(घोषित दि. 24.08.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) वीज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तक्रारदार ही बँक असुन त्यांनी गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून वीज जोडणी घेतलेली आहे. त्यांचा वीज वापर प्रति माह कमी अधिक प्रमाणात सारखाच असतो. वीज वितरण कंपनीने देयकामध्ये मीटरचा फोटो छापणे आवश्यक असते. परंतू गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने जानेवारी 2010 हा महिना सोडता इतर महिन्यातील देयकांवर मीटर रिडींग बाबत फोटो छापला नाही. त्यामुळे मीटर रिडींग योग्य आहे किंवा नाही हे कळू शकत नाही. वीज वितरण कंपनीने जानेवारी 2010 ते सप्टेबर 2010 या कालावधीत दिलेले देयक भरण्यात आले. परंतू ऑक्टोबर 2010 मध्ये वीज वितरण कंपनीने अचानक 3,302 युनिट वीज वापर दर्शवून रक्कम रुपये 30,980/- चे देयक दिले. सदर देयक अवाजवी असल्यामुळे त्याबाबत वीज वितरण कंपनीकडे तक्रार देण्यात आली. परंतू वीज वितरण कंपनीने देयक दुरुस्त करुन दिले नाही आणि दिनांक 30.01.2011 रोजी कोणतीही पुर्व सूचना न देता बँकेचा वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे बँकेच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला. म्हणून बँकेने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीला कायदेशीर नोटीस पाठविली. परंतू वीज वितरण कंपनीने खोटे उत्तर पाठवून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. म्हणून तक्रारदार बँकेने अशी मागणी केली आहे की, वीज वितरण कंपनीने ऑक्टोबर 2010 मध्ये दिलेले देयक रद्द करुन दुरुस्त देयक देण्याचे आदेश करुन नुकसान भरपाई द्यावी. तक्रारदार बँकेची तक्रार पाहता असा प्रश्न उपस्थित झालेला आहे की, तक्रारदार “बँक” ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 2 (1) (ड) प्रमाणे ग्राहकाच्या व्याख्येत बसते काय ? तक्रारदार बँकेच्या वतीने अड. के.ए.भालेकर यांनी युक्तीवाद केला. त्यांचे म्हणणे असे आहे की, बँकेने वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा घेतलेला असल्यामुळे बँक वीज वितरण कंपनीची ग्राहक आहे. म्हणून ही तक्रार या मंचात चालू शकते. तक्रारदार बँक ही बँकींगचा व्यवसाय करते. ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 2 (1) (ड) (ii) मध्ये ग्राहकाची व्याख्या देण्यात आलेली असुन, जी व्यक्ती किंवा संस्था व्यापारी कारणासाठी सेवा घेते त्या व्यक्ती अथवा संस्थेचा सदर ग्राहकाच्या व्याख्येमधे समावेश होत नाही. तक्रारदार बँक ही व्यापारी संस्था असुन त्यांनी गैरअर्जदार वीज वितरण कंपनीची सेवा व्यापारी कारणासाठीच घेतलेली आहे. त्यामुळे बँक ग्राहकाच्या व्याख्येत बसू शकत नाही. म्हणून बँकेची तक्रार या मंचात चालू शकत नाही. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश तक्रारदार बँकेची तक्रार सुनावणीसाठी दाखल करुन न घेता फेटाळण्यात येते.
| HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | HONABLE MRS. Rekha Kapdiya, MEMBER | |