जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.232/2008. प्रकरण दाखल दिनांक – 27/06/2008. प्रकरण निकाल दिनांक –04/08/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे अध्यक्ष मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. मा.श्री.सतीश सामते सदस्य. श्री.प्रकाश नारायणराव मुपडे, अर्जदार. वय वर्षे 30, व्यवसाय शेती, रा.तुप्पा ता.जि.नांदेड. विरुध्द. 1. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, गैरअर्जदार. तर्फे कार्यकारी अभियंता, विद्युत भवन,नवामोंढा, नांदेड. 2. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कनिष्ठ अभियंता, वाजेगांव युनिट, वाघाळेकर पेट्रोल पंपाजवळ,धनेगांव ता.जि.नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.बी.एस.शिंदे. गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - - निकालपत्र (द्वारा,मा.श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे,अध्यक्ष) यातील अर्जदार प्रकाश नारायणराव मुपडे यांची थोडक्यात तक्रार म्हणजे ते दोन म्हशी व दोन बैल घेऊन दि.07/01/2008 रोजी बाबुभाई खैराती यांच्या शेतातुन जात असतांना विद्युत खांबावरील तुटलेले विद्युत तार जमीनीवर लोळत पडल्याने व म्हशीचे त्या जिवंत तारेशी संबंध आल्याने अपघातातुन त्यांची म्हैस जागीच मरण पावली. याबाबत तक्रार केली, चौकशी झाली विद्युत मंडळाला त्यांनी नोटीस दिली आणि शेवटी नुकसान भरपाई मिळावी म्हणुन ही तक्रार दाखल केली. तक्रारीचे स्वरुप पाहता प्राथमिक सुनावणीसाठी ठेवण्यात आली मात्र वेळोवेळी संधी देऊनही अर्जदार वा त्यांचे वकील हजर झाले नाही म्हणुन सदरचे प्रकरण आज रोजी आदेशासाठी ठेवण्यात आले होते. मात्र आजही कोणीही उपस्थित नाहीत. यातील अर्जदार विद्युत मंडळाचे तक्रारीत नमुद परिस्थितीत ग्राहक ठरत नाहीत आणि म्हणुन हे प्रकरण या मंचास चालविण्याचा अधिकार क्षेत्र नाही. यास्तव तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. म्हणुन आदेश खालील प्रमाणे पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यत येते. 2. अर्जदार अन्य न्यायालयात योग्य ती दाद मागु शकेल, त्याचे अधिकार अबाधीत ठेवण्यात येतात. 3. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंह नारायणसिहं राणे) (श्रीमती सुजाता पाटणकर)(श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार, लघुलेखक. |