Maharashtra

Nagpur

CC/187/2019

KIRAN SANJAY DUHILANI - Complainant(s)

Versus

EUREKA FORBES LIMITED - Opp.Party(s)

ADV RAHUL KISNANI

12 Sep 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/187/2019
( Date of Filing : 19 Mar 2019 )
 
1. KIRAN SANJAY DUHILANI
PLOT NO 59, BEHIND BAJAJ COLLEGE CMPDI ROAD, JARIPATKA NAGPUR 440014
NAGPUR
MAHARASHTRA
2. SANJAY MAHAMAL DUHILANI
PLOT NO 59, BEHIND BAJAJ COLLEGE CMPDI ROAD, JARIPATKA NAGPUR 440014
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. EUREKA FORBES LIMITED
7 CHAKRABERIA ROAD, KILKATA 700025 ALSO AT 3RD FLOOR, NASCOH BUILDING ,POSTAL COLONY ROAD, CHEMBUR MUMBAI 400071
MUMBAI
MAHARASHTRA
2. GRACE SERVICES
PLOT NO 107, MECOSABAGH CHRISTIAN COLONY, KADBI CHOWK, NAGPUR 440014
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 12 Sep 2019
Final Order / Judgement

(आदेश पारित व्दारा - श्री  एस.आर.आजने मा. सदस्‍य  )

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक 2 ही विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 ची फ्रॅन्‍चायजी आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक 2 ही विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 ने प्राधिकृत केल्‍यानूसार देखभाल सेवा पूरविते. विरुध्‍द पक्ष वार्षिक देखभाल शुल्‍क घेऊन वार्षिक देखभाल चा करार करते व सेवा देते.
  3. तक्रारकर्ता क्रमांक 1 व तक्रारकर्ता क्रमांक 2 हे पती पत्‍नी आहे. तक्रारकर्ता क्रमांक 1 यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 यांचे कडून दिनांक 20/11/2016 ला RO+UV  Water Purifier ( Magma Model) खरेदी केले. ज्‍याचा ग्राहक आय.डी क्रमांक 6000408105 हा आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 यांचे कार्यालयातुन एका व्‍यक्‍तीने तक्रारकर्त्‍याशी संपर्क साधला आणि वार्षिक देखभाल कराराचे नूतनीकरण करण्‍यासाठी रुपये 4,505/- देण्‍याची विनंती केली. विरुध्‍द पक्ष क्रमांक 2 यांचे कार्यालयातील कर्मचारी श्री अभिषेक सिंग यांनी तक्रारकर्ता क्रमांक 2 यांचेकडे आला आणि वार्षिक देखभाल शुल्‍क देण्‍याचे सांगितले आणि तक्रारकर्ता क्रमांक 2 यांनी दिनांक 30/12/2018 ला विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 यांना धनादेश क्रमांक 498246  त्‍यांचे चालु खात्‍यातुन दिला. सदरचा धनादेश विरुध्‍द पक्ष क्रमांक 2 यांचे कडील श्री अभिषेक सिंग यांना मिळाला आणि तो धनादेश विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 यांचे कंपनी खात्‍यात जमा झाला. तक्रारकर्त्‍याला सांगण्‍यात आले की, त्‍यांचा वार्षिक देखभाल करार नूतनीकरण करण्‍यात आला व त्‍यांच्‍या वॉटर प्‍युरीफायर ला वर्षाच्‍या 3 मोफत सेवा देण्‍यात येईल. कराराप्रमाणे दिनांक 26/12/2018 ते दिनांक 26/12/2019  दरम्‍यान काही खराबी आल्‍यास तक्रारकर्त्‍याला मोफत देण्‍यात येणा-या सेवेकरीता व प्‍युरीफायर च्‍या पार्ट करीता शुल्‍क आकारल्‍या जाणार नाही व त्‍याबाबतची पावती तक्रारकर्त्‍याला देण्‍यात आली.
  4. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याचे वॉटर प्‍युरीफायर ठिक काम करीत नव्‍हते. त्‍याकरीता तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वॉटर प्‍युरीफायर ठिक काम करीत नसल्‍याबाबत विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 यांचे कडे तक्रार केली. वॉटर प्‍युरीफायर मधुन एकसारखे पाणी गळत होते. याव्‍यतिरीक्‍त पाण्‍याचा पुरवठा थांबला आणि वॉटर प्‍युरीफायर काम करणे पूर्णपणे थांबले. तक्रारकर्त्‍याने जेव्‍हा कंपनीचे कस्‍टमर केअर यांचेशी संपर्क साधला तेव्‍हा कंपनीच्‍या प्रतिनीधीने सांगितले की, त्‍यांचा वार्षिंक देखभाल करार याचे नूतनीकरण झाले नाही आणि त्‍यामुळे ते आपणास मोफत सेवा देऊ शकत नाही. आणि त्‍यांना वॉटर प्‍युरीफायर ला सेवा देण्‍याकरीता व दुरुस्‍ती करीता पैस द्यावे लागतील. ग्राहक सेवा प्रतिनीधीने तक्रारकर्त्‍याची सेवा देण्‍याबाबतची विनंतीची नोंद घेतली ज्‍याचा नोंदणी क्रमांक 2010850430  हा होता. जेव्‍हा कंपनीचे सेवा प्रतिनीधीने तक्रारकर्त्‍याला सांगितले की तुमचा वार्षिक देखभाल करार नूतनीकरण झालेला नाही आणि तुम्‍हाला सेवा देण्‍याकरीता शुल्‍क द्यावे लागतील  त्‍यावेळेस तक्रारकर्त्‍याला धक्‍का बसला त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाला विनंती करावी लागली की, त्‍यांचे वॉटर प्‍युरीफायर शुल्‍क घेऊन दुरुस्‍त करुन द्यावे. तक्रारकर्त्‍याने शुल्‍क देण्‍याची तयारी दाखवूनही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे वॉटर प्‍युरीफायर दुरुस्‍त करुन दिले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला त्‍याची गरज भागविण्‍याकरीता दुसरे वॉटर प्‍युरीफायर विकत घ्‍यावे लागले.
  5. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची तक्रार सोडविली नाही किंवा वॉटर प्‍युरीफायर दुरुस्‍त करुन दिला नाही, तक्रारकर्त्‍याचा वॉटर प्‍युरीफायर बंद असुन तो वापरात नाही आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला नाईलाजास्‍तव मा. मंचासमोर तक्रार दाखल करावी लागली व तक्रारकर्त्‍याने तक्रारीमध्‍ये खालिलप्रमाणे मागणी केलेली आहे.
    1. घोषित करावे की, विरुध्‍द पक्ष दोषपूर्ण सेवा देण्‍याबाबत दोषी आहे.
    2. विरुध्‍द पक्षाला निर्देश द्यावे की, त्‍यांने तक्रारकर्ताकडून घेतलेले वार्षिक देखभाल शुल्‍क रुपये 4,505/- द.सा.द.शे. 24 टक्‍के दराने व्‍याजासह दिनांक 30/12/2018 पासून प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत तक्रारकर्त्‍याला परत करावे.
    3. मानसिक व शारीरीक ञासाकरीता व तक्रारीचा खर्च तक्रारकर्त्‍याला देण्‍यात यावा.
    4. विरुध्‍द पक्षास निर्देश द्यावे की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला विकत घ्‍यावे लागलेल्‍या नविन वॉटर प्‍युरीफायरची किंमत रुपये 23,000/- अदा करावे
  6. विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत नोटीस पाठ‍वूनही विरुध्‍द पक्ष मचासमोर हजर झाले नाही, करीता मंचाने विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 व 2 विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 26/07/2019 रोजी पारीत करण्‍यात आला.
  7. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत निशानी क्रमांक 2 वर सादर केलेले दस्‍ताऐवज, लेखी युक्‍तीवाद याचे अवलोकन केले व तक्रारकर्त्‍याचा वकीलांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकून मंचाने खालिल मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नोंदविली आहे.

अ.क्र.            मुद्दे                                                                     उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                           होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?                  होय
  3. काय आदेश ?                                                                 अंतिम आदेशाप्रमाणे

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांचे दरम्‍यान तक्रारकर्त्‍याचे वापरात असलेला RO+UV  Water Purifier ( Magma Model) याचे वार्षिक देखभाल करण्‍याचा करारनामा दिनांक 26/12/2018 ते 26/12/2019 या काला‍वधीकरीता दिनांक 26/12/2018 ला झाला होता. तक्रारकर्त्‍याने वार्षिक देखभाल करारापोटी विरुध्‍द पक्षाला धनादेश क्रमांक 498246  द्वारे 4,505/- इतकी रक्‍कम दिली होती. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक 2 वर दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर असे निर्दशनास आले की, विरुध्‍द पक्षाला तक्रारकर्त्‍याचे वापरात असलेले वॉटर प्‍युरीफायरचे वार्षिक देखभाली कराराची रक्‍कम रुपये 4,505/- प्राप्‍त झाली. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे हे सिद्ध होते. विरुध्‍द पक्षाला मंचाकडून नोटीस पाठवूनही विरुध्‍द पक्षाने आपले बचावात मंचासमोर दस्‍ताऐवज दाखल केले नाही किंवा हजर झाले नाही व आपली बाजु मांडली नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास त्‍याचे वापरात असलेल्‍या वॉटर प्‍युरीफायर ठिक काम करीत  नसल्‍याबाबत कंपनीचे कस्‍टमर केअर ला तक्रार नोंदवूनही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीची दखल घेतली नाही व वार्षिक देखभाल शुल्‍क स्विकारुन तक्रारकर्त्‍याचा वार्षिक करारनामा नूतनीकरण न झाल्‍यामुळे आपणास सेवा देऊ शकत नाही असे सांगितले परंतू सेवेबाबत करारनामा  अस्तित्‍वात आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्ता कडून वार्षिक देखभाल शुल्‍क स्विकारुन सुद्धा तक्रारकर्त्‍याला सेवा न पूरविणे ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्ताप्रती दोषपूर्ण सेवा आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. करीता तक्रारकर्त्‍याची मागणी मंच मंजूर करीत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

       

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची  तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. विरुध्‍द पक्षास निर्देश देण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे वापरात असलेले Water Purifier RO+UV (Magma Model), ग्राहक आय.डी. क्रमांक 6000408105 हा दुरुस्‍त करुन द्यावा.
  3. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरीक व मानसिक ञासाकरीता रुपये 12,000/-  आणि तक्रारीच्‍या खर्चाबाबत रुपये 5,000/-   अदा करावे.
  4. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  5. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.