जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 326/2008. प्रकरण दाखल तारीख - 30/09/2008 प्रकरण निकाल तारीख - 15/01/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. रंगराव दत्तराव देशमुख वय, 42 वर्षे, धंदा, - शेती रा. बारड ता मुदखेड जि. नांदेड. अर्जदार विरुध्द. 1. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. मार्फत अधिक्षक अभिंयता, नांदेड मंडळ, विद्यूत भवन, नांदेड. गैरअर्जदार 2. कनिष्ठ अभिंयता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. बारड विभाग ता. मुदखेड जि. नांदेंड. अर्जदारा तर्फे वकील - अड.सी.डी.इंगळे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे - अड.विवेक नांदेडकर. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार यांच्या सेवेच्या ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांचे मालकीचे शेत गट नंबर 474 मौजे बारड ता. मुदखेड जे की वडिलोपार्जीत जायजाद आहे. तेथे वर्ष,2006-07 साठी ऊसाची लागवड केली होती. त्यांचे शेतामधून 11 के.व्ही. ची विज लाईन गेलेली आहे व त्या लाईटचा एक कट पॉईट अर्जदार यांच्या शेतात आहे. दि.15.04.2006 रोजी सांयकाळी आठ वाजण्याचे सूमारास विद्यूत वाहीनीची तार लूझ असल्यामूळे शॉर्टसर्किट झाले, अर्जदार यांच्या शेतामधील ऊसावर आगीच्या ठीणग्या पडल्या व त्यामूळे ऊसाला आग लागली व त्यात अर्जदार यांचा साडेतीन एकर ऊस जळून खाक झाला, तसेच सोबत शेतातील 3 एच पी ची मोटार व पी.व्ही. सी. कंपनीचे 20 पाईप जळून खाक झाले त्यामूळे शेतक-याचे नूकसान झाले. अर्जदारास प्रतिएकर 50 टन ऊस होत आहे. याप्रमाणे त्यांचे रु.2,00,000/- चे नूकसान झाले आहे. याबददल दि.17.06.2007 रोजी पोलिस स्टेशन बारड येथे खबर दिली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिस स्टेशन यांचेमार्फत विद्यूत निरीक्षक यांना पञ गेल्यावर विद्यूत निरीक्षक यांनी दि.16.04.2007 रोजी घटनास्थळाची पाहणी केली. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना कायदेशीर नोटीस पाठवूनही गैरअर्जदार यांनी नूकसान भरपाई न देऊन सेवेत ञूटी केलेली आहे. म्हणून अर्जदार यांचे मागणी आहे की, ऊसाच्या नूकसानी बददल रु.2,00,000/- व मानसिक ञासाबददल रु.25,000/- गैरअर्जदार यांचेकडून मिळावेत अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले, त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. यात कंपनीच्या पदनामाने तक्रार केलेली आहे ती कलम 168 नुसार करता येणार नाही असा आक्षेप घेतलेला आहे. अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक नाही. त्यामूळे अर्जदाराशी त्यांचा संबंध नाही. अर्जदाराचे शेतावरुन 11 के. व्ही. ची लाईन गेल्या बाबबत गैरअर्जदार यांचा आक्षेप नाही परंतु त्या लाईनचा एक कट पॉईट अर्जदार यांचे शेतात आहे हे म्हणणे चूकीचे आहे. दि.15.04.2007 रोजी विद्यूत वाहीनीची तार लूझ झाल्यामूळे व शॉर्ट सर्किट झाल्यामूळे अर्जदाराच्या शेतामधील ऊसावर आगीच्या ठीणग्या पडल्या त्यामूळे ऊसाला आग लागली व अर्जदाराचा साडेतीन एकर ऊस जळून खाक झाला हे म्हणणे खोटे व चूकीचे आहे. गैरअर्जदाराची चूकी नसताना त्यांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नसताना अर्जदाराने हा खोटा अर्ज दाखल केलेला आहे तो खर्चासह खारीज करावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेला दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय होय. 2. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- गैरअर्जदार यांनी एक आक्षेप घेतला आहे तो म्हणजे अर्जदार यांनी तक्रार ही कंपनीच्या अधिका-यांच्या पदनामाने त्यांचे विरुध्द वैयक्तीक केलेली आहे जी की विज कायदा 2003 चे कलम 168 नुसार योग्य नाही. यावर मंचाचे म्हणणे असे की, दाखल तक्रार ही वैयक्तीकरित्या नांवाने नाही, पदनामाने तक्रार दाखल केली आहे यांचा अर्थ कंपनीच्या वतीने पदनाम धारण केलेले व्यक्ती जी कोणी असेल त्यांचे मार्फत असा होतो. त्यामूळे कलम 168 याला लागू होणार नाही. कारण ही तक्रार वैयक्तीक स्वरुपाची नाही व कंपनीचे विरुध्द असून कंपनीच्या मार्फत अधिका-याने जवाब देण्यासाठी त्या पदनामाचा उल्लेख केलेला आहे. यामूळे तक्रारीवर यांचा काहीही परीणाम होणार नाही. अर्जदाराची शेती बारड येथे असल्याबददल त्यांनी 7/12 दाखल केलेला आहे व यामध्ये त्यांचेकडे 2 हेक्टर जमिनीची मालकी आहे असे दिसते. त्यांनी वर्ष 2006-07 या वर्षासाठी ऊस 1.06 हेक्टर लावल्याची नोंद आहे. ग्राहक नंबर 550040009621 हे दत्तराव रामचंद्र यांचे नांवाचे आहे हे त्यांचे वडिलांचे नांवाने आहे व वारसा हक्काने विज कनेक्शनही त्यांचे नांवाने ट्रान्सफर जरी झाले नसले तरी एकञित हिंदू कायदा याप्रमाणे वारस व मुलगा म्हणून ते लाभार्थी आहेत म्हणून ते ग्राहक मंचात तक्रार दाखल करु शकतात. दि.15.04.2007 रोजी शॉटसर्किटमूळे ऊस जळून नूकसान झाले याबददलचा अर्ज (एफ.आय.आर.), घटनास्थळ पंचनामा शिवाय मंडळ अधिकारी, बारड यांनी केलेला पंचनामा अर्जदाराने दाखल केलेला आहे. यावरुन शेतक-याचा ऊस जळाला याबददल वाद नाही. या प्रकरणात विद्यूत निरीक्षक यांचा दि.22.05.2007 चा अहवाल दाखल आहे. यात विज वितरण कंपनीची 11 के.व्ही. लाईन गेलेली आहे व या लाईनचा एक कट पॉईट अर्जदाराच्या शेतात असल्याने दि.15.04.2007 रोजी राञी 8,00 वाजता या कट पॉईट वरील एक बी फेजचे ऊघडे जंपर लूज होते वादळ वा-यामूळे ते हलून पोलवरील लोंखडी बॅकेटला स्पर्श झाले त्यामूळे शॉट सर्किट होऊन स्पार्कीग झाली व जळीत ठीणग्या खाली ऊसावर व वाळलेल्या पाचटावर पडल्याने ऊसाचे पिकाला आग लागली असल्याचे म्हटले आहे. ऊस जळाला तो शॉर्टसर्किट मूळे हे अहवालावरुन स्पष्ट होते. परंतु ऊस हा संपूर्णतः जळत नाही त्यात ओलावा असल्याकारणाने थोडासा रस मध्ये शिल्लक राहतो व अशा प्रकारचा ऊस साखर कारखाना विकत घेतो पण त्यांला भाव कमी लागतो. त्यामूळे अर्जदाराचा संपूर्ण ऊस जळाला असे म्हणता येणार नाही. अर्जदाराने त्यांना 50 टन एकरी नूकसान झाले असते असे म्हटले आहे. बारड सर्कल मधील सरासरी ऊस हा एकरी 40 टन होऊ शकतो म्हणून अर्जदार यांचा ऊस 3.50 एकर असल्याकारणाने 3.50 40 टन 140 टन ऊसाचे उत्पन्न त्यांना झाले असते. वर्ष,2006-07 या वर्षातील भाव ऊसाला रु.800/- होता, याप्रमाणे रु.1,12,000/- चे नूकसान झाल्याचे दिसून येते. यात कारखाना घेत असलेल्या ऊसाची किंमत 25 टक्के धरल्यास एकूण रु.28,000/-कमी होतील. म्हणजे अर्जदाराचे नूकसान हे रु.84,000/- चे होते. जळालेला ऊस कारखान्यात घातला नाही असा पुरावा नाही. अर्जदाराने मोटार, पी.व्ही.सी. पाईप हे ही जळाले आहे असे म्हटले आहे. याबददल रु.6,000/- देणे योग्य होईल. असे एकूण रु.90,000/- नूकसानीपोटी अर्जदार यांना गैरअर्जदार यांचेकडून मिळू शकतात. यात मोटारीची किंमत धरलेली नाही. कारण मोटार ही सबमर्सिबल होती. दोन मोटारी हया सबमर्सिबल मोटारी आहेत असा पंचनाम्यात उल्लेख केलेला आहे व हया सबमर्सिबल मोटारी हया विहीरीमध्ये पाण्यामध्ये बॉटमला असतात. त्यामूळे आगीमध्ये त्या मोटारी जळतील हे शक्य नाही. त्यामूळे मोटारीचा खर्च मिळणार नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत रु.90,000/- व त्यावर प्रकरण दाखल केलेल्या दिनांकापासून म्हणजे दि.30.09.2008 पासून 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह अर्जदारांना दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु,1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जे.यु.पारवेकर लघूलेखक. |