तक्रार क्रमांक – 22/2009
तक्रार दाखल दिनांक – 07/01/2009
निकालपञ दिनांक – 30/12/2009
कालावधी - 00 वर्ष 11महिना 23दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर
श्री./श्रीमती/मे. किर्ती जे.शाह/पन्ना के शाह
रा. 47, कुंभारआळी, आर्शिवाद बिल्डींग
मु.पो.ता.भिवंडी, जि - ठाणे.
पिन कोड नं.231308(महाराष्ट्र). .. तक्रारदार
विरूध्द
1. युरेका कन्सन्टींग
प्रो. फैजल मो. हनिफ अंन्सारी
167, ठाणे रोड, भिवंडी 421 308.
जि. - ठाणे, महाराष्ट्र. .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा
श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य
सौ. भावना पिसाळ - सदस्य
उपस्थितीः- त.क स्वतः
वि.प तर्फे वकिल बाळासाहेब भास्कर
आदेश
(पारित दिः 30/12/2009)
मा. सदस्य सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार
1. सदरहु तक्रार श्री/श्रीमती/मे.शाह यांनी श्री/श्रीमती/मे. युरेका कन्सल्टींग यांचे विरुध्द दाखल केली आहे यात त्यांनी ताबा घेतलेल्या सदनिकेत गळतीबाबत दुरूस्ती व इमारतीचे बांधकाम पुर्ण करण्याबाबत नुकसान भरपाई सकट रु.73,480/- मागितले आहेत.
2. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार यांच्याकडुन सदनिकेच्या करारनाम्याचे दि.06/05/2005 रोजी नोंदणीकृत करुन घेतले व ठरलेल्या किंमतीपैकी रु.1,00,000/- बयाणा रक्कम दिली व पुढे बांधकाम पुर्ण होताना रु.1,78,000/- अशी ठरलेली पुर्ण किंमत विरुध्द पक्षकार यांना दिली. दि.16/08/2007 रोजी विरुध्द पक्षकार यांनी सदनिकेचा ताबा
.. 2 ..
तक्रारकर्ता यांना दिला. परंतु तक्रारकर्ता यांच्या ताबा घेऊन रहायला गेल्यावर सदनिकेतील गळतीची समस्या लक्षात आली त्यामुळे सदर गळतीची दुरूस्तीच्या खर्चाची रक्कम देण्याबाबत तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकाराकडे मागणी केलेली आहे.
3. विरुध्द पक्षकार यांनी त्यांची लेखी कैफीयत दि.11/05/2009 रोजी निशाणी 5 वर दाखल केली असुन यामध्ये त्यांनी तक्रारकर्ता यांची तक्रार नाकारली असुन तक्रारकर्ता यांनी सदर तक्रार सदनिकेचा ताबा मिळाल्यानुतर 4 वर्षानी दाखल केली आहे व 4 वर्षानंतर सदनिकेत म्युनिसीपालीटीने बांधलेल्या नाल्यांचे बांधकामामुळे गळती झालेल्या तक्रारीला विरुध्द पक्षकार जबाबदार असु शकत नाहीत असे विरुध्द पक्षकार यांचे म्हणणे आहे. तक्रारकर्ता यांनी पाण्याच्या गळतीच्या दुरूस्तीची कोणतीही बिले सादर केलेली नाहीत.
4. उभयपक्षकारांची शपथपत्रे, पुरावा, कागदपत्रे तपासुन पाहिली व मंचापुढे पुढील प्रश्न उपस्थित होतो.
प्र. विरुध्द पक्षकार यांच्या सेवेत निष्काळजीपणा व त्रृटी आढळतात का?
वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच होकारार्थी देत असुन पुढील कारण मिमांसा देत आहे.
कारण मिमांसा
तक्रारकर्ता यांच्या सेदनिकेत ताबा मिळाल्यापासुनच पाणी गळती चालु आहे. त्यांना ताबा मिळाल्यावरही विरुध्द पक्षकार यांनी ताबा प्रमाणपत्र दाखल केलेली नाही. त्यामुळे पुर्ण गळती बंद करण्याची जबाबदारी विरुध्द पक्षकार यांचेवरच आहे. तक्रारकर्ता यांच्या मागणी प्रमाणे रक्कम रु.73,480/- खर्च दाखवला असला तरी सदर खर्चाचा ठोस पुरावा मंचापुढे सादर नाही ज्या पावत्या सादर आहेत त्यावर तारीख नसल्याने त्या नक्की कशाच्या व केव्हाच्या आहेत ते समजत नाही. त्यामुळे तो ठोस पुरावा होऊ शकत नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांची अंतिम मागणी रु.73,480/- रक्कम मिळण्याची हे मंच फेटाळुन लावत आहे. परंतु तक्रारकर्ता यांच्या सदनीकेतील गळतीची दुरूस्ती करण्याची जबाबदारी हे मंच विरुध्द पक्षकार यांचे वर टाकत आहे.
.. 3 ..
अंतीम आदेश
1.तक्रार क्र.22/2009 हि अंशतः मंजुर करण्यात येत असुन या तक्रारीचा खर्च रु.500/-(रु. पाचशे फक्त) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांना द्यावी.
2.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्तायास त्यांच्या सदनीकेच्या गळतीची दुरूस्ती करुन द्यावी व गळती थांबवावी. या आदेशाचे पालन ह्या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 2 महीन्याच्या आत करावे.
3.विरुध्द पक्षकार यांनी मानसिक त्रासाचे रु.500/-(रु. पाचशे फक्त) तकारकर्ता यांस द्यावेत.
4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
5.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यांकरिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही.
दिनांक – 30/12/2009
ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ) (सौ.शशिकला श.पाटील)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे