Maharashtra

Nanded

CC/10/167

Govind Dattarya Bidvai - Complainant(s)

Versus

Ex.Engieer.MSED.Co.Lit - Opp.Party(s)

ADV.Sandeep Agrawal

14 Oct 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/167
1. Govind Dattarya Bidvai R/o.Tarodo Dist.NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Ex.Engieer.MSED.Co.Lit NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE President B.T.Narwade ,PRESIDENTHON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,MEMBERHON'BLE MR. Member Mr. S. J. Samte ,MEMBER
PRESENT :

Dated : 14 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

 

 

 
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :- 2010/167
                    प्रकरण दाखल तारीख -    16/06/2010     
                    प्रकरण निकाल तारीख     14/10/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
        मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख.           -   सदस्‍या
                मा.श्री.सतीश सामते.               - सदस्‍य
 
1.   गोविंद पि.दत्‍तात्रय बिडवई, वय 30 वर्ष,धंदा-व्‍यापार.
रा.विठठलनगर,तरोडा बु. ता.जि. नांदेड.                 अर्जदार.
2.   आशिष पि.प्रभाकर मुंडे, वय 32 वर्षे,
 धंदा व्‍यापार.रा.वामननगर,नांदेड.
3.   ययाती पि.प्रभाकर मुंढे,वय 29 वर्ष धंदा व्‍यापार. रा.वामननगर,नांदेड.
 
      विरुध्‍द.
 
1.   महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्या,
     तर्फे कार्यकारी अभियंता, विद्युत भवन,नवा मोंढा,         गैरअर्जदार
     नांदेड.
2.   महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्या,तर्फे
     कनिष्‍ठ अभियंता, झोन क्र.3 नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील         -   अड.स.रा.अग्रवाल.
गैरअर्जदारां तर्फे वकील       -   अड. व्हि.व्हि.नांदेडकर.
 निकालपत्र
 (द्वारा- मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
     अर्जदाराचे कैलासनगर येथील स्थित सिटी सर्व्‍हे क्र.8381 पैकी दुकान ज्‍याचा मनपा क्र.1-17-858 आहे. सदरील दुकान हे अर्जदार क्र.2 व 3 यांच्‍या मालकीची आहे. अर्जदार क्र.1 हे या दुकानात दि.01/11/2005 पासुन भाडयाने राहतात. अर्जदार क्र.1 या दुकानात दि.01/11/2005 पासुन सप्‍तगीरी ज्‍युस बार अण्‍ड आईस्‍क्रीम पार्लर या नावाने दुकान चालवितो. दि.01/11/2005 पुर्वी पासुन गैरअर्जदार विद्यतु कंपनीचे मिटर क्र.550011006485 बसविले आहे. दुकानातील वस्‍तुचा खप हा मुख्‍यतः उन्‍हाळयात म्‍हणजेच मार्च, एप्रिल, मे व जुन या चार महिन्‍यात चालतो. गैरअर्जदाराने सदर दुकानात बसविलेला विद्युत मिटर हा हा जास्‍त गतीने चालत आहे सदरील बाब गैरअर्जदारास वेळोवेळी निदर्शनास आणून दिली आहे. गैरअर्जदारास दि.20/11/2009 रोजी पत्र लिहून तक्रार केली व मिटर चेक करावयाचे रु.300/- भरण्‍यास सुचविण्‍यात आले व दि.29/11/2009 रोजी गैरअर्जदाराकडे रु.300/- चा भरणा केला व मिटर टेस्‍टींगसाठी टेस्‍ट युनिट युसीआर डिव्‍हीजनकडे पाठविला. दि.15/02/2010 रोजी मिटरचा टेस्‍टींग रीपोर्ट दिला व त्‍यामध्‍ये मिटर हा Abnormal Fast असल्‍या बाबतचा अभिप्राय दिला. याबाबत गैरअर्जदारास विचारले असता, एखादा मिटर जर वाजवी पेक्षा दुपटीने किंवा त्‍या पेक्षाही जास्‍त पळत असेलत तर त्‍या बाबतचा अभीप्राय हा Abnormal Fast असा देण्‍यात येतो. मिटर हा किती फास्‍ट आहे हया बाबतचे अहवाल मागीतला असता, सदर अभिप्राय गोपनीय असल्‍यामुळे देण्‍यास नकार दिला. गैरअर्जदाराने जुलै 2008 ते नोव्‍हेंबर 2009 या सतरा महिन्‍याच्‍या कालावधी करीता अर्जदाराकडुन रु.1,35,680/- रुपयाचे विद्युत देयक देवुन वसुल केले. विद्युत मिटर हा दुपटी पेक्षा जास्‍त धावत असल्‍या कारणने अर्जदार क्र. 1 ने रु.67,840/- परत मिळण्‍या बाबत मागणी केली. गैरअर्जदार हे बिलाची वसुलीसाठी दबावतंत्राचा वापर करीत असुन बिल न भरल्‍यास अर्जदार क्र.1 चा विद्युत पुरवठा खंडीत करण्‍याची धमकी देत आहे. त्‍यामुळे गैरअर्जदारास विद्युत पुरवठा खंडीत करण्‍यापासुन पाबंद करण्‍यात यावा. अर्जदार क्र. 2 व 3 हे गैरअर्जदार कंपनीचा ग्राहक असल्‍या कारणाने व अर्जदार क्र. 1 हा बेनिफीशरी असल्‍यामुळे प्रस्‍तुतचा वाद ग्राहक वाद आहे. म्‍हणुन अर्जदाराची मागणी आहे की, गैरअर्जदारांनी अर्जदार क्र. 1 कडून माहे जुलै 2008 ते नोव्‍हेंबर 2009 या कालावधी मध्‍ये जास्‍तीच्‍या आकारलेले विद्युत देयक रु.67,840/- ही रक्‍कम 18 टक्‍के व्‍याजाने परत करण्‍याचे आदेश करावे. अर्जदारास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- दावा खर्च म्‍हणुन रु.10,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत.
      गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे वकीला मार्फत दाखल केले. त्‍यांचे म्‍हणणे असे की, गैरअर्जदाराने अर्जदाराचे विज देयक दुरुस्‍त करुन दिले आहे त्‍यामुळे आता या प्रकरणांत अर्जदाराने केलेली मागणी चुक असून ती मान्‍य करण्‍या जोगी नाही. अर्जदार क्र. 1 यांचा या प्रकरणांशी ग्राहक या नात्‍याने कोणताही संबंध नाही. मुळ विजेचा मीटर अर्जदार क्र. 2 यांच्‍या नांवे दिलेले होते. अर्जदार क्र. 3 यांना कोणताही विज पुरवठा गैरअर्जदारांनी केलेला नाही. प्रकरण दाखल करायचे असेल तर ज्‍या जागेमध्‍ये विज पुरवठा देण्‍यात आला होता त्‍या जागेचा मनपा क्र.1-10-674 असा होता व अर्जदाराने दाखल केलेल्‍या तथाकथीत इमारतीचा मनपा क्र.1-17-854 असा आहे. त्‍यामुळे या दोन्‍हीही मालमत्‍ता भिन्‍न आहेत. अर्जदार हे तथाकथीत विज जोडणीचा वापर व्‍यवसायीक उपयोगासाठी करतात. सदर दुकानात दि.01/11/2005 पुर्वीपासुन गैरअर्जदार विद्युत कंपनीने विद्युत मिटर बसविलेला आहे व त्‍याचा ग्राहक क्र.550011006485 असा आहे. दुकानातील वस्‍तुचा खप हा चार महीन्‍यातच असतो हे म्‍हणने चुकीचे आहे. अर्जदार क्र. 1 ने सदर दुकान किरायाने घेतल्‍यापासुन त्‍यांच्‍या असे निदर्शनास आले की, सदर दुकानात गैरअर्जदाराने बसविलेला विद्युत मीटर हा जास्‍त गतीने चालत आहे त्‍यामुळे रिंडींग जास्‍त दाखवित आहे हे म्‍हणने चुकीचे आहे. सदरचा वापर प्रत्‍यक्षरित्‍या झालेला असल्‍या कारणाने त्‍यानुसार दिलेली बिले बरोबर आहेत. गैरअर्जदाराच्‍या मीटर टेस्‍टींग डिव्‍हीजनने दि.15/02/2010 रोजी सदर मीटरचा टेस्‍टींग रिपोर्ट दिला व त्‍यामध्‍ये सदर मीटर हा अबनॉर्मल फास्‍ट असल्‍या बाबतचा अभिप्राय दिला हे म्‍हणने खोटे व चुकीचे आहे. अर्जदाराने या प्रकरणांत जो रिपोर्ट दाखल केलेला आहे तो रिपोर्ट मीटर क्र.डी60. 2के 40377184 हा आहे जेंव्‍हा की जे विजेचे देयक अर्जदाराने या प्रकरणांत दाखल केले आहे त्‍यामध्‍ये नोंदविलेला मीटर क्र.9040327184 असा आहे, या अर्थ उघड आणी स्‍पष्‍ट आहे की, जे बिल दाखल करण्‍यात आल आहे तेथे असलेल्‍या विजेच्‍या मीटरचा तो तपासणी अहवाल नव्‍हे त्‍यामुळे अर्जदाराला त्‍याचे तथाकथीत मीटर अबनॉर्मल फास्‍ट असे जे वाटते ते खोटे व चुकीचे आहे. गैरअर्जदारांनी टेस्‍ट अहवाल अर्जदारास देण्‍यास नकार दिला हे अर्जदाराचे म्‍हणणे खोटे व चुकीचे आहे. जुलै 2008 ते नोव्‍हेंबर 2009 या 17 महिन्‍याच्‍या कालाधीत अर्जदाराकडुन रु.1,35,680/- रुपयाचे विद्युत देयक वसुल केले. अर्जदारास रु.67,840/- रक्‍कम परत मिळण्‍यास पात्र आहेत हे म्‍हणणे खोटे व चुकीचे आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराचा मानसिक छळ व मानसिक त्रास केल्‍यामुळे रु.1,00,000/- मिळण्‍यास व दावा खर्च रु.10,000/- ही अर्जदाराची मागणी चुकीची आहे. अर्जदाराने त्‍यांच्‍या फिर्यादीतील फोलपणा माहिती सतनां दबाव तंत्राचा वापर कराव म्‍हणुन ही तक्रार दाखल केली व गैरअर्जदारास बचाव करण्‍यास भाग पाडले म्‍हणुन रु.10,000/- खर्चासह तक्रार खारीज करावी असे म्‍हटले आहे.
     अर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्‍तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात.
     मुद्ये.                                    उत्‍तर.
1.   अर्जदार हे ग्राहक होतात काय? होय.            लाभार्थी ग्राहक.
2.   गैरअर्जदाराच्‍या सेवेतील त्रुटी सिध्‍द होते काय?                      होय
3.   काय आदेश?                                                  अंतीम आदेशाप्रमाणे.
                           कारणे.
मुद्या क्र. 1
     अर्जदार यांनी कैलासनगर येथे मनपा क्र.1-17-854 त्‍यानंतर नवा क्रमांक, हे दुकान अर्जदार क्र. 2 व 3 यांच्‍याकडुन भाडेपटटीने घेतला याबद्यचा करारनामा क्र.5557/2005 दाखल आहे. या दुकानास ग्राहक क्र.550011006485 याद्वारे विद्युत पुरवठा होत होता. अर्जदार क्र. 1 म्‍हणजे भाडेकरुन व अर्जदार क्र. 2 व 3 हे दुकान मालक या तिघांना एकत्रिपणे येऊन ही तक्रार दाखल केलेली आहे. विद्युत बिल हे अर्जदार क्र. 1 हे भरत होते व याचा लाभ देखील त्‍यांनाच मिळणार होता म्‍हणुन ते लाभार्थी ग्राहक असुन त्‍यांना असे प्रकरण दाखल करता येते. म्‍हणुन मुद्या क्र. 1 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.
मुद्या क्र. 2
    अर्जदार क्र.1 यांची तक्रार त्‍यांनी दुकान भाडयाने घेतल्‍यापासुन विद्युत मिटर हा जास्‍त गतीने चालतो त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे मार्च,एप्रिल,मे,जुन या चा महिन्‍यात जास्‍त लोड असते. गैरअर्जदाराने याबाबत वेळोवेळी सांगीतले व त्‍याकडे लक्ष दिला नाही शेवटी दि.20/11/2009 रोजी पत्र देऊन लेखी तक्रार केली तेंव्‍हा मिटर टेस्‍टचे रु.300/- गैरअर्जदाराच्‍या सांगण्‍याप्रमाणे भरले व मीटर टेस्‍टींगसाठी युसीआर डीव्‍हीजन यांचेकडे पाठविला. टेस्‍टींग युनिटमध्‍ये त्‍यांचा‍ मीटर टेस्‍ट झाल्‍यानंतर दि.15/02/2010 च्‍या रिपोर्टनुसार ते अबनार्मल फास्‍ट असल्‍याबद्यल स्‍पष्‍ट झाले तेंव्‍हा अबनार्मल म्‍हणजे दुपटी पेक्षा जास्‍त वेग होता असा त्‍याचा अर्थ होतो या अनुषंगाने स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर दि.04/03/2010 ला गैरअर्जदारांना जास्‍तीची भरलेली रक्‍कम वापस मागीतली. अर्जदाराच्‍या तक्रारी प्रमाणे दि.01/07/2008 पासुन दि.30/11/2009 पर्यंत त्‍यांनी जास्‍त युनिटचे बिल दिले व यासाठी जास्‍तीची रक्‍कम रु.1,35,680/- वसुल केली. अर्जदाराच्‍या मते मीटर हे त्‍यांनी दुकान घेतल्‍यापासुन म्‍हणजे 2005 पासुन वेगाने फीरत होते व त्‍यांनी वारंवार तक्रार केली असे म्‍हटले आहे. यावर जी लेखी तक्रार देखील दि.20/11/2009 ला केली. मीटर टेस्‍टींगचे पैसे दि.29/11/2009 ला भरले आहे व मीटर दि.15/02/2010 ला टेस्‍ट करण्‍यात आले. याप्रमाणे रिपोर्टमध्‍ये मीटर फाऊंड अबनार्मन फास्‍ट असे करण्‍यात आलेले आहे. मीटर जेंव्‍हा टेस्‍ट केले तेंव्‍हा मीटर रिडींग 09 होती, अक्‍युचेकने टेस्‍ट केले तेंव्‍हा 02 रिडींग होती म्‍हणजे 7 युनिट जास्‍त होते व किती जास्‍त वेगाने मीटर फिरत होते या विषयीचे स्‍पष्‍ट केले़ नाही. मीटर टेस्‍टींग यात मीटर अनुक्रमांक 40377184 असा लिहीलेला आहे तेंव्‍हा अर्जदाराचे मीटर हे टेस्‍ट केलेले मीटर नाही, असे गैरअर्जदाराने आक्षेप घेतला आहे. या विषयी बिलाचे अवलोकन केले असता, दि.17/10/2008 च्‍या बिलात मीटर क्र.8040327184 असा दर्शविण्‍यात आहे व रिपोर्टमध्‍ये 40377184 शेवटचे 7184 ही फीगर बरोबर आहे फक्‍त 32 च्‍या जागी 37 लिहीले आहे जे की, लिहीण्‍यातील चुक आहे, असे दिसुन येते कारण वेगळा नंबर किंवा व शेवटचे आकडे त्‍याच्‍याशी मिळाले नसते तसेच दुस-या नंबरचे मीटर कुठून आले हे गैरअर्जदार सांगु शकत नाहीत.   म्‍हणुन गैरअर्जदाराचा आक्षेप आम्‍ही खारीज करीत आहोत व अर्जदार यांचेकडे जे मीटर होते तेच मीटर टेस्‍ट केले गेले हे स्‍पष्‍ट होते. सुरुवाती पासुनचे बिलाचे अवलोकन केले असता देयक दि.16/08/2008 पासुन दि.10/11/2009 पर्यंतच्‍या प्रत्‍येक महिन्‍याच्‍या बिलामध्‍ये 40327184 हे मीटर खरे लिहीले आहे. यानंतर दि.08/12/2009 पासुन मीटर बदलले आहे म्‍हणजे त्‍यावर मीटर क्र.6501997984 असा आहे. म्‍हणजे 16 महिने अबनॉर्मल फास्‍ट म्‍हणुन बिले आले आहे. यातील नक्‍की केंव्‍हा पासुन मीटर टेस्‍ट झाले हे सांगता येणे शक्‍य नाही. म्‍हणुन या 16 महिन्‍यात अर्जदाराने जे पावत्‍या दाखल केल्‍या आहेत याप्रमाणे रु.1,32,060/- ची रक्‍कम वरील काळासाठी अर्जदाराने भरली आहे. परंतु तक्रार ही दि.20/11/2009 ला केली यासाठी संथ गतीने मीटर चालते तेंव्‍हा असेसमेंट 12 महिन्‍याचा धरतो सेक्‍शन 136 व बी सेक्‍शन 123 प्रमाणे दिले. आपण मागील 12 महिन्‍या पासुन मीटर फास्‍ट होते असा हीशोब धरले तर यावर सुरुवातीचे चार महिने म्‍हणजे दि.16/08/2010 ते दि.15/11/2008 इथपर्यंतचे हीशोब म्‍हणजे भरलेले रु.1,32,060/- मधुन सरुवातीचे चार महिन्‍याची रक्‍कम रु.22,030/- कमी केल्‍यास रु.1,10,030/- यातुन मीटर दुपटीपेक्षा जास्‍त वेगाने फीरत होते म्‍हणजे दुपट वेगाने फीरत होते असे जर लक्षात घेतले तर 50 टक्‍के रक्‍कम कमी होईल म्‍हणजे रु.55,015/- एवढी रक्‍कम अर्जदाराने जास्‍तीचे भरली असे म्‍हणावे लागेल. यानंतर नोव्‍हेंबर 2009 चे देयक दि.08/12/2009 पासुन म्‍हणजे जी बिले अर्जदारांना आली आहे ती नविन मीटरवरुन आली आहे व ती योग्‍य आहेत. याबाबत अर्जदाराने या महिन्‍या पासुन आजपर्यंत म्‍हणजे सप्‍टेंबर 2010 पर्यंत साधारणतः नऊ महिन्‍याचे बिल भरल्‍याबद्यल कुठलाही पुरावा दाखल केला नाही. वादग्रस्‍त बिले सोडुन नियमीत बिले अर्जदारांना भरणे आवश्‍यक होते. परंतु असे असतांना त्‍यांनी वादग्रस्‍त बिले भरले आहे व नियमीत बिले भरले नाहीत.  वादग्रस्‍त बिल ही अबनॉर्मल फास्‍ट या मीटरचे असल्‍या कारणाने व मीटर केंव्‍हा पासुन वेगाने फीरते याचे नक्‍की महीना माहीत नसल्‍या कारणांने आम्‍ही 12 महिन्‍याचे बिलाचा हीशोब धरुन त्‍यातुन दुपटीने मीटर फास्‍ट फीरते म्‍हणुन अर्धी रक्‍कम रु.55,000/- वापस मिळण्‍यास अर्जदार पात्र ठरवितो. यापुढील नोव्‍हेंबर पासुनची जी बिले देण्‍यात आली आहे ती सप्‍टेंबर 2010 चे नियमीत बिलाची बेरीज करुन किती रक्‍कम निघते यात रक्‍कम रु.55,000/- समायोजित करण्‍यात यावे व यातुन काही रक्‍कम अर्जदाराकडे निघत असल्‍यास ती त्‍यांनी गैरअर्जदाराच्‍या कार्यालयात ताबडतोब भरावी.
     वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                            आदेश.
1.   अर्जदाराचा तक्रारअर्ज मंजुर करण्‍यात येतो.
2.   गैरअर्जदारांनी या निकाला पासुन 30 दिवसांच्‍या आंत जास्‍तीची वसुल केलेली रक्‍कम रु.55,000/- अर्जदारांना वापस करावी. वरील रक्‍कम अर्जदारांनी पुढील नोव्‍हेंबर 2009 पासुनची बिले भरली नसतील तर असे नियमीत बिले सप्‍टेंबर 2010 अखेरची एकुण रक्‍कम निघेल त्‍या रक्‍कमेत वरील रककम समायोजीत करावी व यानंतर अर्जदाराकडे काही रक्‍कम जर निघत असेल तर ती रक्‍कम त्‍यांनी गैरअर्जदारांना अदा करावी.
3.   गैरअर्जदारांनी, अर्जदारास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणुन रु.2,000/- द्यावी. ही रक्‍कम अर्जदारांना सरळ न देता अर्जदाराच्‍या नियमीत बिलामध्‍ये गैरअर्जदारांना समायोजित करता येईल.
4.   संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्‍यात यावा.
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख)      (श्री.सतीश सामते)     
       अध्‍यक्ष               सदस्‍या                  सदस्‍य
 
 
गो.प.निलमवार.लघूलेखक
 
 

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER