजीचे सामनेवाला यांचे पत्र, खातेउतारा (सीपीएल्), थकबाकीसह रुपये 1,57,350/- चे बिल, दि.01.11.07 रोजीचा ग्राहक मंचाचा आदेश इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (6) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेल्या तक्रारीबाबत तक्रारदारांनी इलेक्ट्रिसिटी अक्ट 2003 मध्ये असलेल्या तरतुदीनुसार विद्युत कंपनीच्या ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केलेली आहे व त्याबाबत निकालही झालेला आहे. सदर निकालाविरुध्द तक्रारदारांनी विद्युत लोकपाल, मुंबई यांचेकडे अपिल दाखल केले होते. सदरचे अपिलामध्ये निकाल झालेला आहे. त्यानंतर तक्रारदारांनी सदरची तक्रार या मंचाकडे दाखल केलेली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 3 यातील तरतूद विचारात घेतली असता तक्रारीत उल्लेख केलेल्या तक्रारीबाबत उपरोक्त उल्लेख केलेप्रमाणे तक्रारदारांनी दाद मागितली आहे. त्यामुळे सदर तक्रारीबाबत पुन्ही या मंचात तक्रार दाखल करता येणार नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार चालणेस पात्र नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |