जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 233/2008. प्रकरण दाखल तारीख - 27/06/2008 प्रकरण निकाल तारीख - /11/2008 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य परसराम गणपतराव कोल्हे वय, 50 वर्षे धंदा शेत अर्जदार रा. धानोरा ता. हदगांव जि. नांदेड विरुध्द. कार्यकारी अभिंयता मार्फत महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि गैरअर्जदार हदगांव (आष्टी विभाग) ता हदगांव जि. नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड. सी.डी. इंगळे गैरअर्जदार तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार विज वितरण कंपनी यांनी सेवा न दिल्या बददल अर्जदाराने खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांनी धानोरा येथे दि.8.4.1999 रोजी केशव शंकर कलाणे यांच्याकडून घर विकत घेतले व त्यांचे घरात विज पूरवठा नसल्याने गैरअर्जदार यांच्याकडे दि.5.3.2008 रोजी विज पूरवठा मिळण्यासाठी अर्ज केला. त्यासाठी त्यांने सर्व कागदपञ, ग्रामपंचायत धानोरा यांचे ना हरहकत प्रमाणपञ, कर भरलेली पावती इत्यादी सर्व आवश्यक कागदपञ गैरअर्जदार यांना दिले. अर्जदार हा गैरअर्जदार यांना कोटेशन दिले असते तर त्यांची भरण्याची तयारी आहे. त्यांना ग्रामपंचायत धानोरा अंतर्गत त्यांचे घर नंबर 3 यांला विज पूरवठा पाहिजे आहे. गैरअर्जदारांनी अत्यावश्यक असे विज पूरवठा न केल्यामूळे त्यांचे अत्यंत हाल होत आहेत. अर्जदार यांची विनंती आहे की, विज पूरवठा करण्यासाठी गैरअर्जदारांना आदेशीत करावे व झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक ञासाबददल रु.50,000/- नूकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांचा पहिला आक्षेप असा आहे की, अर्जदार हा त्यांचा ग्राहक झालेला नाही त्यामूळे त्यांना अशी तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. अर्जदारांनी केलेली तक्रार ही वैयक्तीकरित्या श्री. अशोक नरवाडे यांचे नांवाने केलेली आहे व हे अधिकारी कार्यकारी अभिंयता नसून सहायक अभिंयता आहेत. त्यामूळे अर्जदाराचा अर्ज हा चूकीचा आहे.विज कायदा कलम 138 अन्वये वैयक्तीक नावांने तक्रार करता येत नाही. अर्जदाराने दि.5.3.2008 रोजी विज पूरवठयासाठी अर्ज दिला हे म्हणणे चूकीचे आहे. अर्जदाराने नऊ वर्ष कोणत्या कारणासाठी वाट पाहिली यांचा उलगडा केलेला नाही. ग्रामपंचायत धानोरा यांनी विज पूरवठा घेण्यासाठी नाहरकत प्रमाणपञ दिले यांचा प्रस्तूत प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. अर्जदाराने ज्या घरासाठी विज पूरवठा घेतला आहे त्या घरामध्ये यापूर्वी केशव कलाणे यांचे नांवाने विज कनेक्शन देण्यात आले होते व त्यांचेवर त्या मिटरची थकबाकी रु.5840/- न भरल्यामूळे विज पूरवठा खंडीत करण्यात आला आहे. अर्जदार यांनी सदर रक्कम भरण्यास तयारी असल्या बददल दि.18.3.2008 रोजी गैरअर्जदार यांना लिहून दिले होते परंतु त्यांनी थकबाकीची रक्कम अद्यापही भरली नाही. ज्या इमारतीमध्ये विज जोडणी बाबत थकबाकी असेल त्यांस विज पूरवठा परत करता येत नाही. अर्जदार यांचा अर्ज त्यामूळे चूकीचा आहे. गैरअर्जदार हे त्यांना विज पूरवठा थकबाकी भरल्याशिवाय देऊ शकत नाहीत. अर्जदाराने दि.12.3.2008 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून व त्यांचे उत्तर दिले नाही हे त्यांचे म्हणणे चूकीचे आहे. अर्जदाराचा अर्ज चूकीचा असल्याकारणाने तो खर्चासह फेटाळावा अशी मागणी केली आहे. अर्जदाराने पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. अर्जदारानी दाखल केलेला दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदसार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय होय. 2. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय अंशतः 3. काय आदेश अंतिम आदेशप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे विज पूरवठा मिळण्यासाठी मागणी करताना त्यांचेकडे ऐवन फॉर्म धानोरा तील घर नंबर 3 जे की अर्जदाराच्या नांवे आहे,यासाठी ग्रामपंचायतचे नाहरकत प्रमाणपञ, या घरा संबंधी भरलेली कराची पावती इत्यादी कागदपञ दाखल केलेली आहेत. यासोबत पूरावा दि.5.3.2008 रोजी कार्यकारी अभिंयता हदगांव यांना पञ लिहून 1999 रोजी घराची सौदा चिठठी त्यांचे नांवाने झालेली असून 1999 पूर्वीची त्या घराची थकबाकी ते भरण्यास ते तयार आहेत असा अर्ज दिलेला आहे. त्यासोबत घरामध्ये मिटर घेण्यासाठी लागणारे शपथपञ हे ही दाखल केले आहे. थोडक्यात विज पूरवठा घेण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपञे त्यांनी गैरअर्जदार यांना दिलेली आहेत. गैरअर्जदार यांचे लेखी म्हणण्यात प्रथम आक्षेप असा आहे की, ते त्यांचे ग्राहक नाहीत. परंतु विज पूरवठा करणारी कंपनी ही एकच आहे व त्याशिवाय दूसरे कोणतीही कंपनी विज पूरवठा करु शकत नाही असे असताना ग्राहक न झालेलया एखादयाची विज पूरवठा घेण्याची तयारी असेल तर त्यांने सर्व कागदपञाची पूर्तता केली असेल तर अशा स्थितीत ते भविष्यातील होणारे ग्राहक असे समजून गैरअर्जदार यांनी कोटेशन दिले पाहिजे व ते कोटेशन गैरअर्जदाराने दिले नसेल व गैरअर्जदार विज पूरवठा केला नसेल तर ते भविष्यातील होणारे ग्राहक असे म्हणून गैरअर्जदार यांचे ग्राहक होतील व यासाठी 2004 (1) सीपीजे 369 मा. राज्य आयोग, पश्चिम बंगाल यांचे C.E.S.C. limited Vs. Sri. Mohit Kumar Banerji यांनी दि.31.12.2003 रोजी दिलेला नीर्णय लक्षात घेता येईल. यांत, (i) Consumer Protection Act, 1986 section 2(1)(d) --- Consumer—Complainant made an application for installation of new meter/connection in his premises—Whether complainant is a consumer till connection is sanctioned & supplied ? Yes. म्हणून अर्जदार हे ग्राहक होतात. म्हणून मूददा क्र. 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. मूददा क्र. 2 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे तक्रार करताना ती वैयक्ती नांवाने केलेली आहे असा गैरअर्जदार यांचा आक्षेप आहे. त्यांचा आक्षेप ग्राहय धरुन आम्ही असे ठरवित आहोत की, अर्जदार यांनी वैयक्तीक नांवाने तक्रार करता येणार नाही. परंतु अर्जदार यांनी दिलेल्या प्रतिउत्तरामधील त्यांचे म्हणण्यातील खोडले असता असे दिसून येते की, त्यांची वैयक्तीक अशी श्री. अशोक नरवाडे यांचे विरुध्द तक्रार नाही. परंतु ते त्या पदावर असल्याकारणाने त्यांनी त्यांचे नांव लिहीले त्यात हेतूपूरस्कर त्याचे विरुध्द तक्रार करण्याचा त्यांचा उददेश नव्हता. अर्जदारांनी हे मान्य केल्यामूळे गैरअर्जदार श्री. अशोक नरवाडे यांचे नांव हे वैयक्तीक असल्याकारणाने काढण्यात येते. व कंपनीमार्फत पदनामाने इतकाच गैरअर्जदार यांचा उल्लेख करण्यावीषयी निर्णय देण्यात येतो. दूसरा आक्षेप सदर अधिकारी हे कार्यकारी अभिंयता नसून सहायक अभिंयता या पदावर आहेत असे म्हटले आहे व या कंपनीतर्फे कार्यकारी अभिंयता या पदनामाने तक्रार दाखल केलेली आहे ती कायम ठेवण्यात येते. अर्जदारानी ऐवन फॉर्म धानोरा येथील घर नंबर 3 जे की त्यांचे नांवावर असल्याचा उल्लेख केलेला आहे, त्यांचे भरलेलया घराचे कर पावती यावरुन त्यांचे घरातील मालकी सिध्द होते. ग्रामपंचायत धानोरा यांचा अर्जदार यांचे नांवाने घर नंबर 3 बददलचे विज पूरवठा करण्या बददलचे नाहरकत प्रमाणपञ दाखल केलेले आहे. याचा अर्थ अर्जदाराने सर्व कागदपञाची पूर्तता केलेली आहे, फक्त त्यांनी आपले लेखी म्हणणे म्हटले आहे की, त्या घरावर केशव कलाणे यांचे नांवे रु.5840/- थकबाकी आहे व ती त्यांनी न भरल्या कारणाने त्यांचा विज पूरवठा खंडीत करण्यात आलेला होता. अर्जदाराने ती थकबाकीची रक्कम भरल्यास गैरअज्रदार विज पूरवठा देण्यास तयार आहेत असे म्हटले आहे. दि.27.3.2008 रोजी केशव कलाणे धानोरा यांचे नांवाने रु.5840/- थकबाकी दाखवणारे बिल गैरअर्जदाराने दाखल केलेले आहे त्यावर P D arrears bill old P.I. nal for reconnection असा शेरा मारलेलाक आहे. कागदपञावरुन असे दिसून येते की, अर्जदाराने जे घर विकत घेतले त्यावर थकबाकी आहे पण ती केव्हापासून आहे यांचा उल्लेख नाही.शिवाय दि.5.3.2008 रोजी अर्जदार यांनी कार्यकारी अभिंयता यांचे नांवाने दिलेल्या अर्जात दि.8.4.1999 पूर्वीचे विज बिल मी भरण्यास तयार आहे असा लेखी अर्ज दिलेला आहे म्हणजे थकबाकी भरण्याचे मान्य केलेले आहे व ही थकबाकी त्यांनी भरली असती तर त्यांना हयापूर्वीच विज पूरवठा मिळालाही असता. अर्जदाराने घर 1999 रोजी विकत घेतलेले आहे, 1999 पासून 2008 पर्यत म्हणजे तब्बल 9 वर्ष त्यांनी विज पूरवठा का घेतला नाही किंवा त्यांना त्यांची का गरज पडली नाही यांचा उल्लेख आपल्या तक्रार अर्जात केलेला नाही व सोबत थकबाकी त्यांनी घर विकत घेतल्यानंतरची जरी असली तरी त्यांना ते मिटर त्यांचे नांवावर ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज केला नाही. याउलट त्यांने दिलेल्या ऐवन फॉर्म नुसार 2008 मध्ये विज पूरवठा घेण्यासाठी अर्ज दिलेला आहे. म्हणजे विज पूरवठा काही दिवस अर्जदाराने वापरला व ही त्यांचेवरही थकबाकी असू शकते व घर अर्जदाराने विकत घेतले तर त्यावेळेस घरावरचा वेगवेगळा बोजा हे सर्वस्वी पाहण्याची जबाबदारी त्यांची आहे व बोजा असेल तर व तेवढी रक्कम कमी करुन त्यांना ती देता आली असती. अशा परिस्थितीत थकबाकी कधीची आहे हे नक्की ठरु शकत नाही व अर्जदार यांनी थकबाकी भरल्याची तयारी दर्शविली असेल तर त्यांने ती भरुन टाकावी. येथे ऐवन फॉर्म सोबत आवश्यक असणारा टेसट रिपोर्ट गैरअर्जदार यांचेकडे दिलेला दिसून नाही. त्यांची पूर्तता त्यांनी करावी. 2004 (1) सीपीआर 369 मा. राज्य आयोग, पश्चिम बंगाल यांचे केस लॉ प्रमाणे, (iii) Consumer Protection Act, 1986—Sections 12 & 17 –Complainant applied for electricity connection/meter in his premises—Demand of Opp. Party to clear outstandidng dues in respect of said premises in name of previous consumer—Whether complainant was liable to pay outstanding dues of an erstwhile tenant in that premises in question ? No. हे जरी असले तरी वर चर्चा केल्याप्रमाणे ही थकबाकी पूर्वीच्याच मालकाची होती हे सिध्द होत शकत नाही. परंतु याउलट अर्जदार यांनी त्या घरावर थकबाकी नीघाल्यास थकबाकी भरण्याची तयारी दर्शविली असल्याने तक्रारदाराने प्रस्तूत प्रकरणा संबंधी केस लॉपेक्षा वेगळे आहे. म्हणून हया प्रकरणास हा केस लॉ लागू होणार नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2. श्री. अशोक नरवाडे यांचे वैयक्तीक नांव या प्रकरणातून वगळण्यात यावे. 3. गैरअर्जदार यांनी त्यांचेकडे उपलब्ध असलेला ऐवन फॉर्म व कागदपञानुसार धानोरा अर्जदार यांचे नांवे असलेले धानोरा येथील घर नंबर 3 ला घरगूती विज कनेक्शन घेण्यासाठी कोटेशन दयावे तत्पूर्वी त्या घरावर असलेली थकबाकी रु.5840/- अर्जदार यांच्याकडून भरुन घ्यावी व त्यानंतर ताबडतोब गैरअर्जदारांनी त्यांचा विज पूरवठा दयावा. 4. गैरअर्जदार यांना मानसिक ञासाबददल आदेश नाही. 5. दावा खर्च ज्यांचा त्यांनी आपआपला सोसावा. 6. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |