जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.2009/72 प्रकरण दाखल दिनांक – 23/03/2009. प्रकरण निकाल दिनांक – 29/07/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. योगाजी पि. हरी बहादूरे वय, 70 वर्षे, धंदा शेती, रा. क्रांती नगर, गणेश नगर कॉर्नर, नांदेड. अर्जदार विरुध्द महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी म. नांदेड मार्फत कार्यकारी अभिंयता, शहर वीभाग, नांदेड. गैरअर्जदार अर्जदारा तर्फे. - अड.जे.बी.क्ष्रिरसागर. गैरअर्जदारा तर्फे - अड.विवेक नांदेडकर. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार हे ग्राहक क्र.550010294487 या द्वारे गैरअर्जदार यांचेकडून विज पूरवठा ब-याच वर्षापासून घेतलेला आहे. फेब्रूवारी 2009 मध्ये एकदा रु.1,97,890/- चे अवास्तव विज बिल अर्जदार यांना देण्यात आले. सदरचे बिल हे यूनिट न तपासता दिले आहे. जे की अन्यायकारक आहे. त्यामूळे कमीत कमी विज बिल गैरअर्जदारांने देणे या करीता आदेश देणे गरजेचे आहे. गैरअर्जदारांनी कोणतीही नोटीस न देता दि.19.3.2009 रोजी पासून अर्जदाराचा विज पूरवठा बंद केला आहे. त्यामूळे त्यांचे कूटूंब सध्या अंधारात आहे. यापूर्वीही अर्जदाराने प्रकरण क्र.191/2006 द्वारे तक्रार केली होती. त्यांचा दि.28.12.2007 रोजी निकाल लागलेला आहे व अर्जदाराना सूधारित बिल दिलेले आहे व अर्जदार ते बिल भरण्यास तयार आहेत. अर्जदाराचे विज मिटर हे खराब झाले असून चूकीचे जास्तीचे बिल बदलून मिळणे आवश्यक आहे. चूकीचे व अवास्तव बिल रदद करण्यात यावे तसेच अर्जदारास नवीन विज मिटर देण्याचे आदेश करावेत व विज पूरवठा पूर्ववत सूरु करण्यात यावा. अर्जदारास झालेल्या मानसिक ञासाबददल रु.50,000/- गैरअर्जदारांनी दयावेत अशी मागणी अर्जदाराने केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. विजेचा वापर हा व्यावसायीक उपयोगासाठी आहे असा आक्षेप घेतलो आहे. अर्जदारास रु.1,97,890/- चे बिल फेब्रूवारी 2009 या महिन्यात देण्यात आले ते बिल बरोबर आहे व अर्जदारांना भरणे बंधनकारक आहे. गैरअर्जदाराने मिटरची रिंडीग घेऊन त्यानुसारच यूनिट दिलेले आहेत. मिटर न पाहता, न तपासता यूनिट लिहीले हे म्हणणे खोटे व चूकीचे आहे. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे दि.193.2009 रोजी विज मिटर बंद केले हे म्हणणे खोटे व चूकीचे आहे. अर्जदार म्हणतात की ते विज बिल भरण्यास तयार आहेत त्यांचे म्हणणे खोटे व चूकीचे आहे. अर्जदाराने विज बिल न भरुन प्रकरण दाखल केले आहे. मागील प्रकरणामध्ये विजेचे देयक दि.16.8.2006 रोजी दिले त्यांचा कालावधी नोव्हेबर 2005 ते सप्टेंबर 2006 इतका होता. अर्जदाराने प्रस्तूतचे प्रकरण फेब्रूवारी 2009 मध्ये बिलाप्रमाणे दाखल केलेले असल्यामूळे जून्या बिलाचा संबंध नाही. विज मिटर बदलून मिळावे हे त्यांचे म्हणणे चूकीचे आहे. अर्जदार यांनी यापूर्वी तक्रार 119/2006 ही तक्रार नोंदविली होती त्यांचा निकाल लागला त्यांस अनुसरुन सूधारित बिल दिले आहे. नोव्हेंबर 2005 ते सप्टेंबर 2006 या कालावधीतील भरलेली रक्कम रु.4470/- मानसिक ञासाबददल रु.1,000/- व तक्रारीचा खर्च रु.500/- असे रु.1500/- वजा करता उर्वरित देयकाची रक्कम रु.14,217/- चे बिल दोन हप्त्याचे अर्जदारास दिले होते त्यापैकी पहिला हप्ता दि.29.2.2008 रोजी व दूसरा हप्ता दि.30.3.2008 रोजी देयक होता त्यापैकी अर्जदाराने सूरवातीचा हप्ता भरला आहे व अजूनही दूसरा हप्ता भरला नाही. अर्जदाराने जाणीवपूर्वक ही रक्कम प्रलंबित ठेवलेली आहे. नोव्हेंबर 2008 ला अर्जदाराकडे रु.1,54,309/- ची थकबाकी होती व ती न भरल्याने विज कायदा 2003 च्या कलम 56 नुसार थकबाकीदार यांना नोटीस प्राप्त झाली ही नोटीस प्राप्त झाल्यानंतरही अर्जदाराने रक्कम भरली नाही. सबब या कारणास्तव विज पूरवठा दि.19.3.2009 रोजी तोंउला असे असताना अर्जदाराने दूस-याच्या घरातून मिटरमधून अनाधिकृत विज पूरवठा घेतला. या बाबत दि.24.3.2009रोजी अर्जदारास सूचना देण्यात आली व असे न करण्या बाबत सांगण्यात आले. अर्जदाराने विजेची थकबाकी न भरता विज पूरवठा घेण्याचा धडाका लावलेला आहे या कारणास्तव अर्जदाराचा अर्ज रु.10,000/- खर्चासह खारीज करावा अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय.अंशतः 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदाराचा तक्रार अर्ज पाहता गैरअर्जदार यांनी केलेली कारवाई ही विज कायदा 2003 कलम 56 नुसार दि.19.3.2009 रोजी विज पूरवठा खंडीत केला हे कायदयाचे दूष्टीकोनातून योग्य आहे. प्रकरणाकडे पाहिले असता अर्जदार हे डिफाल्टर आहेत व त्यांचा कल नियमित बिल भरण्याकडे राहीलेला नाही. याआधीही त्यांनी प्रकरण नंबर 191/2006 नोंदविली होती. त्यानुसार गैरअर्जदाराने बिल ही दिले व हप्ताही पाडून दिला.त्याप्रमाणे त्यांला दोन हप्ते पाडून दिले त्यापैकी एकच हप्ता अर्जदाराने भरला व दूसना हप्ता आजही भरलेला नाही.म्हणजे दर वेळेस वाद निर्माण करणे व बिल न भरणे असे अर्जदार यांचा ट्रेंड दिसून येतो तरी ही गैरअर्जदार यांचे देखील दिलेल्या विज देयकामध्ये चूक झालेली दिसून येते. म्हणून अर्जदाराची मागणी पूर्णतः गैर आहे असे म्हणता येणार नाही. गैरअर्जदार यांनी वेळोवेळी अर्जदाराना नोटीस दिलेल्या आहेत., बिल दिलेले आहेत ते अर्जदाराना मान्यही आहे परंतु माझीच रक्कम गैरअर्जदाराकडे नीघते असा अर्जदाराचा यूक्तीवाद आहे. शेवटी नोटीस गैरअर्जदारानी दि.19.11.2008 रोजी दिली. अर्जदाराने देखील त्यांचे आजूबाजूला असलेल्या नऊ लोकांचा विज पूरवठा खंडीत करावा अशी मागणी केली आहे, असे अर्जदार यांना करता येणार नाही. त्यांनी स्वतः पूरतेच मर्यादित तक्रार केली पाहिजे. विजेचे कनेक्शन कापल्यानंतर अर्जदारांनी बाजूचे घरातून अनाधिकृतपणे विज घेतल्याचे दिसून येते. गैरअर्जदारांनी त्यांना सूचना देऊन समजही दिली आहे. असे करणे हे गैरकायदेशीर आहे. शेवटी गैरअर्जदार यांनी शेवटचे बिल दि.2.7.2009 रोजी दिले आहे. ते बिल रु.2611.25 असून त्यात मागील थकबाकी रु.1,76,364.51 व व्याजाची थकबाकी रु.40,738.15 म्हणजे एकूण रु.2,19,680/- अर्जदाराकडून येण्याचे बाकी आहे असे म्हटले आहे. हे बिल चूक असून अर्जदाराने मिटर रिंडीग न घेता मनाने बिल दिले आहे अशी अर्जदार यांची तक्रार आहे. यासाठी गैरअर्जदार यांनी 2004 पासून 2009 चे सीपीएल दाखल केलेले आहे. हया वादासाठी सीपीएल बारकाईने पाहणे आवश्यक होते. अर्जदाराची तक्रार क्र.191/2006 यामध्हये गैरअर्जदारानी नोव्हेंबर 2005 ते सप्टेंबर 2006 या कालावधीचे 3509 यूनिटचे बिल देण्यात यावे असे आदेश झालेले आहेत. त्यामूळे आता 2004 पासून सप्टेंबर 2006 पर्यत मागे जाऊन सीपीएल बघण्याची गरज नाही. ऑक्टोबर 2006 पासून सीपीएल पाहिले असता ऑक्टोंबर 2006 ते एप्रिल 2009 या 30 महिन्यासाठी विजेचा वापर मिटर रिंडीग प्रमाणे Oct. 2006 consumption units 72, Nov.2006 2624 Dec.2006 123, Jan.2007 1234 Feb.2007 1547 March,2007 1325 April,2007 2769 May2007 average 1156 June,2007 average locked 1156 July 2007 average locked 1156 August 2939 Sept. 01 Oct. 113 Nov.07 Faulty average 516 Dec. faulty -“- 516 Jan.08. faulty -“- 516 Feb.. 08 faulty -“- 516 March. Meter change 516 April. –“- 516 May Meter change 2326 June 908 July 820 Aug 959 Sept 1032 Oct. 1503 Nov. 1033 Dec.08 1583 Jan.09 1107 Feb. 1147 March, 09 1191 ----------------------------------------------------- Total 32913 -------------------------------------------------------- सर्व मिळून 32913 यूनिट वापर झालेला दिसून येतो. यानंतर पूढे एप्रिल 2008 पासून मागील रिंडीग घेऊन जो विजेचा वापर दर्शविण्यात आला आहे त्यात सरासरी घेतलेल्या यूनिटचे वापस क्रिडीट देण्यात आलेले आहे.क्रिडीट फक्त रक्कमेमध्ये जूलै 2007 ला 13884.94 व मे 2008 ला अडजेस्ट 5585 असे दाखवलेले आहे. आता सरासरी लॉकंड यूनिट कमी केल्यामुळे ते विचारात घेतले नाही. यानंतर गैरअर्जदारानी म्हटल्याप्रमाणे अर्जदाराचा विज पूरवठा दि.19.3.2009 रोजी बंद करण्यात आलेला आहे. जी रिंडीग लॉकंड व मिटर चेंज दाखवून सरासरी यूनिट दाखवीले आहेत ते विचारात घेतले नाही. असे यूनिट 4472 यूनिट कमी केले आहेत. कारण नंतर Actual Reading मध्ये ते आलेले आहेत. मार्च मध्ये जर विज पूरवठा बंद केला तर सीपीएल मध्ये पाहिले असता एप्रिल 2009 मध्ये विज वापर हा 1128 यूनिट दाखविण्यात आलेला आहे हि चूक आहे. लॉकड व मिटर चेंज सरासरी अशी एकूण सरासरी व बिलाचे चूकीचे यूनिट यांची बेरीज केली असता ती 4472 यूनिट येते. जून 07 लॉकड एव्हरेज 1156 जूलै 07 लॉकड -“- 1156 मार्च,08 मिटर चेंज एव्हरेज 516 एप्रिल08 मिटर चेंज एवहरेज 516 एप्रिल 09 डिसकनेक्ट 1128 --------------- एकूण 4472 ----------------- ऑक्टोंबर 2006 ते एप्रिल 2009 या 30 महिन्यातील विजेचा वापर 28441 यूनिट होतो. 28441 यूनिटचे बिज बिल गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिले पाहिजे. 28441 यूनिट यांचा जो काही विजेचा दर असेल त्याप्रमाणे अधिक इतर आकारासह आकारुन त्यांची एकूण किती रक्कम होते ती काढणे. आलेली एकूण रक्कम यात नोव्हेबर 2005 ते सप्टेबर 2006 या कालावधीसाठी दिलेले रु.14216/- चे बिल हे ही अड करण्यात यावे. या एकूण रककमेतून अर्जदाराने जी रक्कम गैरअर्जदाराकडे सीपीएल प्रमाणे जमा दाखवलेली आहे. सीपीएल प्रमाणे खालील जमा रक्कम 11.06.2006 2800 10.10.2006 6000 28.12.2006 5000 23.01.2007 6000 17.03.2008 7108 ------------ एकूण 26908 ------------ ती रु.26,908/- यातून कमी करण्यात यावे व नेट रक्कमेचे विज बिल जे काही होईल ते अर्जदारास दयावे व ते बिल अर्जदाराने भरावे. अर्जदार यांनी सांगितलेली रक्कम पुराव्याअभावी मान्य करता येणार नाही. ऑक्टोबर 2006 ते एप्रिल 2009 उदा. 28441 यूनिट x यूनिट रेट = + इतर आकारासह एकूण ---------- अड 2005-06 आदेशाप्रमाणे एकूण बिल + रु.14216/- जमा रक्कम कमी करुन येणारे एकूण बिल रु.26908/- वरील बाब पाहता गैरअर्जदार यांनी चूक यूनिट दर्शविले आहे तेथे सरासरी यूनिट दाखवीले आहे. दिलेले विज बिल दूरुस्तीनंतर कमी होईल. म्हणजेच गैरअर्जदार यांचे सेवेत ञूटी आहे हे सिध्द होते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 2. दि.02.07.2009 चे देयक रदद करण्याचे आदेश. 3. हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदारांनी अर्जदार यांना ऑक्टोंबर 2006 ते एप्रिल 2009 या 30 महिने कालावधीचे 28441 यूनिट विज वापर लक्षात घेऊन त्यावेळेच्या यूनिट रेटप्रमाणे व इतर आकारासह दूरुस्तीचे देयक तयार करावे यात वर्ष 2005-06 चे विज देयक रु.14,216/- हे अड करावे, एकूण विज देयक दूरुस्त विज देयक अर्जदारांना दयावे. अर्जदाराने दि.11.7.2006 ते 17.3.2008 या कालावधीत सीपीएल प्रमाणे जमा दाखवलेली रक्कम रु.26908/- ते बिलामध्ये समायोजीत करण्यात यावी. 4. मिटर चांगले असल्यामूळे ते बदलण्या बददल आदेश नाही. 5. यात दोन्ही पक्षाची चूक असलयाकारणाने दावा खर्च ज्यांचा त्यांनी आपआपला सोसावा. 6. मानसिक ञासाबददल आदेश नाही. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |